Author: अनंत पांगारकर
संगमनेर, प्रतिनिधी- मार्चअखेर जवळ आल्याने संगमनेर नगरपरिषदेने मालमत्ता आणि पाणीपट्टी कराच्या वसुलीसाठी आपली यंत्रणा पूर्णपणे कार्यान्वित केली आहे. थकबाकी न भरणाऱ्यांविरुद्ध प्रशासनाने आता कडक पाऊले उचलण्यास सुरुवात केली असून, या मोहिमेअंतर्गत शहरातील विविध भागांतील २२ नळ कनेक्शन खंडित करण्यात आली आहेत. मुख्याधिकारी दयानंद गोरे यांनी स्वतः या मोहिमेचे नेतृत्व करत थकबाकीदारांच्या भेटी घेण्यास सुरुवात केल्याने थकबाकीदारांचे धाबे दणाणले आहेत. कर वसुलीसाठी मुख्याधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कर अधिकारी श्वेता शिंदे, कर निरीक्षक बाजीराव नवले आणि वसुली विभागाचे कर्मचारी प्रयत्न करत आहेत. मोठ्या थकबाकीदारांच्या नावांची प्रसिद्धी बॅनर आणि वर्तमानपत्रांतून केली जाणार आहे. नगरपरिषदेने यापूर्वीच थकबाकीदारांना जप्ती आणि नळ कनेक्शन कापण्याच्या नोटिसा बजावल्या होत्या. मात्र,…
संगमनेर, प्रतिनिधी- कुटुंब, समाज आणि देशाच्या विकासामध्ये महिलांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. आज प्रत्येक क्षेत्रात महिलांनी आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले असून, त्यांचे हे यश नव्या पिढीसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून एकविरा फाउंडेशनच्या वतीने आयोजित या क्रीडा स्पर्धा केवळ खेळ नसून महिलांसाठी एक मोठे व्यासपीठ आहे. या स्पर्धांमधून मिळणारा आनंद आणि ऊर्जा महिलांना वर्षभराच्या कामासाठी नवी उभारी देईल, असे प्रतिपादन काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्य समितीचे सदस्य व माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुल येथे आयोजित ‘महिला क्रीडा महोत्सव २०२६’ च्या शानदार उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी आमदार…
अहिल्यानगर, विशेष प्रतिनिधी- अहिल्यानगर जिल्ह्यात फोफावलेल्या अवैध गुटखा विक्रीला पोलीस प्रशासनातीलच काही बड्या माशांचे अभय असल्याचे आमदार अमोल खताळ यांनी विधानसभेत नावानिशी सांगितल्यानंतर, अखेर स्थानिक गुन्हे शाखेचे अंमलदार हृदय घोडके आणि अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयातील शंकर चौधरी या दोघांचीही तातडीने पोलीस मुख्यालयात उचलबांगडी करण्यात आली आहे. आमदार खताळ यांनी हिवाळी अधिवेशनापासून या पोलीस कर्मचाऱ्यांच्या भ्रष्ट साखळीवर टीकेची झोड उठवली होती. जिल्ह्यात परराज्यातून येणाऱ्या गुटख्याचा महापूर आला असून, हा अवैध व्यवसाय राजरोसपणे सुरू ठेवण्यासाठी ‘सिस्टीम’च्या नावाने दरमहा सुमारे ९० लाख रुपयांची वसुली केली जात असल्याचा खळबळजनक आरोप आमदार अमोल खताळ यांनी केला होता. केवळ आरोपच नव्हे, तर या वसुलीमध्ये प्रत्यक्ष सहभागी…
आजचे राशिभविष्य: शनिवार, ७ मार्च २०२६ मेष आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहवर्धक असेल. कार्यक्षेत्रात तुमच्या कतृत्वाचा गौरव होईल, ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. आर्थिक नियोजनाच्या दृष्टीने काही ठोस निर्णय घेतल्यास भविष्यात मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्यांशी सलोख्याचे संबंध राहतील, मात्र प्रकृतीची काळजी घेणे आवश्यक आहे. सायंकाळी एखादी शुभवार्ता मिळण्याचे योग आहेत. वृषभ आज तुम्हाला खर्चावर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. विनाकारण होणाऱ्या खर्चामुळे तुमची आर्थिक स्थिती डळमळीत होऊ शकते. जीवनसाथीसोबत काही कारणावरून मतभेद होण्याची शक्यता आहे, त्यामुळे बोलताना संयम ठेवावा. नोकरी करणाऱ्या व्यक्तींनी वरिष्ठांशी नम्रतेने वागावे. नवीन गुंतवणूक करण्यासाठी आजचा काळ मध्यम स्वरूपाचा राहील. मिथुन मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी…
संगमनेर, प्रतिनिधी- संगमनेर शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या हायटेक बसस्थानकासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य आणि देखणे स्मारक उभारण्यासाठी शासनाकडून निधीची मागणी केलेली आहेच; मात्र शासन निधी देण्यास विलंब करत असेल तर केवळ त्यांच्यावर अवलंबून न राहता लोकवर्गणी, नगरपरिषद, आमदार निधी आणि जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून येत्या वर्षभरात हे स्मारक पूर्ण केले जाईल, असा निर्धार आमदार सत्यजित तांबे यांनी व्यक्त केला आहे. संगमनेर नगरपरिषदेच्या वतीने स्मारकाच्या स्वरूपाबाबत आयोजित करण्यात आलेल्या नागरिक मत नोंदणी अभियानाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. या मोहिमेला संगमनेरकरांनी पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून, हजारो नागरिकांनी आपले मत नोंदवले आहे. आमदार सत्यजित तांबे यांनी यावेळी स्मारकाच्या आतापर्यंतच्या प्रवासावर…
नवी दिल्ली: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुरुवारी ५ मार्च रोजी रात्री उशिरा महाराष्ट्रासह देशातील अनेक महत्त्वाच्या राज्यांच्या राज्यपालांच्या नवीन नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. या मोठ्या फेरबदलामध्ये त्रिपुराचे माजी उपमुख्यमंत्री आणि तेलंगणाचे विद्यमान राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांची महाराष्ट्राचे नवे पूर्णवेळ राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी उपराष्ट्रपती पदी नियुक्ती झालेल्या सी. पी. राधाकृष्णन यांच्यानंतर गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे महाराष्ट्राचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला होता, मात्र आता राज्याला जिष्णू देव वर्मा यांच्या रूपाने स्वतंत्र राज्यपाल मिळाले आहेत. संपूर्ण देशात झालेल्या या फेरबदलात अनुभवी नेते आणि निवृत्त अधिकाऱ्यांना प्राधान्य देण्यात आले आहे. हिमाचल प्रदेशचे राज्यपाल शिव प्रताप शुक्ला यांची आता…
आजचे राशिभविष्य: शुक्रवार, ६ मार्च २०२६ मेष आजचा दिवस तुमच्यासाठी प्रगतीकारक ठरेल. कार्यक्षेत्रात तुमच्या कष्टाचे चीज होताना दिसेल. रखडलेली कामे मार्गी लागल्यामुळे मनावरचा ताण हलका होईल. कौटुंबिक जीवनात सुखद वातावरण राहील आणि जोडीदारासोबतचे संबंध अधिक दृढ होतील. आरोग्याच्या तक्रारी दूर होतील, मात्र खाण्यापिण्याच्या सवयींकडे लक्ष देणे गरजेचे आहे. वृषभ आज तुम्हाला आर्थिक बाबतीत सावध राहण्याची आवश्यकता आहे. विनाकारण खर्च वाढण्याची शक्यता असल्याने नियोजित पद्धतीने पावले उचलावीत. मित्रमंडळींच्या भेटीमुळे मन प्रसन्न होईल. व्यवसायात नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात, पण घाईने कोणताही निर्णय घेऊ नका. बोलण्यावर ताबा ठेवल्यास वादाचे प्रसंग टाळता येतील. मिथुन आजचा दिवस बौद्धिक कामात यश मिळवून देणारा आहे. नवीन…
संगमनेर, प्रतिनिधी- संगमनेर शहर आणि परिसरातील गावांतून बेकायदेशीरपणे टाकण्यात आलेल्या ३३ KV वीज वाहिनीमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. या धोकादायक वीज वाहिनीच्या विरोधात ‘३३ KV बाधित शेतकरी व नागरिक कृती समिती’ आक्रमक झाली असून, उद्या शुक्रवार, ६ मार्च २०२६ रोजी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या संगमनेर कार्यालयासमोर साखळी उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या संदर्भात समितीने स्थानिक लोकप्रतिनिधींना निवेदन देऊन या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. संगमनेर शहर १३२ KV ते धांदरफळ दरम्यान ही वीज वाहिनी टाकण्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र, ही वाहिनी टाकताना अनेक गंभीर नियमबाह्य बाबी समोर आल्याचा आरोप…
मुंबई, विशेष प्रतिनिधी – महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत असून राज्यसभेच्या सात जागांसाठी होणारी निवडणूक आता बिनविरोध झाली आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या मुदतीपर्यंत सात जागांसाठी सातच अर्ज दाखल झाल्याने ही निवडणूक बिनविरोध पार पडली असून, याबाबतची औपचारिक घोषणा १६ मार्च रोजी केली जाणार आहे. या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात जागांचे वाटप झाले होते. महायुतीच्या वाट्याला सहा जागा आल्या होत्या, ज्यामध्ये भारतीय जनता पक्षाने चार जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. भाजपच्या वतीने राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, रामराव वडकुते आणि माया इवनाते यांना संधी देण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पार्थ पवार यांनी…
संगमनेर, प्रतिनिधी – स्थानिक स्वराज्य संस्थांचे कामकाज अधिक प्रभावी, जबाबदार आणि कायदेशीर चौकटीत राबवण्यासाठी लोकप्रतिनिधींनी कायद्याचा सखोल अभ्यास करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन संगमनेरच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांनी केले. संगमनेर नगरपरिषद आणि प्रजा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यशाळेत त्या बोलत होत्या. नगरपालिकेचे बजेट आणि नियोजनाच्या अनुषंगाने या महत्त्वपूर्ण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत प्रामुख्याने ‘महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती आणि औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५’ या कायद्याचा सखोल अभ्यास, नगरसेवकांची कर्तव्ये आणि विविध विषय समित्यांचे महत्त्व यावर तज्ज्ञांनी सविस्तर मार्गदर्शन केले. सभागृहातील कामकाजाची नेमकी पद्धत आणि लोकशाहीतील लोकप्रतिनिधींची भूमिका यावर प्रजा फाउंडेशनच्या तज्ञांच्या टीमने नगरसेवकांना मार्गदर्शन…
