Author: अनंत पांगारकर

महाराष्ट्र संवाद न्यूज अवघ्या महाराष्ट्राचे आकर्षण आणि पर्यटक, गिर्यारोकांचे साहस केंद्र असलेल्या अकोले तालुक्यातील कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्यात १३० प्रजातीचे पक्षी आढळून आले आहेत. कळसुबाई हरिचंद्रगड अभयारण्यात पहिलेच पक्षी सर्वेक्षण २३ ते २५ फेब्रुवारी दरम्यान पार पडले. हे सर्वेक्षण कळसुबाई हरिचंद्रगड अभयारण्य, वन्यजीव विभाग नाशिक आणि आऊल कन्सर्वेशन फाउंडेशन यांच्यावतीने घेण्यात आले. यामधे महाराष्ट्रासह बाहेर राज्यातील १६ पक्षी निरीक्षक सहभागी झाले होते. अभयारण्याच्या दोन वनपरिक्षेत्रामध्ये प्रत्येकी ४ असे अभयारण्य मिळून ८ मार्ग आखण्यात आले होते. हे मार्ग उंच-सखल जंगला नुसार कमीत कमी २ ते जास्तीत जास्त ५ किलोमीटर असे आखण्यात आले होते. सहभागी झालेल्या पक्षी निरीक्षकांनी वनरक्षक आणि वनमजूर यांच्या सहकार्याने…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज महाराष्ट्र व गोवा या राज्यातील महिलांसाठी महिला दिनाच्या निमित्ताने ‘खेलो इंडिया – दस का दम’ या नावाने योगासन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने येत्या 12 मार्च रोजी पुण्यातील सूस येथील ध्रुव ग्लोबल स्कूलमध्ये पहिल्यांदाच अशाप्रकारच्या या स्पर्धा होणार असल्याची माहिती महाराष्ट्र योगासन स्पोर्ट असोसिएशनचे सचिव डॉ. संजय मालपाणी यांनी दिली. वय वर्ष 9 ते 18 आणि 19 ते 55 अशा दोन गटात होणार्‍या या योगासन स्पर्धेत पारंपरिक व कलात्मक या दोन क्रीडा प्रकारांपैकी कोणत्याही एका प्रकारात महाराष्ट्र आणि गोव्यातील कोणत्याही महिला स्पर्धकाला सहभागी होता येईल. या स्पर्धेसाठी तयार केला गेलेला अभ्यासक्रम नॅशनल योगासन…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात केलेले ट्विट एका तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. मुंबईतील सार्थक कापडी या तरुणा विरोधात नागपूरच्या लकडगंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कापडी हा युजर मुंबईतला असून तो उद्धव ठाकरे गटाचा कार्यकर्ता आहे. असं सांगण्यात येत आहे. “एकनाथ शिंदे तुला हे सर्व इथेच भोगाव लागणार आहे तुला xxxxx असेल ना तर निवडणुका घेऊन दाखव xxxxxxxx. एकनाथ शिवरायांच्या आशीर्वादामुळे नाही तुझा xxx बसलाय ना दिल्लीत त्याच्या आशीर्वादाने तुला धनुष्यबाण भेटला आहे”, असं त्याने या ट्वीटमध्ये लिहिलं होतं. तसंच “चंद्रकांत पाटील चंपा तुझी लायकी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर तालुक्यातील धांदरफळ येथील देशमुख मळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी बाल आनंद मेळाव्यामध्ये मातृ-पितृ पूजन या उपक्रमाचे आयोजन करून पाश्चिमात्य संस्कृतीचे अंधानुकरण नको असा संदेशच जणू दिला. शाळेत चिमुकल्यांनी आई-वडिलांचे पूजन करून आई-वडिलांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा आगळावेगळा दिन साजरा केला. आपल्या राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात सद्यस्थितीत पाश्चिमात्य संस्कृतीचे अंधानुकरण होत आहे. व्हॅलेंटाईन डे, रोज डे, हग डे असे वेगवेगळे डे साजरे करण्यासाठी तरुणाई पुढे सरसावत आहे.  मात्र, आपली भावी पिढी सात्विक आणि सुसंस्कृत व्हावी यासाठी चिमुकल्यांना चांगले संस्कार मिळावे या उदात्त हेतूने देशमुख मळा शाळेतील उपक्रमशील शिक्षिका वृषाली कडलग यांच्या पुढाकाराने मातृ-पितृ पूजन व बाल…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर : वाळू माफीयांवरील कारवाई कोणाला दडपशाही वाटत असेल तर, मला त्‍याची फिकीर नाही. माफीयांच्‍या तावडीतून प्रवरामाई मुक्‍त केली याचे समाधान मला आहे. या वाळूच्‍या विरोधात आदरणीय खासदार साहेबांनी सुध्‍दा मोठा संघर्ष केला. त्‍याच विचाराने आपण या अवैध वाळू तस्‍करीला लगाम घातला असल्‍याचे प्रतिपादन महसूल मंत्री ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केले. तालुक्यातील जोर्वे येथे जल जीवन मिशन अंतर्गत सुमारे १४ कोटी रुपयांच्या नळ पाणी पुरवठा योजनेच्या कामाचा शुभारंभ मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला. निवृत्‍त पोलीस अधिकारी हरीभाऊ कोल्हे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील, भाजपाचे तालुका अध्यक्ष सतीश कानवडे, शहर…

Read More

होळी विशेष ● रवींद्र एरंडे अस्सल संगमनेरी बोंबाबोंब ऐकायची आणि सहन करायची असेल तर, संगमनेरच्या होळीमध्ये सामील व्हायला हवं. बदलत्या काळानुसार होळी उत्सवात बदल झाला असल्यास तरी जुन्या होळीच्या आठवणी कायम आहेत. होळी साजरं करणारं मंडळ आठवड्यापासूनच तयारीला लागतं. पूर्वी लहानपणी घरोघरी फिरून गोवर्‍या (गवर्‍या) मागीतल्या जात. वखारीतून लाकडं आणली जात, सायंकाळी होळीभोवती शेणसडा, रांगोळी, पूजा करुन होळी पेटवली जायची. मग गल्लीतल्या बायाबापड्या पुरणपोळीचा नैवेद्य घेऊन यायच्या. तांब्यातील पाण्याने प्रदक्षिणा मारायची. खोबर्‍याची वाटी जाळायची.त्याचा प्रसाद वाटायचा. “होळीच्या गवर्‍या पाच पाच…होळीपुढं नाच नाच” असा सूर निघायचा. तो साधारणतः साडे आठ पर्यंत… नंतर होळकरी पोरं टप्प्याटप्प्याने घरी जेवण करुन यायची आणि मग…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज कांद्याच्या दराने शेतकऱ्यांना रडविले असताना आता कांद्याचा प्रश्न पेटला असल्याचे दिसत आहे. अमरावतीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाहनावर कांदे फेकण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत एका व्यक्तीला ताब्यात घेतले. कमी कांद्याच्या उत्पादनामुळे जगातील अनेक देशांना रडवत असलेला कांदा आता मात्र आपल्या राज्यात भाव नसल्यामुळे शेतकऱ्यांना रडवत असल्याचे दिसत आहे. अहमदनगर जिल्ह्यात संगमनेरमध्ये माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि पारनेरमध्ये आमदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी आंदोलन झाले असतानाच आता राज्यात कांदा प्रश्नी शेतकऱ्यांमध्ये उद्रेक होताना दिसू लागला आहे. एकीकडे विरोधकांनी या प्रश्नी सभागृहात आवाज उठवताना आता आंदोलने देखील सुरू केले आहे. अशातच उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज लोकशाही देशांमध्ये दर पाच वर्षाने जनतेच्या सेवेकरांची संख्या अचानक वाढत असते. सेवेची बाधा झालेले हे लोक घरोघरी जात सेवेची संधी देण्याची मागणी करतात मात्र, त्यानंतर महिनाभरात ही साथ ओसरते आणि हे सेवेकरी जातात कुठे? असा प्रश्न उपस्थित करत याचे उत्तर पाच वर्षांनी मिळत असते, अशा शब्दात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संघचालक डॉ. मोहन भागवत यांनी सध्याच्या राजकारणावर भाष्य केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनकल्याण समिती, जनकल्याण सेवा फाउंडेशन आणि डॉ. हेडगेवार स्मारक सेवानिधी संस्थेच्यावतीने ‘सेवा भवन’ प्रकल्पाच्या इमारतीचे पुण्यामध्ये शनिवारी डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर जनकल्याण समितीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त गांधी लॉन्स येथे झालेल्या कार्यक्रमात…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नाशिक समस्या नसतील तर तिथे जीवनच नाही. प्रत्येकाच्या जीवनात वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या येतात. काही समस्या मार्गी लागतात तर काहींवर उपाय नसतो. अशा समस्या सोडवल्या जाऊ शकत नाहीत. अशा समस्यांचा सामना करण्यासाठी भावनिक आधार महत्वाचा आहे. समस्या कितीही असुद्या त्यांना सामोरे जाण्याची तयारी ठेवली पाहिजे. संघर्ष असल्याशिवाय जीवन व्यर्थ आहे. नाती जपली पाहिजेत, मित्र जपले पाहिजेत, असा उपदेश प्रसिद्ध लाइफ कोच गौर गोपालदास यांनी केला. एसएमबीटी सेवाभावी ट्रस्टच्या शैक्षणिक संकूलात ‘एसएमबीटी फेस्ट २०२३’ या वार्षिकोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी ते विद्यार्थ्यांना संबोधित करत होते. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात, एसएमबीटीचे मुख्य विश्वस्त…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या घरी त्यांचे चुलत भाऊ चंद्रशेखर पाटील चाकूरकर यांनी स्वतःवर गोळी झाडून घेत आत्महत्या केली आहे. तातडीने घटनास्थळी पोहोचलेल्या पोलीस पथकाने पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविला आहे. घटना घडली तेव्हा शिवराज पाटील चाकूरकर हे दिल्ली होते. चंद्रशेखर पाटील हे 80 वर्षांचे होते, ते शिवराज पाटील चाकूरकर यांच्या लातुर येथील घराच्याजवळ राहत होते. दररोज वृत्तपत्र वाचण्यासाठी आणि सहज फेरफटका मारण्यासाठी चाकूरकर यांच्या घरी ते यायचे. आजही ते सहजपणे शिवराज पाटील चाकूरकर यांच्या ‘देवघर’ या निवासस्थानी आले होते. तिथे त्यांनी स्वतः सोबत आणलेल्या बंदुकीतून डोक्यात गोळी झाडून घेतली. फायरचा आवाज झाल्यानंतर चाकूरकर यांचे…

Read More