Author: अनंत पांगारकर
संगमनेर, प्रतिनिधी- संगमनेर तालुक्यातील ग्रामीण भागातील दळणवळण व्यवस्था अधिक सुलभ आणि सुरक्षित करण्यासाठी आमदार अमोल खताळ यांनी केलेल्या प्रयत्नांना मोठे यश आले आहे. म्हाळुंगी नदीवर वेल्हाळे गावठाण ते राजापूर रस्ता ते निमगाव भोजापूर रस्ता, गणपती मळ्याजवळ जोडणाऱ्या पुलाच्या बांधकामासाठी नाबार्ड ग्रामीण पायाभूत सुविधा विकास निधी योजनेंतर्गत ६ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. आमदार खताळ यांच्या कार्यालयातून देण्यात आलेल्या माहितीनुसार, अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या पुलाच्या कामामुळे घुलेवाडी आणि धांदरफळ गटातील वेल्हाळे, राजापूर, निमगाव भोजापूर, गुंजाळवाडी आणि चिकणी या पंचक्रोशीतील नागरिकांचा प्रवास आता सुखकर होणार आहे. आमदार खताळ यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे या कामासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा केला…
श्रीरामपूर – श्रीरामपूर विभागातील विविध पोलीस स्टेशनच्या हद्दीतून गहाळ झालेले सुमारे ६ लाख रुपये किमतीचे ५२ मोबाईल शोधून काढण्यात पोलिसांना मोठे यश आले आहे. अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयाने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे ही कामगिरी केली असून, जप्त केलेले सर्व मोबाईल आज त्यांच्या मूळ मालकांना सन्मानपूर्वक परत करण्यात आले असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिली. अहिल्यानगर उत्तर विभागातील १७ पोलीस स्टेशनच्या हद्दीत गेल्या काही काळात नागरिकांचे महागडे मोबाईल गहाळ झाले होते. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये तक्रारी दाखल होत्या. या तक्रारींचे गांभीर्य ओळखून अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयाने तांत्रिक तपास सुरू केला होता. या तपासामध्ये श्रीरामपूर शहर, राहुरी, अकोले, संगमनेर आणि…
संगमनेर | महाराष्ट्र संवाद न्यूज विविध अवैध धंद्यांनी वेढलेल्या संगमनेरमध्ये आता गुन्हेगारांना पोलिसांचा धाक उरला आहे की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. संगमनेर तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या सांगवी गावातील ‘हॉटेल रानवारा’ येथे सुरू असलेल्या एका मोठ्या जुगार अड्ड्यावर नाशिकच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या (IG) पथकाने थेट ‘सर्जिकल स्ट्राईक’ केला. या धडक कारवाईत १७ जणांना रंगेहाथ पकडण्यात आले असून त्यांच्याकडून ३ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, स्थानिक पोलिसांना अंधारात ठेवून झालेल्या या कारवाईमुळे तालुक्यातील पोलीस प्रशासनाचे अक्षरशः ‘पितळ’ उघडे पडले आहे. याप्रकरणी पोलिसांनी ज्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहे, त्या आरोपींची नावे अशी, अंकुश मधुकर…
संगमनेर, प्रतिनिधी- अमृत उद्योग समूहाचे संस्थापक, थोर स्वातंत्र्य सेनानी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या जयंती महोत्सवाचे औचित्य साधून थोरात सहकारी साखर कारखान्यात भव्य रक्तदान शिबिर संपन्न झाले. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांचा जन्मदिवस ‘प्रेरणा दिन’ म्हणून संपूर्ण संगमनेर तालुक्यात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून कारखान्याच्या अतिथीगृहात अर्पण रक्तपेढीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या शिबिरात अधिकारी, कर्मचारी आणि कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत १०१ बाटल्या रक्ताचे संकलन केले. याप्रसंगी मार्गदर्शन करताना माजी मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी रक्तदानाचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले की, विज्ञानाने आज सर्वच क्षेत्रात मोठी प्रगती केली असली, तरी रक्ताची कृत्रिम निर्मिती करणे अद्याप मानवाला शक्य झालेले…
श्रीरामपूर – पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यातील एका गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेण्यासाठी श्रीरामपुरातील वॉर्ड नं. १, इराणी गल्ली परिसरात आलेल्या पोलीस पथकावर हिंसक जमावाने हल्ला केल्याची खळबळजनक घटना घडली. जमावाने दगडफेक करत आरोपीला पोलिसांच्या ताब्यातून सोडवण्याचा प्रयत्न केला, तसेच एका तरुणाने लोखंडी कोयत्याने पोलिसांवर वार केले. परिस्थिती अत्यंत गंभीर बनल्याने पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी हवेत एक राऊंड गोळीबार केला. या घटनेत एक पोलीस हवालदार गंभीर जखमी झाला असून परिसरात कमालीचा तणाव निर्माण झाला आहे. तळेगाव दाभाडे (पुणे) पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्यातील आरोपी आयद बाबूलाल सय्यद (रा. इराणी गल्ली, श्रीरामपूर) हा पोलिसांना हवा होता. त्याचा शोध घेण्यासाठी उपनिरीक्षक मुकेश मोहरे,…
संगमनेर: प्रतिनिधी मकर संक्रांतीचा सण जवळ येत असतानाच संगमनेर शहरात नायलॉन मांजामुळे अपघातांचे सत्र सुरू झाले आहे. गेल्या काही दिवसांत शहरात घडलेल्या चार-पाच गंभीर घटनांमुळे नागरिक संतप्त झाले असून, आता याविरोधात संगमनेर शहर भाजप आक्रमक झाली आहे. बंदी असलेल्या नायलॉन आणि चिनी मांजाची विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अन्यथा कार्यकर्ते स्वतः रस्त्यावर उतरून कारवाई करतील, असा इशारा प्रशासनाला देण्यात आला आहे. शहरात नुकत्याच घडलेल्या काही घटनांमध्ये पादचारी आणि दुचाकीस्वारांच्या गळ्याला, कानाजवळ नायलॉन मांजा अडकून गळा, कान कापला जाण्याचे प्रकार घडले आहेत. नायलॉन मांजावर शासनाची बंदी असूनही शहरातील काही दुकानदार छुप्या पद्धतीने याची विक्री करत असल्याचे समोर आले आहे. या गंभीर…
घारगाव (अहिल्यानगर)- संगमनेर तालुक्यातील जांबूत खुर्द येथे एका गर्भवती महिलेचा अपमान करून तिला जातिवाचक शिवीगाळ केल्याची आणि तिच्या पतीला मारहाण केल्याची संतापजनक घटना घडली आहे. या प्रकरणी घारगाव पोलिसांनी दोन सख्ख्या भावांविरुद्ध अॅट्रॉसिटी कायद्यासह भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादीत नमूद केल्यानुसार, दि. २ जानेवारी २०२६ रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास फिर्यादी महिला शेतातून घरी परतत असताना, आरोपी दस्तगीर शब्बीर पठाण याने त्यांना रस्त्यात अडवले. यावेळी आरोपीने महिलेच्या चारित्र्यावर संशय घेणारे आक्षेपार्ह वक्तव्य करून तिला लज्जा वाटेल असे कृत्य केले. इतकेच नव्हे तर, पीडित महिला ही अनुसूचित जमातीची असल्याचे माहित असतानाही तिला जातीवरून हीन वागणूक देत…
मेष – आजचा दिवस कष्टाचा परंतु फलदायी राहील. नोकरीमध्ये पदोन्नतीचे योग असून वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. व्यापारात आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. घरातील वडीलधार्या व्यक्तींच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. सायंकाळी एखादी आनंदाची बातमी मिळेल. वृषभ – तुमच्या कार्यक्षेत्रात आज तुमचे वर्चस्व राहील. जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. नवीन वस्तू खरेदी करण्याचे बेत आखाल. खाण्यापिण्याच्या सवयींमुळे पोटाचे विकार उद्भवू शकतात, सावध राहा. मिथुन – आज मनात नवीन विचार आणि कल्पना येतील. बौद्धिक कामात रस वाढेल. सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घ्याल, ज्यामुळे तुमचा मान-सन्मान वाढेल. प्रवासाचे योग आहेत, जो सुखद ठरेल. जोडीदारासोबतचे मतभेद मिटतील. कर्क – आज…
संगमनेर | अनंत पांगारकर निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर सहसा विजयोत्सवाचा धुरळा शांत व्हायला अनेक दिवस लागतात, परंतु संगमनेरच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा डॉ. मैथिलीताई तांबे यांनी मात्र एक वेगळाच पायंडा पाडला आहे. परदेशातून परतल्यानंतर त्यांनी नगरपालिकेचा पदभार हाती घेतात कामाला सुरुवात केली आहे. तांबे यांनी केवळ कार्यालयात बसून कामकाजाला भर न देता आभार दौऱ्याच्या निमित्ताने प्रभागनिहाय भेटी देण्याचे काम सुरू केले आहे. या भेटीदरम्यान ते केवळ नवनिर्वाचित नगरसेवक, कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांसह प्रभागात फिरत नाही तर मुख्याधिकारी आणि त्यांची सर्व प्रशासकीय टीम त्यांच्यासोबत प्रभागनिहाय दौरे करत आहे. तत्कालीन नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या कार्यकाळात शहरात मोठी विकास कामे झाली. शहर स्वच्छतेचे काम या…
संगमनेर | प्रतिनिधी शहरात व परिसरात मकरसंक्रांत सणाच्या काळात नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर तातडीने कारवाई करून विक्रीसाठी आलेला साठा जप्त करावा, अशा कडक सूचना आमदार अमोल खताळ यांनी पोलीस अधिकारी आणि पालिका प्रशासनास दिल्या आहेत. आमदार खताळ यांच्या कार्यालयाकडून देण्यात आलेल्या माहितीत म्हटले आहे की, नायलॉन मांजाचे अनेक दुष्परिणाम होत असून या जीवघेण्या मांजामुळे अनेक नागरिक आणि मुले जखमी होण्याच्या घटनांचे गांभीर्य मोठे आहे, असे त्यांनी यावेळी नमूद केले. हा मांजा मानवी जीवनासह पशू-पक्ष्यांसाठीही जीवघेणा ठरत असल्याने त्याचा वापर, साठवणूक आणि विक्री पूर्णपणे बंद करणे गरजेचे आहे. नायलॉन मांजाची चोरटी विक्री रोखण्यासाठी शहरातील उपनगरांमधील सर्व दुकानदारांना सूचना देऊन त्यांच्यावर…
