Author: अनंत पांगारकर

बेरोजगारांच्या हाताला काम देण्याच्या देशातील महत्वाच्या महामंडळात सर्वाधिक बदनाम झालेल्या मध्यप्रदेशच्या व्यापम घोटाळ्याला केंद्राने राबवायला घेतलेल्या कौशल्य विकास योजनेने मागे टाकलं आहे. हा घोटाळा म्हणजे मोदी सरकारच्या ‘तुमभी खाओ, मै भी…’ या नीतीचं उत्तम उदाहरण होय. कोट्यवधींचा भ्रष्टाचार केलेल्या व्यापमने आजवर अनेकांचे जीव घेतले. त्यात हात ओले झालेले जसे होते तसे या घोटाळ्याच्या चौकशीची जबाबदारी घेतलेले अधिकारीही होते. देशात आजवर झाला नाही, असा भ्रष्टाचार या महामंडळात झाला. ज्यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या काळात हा घोटाळा झाला ते आज देशाचे कृषीमंत्री आहेत. शिवराजसिंग चौहान हे त्यांचं नाव.  महाराष्ट्रात जसं एमपीएसस्सीचं काम चालतं तसं मध्यप्रदेश सरकारच्या अधिकृत परिक्षा मंडळाचं काम व्यापमद्वारे चालतं. या महामंडळामार्फत…

Read More

मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहवर्धक असेल. नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी काळ अनुकूल आहे. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य लाभल्यामुळे मानसिक प्रसन्नता राहील. मात्र, उत्साहाच्या भरात कोणालाही शब्द देताना विचारपूर्वक द्या. आर्थिक बाजू भक्कम करण्यासाठी केलेले प्रयत्न यशस्वी होतील. वृषभ – आज तुम्हाला कामाच्या ठिकाणी सावध राहणे आवश्यक आहे. सहकाऱ्यांशी विनाकारण वाद टाळणे हिताचे ठरेल. प्रलंबित असलेली सरकारी कामे पूर्ण होण्याच्या दृष्टीने पावले उचलली जातील. कौटुंबिक जीवनात जोडीदाराच्या भावनांचा आदर केल्यास नाते अधिक सुदृढ होईल. आरोग्याची काळजी घ्या. मिथुन – तुमच्यासाठी आजचा दिवस बौद्धिक प्रगतीचा आहे. सर्जनशील कामांमध्ये तुम्हाला रस वाटेल. जुन्या मित्रांशी गाठभेट झाल्यामुळे मन आनंदी राहील. व्यवसायातील नवनवीन संधी…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी-  जादुटोणा करून ‘सर्व चांगले करून देतो’ असे आमिष दाखवून एका कुटुंबाची आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार अहिल्यानगर जिल्ह्यातील घारगांव पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आला आहे. संमोहनाचा वापर करून आरोपीने फिर्यादीच्या आईकडून सुमारे ५ लाख रुपयांची रोकड, सोन्याचे दागिने आणि पशुधन लांबवल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जांबुत खुर्द (हाळदा वस्ती) येथील रहिवासी शरद कैलास डोंगरे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. सन २०१४ मध्ये आरोपी बाळासाहेब पोटे आणि त्याच्या एका साथीदाराने फिर्यादीच्या घरी जाऊन ‘तुमचं सर्व चांगलं करतो’ असे सांगून जादुटोणा करण्याच्या बहाण्याने ५ हजार रुपये आणि एक बकरी नेली होती. त्यानंतर आरोपीने फिर्यादीच्या आईशी संपर्क वाढवून…

Read More

श्रीरामपूर | महाराष्ट्र संवाद न्यूज अल्पावधीत मोठ्या प्रमाणात परतावा देण्याचे आमिष दाखवून सर्वसामान्य जनतेची फसवणूक करणाऱ्या कंपन्यांविरुद्ध श्रीरामपूर पोलिसांनी मोठी मोहीम हाती घेतली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अशा अनेक इन्व्हेस्टर कंपन्यांनी नागरिकांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी यापूर्वी गुन्हे दाखल आहेत. याच पार्श्वभूमीवर, श्रीरामपूर तालुक्यातील भोकर शिवारामध्ये ‘ग्रो इन्व्हेस्टर’ नावाच्या कंपनीकडून विनापरवाना मोठी आर्थिक गुंतवणूक स्वीकारली जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती. या माहितीची खातरजमा करण्यासाठी अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर यांच्या कार्यालयातील पथकाने व उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक सतिष डोळे, पोलीस उपनिरीक्षक दादाभाई मगरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल दादासाहेब लोंढे, पोलीस नाईक संदिप दरंदले, पोलीस कॉन्स्टेबल सहदेव…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी-  व्यापाऱ्यामार्फत केरळ आणि तामिळनाडू राज्यात विक्रीसाठी पाठवलेल्या कांद्याचे पैसे न देता, सुमारे १९ लाख ४० हजार रुपयांची फसवणूक केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात परराज्यातील दोन व्यापारी पेढ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी विक्रम रमेश बोचरे (रा. कुसुर, ता. जुन्नर) यांनी आपला कांदा माल केरळमधील एस. के. ट्रेडर्स आणि तामिळनाडूतील श्री मरियम ट्रेडर्स यांच्याकडे विक्रीसाठी पाठवला होता. मात्र, संबंधित व्यापाऱ्यांनी मालाचे पैसे न देता त्या रक्कमेचा अपहार केला. यामध्ये एस. के. ट्रेडर्सकडून १३ लाख ७० हजार रुपये आणि श्री मरियम ट्रेडर्सकडून ५ लाख ७० हजार रुपये येणे बाकी होते. हा व्यवहार डिसेंबर…

Read More

अहिल्यानगर: राजूर आणि अकोले परिसरातील विद्युत रोहित्रांमधील कॉपरची चोरी करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीला जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. या कारवाईत पोलिसांनी ४ आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून चोरीचे कॉपर आणि गुन्ह्यात वापरलेली १५ लाख रुपये किमतीची इनोव्हा कार असा एकूण १५,६५,००० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. नोव्हेंबर २०२५ मध्ये कोहंडी (ता. अकोले) येथील धरणाजवळील एक विद्युत रोहित्र अज्ञात चोरट्यांनी उघडून त्यातील ३,५०,००० रुपये किमतीची कॉपर चोरून नेली होती. याप्रकरणी स्वप्नील सुरेश कोकणे यांनी राजूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. अकोले परिसरात अशा चोऱ्यांचे प्रमाण वाढल्याने पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी- “काम केलंय, कमाल करूया” ही केवळ घोषणा नसून शहराच्या सर्वांगीण प्रगतीचे एक प्रबळ व्हिजन आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध उद्योजक राजेश मालपाणी यांनी केले. नवनियुक्त नगराध्यक्षा मैथिली तांबे आणि नगरसेवकांच्या पदग्रहण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आमदार बाळासाहेब थोरात यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. आपल्या भाषणात मालपाणी यांनी शहराच्या विकासासाठी वैयक्तिक जबाबदारीवर भर दिला. ते म्हणाले की, ‘व्हिजन २.०’ यशस्वी करण्यासाठी प्रत्येकाने योगदान देणे गरजेचे आहे, कारण प्रगती ही केवळ प्रशासकीय निर्णयावर अवलंबून नसून ती लोकसहभागातून निर्माण होते. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जे. एफ. केनेडी यांच्या प्रसिद्ध वाक्याचा संदर्भ देत त्यांनी उपस्थितांना आवाहन केले की, शहराने माझ्यासाठी काय केले…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी –  लोकशाहीत नागरिकांना जसे मूलभूत अधिकार आहेत, तसेच काही कर्तव्येही आहेत. संगमनेरच्या सर्वांगीण विकासासाठी केवळ लोकप्रतिनिधी नव्हे, तर जनतेचा सहभागही तितकाच महत्त्वाचा आहे. पारदर्शकता वाढवण्यासाठी आता प्रत्येक नगरसेवकाचे काम आणि त्याचे मूल्यमापन थेट नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचवले जाईल, अशी महत्त्वाची घोषणा आमदार सत्यजित तांबे यांनी केली. संगमनेरच्या नूतन नगराध्यक्ष डॉ मैथिली तांबे आणि नूतन नगरसेवकांनी शनिवारी आपल्या पदाचा पदभार हाती घेतला, यावेळी तांबे बोलत होते. राज्याचे माजी मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, काँग्रेसच्या अध्यक्ष डॉ. जयश्री थोरात, दूध संघाचे अध्यक्ष रणजीतसिंह देशमुख, उद्योजक राजेश मालपाणी मनीषा मालपाणी गिरीश मालपाणी आदी यावेळी…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी –  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेल्या लोकशाहीत विचारांची देवाणघेवाण आणि निरोगी राजकीय स्पर्धा अभिप्रेत होती. मात्र, आज राज्याच्या राजकारणात जे काही सुरू आहे, ते अत्यंत विदारक आहे. सत्तेसाठीची ही जीवघेणी स्पर्धा आणि निष्ठावंतांचा गळा घोटण्याची वृत्ती महाराष्ट्राला एका चुकीच्या वळणावर घेऊन जात आहे, अशा शब्दांत माजी मंत्री, लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी राज्यातील सद्य राजकीय स्थितीवर आपली तीव्र चिंता व्यक्त केली. यावेळी त्यांनी राज्यातील अस्थिर राजकारणावर भाष्य करतानाच संगमनेरच्या सुसंस्कृत परंपरेचे महत्त्व अधोरेखित करत राज्यातील हा ट्रेंड संगमनेरमध्ये येऊ न देता संगमनेरने आपले वेगळेपण जपण्याचे आवाहन केले. संगमनेर नगरपालिकेच्या प्रांगणात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ यांच्या संयुक्त जयंतीचे…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी –  स्त्री स्वतःचे आणि समाजाचे भविष्य घडवते, या विचारांना स्मरून मी संगमनेरच्या सेवेसाठी सज्ज आहे, असे भावनिक उद्गार संगमनेरच्या नवनियुक्त नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांनी काढले. संगमनेर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर आयोजित सभेत त्या बोलत होत्या. प्रियदर्शनी इंदिरा गांधी भवनांमध्ये संगमनेर नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष डॉ. मैथिली सत्यजित तांबे यांनी नगराध्यक्ष खुर्चीवर बसून आपला पदभार स्वीकारला. यावेळी झालेल्या कार्यक्रम प्रसंगी माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, माजी नगराध्यक्ष दुर्गा तांबे, उद्योगपती राजेश मालपाणी, मनीष मालपाणी, गिरीश मालपाणी, जर्मनीच्या माजी खासदार क्लोडिया नॉलटे, रणजितसिंह देशमुख, डॉ. जयश्री थोरात, नगरपालिकेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे…

Read More