Author: अनंत पांगारकर
संगमनेर | महाराष्ट्र संवाद न्यूज भविष्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) मुळे मोठी क्रांती होणार आहे. यामुळे कामाच्या पद्धती आणि नोकऱ्यांचे स्वरूप बदलणार असले, तरी नवीन संधींची दारेही उघडणार आहेत. म्हणूनच प्रत्येक तरुणाने या तंत्रज्ञानाशी जुळवून घेत स्वतःला अद्ययावत ठेवणे आवश्यक आहे. एआयच्या युगात जे सातत्याने शिकतील, तेच टिकतील, असे प्रतिपादन प्रसिद्ध लेखक आणि संशोधक डॉ. अच्युत गोडबोले यांनी केले. अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्था आणि ‘डबल डेकर ग्रुप’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ या विषयावरील चर्चासत्रात ते मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री बाळासाहेब थोरात होते. यावेळी डॉ. जयश्रीताई थोरात, एआय तंत्रज्ञ डॉ. सुयश गुंजाळ, दुर्गाताई…
संगमनेर | महाराष्ट्र संवाद न्यूज- राजकारणात विजय मिळाला की गुलालाची उधळण आणि गल्लोगल्ली फ्लेक्स लावून शक्तिप्रदर्शन करण्याची परंपरा आहे. मात्र, संगमनेरमध्ये या परंपरेला छेद देत एक नवा आदर्श निर्माण करण्यात आला आहे. माजी मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात आणि आमदार सत्यजित तांबे यांनी दिलेल्या सूचनेचे तंतोतंत पालन करत, सेवा समितीने ऐतिहासिक विजयानंतरही एकही फ्लेक्स न लावण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे शहरातील बसस्थानक परिसर आणि मुख्य रस्त्यांनी अक्षरशः ‘मोकळा श्वास’ घेतला असून, केवळ फ्लेक्सबाजी करणाऱ्या पुढाऱ्यांना ही मोठी चपराक मानली जात आहे. शब्दाला जागले आमदार!- निवडणूक प्रचारादरम्यान आमदार सत्यजित तांबे यांनी शहराचे विद्रूपीकरण थांबवण्याचे आश्वासन दिले होते. केवळ आश्वासनच दिले नाही, तर…
मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी प्रगतीकारक राहील. कामाच्या ठिकाणी तुमच्या कष्टांचे चीज होईल आणि वरिष्ठांकडून शाबासकी मिळेल. आर्थिक बाबतीत सावध राहणे गरजेचे आहे, कारण अचानक खर्च उद्भवू शकतात. जोडीदारासोबतचे संबंध मधुर राहतील. वृषभ: आज तुम्हाला मानसिक शांतता लाभेल. कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवल्याने मन प्रसन्न राहील. रखडलेली कामे मार्गी लागण्याची शक्यता आहे. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, विशेषतः खाण्यापिण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवा. मिथुन: व्यापार आणि व्यवसायात आज तुम्हाला नवीन संधी मिळू शकतात. मित्रांकडून अपेक्षित सहकार्य मिळेल. बोलण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल, अन्यथा जवळच्या व्यक्तींसोबत विनाकारण वाद होऊ शकतात. अभ्यासात असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला आहे. कर्क: आज तुम्हाला थोडा थकवा जाणवू शकतो, त्यामुळे आरामाला…
संगमनेर | महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर तालुक्याच्या ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांना बळकटी देण्यासाठी राज्य सरकार आणि जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून मंजूर झालेल्या ५१ कोटी ३९ लाख रुपयांच्या विकासकामांचा आज शुभारंभ होत आहे. राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्या शनिवारी, (२७ डिसेंबर) हा सोहळा पार पडणार असून, या निमित्ताने तालुक्यात महायुतीच्या वतीने जोरदार शक्तीप्रदर्शन केले जाणार आहे. या दौऱ्याची सुरुवात सकाळी १० वाजता होणार असून तालुक्यातील निळवंडे, तळेगाव, मालदाड, गुंजाळवाडी, वडगाव लांडगा, धांदरफळ खुर्द, चंदनापुरी, हिवरगाव पावसा आणि पिंपरणे या गावांमध्ये विविध कामांचे भूमिपूजन व लोकार्पण पार पडणार आहे. यामध्ये…
संगमनेर | महाराष्ट्र संवाद न्यूज स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संगमनेर तालुक्यातील घारगाव पोलीस ठाणे हद्दीत मोठी कारवाई केली. या कारवाईत मुळा नदीपात्रातून विनापरवाना वाळूची वाहतूक करणारा १० लाख रुपये किमतीचा डंपर जप्त करण्यात आला असून दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अवैध वाळू उपसा आणि वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध जिल्हा पोलीस प्रशासनाने आता थेट कारवाईचा बडगा उगारला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या विशेष आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संगमनेरमध्ये ही कारवाई केली. पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पथक शुक्रवारी २६ डिसेंबर रोजी संगमनेर भागात गस्तीवर होते. दरम्यान, बोटा शिवारातील कुरकुंडी फाटा येथे एक अशोक लेलँड कंपनीचा डंपर संशयास्पद…
संगमनेर | महाराष्ट्र संवाद न्यूज – अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये गोवंशीय जनावरांची कत्तल करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी मोठी मोहीम उघडली आहे. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) संगमनेर शहर परिसरात शुक्रवारी पहाटे दोन वेगवेगळ्या ठिकाणी धाडसी कारवाया केल्या. या कारवाईत पोलिसांनी ११ लाख ४५ हजार ७०० रुपये किमतीचा एकूण मुद्देमाल हस्तगत केला असून, कत्तलीसाठी आणलेल्या १६ गोवंशीय जनावरांची निर्दयतेच्या विळख्यातून सुटका केली आहे. मदिनानगरमध्ये पहाटेची कारवाई-स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पथक संगमनेर शहर परिसरामध्ये गस्त घालत असताना, त्यांना मदिनानगर येथील गल्ली नंबर २ मध्ये एका पत्र्याच्या शेडमध्ये गोवंशीय जनावरांची कत्तल सुरू असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. पथकाने…
संगमनेर | महाराष्ट्र संवाद न्यूज दारूचे व्यसन हा केवळ एक स्वभावदोष नसून तो एक गंभीर मानसिक व शारीरिक आजार आहे, असे अमेरिकन मेडिकल असोसिएशननेही मान्य केले आहे. या आजारातून सावरण्यासाठी आणि मद्यपींना सन्मानाचे आयुष्य मिळवून देण्यासाठी ‘अल्कोहोलिक ॲनॉनिमस’ (ए.ए.) ही जागतिक संस्था गेल्या अनेक वर्षांपासून कार्य करत आहे. याच कार्याचा भाग म्हणून संगमनेर शहरात एका विशेष ‘जनजागरण सभे’चे आयोजन करण्यात आले आहे. संगमनेरमधील नागरिकांसाठी ही सभा उद्या शनिवारी, (दिनांक २७ डिसेंबर) दुपारी चार ते सहा या वेळेमध्ये संगमनेरच्या भंडारी मंगल कार्यालयामध्ये आयोजित करण्यात आली आहे. कोणासाठी आहे ही सभा?- ज्या व्यक्तींना स्वतःची दारू सोडण्याची मनापासून इच्छा आहे, किंवा ज्यांच्या घरात…
संगमनेर (प्रतिनिधी): मालपाणी फाऊंडेशन संचलित ध्रुव ग्लोबल स्कूलने आपल्या वार्षिक सांस्कृतिक महोत्सवाची परंपरा जपत यावर्षी मेवाडच्या गौरवशाली इतिहासावर आधारित भव्य ऐतिहासिक महानाट्याचे आयोजन केले आहे. शनिवार, २७ डिसेंबर रोजी सायंकाळी ७:३० वाजता मालपाणी लॉन्स येथे हा प्रेरणादायी सोहळा पार पडणार असून, यामध्ये शाळेच्या माध्यमिक विभागातील ३०० हून अधिक विद्यार्थी सहभागी होणार आहेत. या महानाट्याच्या माध्यमातून परकीय आक्रमकांना तब्बल तीन शतके रोखून धरणारे बाप्पा रावल यांच्यापासून ते अटकेपार झेंडा फडकवणारे महापराक्रमी महाराणा प्रताप यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकला जाणार आहे. प्रेक्षकांना यावेळी राणी पद्मिनीचा ऐतिहासिक जोहर, वीर गोरा आणि बादल यांचे अचाट शौर्य, पन्नादाईंचा सर्वोच्च त्याग आणि दानशूर भामाशाह यांच्या दातृत्वाची गाथा…
संगमनेर | महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर शहराचा नावलौकिक आणि वैभव संपूर्ण महाराष्ट्रात परिचित आहे. मात्र, गेल्या चार वर्षांपासून शहरात प्रशासकीय राजवट असताना जनसामान्यांच्या प्रश्नांवर ब्र काढायला तयार नसलेले महायुतीचे पदाधिकारी आता निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर अचानक सक्रिय झाले आहेत. नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींनी अद्याप आपल्या पदाचा कार्यभारही हाती घेतलेला नसताना मुख्याधिकाऱ्यांना निवेदने देऊन आंदोलनाचा पवित्रा घेणे, ही निव्वळ राजकीय स्टंटबाजी असल्याची खरमरीत टीका माजी नगराध्यक्ष तथा नवनिर्वाचित नगरसेवक दिलीपराव पुंड यांनी केली आहे. दिलीपराव पुंड यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात महायुतीच्या दुटप्पी भूमिकेवर तीव्र प्रहार केला आहे. ते म्हणाले की, लोकनेते बाळासाहेब थोरात आणि माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या खंबीर नेतृत्वाखाली संगमनेरने विकासाची…
संगमनेर | प्रतिनिधी सहकारी क्षेत्रात नावलौकिक असलेल्या संगमनेर शहरातील राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी महाराज नागरी सहकारी पतसंस्थेत सुमारे १४ ते १५ कोटी रुपयांचा महाघोटाळा उघडकीस आला आहे. बनावट कर्जप्रकरणे आणि कोऱ्या विड्रॉवल स्लिपचा वापर करून कर्जदारांची फसवणूक केल्याच्या आरोपावरून संस्थेच्या संचालक मंडळासह २२ जणांविरुद्ध संगमनेर न्यायालयात फौजदारी तक्रार दाखल करण्यात आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्याच्या पतसंस्था विश्वात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कल्पेश फुलचंद गांधी, बाळासाहेब सहादु हाडवळे, नंदू सुभाष वर्पे, सूर्यभान शेटे, नंदू कारभारी खेमनार, बाळासाहेब जगन्नाथ आहेर, जिजाबापु पोपट शिंगोटे, नामदेव गोविंद आहेर, सुधाकर बाजीराव जाधव, रंगनाथ किसन सानप, अमोल दादासाहेब गुंजाळ, संतोष संपत सातपुते, राजेंद्र…
