Author: अनंत पांगारकर

संगमनेर: प्रतिनिधी संक्रांतीचा सण आनंदाने साजरा करण्याऐवजी संगमनेर शहरात सध्या नायलॉन मांजामुळे घबराटीचे आणि दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शासनाने नायलॉन मांजावर कडक बंदी घातलेली असतानाही संगमनेरच्या बाजारपेठेत या मृत्यूच्या पाशाची सर्रास विक्री होत आहे. गेल्या दोन दिवसांपासून शहरात या मांजाने अक्षरशः कहर केला असून, सलग झालेल्या चार भीषण अपघातांमध्ये नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. प्रशासनाच्या सुस्त कारभारामुळे संगमनेरकरांच्या गळ्यावर आता नायलॉन मांजाचा सुरा फिरू लागला असून या अपघातांना जबाबदार कोण? असा संतप्त सवाल विचारला जात आहे. शहरात नायलॉन मांजाचा विळखा इतका भयानक झाला आहे की, रस्त्यावरून प्रवास करणे मृत्यूला निमंत्रण देण्यासारखे झाले आहे. नाईकवाडपुरा येथील २३ वर्षीय तरुण हुजेब…

Read More

संगमनेर | महाराष्ट्र संवाद न्यूज आमच्या काही चुका झाल्या, हे मी जाहीरपणे कबूल करतो. आणि आमच्या याच चुकांमुळे आज तालुक्यातील सत्ता कोल्ह्या-कुत्र्यांच्या’ हातात गेली आहे. पण लक्षात ठेवा, हा शरद नाना एकटा नाही, तर माझ्यासोबत असंख्य वाघ उभे आहेत. जर आमच्या नादी लागाल, तर तालुक्यात फिरणं मुश्किल होईल, अशा शब्दांत शरद नाना थोरात यांनी विरोधकांचा समाचार घेतला. पिंपरणे येथे आयोजित शेतकरी मेळावा आणि संगमनेर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष नगरसेवकांचा सत्कार समारंभवेळी झालेल्या जाहीर सभेत जिल्हा परिषदेच्या जोर्वे गटाची ‘बुलंद तोफ’ म्हणून ओळखले जाणारे शरद नाना थोरात बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राज्याचे काँग्रेसचे नेते माजी मंत्री, लोकनेते बाळासाहेब थोरात, संगमनेरच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा…

Read More

संगमनेर | महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर तालुक्याने नेहमीच प्रेमाची आणि विश्वासाची साथ दिली आहे. नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत जो उत्साह दिसला, तो केवळ विजय नसून विकासाचा ‘हाय व्होल्टेज करंट’ आहे. हाच करंट आता चुकीचं बोलणाऱ्यांना आणि सत्तेच्या जोरावर खोट्या केसेस करणाऱ्यांना घरी बसवल्याशिवाय राहणार नाही, अशा कडक शब्दांत माजी मंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी विरोधकांवर घणाघाती हल्ला चढवला. पिंपरणे (संगमनेर) येथे आयोजित भव्य शेतकरी मेळावा आणि संगमनेर नगर परिषदेच्या नूतन लोकप्रतिनिधींच्या सत्कार समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आरपीआयचे नेते सुधाकरराव रोहम होते. या मेळाव्याला व्यासपीठावर संगमनेरच्या नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे, युवा नेत्या डॉ. जयश्रीताई थोरात, रणजीतसिंह देशमुख,…

Read More

मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी उत्साहाने भरलेला असेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कल्पकतेला वाव मिळेल आणि वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक करतील. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील, मात्र रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. आर्थिक बाबतीत कोणताही मोठा निर्णय घेताना घरातील मोठ्यांचा सल्ला नक्की घ्या. वृषभ – आज तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ लाभणार आहे. अडकलेली कामे मार्गी लागल्यामुळे मनावरचा ताण हलका होईल. व्यापारात धनलाभाचे योग असून नवीन गुंतवणुकीसाठी दिवस चांगला आहे. जोडीदारासोबतचे संबंध अधिक दृढ होतील. आरोग्याची काळजी घ्या, विशेषतः खाण्यापिण्याच्या सवयींकडे लक्ष द्या. मिथुन – आजचा दिवस संमिश्र फलदायी ठरेल. कामाचा व्याप वाढल्यामुळे तुम्हाला धावपळ करावी लागू शकते. खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे…

Read More

संगमनेर | महाराष्ट्र संवाद न्यूज नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या संगमनेरच्या भूमीत एक ऐतिहासिक आणि निसर्गरम्य क्रांती घडली आहे. अमृतवाहिनी शिक्षण संस्थेच्या सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालयाच्या परिसरात महाराष्ट्रातील पहिल्या ट्युलीप गार्डनचे स्वप्न प्रत्यक्षात उतरले असून, या अभिनव उपक्रमामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष संगमनेरकडे वेधले गेले आहे. माजी कृषी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून आणि धाडसी प्रयोगातून साकारलेले हे गार्डन सध्या पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र बनले आहे. उष्ण हवामानातील यशस्वी प्रयोग- ट्युलीप ही फुले प्रामुख्याने काश्मीर खोऱ्यासारख्या अतिथंड हवामानातच फुलतात. दरवर्षी फेब्रुवारी ते एप्रिल दरम्यान हे सौंदर्य पाहण्यासाठी लाखो पर्यटक काश्मीरला भेट देतात. मात्र, हीच संकल्पना महाराष्ट्रात, विशेषतः अहिल्यानगर जिल्ह्यासारख्या तुलनेने उष्ण…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी – रब्बी हंगामाच्या पार्श्वभूमीवर संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना युरियाची कमतरता भासू नये, यासाठी आमदार अमोल खताळ यांनी कृषी विभागाचा आढावा घेतला. तालुक्यातील ४३९ कृषी सेवा केंद्रांमध्ये सध्या १५२९ मेट्रिक टन युरियाचा साठा शिल्लक असून, लवकरच नवीन रॅक उपलब्ध होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. काही भागांत खत टंचाईबाबत अफवा पसरवल्या जात असल्याच्या पार्श्वभूमीवर, आ. खताळ यांनी कृषी अधिकाऱ्यांना कडक सूचना दिल्या आहेत. युरियाचे वितरण टप्प्याटप्प्याने आणि पारदर्शक पद्धतीने सुरू असून, शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन त्यांनी केले आहे. उर्वरित मागणी पूर्ण करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असून प्रत्येक शेतकऱ्याला खत मिळेल याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शेतकऱ्यांनी…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी-  शहरात चोऱ्यांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नसून, आता वर्दळीच्या बस स्थानकावर चोरट्यांनी आपला हात साफ केला आहे. शनिवारी दुपारी बस स्थानकावर गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी एका महिलेच्या गळ्यातील सुमारे दोन लाख रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र हातोहात लांबविले. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. घारगाव (ता. संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर) येथील रहिवासी आशालता मनोहर आहेर या आपल्या पतीसह नातेवाईकांना भेटण्यासाठी संगमनेरमार्गे अकोल्याला जात होत्या. शनिवारी दुपारी संगमनेर बस स्थानकावर बसची वाट पाहत असताना आणि बसमध्ये चढण्याच्या गडबडीत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील दोन तोळ्यांहून अधिक वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र अत्यंत शिताफीने चोरले. मंगळसूत्र चोरीला गेल्याचे लक्षात येताच आहेर यांनी तातडीने…

Read More

बेरोजगारांच्या हाताला काम देण्याच्या देशातील महत्वाच्या महामंडळात सर्वाधिक बदनाम झालेल्या मध्यप्रदेशच्या व्यापम घोटाळ्याला केंद्राने राबवायला घेतलेल्या कौशल्य विकास योजनेने मागे टाकलं आहे. हा घोटाळा म्हणजे मोदी सरकारच्या ‘तुमभी खाओ, मै भी…’ या नीतीचं उत्तम उदाहरण होय. कोट्यवधींचा भ्रष्टाचार केलेल्या व्यापमने आजवर अनेकांचे जीव घेतले. त्यात हात ओले झालेले जसे होते तसे या घोटाळ्याच्या चौकशीची जबाबदारी घेतलेले अधिकारीही होते. देशात आजवर झाला नाही, असा भ्रष्टाचार या महामंडळात झाला. ज्यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या काळात हा घोटाळा झाला ते आज देशाचे कृषीमंत्री आहेत. शिवराजसिंग चौहान हे त्यांचं नाव.  महाराष्ट्रात जसं एमपीएसस्सीचं काम चालतं तसं मध्यप्रदेश सरकारच्या अधिकृत परिक्षा मंडळाचं काम व्यापमद्वारे चालतं. या महामंडळामार्फत…

Read More

मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहवर्धक असेल. नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी काळ अनुकूल आहे. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य लाभल्यामुळे मानसिक प्रसन्नता राहील. मात्र, उत्साहाच्या भरात कोणालाही शब्द देताना विचारपूर्वक द्या. आर्थिक बाजू भक्कम करण्यासाठी केलेले प्रयत्न यशस्वी होतील. वृषभ – आज तुम्हाला कामाच्या ठिकाणी सावध राहणे आवश्यक आहे. सहकाऱ्यांशी विनाकारण वाद टाळणे हिताचे ठरेल. प्रलंबित असलेली सरकारी कामे पूर्ण होण्याच्या दृष्टीने पावले उचलली जातील. कौटुंबिक जीवनात जोडीदाराच्या भावनांचा आदर केल्यास नाते अधिक सुदृढ होईल. आरोग्याची काळजी घ्या. मिथुन – तुमच्यासाठी आजचा दिवस बौद्धिक प्रगतीचा आहे. सर्जनशील कामांमध्ये तुम्हाला रस वाटेल. जुन्या मित्रांशी गाठभेट झाल्यामुळे मन आनंदी राहील. व्यवसायातील नवनवीन संधी…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी-  जादुटोणा करून ‘सर्व चांगले करून देतो’ असे आमिष दाखवून एका कुटुंबाची आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार अहिल्यानगर जिल्ह्यातील घारगांव पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आला आहे. संमोहनाचा वापर करून आरोपीने फिर्यादीच्या आईकडून सुमारे ५ लाख रुपयांची रोकड, सोन्याचे दागिने आणि पशुधन लांबवल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जांबुत खुर्द (हाळदा वस्ती) येथील रहिवासी शरद कैलास डोंगरे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. सन २०१४ मध्ये आरोपी बाळासाहेब पोटे आणि त्याच्या एका साथीदाराने फिर्यादीच्या घरी जाऊन ‘तुमचं सर्व चांगलं करतो’ असे सांगून जादुटोणा करण्याच्या बहाण्याने ५ हजार रुपये आणि एक बकरी नेली होती. त्यानंतर आरोपीने फिर्यादीच्या आईशी संपर्क वाढवून…

Read More