Author: अनंत पांगारकर

रविवार विशेष शनिवारी सकाळीच ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचा फोन आला आणि त्यांनी सुलोचना चव्हाण ऊर्फ माईंच्या प्रकृतीबद्दल काही माहिती घ्यायला सांगितलं. जेमतेम अर्धा तास गेला आणि माई गेल्याची बातमी आली. क्षणार्धात एक सांगितिक पट डोळ्यासमोर उभा राहिला.  काही वर्षांपूर्वी एका वाहिनीवर ढोलकीच्या तालावर नावाचा लावण्यांचे सादरीकरण असलेला एक रियालिटी शो गाजत होता. माझे मित्र पानिपतकार विश्वास पाटील त्याचे परीक्षक होते. त्यांच्या निमंत्रणावरून या शोचे शूटिंग बघायला मुंबईला गेलो. त्या दिवशी या शो साठी पाहुण्या परीक्षक म्हणून सुलोचना चव्हाण हजर होत्या. माईंनी परीक्षक म्हणुन लावणी सादर करणाऱ्या कलावतींना त्या दिवशी केलेले मार्गदर्शन ऐकून त्यांचा लावणीचा अभ्यास थक्क करून गेला. त्या…

Read More

रविवार विशेष लेख ‘‘अमेरिका श्रीमंत आहे म्हणून येथील रस्ते चांगले नाहीत तर, अमेरिका श्रीमंत आहे कारण तिथे चांगले रस्ते आहेत.’’ अमेरिकेचे पूर्व राष्ट्राध्यक्ष जॉन केनेडी यांचे हे वाक्य केंद्रिय मंत्री नितीन गडकरी आपल्या भाषणात नेहमी सांगतात. ज्या प्रदेशातील रस्त्यांचे जाळे भक्कम आहे, तेथील विकास झपाट्याने झाल्याचे पाहायला मिळतो. त्यामुळे महाराष्ट्राच्या विकासाला चालना देण्यासाठी आणि विकासापासून दूर राहिलेल्या भागाला समृद्धीच्या मार्गावर आणण्यासाठी मुंबई ते नागपूर असा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग उभारण्यात येत आहे. नागपूर ते शिर्डी हा पहिला टप्प्यातील प्रवासी वाहतूकीचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज (११ डिसेंबर) नागपूर येथून करण्यात येत आहे. त्यानिमित्ताने समृध्दी महामार्गाविषयी ठळक…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्याच्या वाहतूक व दळणवळण सेवेचे लोकार्पण नागपूर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी करणार आहे. या कार्यक्रमाचे शिर्डी इंटरचेंज येथून लाईव्ह प्रक्षेपण करण्यात येणार असल्याने या प्रक्षेपण कार्यक्रमाची पूर्व तयारी, सोयी-सुविधांची महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी शनिवारी शिर्डी इंटरचेंज येथे पाहणी केली. पालकमंत्र्यांच्या या पाहणी दौऱ्यात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे प्रकल्प संचालक विश्वनाथ सातपूते, कार्यकारी अभियंता यशवंत पाटील, शिर्डी प्रांताधिकारी गोविंद शिंदे, पोलीस उपअधीक्षक संजय सातव, कोपरगांवचे तहसीलदार विजय बोरूडे आदी उपस्थित होते. रविवारी सकाळी होणाऱ्या शिर्डी इंटरचेंज येथील लाईव्ह प्रेक्षपण कार्यक्रमास महसूलमंत्री तथा…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज आठवडाभरात दुसऱ्यांदा नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कोल्हारमध्ये बेकायदेशीर विक्रीसाठी आणलेले तीन गावठी कट्टे आणि जिवंत काडतुसांसह पाच जणांना अटक केली आहे. आठवडाभरातील सततच्या दोन घटनांमुळे कोल्हार बुद्रुक गावठी कट्टे विक्रीचे शहर बनत चालले आहे, शहरातील गुन्हेगारी पार्श्वभूमीने परिसरात खळबळ उडाली आहे. गेल्या आठवड्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कोल्हार मध्ये तीन गावठी कट्टे आणि सहा जिवंत काडतुसांसह दोन जणांना अटक केली होती. कोल्हार येथे काही लोक गावठी कट्ट्यांची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली आठवडाभरातच दुसऱ्यांदा स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पुन्हा एकदा कारवाई करत पाच जणांना…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर शहरानजिक सुकेवाडी रस्त्यावरील नाल्याच्या कडेला आढळलेल्या मृतदेहाची ओळख पटविण्यात व त्याची हत्या झाल्याचा निष्कर्ष काढण्यात शहर पोलिसांना यश आले असले तरी या तरुणाची हत्या कशासाठी करण्यात आली आणि कोणी केली याचा शोध मात्र अद्याप पोलिसांना लागलेला नाही. त्यामुळे या खुनाची उकल करण्याचे आव्हान पोलीस यंत्रणेसमोर उभे आहे. शुक्रवारी सकाळी सुकेवाडी रस्त्यावर पुनर्वसन वसाहतीच्या जवळ असलेल्या नाल्याच्या कडेला एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. या व्यक्तीचा घातपात झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष असल्याने त्याचे छायाचित्र पोलिसांनी समाज माध्यमांवर प्रकाशित केले होते. समाज माध्यमाच्या मदतीने पोलिसांना मृताची ओळख पटवण्यात यश आले. मृत तरुण हा अकोले तालुक्यातील नवलेवाडी येथील असल्याचे…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज शिंदे फडणवीस सरकारचा पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील विस्ताराला अद्याप मुहूर्त लागलेला नाही. हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता लांबणीवर पडली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्याकडील अतिरिक्त खात्यांचा कार्यभार अन्य मंत्र्यांकडे सोपविल्याने मंत्रिमंडळ विस्तार रखडण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ विस्तार न करता मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्याकडील नऊ खात्यांचा अतिरिक्त पदभार अन्य मंत्र्यांकडे सोपविला गेल्याचे सांगितले जाते. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांसह सध्याच्या शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात वीस मंत्री कार्यरत आहेत. अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार केला जावा अशी मुख्यमंत्री शिंदे गटातील समर्थक आमदार आणि भाजपच्या आमदारांची मागणी होती. त्यामुळे नव्याने मंत्रिमंडळ विस्तार करून पुन्हा खातेवाटप जाहीर केले…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज माळी महासंघाच्या उत्तर नगर जिल्हाध्यक्षपदी संगमनेर येथील कैलास लक्ष्मण भरीतकर यांची निवड झाली त्यांच्या निवडीची घोषणा माळी महासंघाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अरुण तिखे यांनी केली. कैलास भरीतकर यांनी यापूर्वी समता परिषद, महात्मा फुले प्रतिष्ठान आणि भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून समाजसेवेच्या केलेल्या अविरत कार्याची दखल माळी महासंघाने घेऊन त्यांच्यावर ही मोठी जबाबदारी दिली आहे. माळी महासंघाच्या माध्यमातून समाजाची सेवा करण्याची संधी मिळाल्याचे कैलास भरीतकर यांनी सांगितले. माळी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अरुण तिखे यांनी भरीतकर यांचे निवड जाहीर केले त्यावेळी महासंघाचे सचिव चंद्रशेखर दरवडे, दत्तूशेठ गडगे, रामचंद्र मंडलिक, संपतशेठ गलांडे, बंटी मंडलिक, अतुल अभंग, सचिन भरीतकर, अविनाश वाव्हळ, संतोष पठाडे,…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज पत्रकारांचे मातृसंस्था समजल्या जाणाऱ्या मराठी पत्रकार परिषदेच्या प्रदेश कार्यकारिणीवर दैनिक लोकसत्ताचे संगमनेर प्रतिनिधी सुनील नवले यांची निवड केल्याची माहिती संघटनेचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष अमोल वैद्य यांनी दिली. वैद्य यांनी प्रदेश प्रतिनिधी, मार्गदर्शक, सल्लागार आणि उत्तर नगर जिल्हा कार्यकारिणी जाहीर केली. लोकसत्ताचे अकोले तालुका प्रतिनिधी प्रकाश टाकळकर यांच्यासह पुण्यनगरीचे विकास अंत्रे, दैनिक सार्वमतचे अशोक गाडेकर, दैनिक दिव्य मराठीचे नवनाथ दिघे व गुरुप्रसाद देशपांडे, दैनिक सामनाचे बाळासाहेब भांड, दैनिक लोकमतचे प्रमोद आहेर व संगमनेर येथील मुक्त पत्रकार संदीप वाकचौरे यांचा मार्गदर्शकांमध्ये समावेश आहे. संघटनेच्या सल्लागारपदी दिव्य मराठीचे संगमनेर प्रतिनिधी गौतम गायकवाड, दैनिक आपलं महानगर अकोलेचे प्रतिनिधी विद्याचंद्र सातपुते, लोकमंथनचे…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज लोकांचे प्रश्न घेऊन ज्यावेळी एखादा आमदार उपोषणास बसतो त्यावेळी त्याच्याशी चर्चा करण्याची प्रशासनाची जबाबदारी असते. नगरचे जिल्हाधिकारी देखील उपोषणार्थी आमदार लंके यांच्याशी चर्चा करावयास तयार नाही ही अत्यंत दुर्दैवाची बाब आहे. यात जिल्हाधिकारी दोषी आहेतच, आणि त्यांना सूचना देणारे जास्त दोषी आहेत. सूड, जिरवाजिरवीच राजकारण यापूर्वी जिल्ह्यात कधीही नव्हतं ते आता सुरू असल्याची टीका माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. माजी मंत्री आमदार थोरात यांनी नगरमध्ये सुरू असलेल्या आमदार निलेश लंके यांच्या उपोषणाला शुक्रवारी संध्याकाळी भेट देत पाठिंबा दर्शविला, यावेळी पत्रकारांची ते बोलत होते. राहुरीचे आमदार व माजी मंत्री प्राजक्त तनपुरे त्यांच्या सोबत होते. थोरात म्हणाले,…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज  त्या अबोल तारा छेडल्यानंतर उमटलेले शब्द, बोल, ताल आणि लय यांनी उपस्थित विद्यार्थ्यांच्या मन, मेंदू आणि हृदयाच्या तारा छेडल्या. ‘झणझण छेडल्या तारा, बरसती अमृतधारा’ याची साक्षात अनुभूती घेत उपस्थित विद्यार्थ्यांसह सुमारे दोन तास सगळेच मंत्रमुग्ध झाले. सतारीच्या त्या स्वर्गीय स्वरांची जादू उपस्थितांच्या मनावर कायमची कोरली गेली. निमित्त होते विदुरजी कृष्णनाथ महाजन यांच्या सतारवादन कार्यक्रमाचे. संगमनेर तालुक्यातील पिंपरणे येथील प.पू. गगनगिरी महाराज विद्यालय या उपक्रमशील शाळेत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संगमनेर महाविद्यालय शाळा समूह योजनेच्या वतीने आयोजित ‘सतारवादन आणि विद्यार्थी संवाद’ असे या कार्यक्रमाचे स्वरूप होते. शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष बापूसाहेब देशमुख, उपाध्यक्ष कैलास काळे, महाविद्यालयाचे प्राचार्य…

Read More