Author: अनंत पांगारकर
संगमनेर, प्रतिनिधी- कै. विमल गुंजाळ ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या संचालक आणि कर्मचाऱ्यांवर दाखल असलेल्या गुन्ह्यात जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. बी. गव्हाणे यांनी या प्रकरणातील एकूण १४ आरोपींपैकी ११ जणांना अटकपूर्व जामीन मंजूर केला असून, संस्थापक मधुकर वाळे यांच्यासह तिघांचा अर्ज मात्र फेटाळून लावला आहे. तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, पतसंस्थेच्या अध्यक्षांनी आणि व्यवस्थापनाने त्यांना कर्ज देण्यासाठी शेतजमिनीचा गहाणखत करण्याऐवजी फसवणुकीने खरेदीखत लिहून घेतले. तसेच, काही कोऱ्या कागदपत्रांवर सह्या घेऊन त्याचा गैरवापर करत सहकार कायद्याच्या कलम १०१ अन्वये वसुलीची कारवाई केली व जामीनदाराची मालमत्ता जप्त केली. संबंधित प्रकरणात कर्ज वसुलीच्या वादातून फसवणूक, बनावट कागदपत्रे आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (ॲट्रॉसिटी) संगमनेर तालुका…
अहिल्यानगर – पारनेर तालुक्यातील निघोज येथील एसबीआय बँकेचे एटीएम मशीन लोखंडी हत्याराच्या सहाय्याने फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पंजाबमधील एका सराईत आरोपीला जेरबंद करण्यात पारनेर पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी संकेत चंद्रशेखर वैद्य (वय ४०, रा. नाशिक) यांनी पारनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. २२ मार्च २०२६ रोजी पहाटेच्या सुमारास एका अज्ञात इसमाने चेहऱ्यावर रुमाल बांधून ओळख लपवत आत प्रवेश करून लोखंडी हत्याराचे सहाय्याने एटीएम मशीन फोडून एटीएम मधील पैसे चोरी करण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या होत्या. पोलीस निरीक्षक संतोष खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली…
दरवर्षी युनेस्को या जागतिक संघटनेच्या वतीने जागतिक रंगभूमी दिनाच्या निमित्ताने एक जागतिक दर्जाचे रंगकर्मी जगाला उद्देशून एक संदेश देत असत्तात. जागतिक रंगभूमी दिन संदेश २०२६: – मी एक अभिनेता आहे, जो प्रामुख्याने चित्रपट अभिनेता म्हणून ओळखला जातो. पण माझी मुळे रंगभूमीशी खोलवर जोडलेली आहेत. मी १९७७ ते २००३ पर्यंत वूस्टर ग्रुपचा सदस्य होतो, जिथे मी न्यूयॉर्क शहरातील ‘द परफॉर्मिंग गॅरेज’मध्ये मूळ कलाकृतींची निर्मिती आणि सादरीकरण केले, तसेच जगभर दौरे केले. मी रिचर्ड फोरमन, रॉबर्ट विल्सन आणि रोमियो कॅस्टेलुची यांच्यासोबतही काम केले आहे. आता, मी व्हेनिस थिएटर बिएनालेचा कलात्मक संचालक आहे. ही नियुक्ती, जगातील घडामोडी आणि रंगभूमीवर परतण्याची माझी इच्छा, या…
आजचे राशीभविष्य मेष आजचा दिवस तुमच्यासाठी उत्साहाचा आणि नवीन संधी घेऊन येणारा ठरेल. कार्यक्षेत्रात तुमच्या कष्टाचे चीज होईल आणि वरिष्ठांकडून शाबासकी मिळेल. आर्थिक बाबतीत सावध राहणे आवश्यक आहे, विनाकारण खर्च वाढण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबतचे संबंध मधुर राहतील आणि एकमेकांना समजून घेण्यावर भर द्याल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, विशेषतः खाण्यापिण्याच्या सवयी बदला. वृषभ आज तुम्हाला नशिबाची उत्तम साथ लाभेल. बऱ्याच काळापासून रखडलेली कामे मार्गी लागतील. व्यापारी वर्गाला मोठा नफा मिळण्याची चिन्हे आहेत. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील आणि पाहुण्यांच्या आगमनाने मन प्रसन्न होईल. सामाजिक कार्यात तुमचा सहभाग वाढेल, ज्यामुळे तुमचा सन्मान वाढेल. प्रवासाचे योग आहेत, जो सुखकर आणि लाभदायक ठरेल. मिथुन आज…
मुंबई, विशेष प्रतिनिधी- खरात प्रकरणाशी आपला कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट करत राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. या प्रकरणातील आर्थिक व्यवहार किंवा कोणत्याही गैरकृत्याशी आपला दुरान्वयेही संबंध नसल्याची भूमिका त्यांनी पहिल्या दिवसापासून मांडली असून आजही त्या आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. पुराव्याविना माध्यमांमधून होत असलेले आरोप वेदनादायक असल्याचे सांगत, भविष्यात सत्य प्रखरतेने समोर येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणाचा तपास पारदर्शक आणि निष्पक्षपणे व्हावा, अशी मागणी चाकणकर यांनी यापूर्वीच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पोलीस महासंचालकांकडे केली होती. तपासादरम्यान सर्व बाबी स्पष्ट होतीलच, असेही त्यांनी नमूद केले आहे. आज सकाळी आदरणीय सुनेत्रा पवार…
संगमनेर, प्रतिनिधी- घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्ह्यांसाठी वापरलेली आणि चोरीच्या तपासात जप्त केलेली अनेक वाहने सध्या पोलीस ठाण्याच्या ताब्यात आहेत. सन २०१० मध्ये पोलीस ठाण्याची निर्मिती झाल्यापासून ही वाहने जप्त करण्यात आली आहेत. या वाहनांच्या मूळ मालकांनी तातडीने संपर्क साधण्याचे आवाहन सहायक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात यांनी केले आहे. या संदर्भात प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकानुसार, जप्त करण्यात आलेल्या वाहनांमध्ये विविध कंपन्यांच्या दुचाकी आणि ट्रॅक्टरचा समावेश आहे. यामध्ये प्रामुख्याने खालील वाहने आहेत: दुचाकी वाहने: MH 17 Q 8396, MH 17 AH 8488, MH 17 N 4920, MH 19 AF 2025, MH 17 DX 7285, MH 17 X 2175, MH 12 WY 0164,…
पाथर्डी: अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात एका अज्ञात महिलेची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मौजे कासार पिंपळगाव येथील मुळा पाटबंधारे विभागाच्या कॅनॉलमध्ये एका पांढऱ्या रंगाच्या गोणीत दोरीने बांधलेल्या अवस्थेत या महिलेचा मृतदेह शुक्रवारी सकाळी आढळून आला. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलीस सध्या आरोपीचा शोध घेत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, २७ मार्च २०२६ रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास कासार पिंपळगाव येथील ग्रामपंचायत सार्वजनिक विहिरीजवळील कॅनॉलमध्ये एक संशयास्पद गोणी तरंगताना नागरिकांना दिसली. याबाबतची माहिती मिळताच पाथर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी अमोल बंकट जवरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. गोणी उघडली असता त्यात एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला. प्राथमिक…
संगमनेर, प्रतिनिधी- संगमनेर नगरपालिकेच्या वतीने शहरात विशेषतः नवीन नगर रोड परिसरात राबविण्यात आलेली अतिक्रमण हटाव मोहीम अत्यंत अन्यायकारक, एकतर्फी आणि भेदभाव करणारी असल्याचा गंभीर आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपजिल्हाप्रमुख अमर कतारी (राजपूत) यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी नगराध्यक्ष मैथिलीताई तांबे आणि मुख्याधिकारी दयानंद गोरे यांना लेखी निवेदन देऊन स्थानिक कष्टकरी आणि छोट्या व्यावसायिकांवर होणाऱ्या अन्यायाचा पाढा वाचला आहे. अमर कतारी यांनी निवेदनात नमूद केले आहे की, नगरपालिकेने केवळ नवीन नगर रोड परिसरातील अतिक्रमणे हटवून गरिबांच्या पोटावर पाय दिला आहे, मात्र शहरातील इतर भागांतील अतिक्रमणे अद्यापही ‘जैसे थे’ आहेत. ज्या मोठ्या इमारतींकडे पार्किंगची सुविधा नाही, अशा ठिकाणी धनदांडगे…
नाशिक/कोपरगाव: नाशिक येथील स्वयंघोषित भोंदू बाबा अशोक खरात याच्याविरुद्ध सरकारवाडा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यांचा तपास सध्या ‘विशेष तपास पथक’ (SIT) करत आहे. या तपासादरम्यान एक अत्यंत गंभीर बाब समोर आली आहे. या प्रकरणातील पीडित महिलांचे अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर प्रसारित केले जात असून, यामुळे पीडितांच्या गोपनीयतेचा भंग होत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. महिलांच्या सन्मानाला ठेच पोहचवणारी ही विकृती रोखण्यासाठी पोलिसांनी तातडीने तांत्रिक शोधमोहीम हाती घेतली आणि गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली आहे. या तपासाचे धागेदोरे अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगावपर्यंत पोहोचले आहेत. कोपरगाव येथील ‘BMW’ नावाच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर राहुल गंगाधर शिंदे याने पीडित महिलांचे अश्लील व्हिडिओ प्रसारित केल्याचे…
आजचे राशीभविष्य मेष: आजचा दिवस आपल्यासाठी उत्साहाचा राहील. कामाच्या ठिकाणी नवीन संधी मिळण्याची शक्यता असून वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगावी लागेल. कुटुंबातील सदस्यांशी संवाद वाढवल्यास नाते अधिक दृढ होईल. आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. वृषभ: आज मनासारख्या गोष्टी घडल्याने मन प्रसन्न राहील. व्यवसायात धनलाभाचे योग असून जुनी थकलेली कामे मार्गी लागतील. जोडीदारासोबत आनंदाचे क्षण व्यतीत कराल. प्रवासाचे नियोजन आखाल मात्र वाहने चालवताना दक्षता घेणे गरजेचे आहे. मिथुन: आज आपणास संमिश्र फळे मिळतील. कामाचा ताण वाढण्याची शक्यता असली तरी संयमाने परिस्थिती हाताळावी. खाण्यापिण्याच्या सवयींकडे लक्ष द्यावे. नातेवाईकांशी असलेले मतभेद दूर होऊन सलोख्याचे वातावरण निर्माण होईल. खर्चावर नियंत्रण ठेवावे. कर्क:…
