Author: अनंत पांगारकर
संगमनेर | महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर शहरात नगरपरिषद निवडणुकीच्या विजयाचा जल्लोष सुरू असतानाच भारतनगर भागात दहशतीचे वातावरण निर्माण झाले.नवनिर्वाचित विजयी सदस्य नूर महंमद शेख यांची मिरवणूक सुरू असताना एका कुटुंबावर लोखंडी रॉड, चॉपर आणि बेसबॉल स्टिकने जीवघेणा हल्ला करण्यात आला. या खळबळजनक घटनेमुळे शहरात तणावाचे वातावरण असून, संगमनेर शहर पोलिसांनी याप्रकरणी १७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार,२२ डिसेंबर २०२५ रोजी रात्री ९:३० च्या सुमारास फिर्यादी रिक्षा चालक मुजीब शमशुद्दीन शेख (वय ४०, रा. भारतनगर, संगमनेर) हे आपल्या घरी असताना, यावेळी नवनिर्वाचित विजयी उमेदवार नूर महंमद शेख यांची मिरवणूक या भागातून जात होती. मिरवणूक फिर्यादींच्या घरासमोर आली असता, आरोपींनी…
संगमनेर | महाराष्ट्र संवाद न्यूज- शहरातील मदिनानगर भागात सुरू असलेल्या एका अवैध कत्तलखान्यावर संगमनेर शहर पोलिसांनी रविवारी मध्यरात्री मोठी कारवाई केली. या धाडसी कारवाईत पोलिसांनी कत्तलीसाठी बांधून ठेवलेल्या गोवंश जनावरांची सुटका केली असून, तब्बल ७०० किलो गोमांस जप्त करण्यात आले आहे. या संपूर्ण कारवाईत पोलिसांनी जनावरे, मांस आणि इतर साहित्य असा एकूण २ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. मदिनानगरमधील गल्ली क्रमांक चारमध्ये काही इसमांनी गोवंश जनावरे आणि वासरे कत्तलीच्या उद्देशाने बेकायदेशीररित्या बांधून ठेवल्याची गुप्त माहिती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांना मिळाली होती. या माहितीची गांभीर्याने दखल घेत, बारवकर यांनी तातडीने पोलीस पथकासह रविवारी रात्री…
संगमनेर | महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर तालुक्यातील पानोडी शिवारात अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या एका पिकअपवर स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) धडक कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी १० हजार रुपये किमतीची १ ब्रास वाळू आणि ३ लाख रुपये किमतीची टाटा झेनॉन पिकअप असा एकूण ३ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, याप्रकरणी एका आरोपीविरुद्ध आश्वी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आश्वी पोलीस ठाणे हद्दीत अवैध गौण खनिज उत्खनन रोखण्यासाठी गस्त घालत असताना त्यांना पानोडी गावच्या शिवारातील कॅनॉलवर एक संशयास्पद टाटा कंपनीची पिकअप गाडी दिसून आली. पोलिसांनी गाडी थांबवून तपासणी केली असता ऋषिकेश…
मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी उत्साहाचा असेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कतृत्वाचे कौतुक होईल. रखडलेली कामे मार्गी लागतील, मात्र रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. वृषभ – आर्थिक दृष्टीने आजचा दिवस फायदेशीर ठरेल. कुटुंबातील सदस्यांशी संवाद वाढेल. गुंतवणुकीचा विचार करत असाल तर आजचा दिवस उत्तम आहे. आरोग्याची काळजी घ्या. मिथुन – आज तुम्हाला धावपळ करावी लागू शकते. नवीन ओळखी होतील ज्या भविष्यात फायदेशीर ठरतील. जोडीदारासोबतचे मतभेद दूर होतील. खर्चावर नियंत्रण ठेवा. कर्क – मानसिक शांतता लाभेल. सामाजिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. नोकरीत बढतीचे योग आहेत. घरामध्ये आनंदाचे वातावरण राहील. सिंह – तुमचा आत्मविश्वास आज शिखरावर असेल. कठीण कामे सहज पूर्ण होतील.…
संगमनेर | महाराष्ट्र संवाद न्यूज नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे प्रकल्प हा नाशिक-सिन्नर-अकोले-संगमनेर-अकोले-नारायणगाव-राजगुरुनगर-चाकण या मूळ आराखड्यानुसारच झाला पाहिजे, या मागणीसाठी आता जनआंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी आज नांदूर खंदरमाळ फाटा (संगमनेर) येथे या मार्गावरील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी आणि रेल्वे कृती समितीची महत्त्वपूर्ण विचारमंथन बैठक सोमवारी पार पडली. आमदार सत्यजित तांबे यांनी नाशिक पुणे रेल्वे मूळ मार्गानेच सरळ रेषेत जावी यासाठी सर्वपक्षीय आंदोलन उभे केले आहे. या पार्श्वभूमीवर अकोले तालुक्यातील हजारो नागरिकांनी आपल्या या मागणीसाठी नुकताच अकोले-संगमनेर भव्य मोर्चा काढला होता. 22 किलोमीटरचे अंतर पार करत संगमनेर प्रांत कार्यालयावर धडकलेल्या या मोर्चामध्ये संबंधित सर्व आमदार खासदारांनी एकत्र बैठक…
अमोल शेलकर – (राहुल गांधी समर्थक संघ, महाराष्ट्र – TEAM RGSS) विधानसभा २०२४ च्या निवडणुकीत लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या पराभवानंतर झालेली ही पहिलीच जनतेतील निवडणूक होती. या निकालाने हे सिद्ध केले आहे की, संगमनेरच्या मतदारांनी विधानसभेला झालेली चूक वेळीच दुरुस्त करून साहेबांनी गमावलेला जनाधार पुन्हा व्याजासकट, एका भव्यदिव्य विजयाच्या रूपाने त्यांच्या पदरात टाकला आहे. साहेब म्हटले की एकनिष्ठ, पक्षनिष्ठ आणि कर्तव्यनिष्ठतेचा संगम, हेच या विजयाने पुन्हा अधोरेखित केले. २०२४ ला झालेला तो राजकीय अपघात मागील वर्षभरात कोणीही विसरू शकले नव्हते. शहर असो की गाव, साहेबांवर प्रेम करणारे कार्यकर्ते एका योग्य संधीची वाट पाहत होते. अखेर नगरपालिकेच्या निमित्ताने ही संधी चालून…
संगमनेर | महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर नगरपालिकेच्या निवडणुकीत लोकनेते बाळासाहेब थोरात आणि आमदार सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखाली ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर, नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी सत्तेची खुर्ची गाजण्यापूर्वीच ‘सेवेचा झाडू’ हातात घेतला आहे. “निवडणूक संपली, आता केवळ विकास आणि स्वच्छता” हा संदेश देत नगराध्यक्षा डॉ. मैथिलीताई तांबे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी संगमनेरच्या हायटेक बसस्थानक परिसरासह मुख्य रस्त्यांचे विद्रुपीकरण दूर करून स्वच्छतेचा नवा आदर्श घालून दिला आहे. रात्री रस्ते धुतले, सकाळी झाडू मारला: असा झाला ‘ॲक्शन प्लॅन’- विजयाचा उत्सव साजरा झाल्यावर विश्रांती घेण्याऐवजी नवनिर्वाचित नगरसेवकांनी रात्रीच कामाला सुरुवात केली. नाशिक-पुणे महामार्गावरील ऑरेंज कॉर्नर ते बसस्थानक हा मुख्य रस्ता रात्रीच पाण्याने स्वच्छ धुऊन काढण्यात आला.…
संगमनेर | महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर तालुक्यातील जवळे कडलग येथे बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या चिमुकल्या सिद्धेश कडलगच्या कुटुंबीयांचे आज सोमवारी (२२ डिसेंबर) पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांत्वन केले. यावेळी बिबट्यांचा वाढता वावर आणि हल्ले रोखण्यासाठी प्रशासकीय पातळीवर हायटेक यंत्रणा सज्ज करण्याचे निर्देश त्यांनी दिले. बिबट्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी वन विभागाला आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ज्या भागात बिबट्यांची घनता अधिक आहे, तिथे थर्मल ड्रोन, नाईट व्हिजन कॅमेरे आणि ५०० हून अधिक ट्रॅप कॅमेरे तैनात करण्यात आले आहेत. याशिवाय वन विभागाच्या ताफ्यात २२ नवीन गस्ती वाहने आणि ५ अत्याधुनिक गन दाखल होणार असून, ही विशेष मोहीम पुढील…
अनंत पांगारकर | महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेरच्या राजकीय रणांगणात आज पुन्हा एकदा ‘थोरात-तांबे’ नावाचा डंका वाजला असून, नगरपरिषद निवडणुकीच्या निकालाने प्रस्थापित नेतृत्वाची पकड किती मजबूत आहे, हे सिद्ध केले आहे. संगमनेरच्या राजकीय इतिहासात आजचा दिवस सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल, कारण हा विजय केवळ एका नगरपरिषदेची सत्ता मिळवण्याचा नसून, तो संगमनेरच्या अस्मितेवर आणि विकासाच्या मॉडेलवर जनतेने दिलेली मोहोर आहे. माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि युवा नेते आमदार सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखालील ‘संगमनेर सेवा समिती’ने विरोधकांच्या रणनीतीचे अक्षरशः धिंडवडे काढत ३० पैकी २७ जागांवर निर्विवाद वर्चस्व मिळवले आहे. विधानसभा निवडणुकीत झालेला पराभव हा केवळ एक राजकीय अपघात होता, हे संगमनेरच्या मतदारांनी…
संगमनेर | महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर नगरपरिषद निवडणुकीमध्ये आज रविवारी सकाळी दहा वाजता सुरू झालेल्या मतमोजणी मध्ये नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखालील संगमनेर सेवा समितीने आपल्या पहिल्याच विजयानंतर जोरदार खाते उघडले आहे. आत्तापर्यंत समोर आलेल्या निवडणूक निकालामध्ये सेवा समितीचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होताना दिसत असून महायुतीच्या उमेदवारांना या निवडणुकीत चुरस निर्माण करता आली नसल्याचे समोर येत आहे. आतापर्यंत समोर आलेल्या निवडणूक निकालातून संगमनेर सेवा समितीचे उमेदवार सीमा खटाटे, भारत बोऱ्हाडे, सौरभ कासार, शोभा पवार, प्राची काशीद, किशोर पवार, विश्वास मुर्तडक, डॉ. अनुराधा सातपुते, वनिता गाढे, गजेंद्र अभंग, नितीन अभंग, मालती डाके, दिपाली पंचरिया, गणेश गुंजाळ यांनी…
