Author: अनंत पांगारकर

संगमनेर, प्रतिनिधी – रोटरी क्लब संगमनेरच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘आनंदी रस्ते’ या उपक्रमाने रविवारी संगमनेर शहरात चैतन्याचे वातावरण निर्माण केले. रोटरी इंटरनॅशनलच्या १२१ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे यंदा दहावे वर्ष होते. या सोहळ्याला संगमनेरकरांनी आबालवृद्धांसह मोठी गर्दी करत प्रतिसाद दिला. कार्यक्रमाच्या निमित्ताने आमदार अमोल खताळ, नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, रोटरी डिस्ट्रीक्ट ३१३२ चे असिस्टंट गव्हर्नर अमोल वैद्य आणि माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांच्यासह शहरातील अनेक मान्यवर उपस्थित होते. रो. दिलीप मालपाणी यांनी दहा वर्षांपूर्वी संगमनेरमध्ये रुजवलेली ही संकल्पना आता जनचळवळ बनली आहे. यावर्षीच्या उपक्रमात सांस्कृतिक आणि…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी –  संगमनेर शहराच्या विकासकामांना गती देण्यासाठी आणि नगरपरिषदेचा महसूल वाढवण्यासाठी मालमत्ता व पाणीपट्टी कर वेळेत भरणे अत्यंत आवश्यक आहे. याच पार्श्वभूमीवर, शहरातील सर्व मालमत्ता व पाणीपट्टी कर धारकांनी आपल्याकडे असलेल्या कराचा भरणा वेळेत करून नगर परिषदेस सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्षा डॉ. सौ. मैथिली तांबे यांनी केले आहे.  विशेषतः ज्या मालमत्ता धारकांकडे अनेक वर्षांपासून कराची रक्कम थकीत आहे, त्यांच्यासाठी नगरपरिषदेने ‘अभय योजना’ जाहीर केली असून, या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. या योजनेच्या सविस्तर माहितीनुसार, थकबाकीदार मालमत्ता धारकांच्या करावर दरमहा दोन टक्के या दराने शास्ती (दंड) आकारली जाते. मात्र, अभय योजनेअंतर्गत या शास्तीच्या रकमेत ५०…

Read More

दैनिक राशीभविष्य: २३ फेब्रुवारी २०२६ मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत ऊर्जेचा राहील. कामाच्या ठिकाणी तुमचे वर्चस्व वाढेल आणि रखडलेली कामे मार्गी लागतील. आरोग्याची थोडी काळजी घेणे आवश्यक आहे, विशेषतः खाण्यापिण्याच्या सवयींकडे दुर्लक्ष करू नका. जोडीदारासोबतचे संबंध मधुर राहतील. वृषभ: आर्थिक नियोजनासाठी आजचा दिवस उत्तम आहे. जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला लाभ मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील, मात्र बोलताना संयम बाळगणे हिताचे ठरेल. नवीन व्यवसायाची संधी चालून येईल. मिथुन: तुमच्या बौद्धिक क्षमतेचा कस लागेल अशा काही घटना आज घडू शकतात. नोकरीत नवीन जबाबदाऱ्या अंगावर पडतील, पण तुम्ही त्या समर्थपणे पेलू शकाल. मित्रांच्या भेटीमुळे मन प्रसन्न होईल आणि एखादा सुखद प्रवास घडण्याची…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी –  पर्यावरण संवर्धन आणि निसर्ग रक्षणाच्या चळवळीत संगमनेर तालुक्यातील खांडगाव ग्रामपंचायतीने राज्याच्या नकाशावर आपली मोहोर उमटवली आहे. राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात आलेल्या ‘माझी वसुंधरा अभियान ४.०’ अंतर्गत २,५०० ते ५,००० लोकसंख्या गटात खांडगावने उत्कृष्ट कामगिरीचे प्रदर्शन केले. या यशाबद्दल गावाला राज्यस्तरीय पुरस्कार आणि ५० लाख रुपयांचे रोख पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले आहे. मुंबई येथील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियममध्ये या विशेष गौरव सोहळ्याचेआयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल आचार्य देवव्रत, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते खांडगावच्या पदाधिकाऱ्यांनी हा बहुमान स्वीकारला. खांडगावने राबविलेले पर्यावरणपूरक उपक्रम आणि ग्रामस्थांच्या…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी –  निळवंडे डाव्या कालव्याच्या माध्यमातून कासारे येथील पाझर तलावात पाणी सोडण्यात आल्याने या भागातील शेतीचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. रविवारी आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते या पाण्याचे विधिवत पूजन करून रब्बी हंगामासाठी पाणी सोडण्यात आले.  याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात बोलताना आमदार अमोल खताळ म्हणाले की, लोहारे-कासारे आणि मेंढवण हा परिसर पूर्वीपासूनच दुष्काळाच्या झळा सोसत आला आहे. अनेक पिढ्यांनी येथे भीषण पाणीटंचाई अनुभवली असून, येथील शेती पूर्णपणे पावसाच्या लहरीपणावर अवलंबून होती. अनेकदा पाझर तलाव कोरडे राहत असल्याने हातातोंडाशी आलेली पिके वाया जात असत.  मात्र, आता राज्यातील महायुती सरकारच्या माध्यमातून आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच पालकमंत्री राधाकृष्ण…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी – लोकशाहीमध्ये ग्रामसभा ही नागरिकांच्या समस्या मांडण्यासाठीचे हक्काचे व्यासपीठ मानले जाते. मात्र, संगमनेर तालुक्यातील धांदरफळ खुर्द येथे एका तरुणाला मूलभूत पाणी प्रश्नावर आवाज उठवणे चांगलेच महागात पडले आहे. प्रश्न विचारल्याचा राग मनात धरून बाजार समितीच्या संचालकाने तरुणाला मारहाण केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. धांदरफळ खुर्द येथे नुकतीच ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत विविध विषयांवर चर्चा सुरू असताना पियुष ठोंबरे या तरुणाने, आमच्या घरी नळाचे पाणी का येत नाही? असा साधा प्रश्न उपस्थित केला. या प्रश्नामुळे संतप्त झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सतीश विश्वनाथ खताळ यांनी तू असे प्रश्न का विचारतो? तुला पाहून घेईन, अशी…

Read More

जगाला हादरवून सोडणार्‍या जेफ्री एपस्टिनच्या भुताने भारताला हैराण करून सोडलं आहे. बाहेर येणार्‍या एकेका गोष्टीने जग हदरतो आहेच. पण स्वत:ला संस्कृती आणि परंपरेचा पायिक समजणार्‍या भारताचं आणि इथल्या राजकारण्यांचं नाव बाहेर येऊ लागल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झालीय. फाईलमध्ये आपलं नाव येऊ नये म्हणून सत्ता ज्या प्रकारे अमेरिकेपुढे लोटांगण घालत आहे, ते पहाता हे देशाच्या अस्तित्वासाठी अतिगंभीर होऊ शकतं. एपस्टिनच्या फाईलमध्ये अडकलेला एका राष्ट्राचा प्रमुख इतर देशांना कसा ब्लॅकमेल करतो, हे भारताच्या सत्ताधार्‍यांना लक्षात आलं नसेल तर दुर्देवच. असल्या विकृतीच्या मागे लागल्यावर देशाचं भलं होईल, असं ज्यांना वाटतं ते त्याहून अधिक विकृतीने पछाडलेत असंच म्हणायला हवं. ज्या महिला पत्रकाराने हे प्रकरण…

Read More

मेष आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहाचा राहील. कार्यक्षेत्रात तुमच्या कामाचे कौतुक होईल आणि वरिष्ठ तुमच्यावर नवीन जबाबदारी सोपवू शकतात. आर्थिक बाबतीत दिवस सामान्य असला तरी, जुन्या गुंतवणुकीतून लाभ मिळण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबतचे संबंध मधुर राहतील, मात्र आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. वृषभ आज तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. प्रलंबित असलेली सरकारी कामे मार्गी लागतील. व्यावसायिकांसाठी आजचा दिवस मोठ्या नफ्याचा ठरू शकतो. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील आणि संध्याकाळी पाहुण्यांचे आगमन होऊ शकते. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. मिथुन आजचा दिवस संमिश्र फलदायी ठरेल. विचारांमध्ये स्पष्टता नसल्यामुळे काही महत्त्वाचे निर्णय घेताना गोंधळ होऊ शकतो. नोकरीमध्ये सहकाऱ्यांशी जुळवून घ्यावे लागेल. रागावर नियंत्रण…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी –  पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासाच्या दिशेने टाकलेल्या खंबीर पावलांमुळे संगमनेर नगरपरिषदेने ‘माझी वसुंधरा अभियान ४.०’ अंतर्गत राज्यस्तरीय पुरस्कारावर आपले नाव कोरले आहे. मुंबईतील वरळी येथील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियमवर आयोजित एका दिमाखदार सोहळ्यात ५० हजार ते १ लाख लोकसंख्या गटातील ‘अमृत’ शहरांच्या श्रेणीत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल शहराला हा बहुमान प्रदान करण्यात आला. राज्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या सोहळ्यात पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते संगमनेरच्या नगराध्यक्षा डॉ. मैथिलीताई तांबे, तत्कालीन मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी हा मानाचा पुरस्कार स्वीकारला. यावेळी राज्यपाल आचार्य देवव्रत, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, संगमनेर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे आणि…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी –  दैनंदिन जीवनातील धावपळ विसरून नागरिकांनी आनंदाचे क्षण अनुभवावेत यासाठी रोटरी क्लब ऑफ संगमनेरच्यावतीने अत्यंत लोकप्रिय असलेल्या ‘आनंदी रस्ते’ अर्थात ‘हॅपी स्ट्रीट’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांना एकत्र आणणारा हा उपक्रम शहरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारा ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. यंदा या उपक्रमाचे विशेष महत्त्व असून, हे या उपक्रमाचे १० वे वर्ष आहे. हा उपक्रम उद्या रविवारी (२२ फेब्रुवारी) सकाळी ७ ते १० या वेळेत स्व. ओंकारनाथ मालपाणी मार्गावर, राजपाल क्लॉथ स्टोअर ते जाणता राजा मैदान या दरम्यान पार पडणार आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांना विविध खेळ, गाणी, गप्पा आणि…

Read More