Author: अनंत पांगारकर
अहिल्यानगर- जिल्हा पोलीस दलातील पोलीस शिपाई संवर्गातील रिक्त ७३ पदांसाठी आयोजित करण्यात आलेल्या लेखी परीक्षेच्या वेळेत प्रशासकीय कारणास्तव बदल करण्यात आला आहे. ही परीक्षा १५ मार्च २०२६ रोजी नियोजित वेळेनुसार सकाळी ११.०० ते १२.३० या वेळेत होणार होती, मात्र आता ती त्याच दिवशी म्हणजे रविवारी दुपारी ४.०० ते ५.३० या वेळेत घेतली जाणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. ही लेखी परीक्षा ‘न्यू कॉमर्स बिल्डिंग, न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, बॉईज हॉस्टेल गेट, बालिकाश्रम रोड, अहिल्यानगर’ या केंद्रावर पार पडणार आहे. परीक्षेच्या बदललेल्या वेळेनुसार उमेदवारांनी परीक्षेच्या दोन तास आधी म्हणजेच दुपारी २.०० वाजेपर्यंत…
अहिल्यानगर: न्यायालयातील दीर्घकाळ प्रलंबित असलेली प्रकरणे अल्पावधीत निकाली काढण्यासाठी पक्षकारांनी लोकअदालतीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. विशेषतः तडजोडपात्र प्रकरणांमध्ये सकारात्मक भूमिका घेऊन सामंजस्याने तोडगा काढणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आशिष पाटील यांनी केले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, बार असोसिएशन आणि सेंट्रल बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने अहिल्यानगर जिल्हा न्यायालय तसेच सर्व तालुका न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते रोपाला पाणी घालून उत्साहात पार पडले. यावेळी उपस्थित पक्षकार आणि विधी क्षेत्रातील मान्यवरांना मार्गदर्शन करताना न्यायाधीश पाटील बोलत होते. या प्रसंगी व्यासपीठावर जिल्हा न्यायाधीश-३…
संगमनेर, प्रतिनिधी – स्वातंत्र्यसंग्रामात वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी उडी घेणारे आणि आयुष्यभर शब्दांचा पक्केपणा व मनाचा सच्चेपणा जपणारे स्वातंत्र्यसेनानी भाऊसाहेब थोरात हे समाज विकासासाठी झटणारे एक ‘कृतीशील संत’ होते, असे गौरवपूर्ण उद्गार ज्येष्ठ साहित्यिक मल्हार अरणकल्ले यांनी काढले. अमृत उद्योग समूहाच्या वतीने सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या १६ व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त कारखाना कार्यस्थळावरील प्रेरणास्थळ येथे आयोजित अभिवादन सभेत ते मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलत होते. याप्रसंगी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, थोरात कारखान्याचे व्हाईस चेअरमन पांडुरंग घुले, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, डॉ. जयश्रीताई थोरात, अमेय प्रकाशाचे उल्हास लाटकर यांच्यासह अमृत उद्योग समूहातील विविध संस्थांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या…
मुंबई: राज्यातील बळजबरीने, आमिष दाखवून आणि फसवणुकीद्वारे होणाऱ्या बेकायदेशीर धर्मांतराच्या घटनांना कायमचा लगाम घालण्यासाठी राज्य सरकारने पावले उचलली आहेत. गृह राज्यमंत्री पंकज भोयर यांनी शुक्रवारी विधानसभेत ‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक’ सादर केले असून, यामुळे बेकायदेशीर धर्मांतराविरोधात कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातील १० वे राज्य ठरणार आहे. राज्यात गेल्या काही काळात प्रलोभने आणि फसवणुकीतून धर्मांतर केल्याच्या तक्रारींमध्ये मोठी वाढ झाली असून, त्यामुळे सामाजिक सलोखा बिघडत असल्याचा मुद्दा सरकारने अधोरेखित केला आहे. या प्रस्तावित कायद्यानुसार, बेकायदेशीर धर्मांतर घडवून आणणाऱ्या व्यक्तीला किंवा संस्थेला ७ वर्षांचा तुरुंगवास आणि ५ लाख रुपये दंडाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. जर एखाद्या दोषी व्यक्तीने पुन्हा असाच अपराध केला,…
आजचे सविस्तर राशिभविष्य: शनिवार, १४ मार्च २०२६ मेष आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहाचा राहील. कामाच्या ठिकाणी तुमच्या कर्तृत्वाचा प्रभाव पडेल आणि वरिष्ठांकडून तुमच्या कामाचे कौतुक होईल. नवीन जबाबदाऱ्या स्वीकारण्यासाठी हा काळ योग्य आहे. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील आणि जोडीदारासोबतचे संबंध अधिक दृढ होतील. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, विशेषतः खाण्यापिण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवा. वृषभ आर्थिक दृष्टीकोनातून आजचा दिवस फलदायी ठरेल. जुन्या गुंतवणुकीतून लाभ मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायामध्ये नवीन संधी चालून येतील, ज्यामुळे भविष्यात चांगला फायदा होईल. जवळच्या नातेवाईकांशी असलेले मतभेद मिटतील आणि घरात खेळीमेळीचे वातावरण राहील. संध्याकाळचा वेळ मित्रपरिवारासोबत आनंदात जाईल. मिथुन आज तुम्हाला संमिश्र फळे मिळतील. मनातील द्विधा अवस्थेमुळे…
अहिल्यानगर, विशेष प्रतिनिधी अहिल्यानगर जिल्ह्यातील मिरजगाव परिसरातून बेपत्ता असलेल्या वृद्ध पित्याचा त्यांच्याच मुलाने, सुनेने आणि जावयाने मिळून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार असलेल्या जावयाने अकोला जिल्ह्यात आपल्या प्रेयसीचाही खून करून तिचा मृतदेह जाळल्याची कबुली दिली आहे. स्थानिक गुन्हे शाखेने अतिशय चाणाक्षपणे तपास करत या दोन्ही गुन्ह्यांचा उलगडा केला असून आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. कर्जत तालुक्यातील चिंचोली रमजान येथील बापू आनंदा गाढवे (वय ६०) हे गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता होते. याप्रकरणी त्यांचा मुलगा आकाश बापू गाढवे यानेच मिरजगाव पोलीस ठाण्यात ५ मार्च २०२६ रोजी मिसिंगची तक्रार दाखल केली होती. या प्रकरणाचे गांभीर्य…
संगमनेर, प्रतिनिधी – संगमनेर तालुका व शहरात वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, कमी दाबाने मिळणारी वीज आणि ग्रामपंचायतींच्या पाणीपुरवठा योजनांचे तोडलेले कनेक्शन या मुद्द्यांवरून आक्रमक होत युवक काँग्रेसच्या डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या नेतृत्वाखाली वीज वितरण विभागाच्या कार्यालयात तीव्र ठिय्या आंदोलन करण्यात आले. राज्यभरात उन्हाची तीव्रता प्रचंड वाढली असतानाच महावितरणच्या गलथान कारभारामुळे शेतकरी, विद्यार्थी आणि सामान्य नागरिक होरपळून निघत आहेत. सध्या उन्हाळ्यामुळे पिकांना पाण्याची नितांत गरज असून दुसरीकडे विद्यार्थ्यांच्या परीक्षांचा कालावधी सुरू आहे. अशा परिस्थितीत अवेळी आणि कमी दाबाने वीज मिळत असल्याने सिंचनासह विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर मोठा परिणाम होत आहे. विशेषतः गुंजाळवाडी, वडगाव पान, समनापूर, खांडगाव यांसारख्या अनेक गावांमधील पाणीपुरवठा योजनांची वीज तोडल्याने…
संगमनेर, प्रतिनिधी- मुंबई येथे सुरू असलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात संगमनेर तालुक्यातील पोलीस ठाण्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर आमदार अमोल खताळ यांनी जोरदार आवाज उठवला. संगमनेर शहर, तालुका आणि घारगाव पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांचा प्रश्न, अपुरे मनुष्यबळ आणि मूलभूत सुविधांची गरज याकडे त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधून तातडीने निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली. आमदार खताळ यांनी मांडलेल्या मुद्द्यांमध्ये पोलीस निवासस्थानांच्या दुरवस्थेचा प्रश्न अत्यंत कळीचा ठरला. संगमनेर शहर आणि तालुका पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांची निवासस्थाने राहण्यायोग्य राहिलेली नाहीत, ज्यामुळे पोलीस आणि त्यांच्या कुटुंबियांना मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. यापूर्वीही हा प्रश्न शासनासमोर मांडूनही अद्याप ठोस आर्थिक तरतूद न झाल्याने त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.…
आजचे सविस्तर राशिभविष्य: शुक्रवार, १३ मार्च २०२६ मेष आजचा दिवस आपल्यासाठी उत्साहाचा राहील. कामाच्या ठिकाणी आपल्या कर्तुत्वाला वाव मिळेल आणि वरिष्ठ आपल्या कामाचे कौतुक करतील. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील. आर्थिक गुंतवणुकीसाठी आजचा काळ अनुकूल आहे, मात्र घाईने कोणताही निर्णय घेऊ नका. आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. वृषभ आज आपल्याला नशिबाची उत्तम साथ लाभेल. प्रलंबित असलेली कामे मार्गी लागल्याने मानसिक समाधान मिळेल. जोडीदारासोबतचे संबंध अधिक दृढ होतील. नवीन जबाबदाऱ्या स्वीकारण्यासाठी आजचा दिवस शुभ आहे. व्यवसायात धनलाभाचे योग असून जुन्या मित्रांच्या भेटीमुळे मन प्रसन्न राहील. मिथुन आजचा दिवस संमिश्र फलदायी ठरेल. विचारांमध्ये स्पष्टता ठेवल्यास कठीण प्रसंगातून मार्ग काढणे सोपे जाईल. अनावश्यक…
संगमनेर, प्रतिनिधी – सध्या समाजामध्ये वाढत चाललेले कॅन्सरचे प्रमाण ही एक गंभीर चिंतेची बाब बनली आहे. मात्र, प्राथमिक टप्प्यात निदान होऊन योग्य उपचार घेतल्यास हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो. याच सामाजिक बांधिलकीतून शनिवारी (दिनांक १४ मार्च) एकविरा फाउंडेशन, इंडियन कॅन्सर सोसायटी आणि एसएमबीटी सेवाभावी ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने महिला व युवतींसाठी विशेष मोफत कॅन्सर तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्षा तथा कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात यांनी ही माहिती दिली असून जास्तीत जास्त महिलांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. राज्याचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून एकविरा फाउंडेशनच्या…
