Author: अनंत पांगारकर
संगमनेर, प्रतिनिधी – राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनानंतर सोशल मीडियावर आक्षेपार्ह टिप्पणी करणे शिवसेना शिंदे गटाच्या शहरप्रमुखाला चांगलेच महागात पडले आहे. फेसबुकवर वादग्रस्त पोस्ट करून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून शिवसेना (एकनाथ शिंदे गट) शहर प्रमुख दिनेश भीमाशंकर फटांगरे याची आमदार अमोल खताळ यांच्या आदेशावरून पक्षातून तातडीने हकालपट्टी करण्यात आली असून, आता त्याच्या विरोधात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. आज सकाळी अजित पवार यांच्या निधनाची धक्कादायक बातमी समोर आल्यानंतर संपूर्ण राज्यातून हळहळ व्यक्त होत असतानाच, दुपारी दिनेश भीमाशंकर फटांगरे याने आपल्या फेसबुक अकाऊंटवरून “जसे ज्याचे…
संगमनेर, प्रतिनिधी – सातत्याने कारवाया होऊन देखील संगमनेर मधील अवैध कत्तलखाने बंद होण्याचे लक्षण दिसत नाहीत. कायद्याची कोणतीही भीती नसलेल्या कसायांकडून हे कत्तलखाने राजरोसपणे सातत्याच्या छाप्यानंतर देखील सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी संगमनेर शहर पोलीस स्टेशनच्या पथकाने मदिनानगर परिसरातील गल्ली नंबर २ मध्ये एका पत्र्याच्या वाड्यावर धाडसी छापा टाकून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी सुमारे ३००० किलो गोमांस, ६ जिवंत गोवंश आणि कत्तलीसाठी वापरले जाणारे साहित्य असा एकूण १०,५७,३०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई संगमनेर शहर पोलिसांनी मंगळवारी (२७ जानेवारी) दुपारी ४:०० वाजेच्या सुमारास गुप्त माहितीच्या आधारे केली. या घटनेची अधिक माहिती अशी की, संगमनेर…
संगमनेर, प्रतिनिधी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील दुर्दैवी निधनानंतर संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडालेला असताना, संगमनेरमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शिवसेना (शिंदे गट) संगमनेर शहराध्यक्ष दिनेश भीमाशंकर फटांगरे यांनी सोशल मीडियावर अजित पवार यांच्या संदर्भात एक अत्यंत वादग्रस्त आणि आक्षेपार्ह पोस्ट केली होती. या कृत्यामुळे राजकीय वर्तुळात संतापाची लाट उसळल्यानंतर, पक्षाने त्यांची तात्काळ पदावरून हकालपट्टी केली आहे. शिवसेना शिंदे गट जिल्हाप्रमुख नेमकं काय म्हणाले… बघा व्हिडिओ… उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यावर शोककळा पसरलेली असताना, दिनेश फटांगरे यांनी फेसबुकवर एक वादग्रस्त टिप्पणी केली होती. या पोस्टमुळे संगमनेरमधील नागरिक आणि कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. समाज माध्यमातून…
संगमनेर, प्रतिनिधी – राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री आणि ‘विकासपुरुष’ अजितदादा पवार यांच्या विमान अपघातातील अकाली निधनाचे वृत्त अत्यंत धक्कादायक आणि वेदनादायक आहे. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्राची कधीही न भरून निघणारी हानी झाली असून, राज्याने एक कणखर आणि विकासाला गती देणारे नेतृत्व गमावले आहे, अशा शब्दांत आमदार अमोल खताळ यांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत. आमदार अमोल खताळ यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली शोकसंवेदना व्यक्त करताना सांगितले की, अजितदादा पवार हे प्रशासनावर मजबूत पकड असणारे आणि जनतेसाठी अखंड झटणारे नेतृत्व होते. त्यांची निर्णयक्षमता, कार्यतत्परता आणि स्पष्टवक्तेपणा कायम स्मरणात राहील. माझी राजकारणातील सुरुवात राष्ट्रवादी काँग्रेसमधून झाली असून राजकीय व…
संगमनेर, प्रतिनिधी – स्पष्टवक्तेपणा, कामाचा प्रचंड उरक आणि प्रशासनावर मजबूत पकड असलेले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. या धक्कादायक बातमीने संपूर्ण महाराष्ट्र हळहळला असून, संगमनेरमध्येही शोक व्यक्त केला जात आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे आणि डॉ. जयश्रीताई थोरात यांनी आपल्या शोकभावना व्यक्त करत अजित दादांना श्रद्धांजली वाहिली आहे. प्रशासनावर पकड असलेला उमदा नेता गमावला – बाळासाहेब थोरात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी अत्यंत दु:खी अंतःकरणाने आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले की, “अनेक वर्षे अजित दादा आणि आम्ही एकत्र काम केले. कठोर निर्णय घेण्याची क्षमता…
संगमनेर – लाख मेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा वाचला पाहिजे, असं बाजीप्रभू देशपांडे म्हणाले होते. आज अजितदादांच्या जाण्याने या ओळींची प्रकर्षाने जाणीव होत आहे. एक कर्ता पुरुष गेला की सगळी समीकरणं कशी बदलून जातात, याचा अनुभव आज महाराष्ट्र घेतोय, अशा शब्दांत आमदार सत्यजित तांबे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. अजितदादांच्या निधनानंतर संपूर्ण राजकीय क्षेत्रावर शोककळा पसरली असून, सत्यजित तांबे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दादांसोबतच्या आठवणींना उजाळा दिला. https://x.com/i/status/2016384140682395808 तांबे यांनी आपल्या ट्विटरच्या पोस्टमध्ये अजितदादांच्या कार्यशैलीचे वर्णन करताना म्हटले की, लवकर चिडणारा, फटकळ बोलणारा आणि अत्यंत स्पष्टवक्ता म्हणून दादांची ओळख होती. पण त्याचसोबत, आपली चूक लक्षात आल्यावर ती मान्य…
बारामती: महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मोठे वादळ शमले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते अजित पवार यांच्या विमानाचा आज बारामती येथे भीषण अपघात झाला. या दुर्दैवी घटनेत अजित पवारांसह विमानातील सर्व सहा जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अजित पवार आज सकाळी ८ वाजून १० मिनिटांनी मुंबईहून खासगी विमानाने बारामतीकडे रवाना झाले होते. बारामती विमानतळावर सकाळी ८ वाजून ५० मिनिटांच्या सुमारास लँडिंग होत असताना विमानाला भीषण अपघात झाला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, विमान उतरत असताना धावपट्टीजवळ एका शेतात कोसळले आणि क्षणात विमानाने पेट घेतला. परिसरात काही काळ धुराचे लोट दिसत होते. नागरी विमानवाहू महासंचालनालयाने (DGCA) आणि…
आजचे राशिभविष्य मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहवर्धक ठरेल. कार्यक्षेत्रात तुमच्या कतृत्वाला वाव मिळेल आणि वरिष्ठ तुमच्या कामाची दखल घेतील. रखडलेली आर्थिक कामे मार्गी लागल्यामुळे मनावरचा ताण हलका होईल. जोडीदारासोबतचे संबंध अधिक दृढ होतील, मात्र घरातील मोठ्या व्यक्तींच्या प्रकृतीची काळजी घेणे आवश्यक आहे. नवीन गुंतवणुकीसाठी दिवस शुभ आहे. वृषभ – आज तुम्हाला आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. कामाचा व्याप वाढल्यामुळे शारीरिक थकवा जाणवू शकतो. आर्थिक बाबतीत कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका, अन्यथा फसवणूक होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जीवनात शांतता राहील. व्यवसायात असलेल्या व्यक्तींना आज मध्यम स्वरूपाचा लाभ होईल. सकारात्मक विचार केल्यास दिवसाचा शेवट गोड होईल. मिथुन – तुमच्या…
संगमनेर, २७ जानेवारी – महावितरण कार्यालयात वीजबिल, नवीन वीज जोडणी आणि ट्रिपिंग यांसारख्या विविध तक्रारी घेऊन येणाऱ्या ग्राहकांच्या समस्यांना प्राधान्य देऊन त्या तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश आमदार अमोल खताळ यांनी दिले आहेत. प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्याने ग्राहकांशी सौजन्याने वागणे बंधनकारक असून, यात हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, अशा सक्त सूचना त्यांनी महावितरणच्या आढावा बैठकीत दिल्या. संगमनेर शहर आणि तालुक्यातील वीज समस्यांचा आढावा घेण्यासाठी विभागीय कार्यालयात ही विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला महावितरणचे कार्यकारी अभियंता प्रदीप वट्टमवार, उपकार्यकारी अभियंता धनंजय खैरनार, प्रेमकुमार पाटील यांच्यासह तालुक्यातील सर्व विभागांचे उपअभियंता उपस्थित होते. बैठकीत प्रामुख्याने शेतकऱ्यांच्या दिवसा वीज पुरवठ्याचा प्रश्न ऐरणीवर…
संगमनेर, प्रतिनिधी – शहरातील जुना पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील वाढती वाहतूक आणि वाहनांचा अतिवेग यामुळे सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. विशेषतः पुणे रोडवरील मौलाना आझाद मंगल कार्यालय समोर आणि जोर्वे नाका या दोन ठिकाणी वाहने अतिशय वेगाने धावत असल्यामुळे अपघातांच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. या परिसरात शाळा, रहिवासी वस्ती आणि बाजारपेठ असल्याने शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक व पादचाऱ्यांच्या जिवाला मोठा धोका निर्माण झाला आहे. स्थानिक नागरिक गुड्डू इंजिनिअर यांनी या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांकडे लेखी निवेदन दिले आहे. यापूर्वी अनेकदा स्थानिक स्तरावर अर्ज देऊनही प्रशासनाने याकडे सोयीस्कर दुर्लक्ष…
