Author: अनंत पांगारकर

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष कार्य अधिकारी (ओएसडी) असलेले संगमनेरचे भूमिपुत्र डॉ. राहुल गेठे यांना नक्षलवाद्याकडून जीवे मारण्याचे धमकी मिळाली आहे. यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. डॉक्टर देठे यांना मिळालेल्या धमकी पत्रामध्ये म्हटले आहे की, जय लाल सलाम, जय किसान डॉक्टर राहुल गेठे को आखरी चेतावणी… एकनाथ शिंदे का ऑफिसर डॉक्टर राहुल गेठे बहुत उड रहा है. हमारा नुकसान गडचिरोली मे बहुत कर रहा है. हम हमारे भाईयों का बदला जलद ही लेने वाले है. उसकी मौत का एलान निकल चुका है. महाराष्ट्र सरकार को उसकी जबाबदारी जितना लेना हे ले लो. जय नक्षलवाद…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क राज्यभरात बिजनेस कोच म्हणून प्रसिद्ध असलेले विनीत बनसोडे आता संगमनेर मधील उद्योजकांना शनिवारी (५ नोव्हेंबर) उद्योग वृद्धीसाठी मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टच्या संगमनेर शाखेचा सेक्रेटरी डॉ. सागर गोपाळे यांनी दिली. नासिक-पुणे महामार्गावरील हिवरगाव पावसा येथील हॉटेल मयूर एक्सप्रेसमध्ये शनिवारी सायंकाळी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. विनीत बनसोडे हे बिजनेस कोच म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात सुपरिचित आहेत. सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टच्या सेक्रेटरी जनरल या पदावर ते कार्यरत आहेत. प्रसिद्ध बिझनेस कोच संतोष नायर यांचे ते गुरु आहेत. सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट ही उद्योजकांसाठीची संघटना वीस वर्षांहून अधिक काळ व्यावसायिकांसाठी कार्यरत आहे. महाराष्ट्रात ७५…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील वादामुळे निर्माण झालेली राज्यातील सत्ता संघर्षाची सुनावणी आता तब्बल चार आठवडे म्हणजेच महिना अखेरपर्यंत लांबणीवर पडली आहे. पुढील सुनावणीसाठी न्यायालयाने २९ नोव्हेंबरची तारीख निश्चित केली आहे. राज्यातील सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी सकाळी सुनावणी सुरू झाली. सुनावणी मध्ये घटनापिठाने दोन्ही बाजूच्या पक्षकारांना लिखित बाजू मांडण्यास सांगितले आहे. त्यामुळे 29 नोव्हेंबर पर्यंत दोन्ही बाजूच्या वकिलांना लिखित स्वरुपात न्यायालयासमोर कागदपत्रे सादर करावे लागणार आहे. यानंतर मात्र न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सलगपणे होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. ठाकरे गटाचे प्रवक्ते अनिल देसाई यांनी सांगितले की, सुनावणी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क सक्तवसुली संचालनालयाच (ईडी) नाव काढलं की भल्या भल्या राजकारणांना घाम फुटतो. मात्र आता एक वेगळेच प्रकरण समोर आले आहे. अनेकांना घाम फोडणाऱ्या या ईडीच्याच एका अधिकाऱ्याला सर्वोच्च न्यायालयाने तब्बल एक लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. हा दंड ईडी अधिकाऱ्याला आपल्या पगारातून भरावा लागणार आहे. 24 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा आरोप असलेल्या कॅन्सरग्रस्त बँक कर्मचारी असलेल्या आरोपीला हायकोर्टाने जामीन दिला होता, मात्र तरीही ईडीनं याला सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं. त्यामुळे सुप्रीम कोर्टानं ईडीला तर फटकारले. ईडीकडून दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी झाली. तसेच कॅन्सरग्रस्त आरोपीचा जामीन कायम ठेवला. लीगल शुल्क, स्टेशनरी सोबतच कोर्टाचा वेळही वाया घालवला, असे…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क सोलापूर जिल्हा परिषदेतील लाचखोर शिक्षणाधिकारी किरण अनंत लोहार याला एका शैक्षणिक संस्थेच्या अध्यक्षाकडून २५ हजाराची लाच घेतांना सोलापूर लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे. यामूळे राज्याच्या शिक्षण वर्तुळात खळबळ उडाली असून वरिष्ठ शिक्षण अधिकाऱ्याचा लाचखोरीचा विषय चव्हाट्यावर आला आहे. लोहार याच्याविरोधात सोलापूर शहरातील सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया रात्रीपर्यत सुरु होती. शिक्षणाधिकारी लोहार याने एका शैक्षणिक संस्थेच्या अध्यक्षाकडे ऑनलाईन असलेल्या युडायस प्लस या प्रणालीमध्ये त्यांच्या शाळेचे ८ वी ते १० वी चे वर्ग वाढ करण्याबाबत अर्ज केला असून संबधित संस्थेचे तक्रारदार अध्यक्ष हे या अर्जाबाबत पाठपुरावा करत असतांना शिक्षणाधिकारी लोहार याने ऑनलाईन असलेल्या…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क राज्यात परतीच्या पावसाने थैमान घातले असून शेतकऱ्यांची तयार झालेली पिके पाण्यात गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्यभर ३६ लाख हेक्टरवरील पिके बरबाद झाली आहेत. शेतकऱ्यांना अशा आपत्तीच्या काळात सरकारने तातडीने भरपाई व मदत देणे अपेक्षित असताना राज्यातील शिंदे- फडणवीस सरकार मात्र केवळ घोषणा व दिखावा करत आहे. शेतकऱ्यांच्या व सामान्य जनतेच्या मनात सरकारच्या या दुर्लक्षाच्या विरोधात तीव्र संताप खदखदत आहे. सोमवारी (३१ ऑक्टोबर) अकोले येथे अखिल भारतीय किसान सभेच्या महाराष्ट्र राज्य अधिवेशनाला उत्साहात सुरुवात झाली. ३१ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर असे तीन दिवस चालणाऱ्या अधिवेशनासाठी किसान सभेचे केंद्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे, केंद्रीय कोषाध्यक्ष पी. कृष्णप्रसाद, किसान सभेचे नेते…

Read More

मुख्यमंत्री शिंदे गटाच्या कार्यकारिणीला अखेर मुहूर्त लाभला; नव्या पदाधिकाऱ्यांचा खासदारांच्या हस्ते शिर्डीत सत्कार महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क ‘बाळासाहेबांची शिवसेना’ पक्षाच्या संपर्क प्रमुख पदे बाजीराव दराडे आणि बाळासाहेब उर्फ निरंजन पवार यांची तर जिल्हाप्रमुख पदी कमलाकर कोते आणि राजेंद्र देवकर यांची निवड जाहीर करण्यात आली आहे. याशिवाय उत्सुकता लागलेल्या संगमनेर तालुका अध्यक्षपदी रमेश काळे आणि राजेंद्र सोनवणे यांच्यासह शहराध्यक्षपदी दिनेश फटांगरे यांची वर्णी लागली आहे. शिवसेना फुटीनंतर प्रतीक्षेत असलेली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील ‘बाळासाहेबांची शिवसेना’ पक्षाची शिर्डी लोकसभा मतदारसंघाची कार्यकारिणी अखेर जाहीर करण्यात आली आहे. नव्या निवडीमुळे शिंदे गटाच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे शिर्डी लोकसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट झाले आहे. खासदार…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क बँकांचे राष्ट्रीयीकरण, ऑपरेशन ब्लू स्टारसह बांगलादेशची निर्मिती करणाऱ्या इंदिरा गांधी या देशाच्या कणखर नेत्या होत्या. देशाच्या विकासात ‘इंदिरा पर्व’ अत्यंत महत्त्वाचे असून भारताच्या एकात्मता व अखंडतेसाठीच त्यांनी बलिदान दिल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाद सबनीस यांनी केले आहे. अमृत उद्योग समूहाच्या वतीने सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर आयोजित स्व. इंदिरा व सरदार पटेल यांना अभिवादन व पुष्पांजली कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार डॉ. सुधीर तांबे होते. व्यासपीठावर कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ, सौ. ललिताताई सबनीस, इंद्रजीत थोरात, रामहरी कातोरे, सिताराम राऊत, अभिजीत ढोले, मिलिंद कानवडे, कार्यकारी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क आमदार बच्चू कडू आणि आमदार रवी राणा यांच्या वादात अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केली आहे. या मध्यस्थीनंतर आमदार राणा यांनी आपला आरोप मागे घेतला तर आमदार कडू यांनी कार्यकर्त्यांशी बोलून निर्णय जाहीर करणार असल्याचे सांगितले. यामुळे बच्चू कडू यांची वेगळीच भूमिका समोर आली असून ते काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागले आहे. शिंदे-फडणवीस सरकारच्या घटक पक्षांमधील दोघा आमदारांमधील वाद ५० खोक्यांच्या आरोपावरून विकोपाला गेला होता. पोलीस ठाण्यापासून न्यायालयापर्यंत पोहोचणाऱ्या या वादात ऐनवेळी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी उडी घेत मध्यस्थी केली. राणा आणि कडू या दोघांनाही मुख्यमंत्र्यांनी आपल्या वर्षा निवासस्थानी चर्चेसाठी बोलाविले होते.…

Read More

विद्याचंद्र सातपुते महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क अनेक शेतकरी पिढीजात फुलशेती करत असले तरी सध्या वाढती मागणी आणि बदलते तंत्रज्ञानामुळे पारंपरिक फुलांसह नानाविध फुले शेतात बहरु लागली आहेत. पारनेर तालुक्यातील हंगा येथील नितीन साठे यांनी अशाच शेवंती फुलांची लागवड करुन फुलशेतीत वेगळी वाट शोधली आहे. शेवंती फुलशेतीतून साठे यांना अवघ्या पाच महिन्यात खर्च वजा जाता तीन लाखांचे निव्वळ उत्पन्न मिळाले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुका हा दुष्काळग्रस्त तालुका म्हणून प्रसिद्ध आहे. तालुक्यातील शेती हंगामी व पावसावर अवलंबून असून, बहुतेक क्षेत्र कोरडवाहू आहे. तालुक्यातील हंगा हे गाव भौगोलिक दृष्ट्या आकाराने व क्षेत्रफळाने मोठे आहे. याच गावात पारंपरिक शेती करताना नितीन साठे या…

Read More