Author: अनंत पांगारकर
संगमनेर – सहकार विभागाच्या छापेमारीत संगमनेर तालुक्यातील साकुर येथील दोन सावकारांवर कारवाई करण्यात आली आहे. या छाप्यात सहकार विभागाच्या अधिकाऱ्यांच्या हाती काही महत्त्वाचे दस्त लागल्याचे बोलले जाते. सावकाराच्या सततच्या तगाद्याला कंटाळून साकुरमधील एका दाम्पत्याने जिल्हाधिकाऱ्याकडे स्वेच्छा मरणाची परवानगी मागितली होती. त्यानंतर तातडीने वरिष्ठ पातळीवर हालचाली झाल्या आणि ही कारवाई झाली. सहकार खात्याचे उपनिबंधक संतोष कोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार दोन पथकांनी राहुल किसन डोंगरे व सचिन बन्सी डोंगरे (रा. साकुर, ता. संगमनेर, जि. अहमदनगर) यांच्या दोघा सावकारांविरोधात सावकारी अधिनियमान्वये कारवाई करण्यात आले आहे. यासंदर्भात साकुर येथीलच संगीता व विलास दौलत वाकचौरे या दाम्पत्याने सावकाराच्या जाचातून मुक्ती मिळण्यासाठी बुधवारी (१४ फेब्रुवारी) जिल्हाधिकारी…
मंचर – पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर एक कंटेनर बंद पडला होता. या मार्गावर सकाळी टेम्पो आणि स्विफ्ट कारमध्ये जोरदार धडक झाली. त्यानंतर टेम्पो पुढे उभ्या असलेल्या कंटेनरवर धडकला. तर स्विफ्ट कारने पेट घेतला. या भीषण अपघातात पेटत्या कारमधील तिघांचा होळपळून मृत्यू झाला आहे. शनिवारी पहाटे मंचरजवळ असलेल्या भोरवाडी येथे हा विचित्र अपघात झाला. या अपघातात स्विफ्टकार जागीच जळून खाक झाली. यामुळे या गाडीतील तीन जणांचा होरपळून मृत्यू झाला. सुदैवाने कारचा चालक आणि टेम्पोचा चालक अपघातातून बचावले. अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली होती. मंचर येथील वाहतूक शाखेच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी रस्त्यावर असलेली अपघातग्रस्त वाहने क्रेनच्या मदतीने…
संगमनेर – हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती दरवर्षीप्रमाणे राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसार उत्साहात सोमवारी (ता. १९ फेब्रुवारी) साजरी केली जाणार आहे, अशी माहिती संगमनेर नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक राहुल वाघ यांनी दिली. सोमवारी सकाळी नगर परिषदेच्या प्रांगणात नऊ वाजता संगमनेरचे प्रांताधिकारी शैलेश हिंगे, डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे, तहसीलदार धीरज मांजरे, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अनिल नागणे, संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे, मुख्याधिकारी वाघ आदी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून साडेनऊ वाजता मुख्य मिरवणुकीस प्रारंभ होणार आहे. नगरपरिषदेच्या प्रांगणातून सुरू होणारी ही मिरवणूक शहरातील प्रमुख मिरवणूक मार्गावरून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापाशी येणार…
संगमनेर – महिला भगिनींचा सन्मान करणे ही आपली भारतीय संस्कृती आहे. दुर्दैवाने ज्या महिला भगिनींवर एकलपणाचे दुःख आले, त्या सर्वांना आधार देत त्यांना आदर व सन्मान देण्याचे आवश्यकता असल्याचे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या कांचनताई थोरात यांनी केले. स्वर्गीय नानासाहेब गुंजाळ प्रतिष्ठानच्यावतीने संगमनेर खुर्दमध्ये श्रीमती रोहिणी गुंजाळ यांच्या पुढाकारातून एकल महिलांसाठी हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दोनशे एकल महिलांना आवळा व जांभूळ वृक्ष देऊन सन्मानित करण्यात आले. त्यावेळी थोरात बोलत होत्या. रोहिणी गुंजाळ यांच्यासह सरपंच श्वेता मंडलीक, जयश्री शिंदे, रोहिणी कदम, स्वाती गोसावी, दिपाली गडगे, श्रीमती पवार मॅडम यांच्यासह सुमारे पाचशे महिला उपस्थित होत्या. थोरात म्हणाल्या, महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती…
संगमनेर – दरोड्यासह विविध प्रकारच्या चोरीचे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या संगमनेरमधील विक्रम उर्फ पिल्या रामनाथ घोडेकर याला संगमनेरच्या प्रांताधिकार्यांनी सहा महिन्यांसाठी नगर आणि नाशिक जिल्ह्यातून हद्दपार केले. पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी यासंदर्भात माहिती दिली. विक्रम उर्फ पिल्या रामनाथ घोडेकर (रा. पंपिंग स्टेशन संगमनेर) याच्या विरोधात संगमनेर शहर पोलीस स्टेशन, संगमनेर तालुका पोलीस स्टेशन आणि घारगाव पोलीस स्टेशनमध्ये विविध स्वरूपाचे तब्बल नऊ गुन्हे दाखल असून यामध्ये दरोडा टाकणे, जबरी चोरी करणे, मोटार सायकल चोरी करणे, शिवीगाळ, दमदाटी, जखमी करणे आदी स्वरूपाच्या गुन्ह्यांचा समावेश आहे. कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या विक्रम उर्फ पिल्या रामनाथ घोडेकर यांच्या हद्दपारीचा प्रस्ताव संगमनेर…
मुंबई – गुरुवारी झालेल्या काँग्रेस पक्षाच्या महत्त्वपूर्ण असलेल्या बैठकीला जे सात आमदार गैरहजर होते त्यांनी पक्षाला गैरहजर राहण्याचे कारण पत्राच्या माध्यमातून कळविले होते, अशी माहिती काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी दिली. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर काँग्रेसमधील हालचालींना वेग आला आहे. गुरुवारी (ता. १५ फेब्रुवारी) काँग्रेसची महत्त्वाची बैठक विधिमंडळात पार पडली. या बैठकीला काँग्रेसचे 30 पेक्षा अधिक आमदार उपस्थित होते. या बैठकीनंतर थोरातांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ही माहिती दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होत असल्याच्या चर्चे संदर्भात थोरात म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन होण्याबाबत कोणतीही चर्चा सुरू नाही. आम्हालाही प्रसार माध्यमांकडूनच याबद्दल…
संगमनेर – अनंत पांगारकर घरच्यांनीच केलेल्या गद्दारीमुळे सत्तेतून पायउतार व्हाव्या लागलेल्या माजी मुख्यमंत्री शिवसेना शहरप्रमुख उद्धव ठाकरे यांचा बुधवारचा संगमनेरचा जनसंवाद दौरा त्यांच्या भाषणाने, आमदार बाळासाहेब थोरात यांच्या जाहीररीत्या केलेल्या कौतुकाने चर्चेत आला असताना दुसरीकडे माजी शहरप्रमुख अमर कतारी यांच्या नेतृत्वाखाली ठाकरेंचं स्वागत करण्यासाठी निघालेली मोटार सायकल रॅली चर्चेत आली आहे. सत्तेतून पायउतार झाल्यानंतर शिवसेनेत अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. अनेक निष्ठावंत शिवसैनिकांना फोडत शिंदे गटाने त्यांच्यासाठी पायघड्या टाकल्या. शिर्डी लोकसभा मतदारसंघातून अनेक जण ठाकरेंची साथ सोडत शिंदेंच्या सोबत जाण्याच्या तयारीत असतानाच शिवसेनेत पुन्हा एकदा पक्षांतर्गत घडामोडी घडल्या आणि उत्तर नगर जिल्ह्यातील कार्यकारिणीत फेरबदल करण्यात आले. यात अनेक निष्ठावंत पदाधिकाऱ्यांना डावलत…
संगमनेर – तुम्ही आणि तुमच्या पुढच्या पिढ्या या देशाच्या स्वातंत्र्यामध्ये जगणार आहेत की भाजपच्या हुकूमशाहीच्या गुलामगिरीत जगणार आहेत, हे ठरविणारी येणारी निवडणूक आहे. लढाई मोठी आहे असे सांगत भाजपने आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी आजपर्यंत बेंबीच्या देठापासून ओरडत ज्या भ्रष्ट लोकांविरोधात आरडाओरडा केला, ज्यांच्या-ज्यांच्यावर चिखल उडविला त्यांचीच धुनी धुण्याची वेळ त्यांच्यावर आली. ज्यांना फोडाफोडी शिवाय दुसरा धंदा नाही कपट कारस्थान, नीच कारस्थान करणारे गृहमंत्री ‘फोडणवीस’ हे घरफोडे मंत्री आहेत, अशा शब्दात भाजपच्या केंद्रीय व राज्यातील नेतृत्वावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जोरदार टीका केली. जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बुधवारी संगमनेरमध्ये आले होते यावेळी ते बोलत होते. ठाकरे यांच्या समवेत…
संगमनेर – पाठ्यक्रमासह विविध कलाविष्कार आणि खेळांमध्ये नैपूण्य दाखवणार्या संगमनेरच्या ध्रुव ग्लोबल स्कूलचे नाव पुन्हा एकदा राष्ट्रीय पातळीवर चमकले. जम्मु-काश्मिरमध्ये झालेल्या ९ व्या राष्ट्रीय स्पोर्ट्स डान्स चॅम्पियनशीप स्पर्धेत ध्रुवच्या खेळाडूंनी उत्कृष्ट सादरीकरण करताना ३५ सुवर्णसह तब्बल ४५ पदकांची लयलुट केली. स्पर्धेतील उत्कृष्ट प्रदर्शनाच्या बळावर ध्रुव ग्लोबल स्कूलला राष्ट्रीय पातळीवर प्रथम क्रमांक देवून गौरविण्यात आले आहे. स्पोर्ट्स डान्सच्या वैयक्तिक प्रकारात ९ वर्षांखालील गटात तेजस्विनी क्षितीज मोहापात्रा हिने हर हर गंगे नृत्य सादर करीत सुवर्ण पदक मिळवले. १३ वर्षांखालील गटात रित चेतन राजपालने राधाराणी नृत्यावर तर, १७ वर्षांखालील गटात सौम्या सचिन जोशीने सुवर्ण पदक मिळवताना शाळेच्या कामगिरीचा आलेख उंचावला. युगल प्रकारातही हाच…
रमेश चेन्नीथला, नाना पटोले यांचीही चव्हाणांवर टीका… काँग्रेसने अशोक चव्हाण यांना आणि त्यांच्या वडिलांना खूप काही दिले मात्र आता काँग्रेसच्या तत्त्वज्ञानात असा कोणता दोष निर्माण झाला की ज्यामुळे चव्हाण यांना काँग्रेसच सोडावी लागली? चव्हाण यांच्यावर काही दबाव होता का? असा सवाल उपस्थित करत ते एखाद्या दबावाने किंवा स्वार्थापोटी भाजपमध्ये गेले असावेत, अशी थेट सडकून टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. माजी मुख्यमंत्री आमदार अशोक चव्हाण यांनी सोमवारी काँग्रेसचा आणि विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर आज मंगळवारी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या महत्त्वाच्या नेत्यांची बैठक पार…
