Author: अनंत पांगारकर

महाराष्ट्र संवाद न्यूज लोकशाही देशांमध्ये दर पाच वर्षाने जनतेच्या सेवेकरांची संख्या अचानक वाढत असते. सेवेची बाधा झालेले हे लोक घरोघरी जात सेवेची संधी देण्याची मागणी करतात मात्र, त्यानंतर महिनाभरात ही साथ ओसरते आणि हे सेवेकरी जातात कुठे? असा प्रश्न उपस्थित करत याचे उत्तर पाच वर्षांनी मिळत असते, अशा शब्दात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संघचालक डॉ. मोहन भागवत यांनी सध्याच्या राजकारणावर भाष्य केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनकल्याण समिती, जनकल्याण सेवा फाउंडेशन आणि डॉ. हेडगेवार स्मारक सेवानिधी संस्थेच्यावतीने ‘सेवा भवन’ प्रकल्पाच्या इमारतीचे पुण्यामध्ये शनिवारी डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर जनकल्याण समितीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त गांधी लॉन्स येथे झालेल्या कार्यक्रमात…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नाशिक समस्या नसतील तर तिथे जीवनच नाही. प्रत्येकाच्या जीवनात वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या येतात. काही समस्या मार्गी लागतात तर काहींवर उपाय नसतो. अशा समस्या सोडवल्या जाऊ शकत नाहीत. अशा समस्यांचा सामना करण्यासाठी भावनिक आधार महत्वाचा आहे. समस्या कितीही असुद्या त्यांना सामोरे जाण्याची तयारी ठेवली पाहिजे. संघर्ष असल्याशिवाय जीवन व्यर्थ आहे. नाती जपली पाहिजेत, मित्र जपले पाहिजेत, असा उपदेश प्रसिद्ध लाइफ कोच गौर गोपालदास यांनी केला. एसएमबीटी सेवाभावी ट्रस्टच्या शैक्षणिक संकूलात ‘एसएमबीटी फेस्ट २०२३’ या वार्षिकोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी ते विद्यार्थ्यांना संबोधित करत होते. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात, एसएमबीटीचे मुख्य विश्वस्त…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या घरी त्यांचे चुलत भाऊ चंद्रशेखर पाटील चाकूरकर यांनी स्वतःवर गोळी झाडून घेत आत्महत्या केली आहे. तातडीने घटनास्थळी पोहोचलेल्या पोलीस पथकाने पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविला आहे. घटना घडली तेव्हा शिवराज पाटील चाकूरकर हे दिल्ली होते. चंद्रशेखर पाटील हे 80 वर्षांचे होते, ते शिवराज पाटील चाकूरकर यांच्या लातुर येथील घराच्याजवळ राहत होते. दररोज वृत्तपत्र वाचण्यासाठी आणि सहज फेरफटका मारण्यासाठी चाकूरकर यांच्या घरी ते यायचे. आजही ते सहजपणे शिवराज पाटील चाकूरकर यांच्या ‘देवघर’ या निवासस्थानी आले होते. तिथे त्यांनी स्वतः सोबत आणलेल्या बंदुकीतून डोक्यात गोळी झाडून घेतली. फायरचा आवाज झाल्यानंतर चाकूरकर यांचे…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ○ अनंत पांगारकर संगमनेर शहरातील स्वामी समर्थ मंदिर ते साई मंदिरा दरम्यान असलेला म्हाळुंगी नदीवरील पूल गेल्या काही महिन्यापासून वाहतुकीसाठी बंद आहे. खचलेल्या या पुलाचे काम तातडीने सुरू करण्यात यावे, अशी मागणी संघर्ष सामाजिक संस्थेने केली आहे. अन्यथा यासाठी संस्थेच्या वतीने संघर्षाचा इशारा देण्यात आला आहे. स्वामी समर्थ मंदिरालगत असलेल्या या पुलावरून साई मंदिर, प्रवरा नदी, गंगामाई घाट, पंपिंग स्टेशन, कासारवाडी, साईनगर, घोडेकर मळा, दिगंबर गणेश सराफ विद्यालय, देवेंद्र ओहरा महाविद्यालय, मालपाणी हेल्थ क्लब आदी ठिकाणी ये-जा करता येते. साधारणत: ऑक्टोंबरमध्ये या भागाला जोडणारा म्हाळुंगी नदीवरील पूल मानवनिर्मित चुकांमुळे कसला आहे. जवळपास सहा महिन्याहून अधिक काळ हा…

Read More

रविवार विशेष ○ प्रवीण पुरो कायदे मंडळाची दोन सभागृहे खोटं बोलण्याची व्यासपीठ होऊ नयेत, असं कितीही म्हटलं तरी आता या सभागृहांचा वापर रेटून खोटं बोलण्यासाठी केला जातो, हे आता स्पष्ट होऊ लागलं आहे. आपल्यावरील आक्षेप ढकलून देण्यासाठी सत्ताधारी खुलेआम खोटेपणा करतात आणि हा खोटेपणा बहुमताच्या जोरावर टाळ्यांच्या गजरात खपवून घेतात. असे एक ना अनेक प्रसंग विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात आताही घडतात आणि यापूर्वीही घडून गेलेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात आणण्यात आलेल्या हक्कभंग प्रकरणानंतरही त्यांनी घेतलेली कोलांटउडी हा याच पठडीतील विषय ठरला आहे. कितीही खोटं बोललं तरी जिथे काहीच बिघडत नाही, असं हे ठिकाण बनलंय. आपण शहाण्यासारखं वागलं पाहिजे याचं भान…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज रिव्हॉल्वरचा धाक दाखवून पेट्रोल पंपावरील अडीच लाख रुपयांचे लूट करणारे, पंचर दुकानदारावर हल्ला करून त्याचे मोटरसायकल लांबविणारे तीन गुन्हेगार नगरच्या स्थानिक पुणे शाखेला पकडण्यात यश आले. पेट्रोल पंपावरील लुटी सोबतच नगरच्या कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका खून प्रकरणाचाही उलगडा या आरोपींकडून करण्यात पोलिसांना यश आले आहे. गेल्या रविवारी (ता. २६ फेब्रुवारी) संगमनेरच्या पठार भागात साकुर मांडवे रस्त्यावरील भगवान पेट्रोलियम या पेट्रोल पंपावर तिघा सशस्त्र चोरट्यांनी आपल्याकडील दोन्ही दुचाकीमध्ये पेट्रोल भरत पेट्रोल पंपावरील केबिनमध्ये घुसून तेथील कर्मचाऱ्यांना रिव्हॉल्वरचा धाक दाखवून अडीच लाखाची लूट केली होती. तत्पूर्वी याच आरोपींनी माहूली गावच्या शिवारात एका पंचर दुकानदाराला रिव्हॉल्वरचा धाक दाखवत त्याच्यावर…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज भाजीपाला, कापूस, सोयाबीन, कांदा या सर्व पिकांचे भाव पडले आहेत. कांदा उत्पादनासाठी खर्च मोठा येत असून यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. अशा वेळेस सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. मात्र मेट्रो आणि स्मार्ट सिटीकडे लक्ष देणाऱ्या या सरकारचे शेतकऱ्यांकडे मात्र दुर्लक्ष आहे. सरकारने शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल कांद्याला जास्तीत जास्त भाव द्यावा व कोणत्याही शेतकऱ्यांची वीज कनेक्शन कट करू नये, अशी आग्रही मागणी काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली. संगमनेरमध्ये महाविकास आघाडीच्यावतीने शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी मोर्चा व धरणे आंदोलन झाले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, बाजीराव खेमनर, दुर्गाताई तांबे, कॅन्सरतज्ञ डॉ.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर गीता परिवाराच्या संगमनेर शाखाध्यक्षपदी संजय कर्पे, उपाध्यक्षपदी शोभा बाहेती आणि सचिवपदी अभिजीत गाडेकर यांची निवड करण्यात आली आहे. याशिवाय अन्य पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्याही जाहीर करण्यात आल्या आहेत. गेल्या साडेतीन दशकांहून अधिक काळ बालसंस्कार क्षेत्रात उल्लेखनीय काम करणार्‍या गीता परिवाराच्या संगमनेर शाखेतील पदाधिकार्‍यांच्या निवडी गीता परिवाराचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. संजय मालपाणी यांच्या अध्यक्षतेखाली गीता परिवाराच्या संस्कार बालभवन येथे झालेल्या बैठकीत जाहीर करण्यात आल्या. कोषाध्यक्षपदी अमित चांडक, संगमनेर केंद्र पालक व जिल्हा विस्तारक पदासाठी गणेशलाल बाहेती, केंद्र विस्तार प्रमुख पदावर कुंदन जेधे, सतीष इटप, अर्जुन युवा मंच प्रमुखपदावर पूजा दिक्षीत, परिवार संपर्क समितीच्या प्रमुखपदी  सरोज आसावा, परिवार संपर्क समिती…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज गेल्या बारा वर्षापासून विविध समाज उपयोगी नावीन्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या शिवजयंती उत्सव युवक समितीच्यावतीने यावर्षीदेखील महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. गतवर्षी १०३७ शिवभक्त रक्तदात्यांनी रक्तदान केल्यानंतर आता यावर्षी ११११ रक्तदात्यांनी रक्तदान करण्याचा संकल्प केला आहे. या महा रक्तदान संकल्पमध्ये संगमनेरकरांनी सहभाग घेण्याचे आवाहन उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे. एका तपाची वाटचाल पूर्ण करणाऱ्या उत्सव समितीने यापूर्वी कोरोनासारख्या भयंकर आजारातदेखील गोरगरिबांना अन्नदान केले होते. सांगली, सातारा सारख्या भागात पूरग्रस्त नागरिकांना किराणा व संसार उपयोगी वस्तूचे वाटप केले. गरजू विद्यार्थ्यांना दरवर्षी शैक्षणिक साहित्य वाटप केले जाते. वैद्यकीय मदतीसाठी पुढाकार घेतला जातो. शिवरायांचे विचार मनामनात रुजवण्यासाठी व्याख्याने तसेच विद्यार्थ्यांसाठी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबईः मी आता ७० वर्षांचा झालो आहे. मी १४ वर्षांपेक्षा अधिक काळ शिक्षा भोगली आहे. त्यामुळे आता माझी मुदतपूर्व सुटका करा, अशी मागणी करणारी याचिका डॉन अरुण गवळीने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासमोर केली आहे. या याचिकेवर १५ मार्चला सुनावणी होणार आहे. शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसंडेकर हत्येप्रकरणी अरुण गवळीला जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. गवळी सध्या नागपूर येथील मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहे. कैद्यांच्या मुदतपूर्व सुटके संदर्भात २००६ साली राज्य शासनाने परिपत्रक जारी केले आहे. या परिपत्रकाचा आधार घेत गवळीने उच्च न्यायालयात याचिका केली आहे. १५ ऑगस्ट, २६ जानेवारी, १ मे अशा गौरवशाली दिवसांचे औचित्य साधून कैद्यांचे मुदतपूर्व…

Read More