Author: अनंत पांगारकर
महाराष्ट्र संवाद न्यूज नागपूर – दि. ११ डिसेंबर राणा भीमदेवी थाटात गर्जना केलेले नवे वाळू धोरण फसलेले आहे. महसूल मंत्र्यांनी वाळू तस्करांना सन्मानाने ठेके दिले. त्यांच्याकडूनच आता रात्री-बेरात्री वाळूची तस्करी केली जाते, सामान्य गोरगरीब माणसाला वाळू मिळणे मुश्किल झाले आहे, या वाळू धोरणामुळे नवे गुंड तयार झाले, अशा शब्दात काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी महसूल विभागावर हल्ला चढवला. नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागण्यांवरील चर्चेदरम्यान काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात बोलत होते. फसलेले वाळू धोरण, तलाठी भरतीत झालेले गैरप्रकार आणि कंत्राटी पद्धतीने तहसीलदारांची भरती प्रक्रिया यावर त्यांनी जोरदार हल्ला चढवला. थोरात म्हणाले, नवे महसूल मंत्री…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – दि.११ डिसेंबर आत्तापर्यंत आपण शिक्षण आणि व्यवसायात एकमेकांशी स्पर्धा करून जीवन जगत आलो आहोत, परंतु आता कृत्रिम बुद्धिमत्तेशी (Artificial Intelligence) स्पर्धा करून, आपल्याला स्वतःची व्यावसायिक उपयुक्तता सिद्ध करावी लागेल. भारतीय मुले ही कष्टाळू व बुद्धिमान आहेत, ती हे आव्हान लीलया पेलतील. मात्र त्यांना या परिस्थितीत ताणतणावाचे व्यवस्थापन करणारे आनंददायी शिक्षण द्यायला हवे, असे प्रतिपादन माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केले. गुरु एज्युकेशन पुणे व एक्सपर्ट अबॅकस फाउंडेशन संगमनेर-अकोले यांच्या विद्यमाने राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धांच्या बक्षीस वितरण समारंभ प्रसंगी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर सामाजिक कार्यकर्ते सुनील कडलग, उद्योजक सुदीप वाकळे, प्रकाश नवले,…
महाराष्ट्र संवाद न्यूज ओझर टाऊनशिप – दि. ११ डिसेंबर गोखले एज्युकेशन सोसायटीच्या एच.ए.एल. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत सोमवारी दहावी शालेय स्तरीय विज्ञान प्रदर्शन पार पडले. प्रदर्शनामध्ये १०३ मॉडेलचे सादरीकरण करण्यात आले होते. संस्थेचे ओझर विभागाचे अध्यक्ष के. एन. पाटील, शालेय व्यवस्थापन व विकास समितीचे सदस्य रमेश कदम यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून प्रदर्शनाची सुरुवात झाली. विज्ञान प्रदर्शनासाठी शालेय स्तरावर इयत्ता पाचवी ते सातवीपर्यंतचा एक गट तर इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी दुसरा गट करण्यात आला होता. यावेळी सर्व विद्यार्थ्यानी भूगोल, अवकाशिय, शेती, संगणक, सेन्सर, भूकंप मापन, चांद्रयान मोहीम आदीं विविध विषयांवर आधारीत सुमारे १०३ मॉडेल्स सूरेख पद्धतीने…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – दि. ११ डिसेंबर दूध भाव वाढ करावी, कांद्यावरील निर्यात बंदी उठवावी या दोन प्रमुख मागण्यांसाठी संगमनेरमध्ये शिवसेनेच्या (उबाठा) नव्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी प्रांताधिकार्यांना निवेदन देत आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. राज्य सरकारने दुधाचे भाव १२ ते १३ रुपयांनी कमी केले असल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला असून दुग्ध व्यवसाय देखील अडचणीत आला आहे. याबरोबरच केंद्र सरकारने कांद्याचे निर्यात बंदी केल्याने कांदा उत्पादक शेतकरी देखील अडचणीत सापडले आहे. निर्यात बंदी केल्याने सर्वत्र कांद्याचे भाव पडले आहेत. राज्य सरकारने दुधाला प्रति लिटर चाळीस रुपयांचा भाव द्यावा तसेच कांद्यावर केंद्र सरकारने लादलेली निर्यात बंदी…
महाराष्ट्र संवाद न्यूज अकोले (अहमदनगर) -अकोले तालुक्यातील सिरीयल किलर म्हणून परिचित असलेल्या क्रूरकर्मा अण्णा वैद्य याने अल्पवयीन मुलीची छेड काढत तिला मारहाण केल्याच्या कारणावरून जमावाने केलेल्या हल्ल्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. रविवारी (दि. १० डिसेंबर) सायंकाळी अकोले तालुक्यातील सुगाव खुर्द येथे ही घटना घडली. चार महिलांच्या खून प्रकरणानंतर क्रूरकर्मा म्हणून राज्यात परिचित असलेल्या मच्छिंद्र उर्फ अण्णासाहेब मुक्ताजी वैद्य (अण्णा वैद्य) याने रविवारी सायंकाळी सुगाव खुर्द गावातील एका अल्पवयीन मुलीची छेड काढत तिला बेदम मारहाण केली होती या मारहाणीत घाबरलेली मुलगी जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहे. या घटनेमुळे संतप्त झालेल्या जमावाने अण्णा वैद्य याच्यावर हल्ला करत त्याला बेदम मारहाण केली.…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – दि. १० डिसेंबर नेहरू गार्डनमध्ये लहान मुलांना खेळविण्यासाठी असलेली चाचा नेहरू एक्सप्रेस रेल्वे रुळावरून घसरल्याने झालेल्या अपघातात एक सात वर्षाचा बालक गंभीर जखमी झाला. पुढील उपचारासाठी त्याला लोणीच्या प्रवरा रुग्णालयात हलविण्यात आले असल्याची माहिती समोर येत आहे. संगमनेर नगर परिषदेच्या नेहरू गार्डनमध्ये ही घटना घडली. विराज मारुती शिंदे (वय ७ वर्ष, रा. संजय गांधी नगर, संगमनेर) असे अपघातात जखमी झालेल्या बालकाचे नाव आहे. गार्डनमध्ये लहान मुलांसाठी एक चाचा नेहरू एक्सप्रेस रेल्वे आहे. गार्डनमध्ये येणारी लहान बालके या एक्सप्रेस रेल्वेतून सफरीचा आनंद घेत असतात. सायंकाळी सहा वाजता नियमितपणे लहान बालकांना खेळविण्यासाठी ही रेल्वे गाडी बालकांना घेऊन…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – दि. १० डिसेंबर संगमनेर येथील शांती फाउंडेशनच्यावतीने कै. चंद्रभागा व काशिनाथ मुटकुळे यांच्या स्मरणार्थ दरवर्षी दिले जाणारे विशेष गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे. या संदर्भातील घोषणा निवड समितीच्या अध्यक्षा दुर्गाबाई तांबे यांनी केली. संगमनेर येथील ज्येष्ठ संपादक, सामाजिक कार्यकर्ते प्रा. विठ्ठल शेवाळे यांना साहित्य व सामाजिक कार्यासाठीचा साहित्य गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे. नगर येथील महाराष्ट्रातील नामवंत नाट्यकर्मी आयुब शेख व अकोले येथील डॉ. उल्हास कुलकर्णी यांना नाट्य गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. विठ्ठल शेवाळे हे सेवानिवृत्त प्राध्यापक असून त्यांनी उज्वल उद्यासाठी या त्रैमासिकाचे संपादन केले आहे. शासनाच्यावतीने आढळा नदीच्या अभ्यास प्रकल्पासाठी…
प्रवीण पुरो (मो. 9869991868) आपल्या खोटारडेपणाला ठेस पोहोचली की माणसं कासावीस होतात. ते कसल्याही गोष्टीचा आधार घेत होत्याचं नव्हतं करतात. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे असेच काहीसे कासावीस झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एकेकाळचे प्रवक्ते असलेल्या नवाब मलिक हे देशद्रोही असल्याने त्यांना सत्तेत सहभागी करून घेता येणार नाही, असा रेटा त्यांनी लावला आहे. त्यांचे सहकारी उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे पत्र पाठवून त्यांनी नैतिकता दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. मलिक यांना आरोग्याच्या कारणास्तव पॅरोलवर सोडण्यात आल्याने ते सध्या नागपूरमध्ये विधिमंडळाच्या अधिवेशनात उपस्थित आहेत. त्यांनी आपला विधिमंडळात उपस्थित राहण्याचा हक्क बजावला आहे. पण यामुळे अनेकजण अस्वस्थ झाले आहेत. यात पहिले आहेत देवेंद्र फडणवीस. एखाद्याविषयी…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – दि. ९ डिसेंबर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा संगमनेर बसस्थानकावर बसविण्यात यावा, यासाठी नगरपालिकेने दिलेल्या प्रस्तावास मंजुरी द्यावी. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारून त्याठिकाणी सुशोभीकरणासाठी, विश्वयुध्दात सहभागी असलेले व व्हिक्टोरिया क्रॉस प्राप्त शहीद नामदेवराव जाधव यांच्या स्मारकास प्रत्येकी १ कोटींचा निधी उपलब्ध करुन द्यावा, यासाठी आमदार सत्यजित तांबे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली. यासंदर्भात सकारात्मक कार्यवाहीचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तांबे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाला दिले. आमदार तांबे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या मागणीमुळे काँग्रेसचे पक्ष नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासह वैभवशाली स्मारके होण्याचा मार्ग…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – दि. 9 डिसेंबर महाराष्ट्र राज्य शिक्षण विभाग व एज्युकेशन सप्लाय अँड फ्रँचाइजी यांच्यावतीने मेरिटवर दिला जाणारा स्टार एज्युकेशन अवार्ड (Star Education Award 2023, only on Merit ) ‘उत्कृष्ट प्राचार्य’ पुरस्कार संगमनेर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड यांना प्रदान करण्यात आला. शैक्षणिक क्षेत्रात भरीव कामगीरी केल्याबद्दल दिला जाणारे या पुरस्काराचे वितरण नुकतेच मुंबईत करण्यात आले. प्राचार्य डॉ. गायकवाड हे गेल्या ३५ वर्षांपासून अध्यापनाचे कार्य करत आहे. ते संगमनेर महाविद्यालयात प्राचार्य पदाबरोबरच वाणिज्य विभागाचे विभागप्रमुख म्हणुन कार्यरत आहेत. त्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बिझनेस लॉ बोर्डाचे विद्यमान अध्यक्ष, व्होकेशनल कॉमर्स अभ्यासमंडळाचे अध्यक्ष, विद्यापरीषद सदस्य, अकौंटन्सी अभ्यासमंडळ सदस्य, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा सदस्य इत्यादी अधिकार मंडळामध्ये…
