Author: अनंत पांगारकर
मुंबई – विशेष प्रतिनिधी शासकीय कर्मचाऱ्यांच्या सोशल मीडिया वापरासाठी लवकरच नियमावली तयार करण्यात येणार आहे. महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, १९७९ मध्ये सोशल मीडिया संदर्भात कोणताही उल्लेख नसल्याने, बदलत्या काळानुसार आणि सोशल मीडियाचा वाढता प्रभाव लक्षात घेता, पुढील तीन महिन्यांत नियमांमध्ये बदल करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली. शासकीय कर्मचाऱ्यांकडून समाज माध्यमांच्या वाढत्या वापरावर बंधने नसल्याबाबत सदस्य डॉ. परिणय फुके, प्रवीण दरेकर आणि विक्रम काळे यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती, ज्याला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी हे आश्वासन दिले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, शासकीय कर्मचाऱ्यांनी सोशल मीडियाचा उपयोग जनतेशी संवाद साधण्यासाठी आणि सार्वजनिक हितासाठी करावा. या संदर्भात…
अहिल्यानगर – अहिल्यानगर जिल्ह्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असताना, आता एक अत्यंत धक्कादायक आणि घृणास्पद प्रकार समोर आला आहे. एका व्यक्तीने आपल्या पत्नीला गुंगीचे औषध देऊन तिला परपुरुषांशी संबंध ठेवण्यास भाग पाडल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पोलिसांनी लोणी येथील एका व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. पीडित महिलेने (वय २९) दिलेल्या फिर्यादीनुसार, २०१४ मध्ये विवाह झाल्यानंतर सुरुवातीचे काही महिने ठीक होते. मात्र, त्यानंतर पतीने तिला मारहाण आणि शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. सासू आणि सासरे यांनीही तिला वाईट वागणूक दिली. दीड वर्षांपूर्वी तिला लोणी येथे एका बंगल्यावर नेण्यात आले, जिथे एका अनोळखी व्यक्तीने तिच्यासोबत बळजबरीने शरीरसंबंध केले. या कृत्याची वाच्यता केल्यास फोटो…
संगमनेर, दि. १९ मार्च – प्रतिनिधी संगमनेर तालुक्यातील पठार भागातील म्हसवंडी गावच्या परिसरात मंगळवारी दुपारी एका दुर्दैवी घटनेत डोंगराला लागलेल्या भीषण आगीत एका गुराख्याचा आणि त्याच्या एका गाईचा होरपळून मृत्यू झाला. सिताराम तुकाराम जाधव (वय अंदाजे ५० वर्षे) असे मृत गुराख्याचे नाव आहे. ते म्हसवंडी गावच्या परिसरातील जाधव वस्ती येथे वास्तव्यास होते आणि जनावरे चारण्याचा व्यवसाय करत होते. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी सिताराम जाधव हे त्यांच्या गाई चरायला घेऊन वनविभागाच्या हद्दीत गेले होते. दुपारच्या सुमारास अज्ञात कारणांमुळे डोंगरावर आग लागली. वाऱ्यामुळे आग वेगाने पसरली आणि जाधव तसेच त्यांच्या गाई आगीच्या कचाट्यात सापडले. आगीची तीव्रता…
संगमनेर, दि. १९ मार्च – प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड जगाचे दैवत आहे. मात्र भाजप महायुतीने सातत्याने शिवाजी महाराजांचा अपमान केला आहे. शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर महायुतीने उभारलेल्या कमानीवर छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा होती. महाराजांची प्रतिमा लावलेली कमान पडणे हे दुर्दैव असून, यामुळे महाराजांच्या प्रतिमेचा अवमान झाला आहे. त्यामुळे या घटनेला जबाबदार असणाऱ्या आयोजकांवर तातडीने गुन्हे दाखल करावे, अशी मागणी माजी नगराध्यक्ष विश्वास मुर्तडक यांनी केली आहे. फक्त राजकीय उद्देश ठेवून छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करणारे संगमनेरचे शिवसेनेचे स्थानिक लोकप्रतिनिधी व महायुतीचे समर्थक यांच्या गलथान कारभारामुळे कमान कोसळल्याची घटना बुधवारी घडली. शिवजयंती उत्सव समितीच्या माध्यमातून गेल्या सोळा वर्षांपासून छत्रपती शिवाजी…
संगमनेर, दि. १९ मार्च – प्रतिनिधी बुधवार संगमनेरकरांसाठी दुर्घटनावर ठरला आहे. शहरालगतच्या कासारवाडी शिवारातील मालपाणी हेल्थ क्लबच्या मालपाणी पॅलेसमध्ये लग्न समारंभासाठी तयार करण्यात आलेल्या स्टेजला आग लागून एक जण या आगीत गंभीर जखमी झाल्याच्या प्रकार घडला असताना शिवजयंतीसाठी महायुतीने बस स्थानकासमोर उभारलेली कमान कोसळली आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणालाही इजा झाली नाही. जागेवरून झालेल्या दोन गटातील वादानंतर सोमवारी संगमनेर मध्ये भव्य दिव्य शिवजयंती साजरी झाली. मोठ्या संघर्षानंतर दोन्ही गटांना प्रशासनाने दोन ठिकाणी परवानगी दिली होती. महायुतीने परवानगी दिलेल्या जागेवर किल्ला तर शिवजयंती उत्सव समिती स्वाभिमानी संगमनेर शहर तालुका यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचा देखावा उभारला होता. शिवजयंती झाल्यानंतर हे देखावे…
संगमनेर, दि. १९ मार्च – प्रतिनिधी कासारवाडी शिवारात असलेल्या मालपाणी हेल्थ क्लब येथील विवाह समारंभासाठी वापरल्या जाणाऱ्या मालपाणी पॅलेस मध्ये उभारण्यात आलेल्या स्टेजला बुधवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. लागलेल्या आगीमध्ये एक जण गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तर एक जण बचावला असल्याची माहिती समोर येत आहे. घटनास्थळी अग्निशामक दल, रुग्णवाहिका, नगरपरिषद आणि हजर झाले आहे. आगीचे निश्चित कारण समजू शकले नसले तरी स्टेज उभारण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या कटरच्या निर्माण झालेल्या ज्वालांमुळे थर्माकोलने पेट घेतल्याने ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मालपाणी पॅलेसचा वापर विवाह समारंभासह अन्य काही कारणांसाठी केला जातो. बुधवारी दुपारी पॅलेसच्या…
संगमनेर, दि. १९ मार्च – प्रतिनिधी बौद्ध धर्मीयांचे महाविहार, लेणी, दीक्षाभूमी ही ठिकाणे बौद्धांच्या ताब्यात नसून ही सर्व बौद्ध स्थळे भारतीय बौद्ध महासंघ राष्ट्रीय संस्थेच्या ताब्यात देण्यात यावी. बौद्ध गया मंदिर अधिनियम १९४९ रद्द करावा, या मागणीसाठी येथील वंचित बहुजन आघाडीच्यावतीने प्रांताधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. वंचित बहुजन आघाडीच्यावतीने मंगळवारी दुपारी हे आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी उत्कर्षाताई रुपवते, चंद्रकांत पवार, राजू मुन्तोडे, रामदास भालेराव, एकनाथ मेढे, अशोक गायकवाड, रवींद्र भालेराव, विशाल रुपवते, संगिता मिसाळ, शकुंतला जाधव, गौतम रोहम, संध्या खरे, सुनिता भालेराव, वैभव मोकळ आदी उपस्थित होते. यावेळी उत्कर्षा रुपवते म्हणाल्या, अशोक सम्राट यांनी ८४ हजार स्तुप बांधले. यात…
महाराष्ट्र संवाद न्यूज पुणे, दि. १९ मार्च – ऐन रंगपंचमीच्या दिवशी पुण्याच्या पिंपरी-चिंचवडमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. पुण्याच्या हिंजवडी मध्ये धावत्या ट्रॅव्हलर बसला आग लागल्याने चार जणांचा होरपळून मृत्यू झाला असून सहा जण गंभीर जखमी झाले आहे. जखमींवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे. मृतांची व जखमींची नावे अद्याप समोर आलेली नाही. सकाळी आठच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली आहे. १५ प्रवासी घेऊन होमा प्रिंटिंग प्रेसची बस तमन्ना सर्कलवरून रेजवानच्या दिशेने जात होती. अचानक बसला समोरून आग लागल्याने चालकाने उडी घेतली. मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवडच्या हिंजवडीमध्ये होमा प्रिंटिंग प्रेस कंपनीच्या बसला आग लागली. तमन्ना सर्कलवरून रिजवानच्या दिशेने जाणाऱ्या बसने समोरून अचानक पेट…
अहिल्यानगर, दि. १९ मार्च – अहिल्यानगर शहरातील बेपत्ता व्यापारी दीपक लालसिंग परदेशी (वय ६८) यांचे खंडणीसाठी अपहरण करून खून करण्यात आल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. १० कोटी रुपयांच्या मागणीसाठी त्यांचे अपहरण करण्यात आले आणि नंतर गळा आवळून त्यांची हत्या करण्यात आली. या प्रकरणी तोफखाना पोलिसांनी एका बडतर्फ पोलिसासह दोघांना अटक केली आहे. या दोघांना न्यायालयाने २१ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. किरण बबन कोळपे (वय ३८, रा. विळद, ता. अहिल्यानगर) आणि त्याचा साथीदार सागर गीताराम मोरे (वय २८, रा. ब्राह्मणी, राहुरी) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. त्यांनी खुनाची कबुली दिली असल्याचे तपासी अधिकारी आणि तोफखाना पोलीस…
मुंबई दि. १८ मार्च : प्रतिनिधी राज्य सरकारने सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका सुरूच ठेवला आहे. गेल्या काही दिवसांपासून दर ८ ते १५ दिवसांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांची घोषणा होत आहे. यापूर्वी १५ दिवसांपूर्वी काही जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांच्या बदल्या झाल्या होत्या. आता पुन्हा एकदा सहा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर करण्यात आल्या आहेत. यामध्ये नागपूरच्या अतिरिक्त महापालिका आयुक्त आंचल गोयल यांना मुंबईच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्त करण्यात आले आहे, तर छत्रपती संभाजीनगरसह इतर जिल्ह्यांमध्येही अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये बदल करण्यात आले आहेत. नागपूरमध्ये नुकत्याच झालेल्या दोन गटांमधील तणावामुळे शहर चर्चेत आले होते. सध्या तिथली परिस्थिती नियंत्रणात असली तरी आता अतिरिक्त महापालिका आयुक्तांची बदली झाल्याने याबाबत चर्चा…
