Author: अनंत पांगारकर

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते आमदार भास्कर जाधव यांच्या चिपळूणमधील घरावर मध्यरात्री हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती समोर येत आहे. सतर्कता म्हणून जाधव यांच्या घरी पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. जाधव यांच्या चिपळूण (रत्नागिरी) येथील निवासस्थानासमोर दगड, क्रिकेटचे स्टंप आणि काचेच्या बाटल्या आढळल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच शिवसैनिकांनी जाधव यांच्या निवासस्थानी धाव घेत गर्दी करण्यास सुरुवात केली. कुडाळ मध्ये मंगळवारी वैभव नाईक यांच्या समर्थनार्थ काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये जाधव सहभागी झाले होते. त्यानंतर रात्रीच ते मुंबईला रवाना देखील झाले होते. मात्र आज सकाळी त्यांच्या निवासस्थानी दगड क्रिकेटचे स्टंप आणि काचेच्या बाटल्या…

Read More

पालकमंत्र्यांची परवानगी असेल तरच कार्यक्रम घ्या, नाहीतर कार्यक्रम नकोत जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क अहमदनगर जिल्ह्यातील कोणताही शासकीय अथवा समारंभ असेल त्या कार्यक्रमास, शासकीय निधीतून होणारी कामांची भूमिपुजने, उद्घाटने यांचे आयोजन करण्यापूर्वी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची पूर्व परवानगी आवश्यक असणार आहे. अशा कोणत्याही पूर्व परवानगीशिवाय कार्यक्रमांचे आयोजन केल्यास योग्य ती कारवाई केली जाणार आहे, अशा आशयाचे आदेश नगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी काढले आहेत. शासकीय कामांचे श्रेय घेण्याचे प्रकार सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जिल्ह्यात सातत्याने सुरु असतात. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजनदेखील केले जाते. राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर विखे पाटलांकडे वजनदार महसूल खात्याची जबाबदारी आली आहे. तसेच जिल्ह्याच्या पालकमंत्री…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर पद्मशाली समाज मंडळाचे माजी अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते नारायण इटप यांची पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघम् च्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. याबाबतचे अधिकृत पत्र पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघम् चे अध्यक्ष महेश कोठे तसेच सरचिटणीस गणेश पेनगोंडा यांनी दिले आहे. संगमनेरात पद्मशाली समाजात अध्यक्ष तसेच सदस्य म्हणून काम करत असताना त्यांनी केलेल्या कामाची दखल पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघम् ने घेत त्यांना ही मोठी जबाबदारी दिल्याचे सांगण्यात आले. समाजाची उन्नती व प्रगतीसाठी भविष्यात संघाच्यावतीने राबविल्या जाणाऱ्या विविध कार्यक्रमात त्यांचा सहभाग अपेक्षित आहे. आपण समाजाला काहीतरी देणे लागतो या भूमिकेतून नारायण इटप यांनी नेहमीच समाजातील तळागाळातील लोकांच्या समस्या…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क शहर पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधव यांच्याकडून काढून त्यांची चौकशी करण्याची तसेच या गुन्ह्यात आणखी दोघा आरोपींची नांवे समाविष्ठ करण्याची मागणी शिवसेनेचे शहराध्यक्ष अमर कतारी व फिर्यादी जतीन बत्रा यांनी नाशिक परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर यांच्याकडे केली आहे. या प्रकरणात शहरातील नामांकित वकील व भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष श्रीराम गणपूले यांच्यावरदेखील कतारी व बत्रा यांनी गंभीर स्वरुपाचे आरोप केल्याने या गुन्ह्याने वेगळे वळण घेतले आहे. शेखर याप्रकरणी काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे. शिवसेना शहराध्यक्ष कतारी व भाजपचे शहराध्यक्ष गणपूले यांच्यात गेल्या काही दिवसांपासून संघर्ष सुरु आहे.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क देशात सहकार मंत्रालय स्थापन करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी सहकारी साखर कारखानदारीबद्दल अनेक मोठे निर्णय घेत आहेत. तर सहकार मंत्री अमित शाह यांच्या माध्यमातून सहकार चळवळ सक्षम होत आहे. आपल्या कारखान्याने संघर्षाचे दिवस बघीतले, आता चांगले दिवस आपण बघत आहोत. आपल्या सर्वांच्या पाठबळाने नामदार विखे पाटील मोठ्या मंत्रीपदावर पोहोचले याची उतराई म्हणून इतरांपेक्षा चांगला भाव देण्याच्या स्पर्धेत विखे पाटील सर्वांच्या पूढे असेल, असे प्रतिपादन खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले. पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या ७३ व्या गळीताची सुरुवात खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आली. कारखान्याचे माजी अध्यक्ष भास्करराव खर्डे…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेरमधून 23 गोवंशीय जनावरांची वाहतूक करणारी पिकअप चालकास मारहाण करून पेटवून देण्याची घटना नगर तालुक्यातील शेंडी येथे घडली आहे. यासंदर्भात जावेद पठाण याच्या तक्रारीवरून नगरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जावेद मुसा पठाण (वय 28 वर्ष रा. ममदापूर ता. राहता) हे आपल्या पिकअपमध्ये संगमनेर येथून 23 लहानमोठी गोवंशीय जनावरे घेऊन जात असताना नगरच्या शेंडीजवळ ही घटना घडली असल्याचे सांगितले जाते. शेंडी बायपासवर या पिकअप गाडीचा काही लोकांनी पाठलाग सुरू केला होता. ही बाब पिकअप चालक पठाण यांच्या लक्षात आली असता या दरम्यान चालकाचा पिकअपवरील ताबा सुटून पिकअप पलटी झाली. त्यानंतर शेंडी बायपासवरील बर्डे…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क समृद्ध सहकाराचा वारसा लाभलेल्या संगमनेरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. पोस्टाच्या टपाल पाकिटावर सहकार महर्षी दिवंगत भाऊसाहेब थोरात यांची छबी आणि सहकारातील अग्रेसर राजहंस दुधची लोगोसह माहिती झळकली आहे. या टपाल पाकिटाचे लोकार्पण राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते करण्यात आले. भारतीय डाक विभागातर्फे वन डिस्ट्रिक्ट वन प्रॉडक्ट अंतर्गत राजहंस दूध या विशेष टपाल पाकिटाची निर्मिती करण्यात आली आहे. या विशेष टपाल पाकिटाचे विमोचन डाक अधीक्षक हेमंत खडकीकर आणि दूध संघाचे अध्यक्ष रणजीत सिंह देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले होते. त्या पाठोपाठ थोरात यांनी या पाकिटाचे एका कार्यक्रमात लोकार्पण केले. यावेळी आमदार…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क सहकारी साखर कारखाना चालविणे येड्या गबाळ्याचे काम नाही. कारखान्याने एखादे कर्ज पाच-सात वर्षात फेडणे अपेक्षित आहे. मात्र आख्खी पिढी गेली तरी कारखान्याच्या कर्जाचा बोजा कायम आहे. ऋण काढून सण साजरा करण्यासारखं कर्ज काढून भाव द्यायचा नसतो, असे सहकाराचे धडे देत जर संचालक मंडळाने माझ्या सूचना अमलात आणल्या नाही तर येथेच सभा घेऊन या संचालक मंडळाला निवडून दिल्याची चूक केल्याचे जाहीररित्या सांगेल, अशा कानपिचक्या राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी नव्या संचालक मंडळाला दिल्या. अकोलेच्या अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सत्तांतर घडल्यानंतर 29 व्या ऊस गळीत हंगामाचा व आसवानी प्रकल्पाचा शुभारंभ माजी उपमुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क पाण्यात उतरलेल्या वीज प्रवाहामुळे चार भावंडांचा मृत्यू झाल्यानंतर बर्डे कुटुंबीयांच्या सांत्वनासाठी राजकीय पदाधिकाऱ्यांचा ओघ सुरू झाला आहे. सोमवारी (ता. १७ ऑक्टोंबर) सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी देखील अकलापुरमध्ये जाऊन या कुटुंबियांचे सांत्वन केले. राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्याशी तात्काळ मोबाईलवरून संवाद साधला. त्यानंतर या कुटुंबियांना जास्तीत जास्त मदत करण्याच्या सूचनाही त्यांनी अधिकार्‍यांना दिल्या. संगमनेर तालुक्यातील खंदरमाळवाडी गावांतर्गत असलेल्या वांदरकडा येथे तुटून पाण्यात पडलेल्या विज वाहिनीचा प्रवाह पाण्यात उतरल्याने विजेचा धक्का बसून अनिकेत अरुण बर्डे, ओंकार अरुण बर्डे, दर्शन अजित बर्डे, विराज अजित बर्डे या चार भावंडांचा दुर्दैवी मृत्यूची झाल्याची…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क म्युच्युअल फंड हा गुंतवणुकीचा उत्तम पर्याय आहे. म्युच्युअल फंडाच्या एसआयपीद्वारे देखील सामान्य व्यक्ती करोडपती होऊ शकतो. अशी स्वप्न आपण पाहिली पाहिजेत, असे प्रतिपादन म्युच्युअल फंड वितरक व कडलग इन्व्हेस्टमेंटचे व्यवस्थापकीय संचालक सुनील कडलग यांनी केले. भारत सरकारच्या श्रम मंत्रालयाच्या निर्देशानुसार येथील श्री सिद्धिविनायक कार्पोरेशनतर्फे आयोजित सुतारांसाठीच्या कौशल्य निर्मिती ‘संवाद ‘ प्रशिक्षण कार्यशाळेत सुतारांनी आर्थिक नियोजनाचे धडे गिरविले. ‘भारतीय अर्थव्यवस्था व सामान्य गुंतवणूकदारांचे संपत्ति निर्माण’ या विषयावर कडलग यांनी मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी सिद्धिविनायकचे संचालक संदीप चोथवे तर अतिथी म्हणून ग्रीन प्लाईचे व्यवस्थापक राहुल साहू, मेरीनो लैमिनेट्सचे शाखा व्यवस्थापक जितेन्द्र पाटील, यूनिकोलचे नायर उपस्थित होते. कडलग म्हणाले, सद्यस्थितीत…

Read More