Author: अनंत पांगारकर
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर – संगमनेरमधून जाणाऱ्या कोल्हार घोटी राज्यमार्गाच्या रुंदीकरणाचे काम सध्या सुरू आहे. शहरातील दिल्ली नाका ते समनापुरपर्यंत रस्त्याचे काम प्रगतीपथावर असल्याने तसेच नव्याने हा रस्ता खड्डे मुक्त होत असल्याने या रस्त्यावरून वाहन चालक वेगाने वाहने चालवत आहे. परिणामी रस्त्यावरील अपघातात वाढ झाली असल्याने अपघात रोखण्यासाठी या मार्गावर गतिरोधक टाकण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना या संदर्भात निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, कोल्हार-घोटी राज्य मार्गाच्या रुंदीकरणाचे काम सध्या सुरू आहे. संगमनेर शहरातील दिल्ली नाका ते समनापुरपर्यंत रस्त्याचे काम प्रगतीपथावर आहे. हा रस्ता दुरुस्त झाल्याने व…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क एका आयशर टेम्पोमधून कत्तलीसाठी नेली जात असलेली तब्बल पंचेचाळीस जिवंत गोवंश जनावरे राहुरी पोलिसांनी पकडली आहेत. पोलिसांनी केलेल्या कारवाईत पुन्हा एकदा संगमनेर कनेक्शन समोर आले आहे. यामुळे संगमनेरची बदकीर्ती पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. संगमनेर येथून वांबोरी मार्गे अहमदनगर येथे चाललेल्या एका आयशर टेम्पोतून या जनावरांची निर्दयपणे वाहतूक केली जात होती. पोलीस हवालदार दिनकर चव्हाण, पोलीस नाईक नदिम शेख, सचिन ताजणे, गणेश लिपने, चालक साखरे या पोलीस पथकाने राहुरी तालुक्यातील वांबोरी परिसरातील केएसबी चौकात रात्री दहा वाजेदरम्यान सापळा लावला होता. त्यावेळी तेथे एक आयशर टेम्पो (एमएच 17 बीवाय 2478) आला. पथकाने त्या टेम्पोला थांबवून त्याची तपासणी…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क समुदाय आरोग्य अधिकारी म्हणून नोकरीस असलेल्या महिलेकडून ऑगस्ट व सप्टेंबर या दोन महिन्याच्या कामावर आधारित मोबदला व प्रोत्साहन भत्त्यासाठी दहा हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या महिला डॉक्टरला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी पकडत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात असलेल्या बारागाव नांदूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेल्या वर्ग २ च्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वृषाली तुळशीराम सूर्यवंशी या लाचखोर महिला डॉक्टरवर अहमदनगरच्या लाच लुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली आहे. डॉ. सूर्यवंशी यांनी समुदाय आरोग्य अधिकारी म्हणून नोकरीस असलेल्या २६ वर्षीय राहुरी येथील महिलेकडे लाचेची मागणी केली होती. ऑगस्ट व सप्टेंबर २०२१ या दोन महिन्याच्या…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क नाशिक पदवीधर मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार सत्यजित तांबे यांनी बुधवारी विधानपरिषदेत शपथ घेतली. शपथ घेतल्यानंतर लगेचच त्यांनी आपल्या कामाला सुरुवात केली. राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना शिक्षकांच्या प्रश्नांसंदर्भात पत्र देत चर्चेसाठी वेळ मागितली आहे.गेली तेरा वर्ष नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार म्हणून डॉ. सुधीर तांबे यांनी सभागृहात लक्षवेधी कामगिरी केली आहे. शिक्षक पदवीधरांच्या प्रश्नावर त्यांनी सभागृहात सातत्याने आवाज उठविला. यावेळी मात्र तांबे यांनी उमेदवारी मिळवून देखील आपले पुत्र सत्यजित तांबे यांच्यासाठी निवडणूक न लढवत त्यांना अपक्ष निवडून आणले आहे. राज्याच्या राजकारणात आक्रमक नेता म्हणून ओळखले जाणारे सत्यजित तांबे यांनी पहिल्याच दिवशी आपल्या कामकाजाला धडाकेबाज सुरुवात…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क ‘एकच वादा… सत्यजित दादा’ पाठोपाठ ‘एकच वादा… अजित दादा’ अशा घोषणांनी विधान परिषदेचे सभागृह बुधवारी दुमदुमून गेले होते. सत्यजित तांबे यांच्या शपथविधी सोहळ्यातील या घोषणांनी सर्वांच्याच भुवया उंचावल्या. याशिवाय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसकडून ज्या विचारधारेचा वारसा सांगितला जातो त्या छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू आंबेडकरांसह भाऊसाहेब थोरात यांच्या नावाचा उल्लेख करत तांबे यांनी शपथ घेतल्याने सध्या तरी ते भाजपापासून चार हात दूर असल्याचे स्पष्ट झाले. नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांच्यासह शिक्षक पदवीधर मतदारसंघातील नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी सोहळा आज विधान परिषदेच्या सभागृहात पार पडला. तांबे यांच्या बंडखोरीवरून काँग्रेसमध्ये मोठा वाद निर्माण झाला असून हा वाद आता…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क लोणी वारकरी संप्रदाय आणि संत सेवेत अतुलनीय योगदान दिल्याबद्दल पालघर जिल्ह्यातील आलोंडे-कोकणपाडा येथील हभप श्रावण महाराज कुवरा यांना यावर्षीचा राज्यस्तरीय पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील स्मृती संत सेवा पुरस्कार जाहीर झाला असून पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष महंत उद्धव महाराज मंडलिक यांनी बुधवारी पुरस्काराची घोषणा केली. अहमदनगर जिल्ह्यातील लोणी बुद्रुक येथील जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज सेवा ट्रस्ट व ग्रामस्थांच्या वतीने सन २०१७ पासून हा पुरस्कार दिला जातो. लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील स्मृती संत सेवा पुरस्कार राज्यातील प्रतिष्ठेचा पुरस्कार मानला जातो. महंत उद्धव महाराज मंडलिक यांच्या अध्यक्षतेखालील भाषा प्रभू जगन्नाथ महाराज पाटील (ठाणे) व प्राचार्य डॉ. गोरक्षनाथ…
शिर्डी महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क २०१९ साली काँग्रेस वाचविण्यासाठी मी बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका बजावणार असे सांगणारे आणि एकाकी खिंड लढवणार म्हणून मिरवून घेणारे आता हतबल का झाले? खिंड लढवायची सोडून त्यांनी पळ काढण्यात समाधान मानले आहे, अशी उपरोधिक आणि घणाघाती टीका करीत राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी थोरातांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. काॅग्रेसमध्ये सुरू असलेल्या राजीनामा नाट्यावर त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. नाशिक पदवीधर विधानपरिषद निवडणूक निकालानंतर राज्यात विविध राजकीय चर्चा रंगू लागल्या आहेत. राज्यातील या घडामोडींबद्दल महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी माध्यमाशी संवाद साधला. तेव्हा ते म्हणाले की, नाशिक पदवीधर मतदार संघ निवडणुकीनंतर काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर संगमनेर तालुक्याचे लोकप्रतिनिधी असलेले बाळासाहेब थोरात हे लोकनेते असून संगमनेर तालुका व नगर जिल्ह्यासाठी ते केवळ नेते नव्हे तर आपला स्वाभिमान असल्याचे प्रतिपादन समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी केले. माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्ताने तालुक्यातील वेल्हाळे येथे हरीबाबा मित्र मंडळाच्या वतीने कीर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुखयांच्या कीर्तनाने मंगळवारी या सप्ताहाची सांगता झाली. यावेळी नाशिक पदवीधर मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार सत्यजित तांबे, राजहंस दूध संघाचे अध्यक्ष रणजीतसिंह देशमुख, कॅन्सर तज्ञ डॉ. जयश्री थोरात आधी प्रमुख मान्यवर उपस्थित होते. यावेळी केक कापून आमदार थोरात यांचा वाढदिवस साजरा करण्यात…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क मुंबई काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी मंगळवारी आपल्या विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिला असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. थोरात यांनी आपला राजीनामा पक्षश्रेष्ठींकडे पाठविला असून काँग्रेस हाय कमांड या संदर्भात काय निर्णय घेते, याकडे लक्ष लागले आहे . दरम्यान थोरात यांच्या राजीनाम्यामुळे काँग्रेसच्या गोटात खळबळ उडाली आहे. काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची संबंधित असलेले थोरात काँग्रेसमधील वजनदार नेते म्हणून ओळखले जातात. त्यांच्याकडे विधिमंडळ पक्षनेते पदाची जबाबदारी होती. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह काँग्रेस मधील काही नेत्यांवर थोरात नाराज असून या संदर्भात त्यांनी पक्षश्रेष्ठींना सविस्तर पत्र पाठवले असल्याची माहिती दोन दिवसापूर्वी त्यांनी संगमनेर येथील एका…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर संगमनेर तालुक्यातील कर्हे येथील खंडोबा देवस्थानच्या गडावर देवदर्शनासाठी आलेल्या पुण्याच्या महिलेसह तिघींचे सुमारे लाखभर रुपयांचे दागिने दोन अज्ञात महिलांनी लांबविण्याचा प्रकार समोर आला आहे. रविवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास धारणगाव देवपूर तालुका सिन्नर येथील मूळ रहिवासी असलेल्या आणि सध्या सिंहगड रोड धायरी फाटा पुणे येथे राहत असलेल्या वनिता भगवंत घुगे वय 29 वर्ष या संगमनेर तालुक्यातील कर्हे येथील खंडोबा मंदिराच्या गडावर देवदर्शनासाठी आल्या होत्या. त्यावेळी तेथे असलेल्या गर्दीचा फायदा घेत दोन महिलांनी वनिता घुगे यांच्या पर्समधील दागिने ठेवलेला पांढऱ्या रंगाचा प्लास्टिकचा बॉक्स लंपास केला. याशिवाय अन्य दोन महिलांच्य गळ्यातील मनी मंगळसूत्र व सोन्याची पोत त्यांचे…
