Author: अनंत पांगारकर
संगमनेर: आमदार सत्यजीत तांबे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश येण्याची चिन्हे असून संगमनेर येथे स्वतंत्र उपप्रादेशिक परिवहन कार्यालय स्थापन करण्याबाबत परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. मुंबईत पार पडलेल्या एका महत्त्वपूर्ण बैठकीत आमदार तांबे यांनी परिवहन मंत्र्यांची भेट घेऊन संगमनेर आणि अकोले परिसरासाठी नव्या निकषांनुसार स्वतंत्र आरटीओ कार्यालय मंजूर करण्याची मागणी केली. यावर तातडीने कार्यवाही करत परिवहन मंत्र्यांनी नव्या शासन अध्यादेशातील निकषांच्या आधारे संगमनेरसाठीचा प्रस्ताव सकारात्मकरीत्या तयार करून शासनाकडे सादर करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. संगमनेर हे अहिल्यानगर जिल्ह्यातील एक मुख्य व्यापारी, शैक्षणिक आणि वाहतूक केंद्र असल्याने येथे दरवर्षी मोठ्या प्रमाणावर वाहनांची खरेदी-विक्री होते. मात्र, सध्या…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: निळवंडे धरणातून संगमनेर शहरासाठी राबविण्यात आलेली ऐतिहासिक थेट पाईपलाईन योजना पूर्णपणे यशस्वी झाली असून शहरवासीयांना दररोज स्वच्छ व मुबलक पाणी मिळत आहे. असे असताना २००९ च्या योजनेबाबत २०२६ मध्ये विधानसभेत अत्यंत खोटे, चुकीचे आणि अपूर्ण माहितीच्या आधारे आरोप करून संगमनेर शहर व तालुक्याची राज्यात बदनामी करण्याचे काम येथील नवीन लोकप्रतिनिधी करत आहेत. पालिका निवडणुकीत घरातील उमेदवारासह सर्वच जागांवर सपाटून मार खाल्ल्यामुळे आलेल्या वैफल्यग्रस्ततेतूनच हे आरोप केले जात असून, राज्य शासनाने जाहीर केलेल्या चौकशीचे आम्ही स्वागतच करतो. या चौकशीतून ‘दूध का दूध, पानी का पानी’ होऊन तोंडाच्या वाफा दवडणारे विरोधक तोंडघाशी पडतील, अशी घणाघाती टीका माजी…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन मुंबई: संगमनेर शहराच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेच्या निविदा प्रक्रियेतील कथित अनियमिततेची नगर विकास विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय चौकशी केली जाईल आणि दोन महिन्यांत दोषींवर कडक कारवाई केली जाईल, अशी घोषणा नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधानसभेत केली. आमदार अमोल खताळ यांच्या कार्यालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, खताळ यांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात लक्षवेधी सूचनेद्वारे या गंभीर प्रकरणावर सभागृहात जोरदार आवाज उठवला होता. आमदार खताळ यांनी सभागृहात सांगितले की, जून २००९ मध्ये प्रसिद्ध झालेल्या या पाणीपुरवठा योजनेच्या निविदेला तब्बल ६९ टक्के वाढीव दराने मंजुरी देण्यात आली होती. महाराष्ट्राच्या इतिहासात एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाढीव दराने निविदा मंजूर होण्याचे…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाइन संगमनेर: तालुक्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून सुरु असलेल्या अखंडित भीज पावसामुळे ग्रामीण भागाला मोठा तडाखा बसला आहे. या सातत्यपूर्ण पावसामुळे अनेक ठिकाणी नागरिकांच्या घरांचे आणि शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तालुक्यातील सावरगावतळ येथे तर बुधवारी सकाळी तीन शेतकऱ्यांची राहती घरे कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सावरगावतळ येथील वयोवृद्ध शेतकरी कारभारी दशरथ थिटमे, दादाभाऊ एकनाथ नेहे आणि भाऊसाहेब विठोबा नेहे या तिघांच्या घरांच्या भिंती बुधवारी सकाळी अचानक कोसळल्या. यामध्ये घरांचे अतोनात नुकसान झाले असून कुटुंबे उघड्यावर आली आहेत. मात्र, अचानक ओढवलेल्या या संकटामुळे या सर्व कुटुंबांना मोठ्या आर्थिक फटक्याला सामोरे जावे लागले असून, त्यांच्यासमोर आता सुरक्षित निवाऱ्याचा…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: संगमनेर आणि परिसरातील हजारो कामगार बांधवांसाठी एक आनंदाची आणि दिलासादायक बातमी आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले कामगार रुग्णालयाचे स्वप्न आता प्रत्यक्षात साकार होत असून, आमदार अमोल खताळ यांच्या सातत्यपूर्ण आणि प्रभावी पाठपुराव्यामुळे या रुग्णालयाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. शहरातील मुख्य ठिकाण असलेल्या जाणता राजा मार्गावरील, स्टेट बँकेसमोरील इमारतीमध्ये हे रुग्णालय उभारण्यात येत असून, लवकरच ते सर्वसामान्य नागरिकांच्या आणि कामगारांच्या सेवेत दाखल होणार आहे. आजवर कर्मचारी राज्य विमा योजनेअंतर्गत येणाऱ्या संगमनेरमधील हजारो कामगारांना किरकोळ तसेच गंभीर आजारांवरील उपचारांसाठी नाशिक किंवा अहिल्यानगर येथील रुग्णालयांवर अवलंबून राहावे लागत होते. या लांबच्या प्रवासामुळे कामगारांचा मोठा वेळ आणि पैसा…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: संगमनेर नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेचे थेट प्रक्षेपण करण्यात यावे, अशी आग्रही मागणी सामाजिक कार्यकर्ते मुजम्मील शेख (गुड्डू इंजिनिअर) यांनी मुख्याधिकारी दयानंद गोरे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. आजच्या आधुनिक आणि डिजिटल युगात प्रशासकीय कारभारात पूर्ण पारदर्शकता आणण्यासाठी हे हायटेक पाऊल उचलणे अत्यंत गरजेचे असल्याचे मुजम्मील शेख यांनी या निवेदनात म्हटले आहे. या मागणीच्या पूर्ततेकडे आता संगमनेरकरांचे लक्ष याकडे लागले आहे. नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये शहराच्या विकासाचे महत्त्वाचे निर्णय, विविध विकासकामे, आर्थिक बाबी आणि नागरिकांच्या मूलभूत समस्यांवर खडाजंगी चर्चा होत असते. अशा वेळी सभागृहात आपण निवडून दिलेले लोकप्रतिनिधी नक्की काय भूमिका मांडतात, हे प्रत्येक नागरिकाला घरबसल्या कळावे यासाठी…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन आश्वी: पावसाळा सुरू होताच आश्वी खुर्द आणि परिसरात महावितरणच्या गलथान कारभाराचे दर्शन घडू लागले असून, रविवारी सकाळी एका शेतकरी दाम्पत्याला मृत्यूचा थरारक अनुभव आला. आश्वी खुर्द येथील प्रगतशील शेतकरी रामनाथ क्षिरसागर (वय ४४) आणि त्यांच्या पत्नी योगिता क्षिरसागर (वय ३८) हे सकाळी नऊ वाजेच्या सुमारास आपल्या गायींसाठी चारा कापत असताना, त्यांच्या अवघ्या दोन फुटांवर ११ केव्हीची उच्चदाब वीजवाहिनी अचानक तुटून कोसळली. सुदैवाने या तारेला रबराचे आवरण असल्याने आणि दाम्पत्य काही अंतरावर असल्याने एक मोठा अनर्थ टळला. मुख्य वीजवाहिनी जमिनीवर पडताना मोठा स्फोट झाला आणि हवेत ठिणग्या उडाल्याने काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या…
आजचे राशिभविष्य मेष – आज बुद्धीचा योग्य वापर करून तुम्ही अवघड कामेही सहज सोपी कराल. कार्यक्षेत्रात तुमच्या नवीन कल्पनांचे कौतुक होईल, ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. मनाची एकाग्रता टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून कामात चुका होणार नाहीत. वृषभ – आज तुमचे मन थोडे विचलित राहू शकते. रखडलेली कामे पूर्ण करण्यासाठी नेहमीपेक्षा अधिक मेहनत घ्यावी लागेल. पैशांची देवाणघेवाण करताना किंवा कोणतीही आर्थिक गुंतवणूक करताना पूर्ण काळजी घ्या, घाईगडबडीत निर्णय घेऊ नका. मिथुन – आजचा दिवस तुमच्यासाठी प्रगतीचा आणि आनंदाचा असेल. तुमच्या प्रभावी बोलण्याने लोक प्रभावित होतील आणि समाजात तुमचा मान वाढेल. अचानक धनलाभ होण्याचे योग असून जुनी येणी वसूल होण्याची शक्यता आहे.…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन श्रीरामपूर: अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलाने गुन्हेगारी टोळ्या आणि सराईत गुन्हेगारांवरिुद्ध ‘झिरो टॉलरन्स’ धोरण स्वीकारले असून सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने सन २०२५ व २०२६ मध्ये श्रीरामपूर विभागातील एकूण ६८ सराईत आरोपींवर हद्दपारीची मोठी कारवाई करण्यात आली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूरचे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी सक्रिय गुन्हेगारांवर प्रतिबंधक कारवाई करण्याचे निर्देश सर्व पोलीस स्टेशनला दिले होते. त्यानुसार मानवी जीवितास किंवा मालमत्तेस भय, इजा किंवा धोका निर्माण करणाऱ्या व्यक्तींवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ५५ व ५६ च्या तरतुदीनुसार ही धडक कारवाई करण्यात आली आहे. महाराष्ट्र पोलीस कायदा कलम…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन अहिल्यानगर: भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर अकोले तालुक्यातील सर्व अंगणवाड्या, प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना आज, (मंगळवारी ७ जुलै) सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. पंकज आशिया यांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा उपाय म्हणून हे आदेश जारी केले आहेत. हवामान विभागाने अकोले तालुक्यात मुसळधार पाऊस, ढगफुटीसदृश परिस्थिती आणि पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवली आहे. तालुक्यामध्ये आधीच काही भागांत अतिवृष्टी झाली असल्याने निर्माण झालेली स्थानिक परिस्थिती विचारात घेऊन जिल्हा प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन अधिनियमातील तरतुदींनुसार हा निर्णय घेतला आहे. दरम्यान, शाळांना सुट्टी असली तरी सर्व मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना कार्यालयीन वेळेत…
