Author: अनंत पांगारकर
नवी दिल्ली: भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय निवडणूक समितीने महाराष्ट्रातील आगामी राज्यसभा द्विवार्षिक निवडणुकीसाठी आपल्या चार अधिकृत उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. या संदर्भात पक्षाच्या केंद्रीय कार्यालयाकडून अधिकृत प्रसिद्धी पत्रक जारी करण्यात आले असून, यामध्ये अनुभवी नेत्यांसह नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. महाविकास आघाडीकडून अद्याप उमेदवाराची घोषणा करण्यात आली नसल्याने आघाडीतील पेच अद्यापही कायम आहे. महाविकास आघाडीकडून कोणाच्या नावाची घोषणा केली जाते याची उत्सुकता लागली आहे. भाजप कडून जाहीर करण्यात आलेल्या यादीनुसार, महायुतीमधील महत्त्वाचे घटक पक्ष असलेले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) चे प्रमुख आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्यासोबतच भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस…
पिंपरी-चिंचवड: कौतुक आणि जिद्दीच्या जोरावर अशक्य गोष्टीही साध्य करता येतात, याचाच प्रत्यय साळी समाजातील चिमुकल्या कारवी सारंग साळी हिने आणून दिला आहे. वयाच्या अवघ्या ५ व्या वर्षी महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर ‘कळसुबाई’ सर करण्याची ऐतिहासिक कामगिरी कारवीने डिसेंबर २०२५ मध्ये फत्ते केली आहे. तिच्या या अफाट ध्येयधोरणाची दखल थेट ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’ने घेतली असून, तिला ‘आयबीआर अचिव्हर’ (IBR Achiever) या मानांकनाने सन्मानित करण्यात आले आहे. कळसुबाई शिखरावर आजवर अनेक बाल गिर्यारोहकांनी चढाई केली असली, तरी कारवीची ही मोहीम अत्यंत विशेष ठरली. तिने शिखरावर पोहोचण्यासाठी निवडलेला मार्ग हा अत्यंत कमी वापरातील, अनवट आणि खडतर असा ‘ऑफबीट’ मार्ग होता. ज्या मार्गावर गिर्यारोहकांच्या…
आजचे राशिभविष्य मेष आजचा दिवस तुमच्यासाठी उत्साहाने भरलेला असेल. कार्यक्षेत्रात तुमच्या कष्टाचे योग्य फळ मिळेल. आर्थिक बाबतीत सावध राहणे गरजेचे आहे, विनाकारण खर्च वाढण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबतचे संबंध मधुर राहतील आणि एकमेकांना समजून घेण्यावर भर द्याल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, विशेषतः खाण्यापिण्याच्या सवयी बदला. वृषभ आज तुम्हाला नशिबाची उत्तम साथ मिळेल. रखडलेली कामे मार्गी लागल्यामुळे मनावरचा ताण हलका होईल. समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल. जुन्या मित्रांच्या भेटीमुळे मन प्रसन्न राहील. व्यवसायात नवीन संधी उपलब्ध होतील, मात्र घाईने कोणताही निर्णय घेऊ नका. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला मोलाचा ठरेल. मिथुन आजचा दिवस संमिश्र फलदायी राहील. कामाचा ताण वाढल्यामुळे थकवा जाणवू शकतो. बोलण्यावर नियंत्रण…
कोपरगाव: जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी आणि गुन्हेगारी प्रवृत्तींना मिळणारा आश्रय पूर्णपणे नष्ट करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे. नागरिकांच्या मनातील भीती दूर करून त्यांना थेट प्रशासनाशी जोडण्याच्या उद्देशाने लवकरच एक विशेष ‘हेल्पलाईन’ क्रमांक सुरू करण्यात येईल. या हेल्पलाईनद्वारे तक्रार करणाऱ्या नागरिकाची ओळख पूर्णपणे गुप्त ठेवून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही राज्याचे जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याच्या नूतन इमारतीचे आणि पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात आलेल्या ६४ निवासस्थानांच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी पोलीस दलाच्या ताफ्यात दाखल झालेल्या चार अत्याधुनिक फॉरेन्सिक लॅब व्हॅनचेही लोकार्पण करण्यात आले. या…
संगमनेर, प्रतिनिधी राज्यात प्रतिबंधित असलेल्या मांगुर माशांच्या बेकायदेशीर वाहतुकीविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने शिर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी ४०० किलो मांगुर मासे आणि एक ट्रक असा एकूण २१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून चार आरोपींना ताब्यात घेतले आहे. अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी जिल्ह्यातील अवैध व्यवसायांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक मेवे, पोलीस अंमलदार राहुल द्वारके, शाहिदा शेख, फुरकान शेख, राहुल डोके, सुनील माळवदकर, प्रशांत राठोड, सतीश भवर आणि चालक उमाकांत गावडे यांच्या पथकाने ही कारवाई केली. पोलीस अधिकाऱ्यांनी…
संगमनेर, प्रतिनिधी – संगमनेर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या बसस्थानक परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांचे भव्य स्मारक उभारण्याचा मार्ग आता मोकळा झाला असून, हे स्मारक नेमके कोणत्या स्वरूपाचे असावे, याचा निर्णय आता थेट जनतेच्या कौलाने घेतला जाणार आहे. संगमनेर नगरपरिषदेच्या वतीने ५ ते ७ मार्च दरम्यान एका विशेष मतदान प्रक्रियेचे आयोजन करण्यात आले असून, यामध्ये नागरिक आपल्या पसंतीच्या स्मारकाच्या आराखड्याला मत देऊ शकणार असल्याची माहिती नगराध्यक्ष डॉ. मैथिलीताई तांबे यांनी दिली आहे. शहराच्या अस्मितेशी जोडल्या गेलेल्या या निर्णयामध्ये संगमनेरकरांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपले मत नोंदवावे, असे आवाहन नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आले आहे. या स्मारकाच्या पार्श्वभूमीवर लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली…
संगमनेर, प्रतिनिधी – गुरु-शिष्याच्या पवित्र नात्याला काळिमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना संगमनेर तालुक्यातील पठार भागातून समोर आली आहे. एका नामांकित शाळेत इयत्ता नववीत शिकणाऱ्या १५ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीवर त्याच शाळेतील शिक्षकाने वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचे उघड झाले असून, या अत्याचारामुळे पीडित मुलगी गरोदर राहिली आहे. याप्रकरणी घारगाव पोलिसांनी तत्परता दाखवत आरोपी शिक्षक अमोल बाबासाहेब भोसले (रा. वरवंडी, ता. संगमनेर) याला बेड्या ठोकल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी साकूर परिसरात आपल्या कुटुंबासह वास्तव्यास आहे. तिचे आई-वडील उदरनिर्वाहासाठी घरापासून काही अंतरावर असलेल्या कपड्याच्या दुकानात कामाला जात असल्याने ती अनेकदा घरी एकटीच असायची. कौटुंबिक कारणातून ती काहीशी मानसिक तणावात होती, याच बाबीचा…
दैनिक राशीभविष्य: २ मार्च २०२६ मेष आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहाचा राहील. कार्यक्षेत्रात नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुमच्या कारकिर्दीत प्रगती होईल. आरोग्याच्या दृष्टीने आजचा दिवस उत्तम असून, जुन्या व्याधींपासून सुटका मिळेल. जोडीदारासोबतचे संबंध मधुर राहतील, मात्र घाईघाईत कोणताही मोठा निर्णय घेऊ नका. वृषभ आर्थिक नियोजनासाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. तुमच्या आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा होण्यासाठी काही ठोस पावले उचलली जातील. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील आणि मित्रांकडून अपेक्षित सहकार्य मिळेल. व्यापारात नवीन गुंतवणूक करताना अनुभवी व्यक्तींचा सल्ला घेणे हिताचे ठरेल. मिथुन आज तुम्हाला तुमच्या वाणीवर ताबा ठेवावा लागेल, अन्यथा विनाकारण वाद होऊ शकतात. कामाच्या ठिकाणी ताणतणाव जाणवण्याची शक्यता आहे, त्यामुळे…
संगमनेर, प्रतिनिधी – संगमनेर तालुका पोलिसांनी नाशिक-पुणे महामार्गावरील कऱ्हे घाट परिसरात मोठी कारवाई करत गुटखा आणि सुगंधी तंबाखूची अवैध वाहतूक उघडकीस आणली आहे. या कारवाईत पोलिसांनी सुमारे १९ लाख २० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला असून तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २ मार्च २०२६ रोजी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास संगमनेर तालुका पोलीस स्टेशनचे अंमलदार गस्त घालत असताना त्यांना एका पांढऱ्या रंगाच्या महिंद्रा स्कॉर्पिओ गाडीचा (क्रमांक एम.एच. ४६ एक्स. ४०४६) संशय आला. पोलिसांनी या वाहनाची झडती घेतली असता, त्यामध्ये विक्रीच्या उद्देशाने साठवून ठेवलेला मोठा साठा मिळून आला. यामध्ये ६ लाख ५३ हजार ४०० रुपये किमतीचा विमल पान…
संगमनेर, प्रतिनिधी – शहर पोलिसांनी अमली पदार्थ तस्करीविरोधात मोठी कारवाई करत सुकेवाडी-समनापूर रोड परिसरातून तब्बल १० लाख ९४ हजार ७०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत पोलिसांनी २१ किलो ४९० ग्रॅम वजनाचा गांजा आणि एक स्विफ्ट डिझायर कार हस्तगत केली असून, दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, १ मार्च २०२६ रोजी रात्री आठ ते दहाच्या दरम्यान सुकेवाडी येथील समनापूर रोड परिसरात ही कारवाई करण्यात आली. पोलीस कॉन्स्टेबल विजय अण्णा खुळे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये प्रथमेश उर्फ भैय्या पोपट राऊत (वय २६, रा. घुलेवाडी, संगमनेर) आणि प्रथमेश सुरेश गोलवड (वय २१, रा. शिर्डी,…
