Author: अनंत पांगारकर
मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहाचा असून कार्यक्षेत्रात तुमच्या कामाची प्रशंसा होईल, ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. आर्थिक लाभाचे योग असून कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल, फक्त रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. वृषभ: आज तुम्हाला आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज असून खाण्यापिण्यावर संयम ठेवावा लागेल. महत्त्वाचे निर्णय घेताना घाई करू नका, कारण कुटुंबातील सदस्यांचा सल्ला आज तुमच्यासाठी मोलाचा ठरेल. मिथुन: व्यापार करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस प्रगतीकारक असून नवीन संधी चालून येतील. विद्यार्थ्यांचे अभ्यासात लक्ष लागेल आणि मित्रपरिवारासोबत प्रवासाचे बेत आखले जातील, मात्र संवाद साधताना स्पष्टता ठेवा. कर्क: आज कामाचा व्याप वाढल्याने थोडा मानसिक तणाव जाणवू शकतो, पण तुमची जिद्द तुम्हाला यश…
संगमनेर, प्रतिनिधी- ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत ई-केवायसी प्रक्रियेत तांत्रिक अडचणी किंवा माहितीअभावी अपात्र ठरलेल्या महिलांना पुन्हा एकदा ई-केवायसी करण्याची संधी द्यावी, अशी मागणी आमदार अमोल खताळ यांनी केली आहे. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांना सविस्तर निवेदन दिले आहे. आमदार खताळ यांनी निवेदनात नमूद केले आहे की, त्यांच्या संगमनेर मतदारसंघासह संपूर्ण राज्यातील अनेक लाभार्थी महिलांकडून या योजनेसंदर्भात तक्रारी प्राप्त होत आहेत. प्रामुख्याने ई-केवायसी प्रक्रिया करताना अनेक महिलांकडून अज्ञानामुळे किंवा तांत्रिक चुकीमुळे ‘घरामध्ये शासकीय कर्मचारी आहे’ हा पर्याय निवडला गेला आहे. यामुळे संबंधित…
नाशिक: सात वर्षांपूर्वी एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या नराधमाला नाशिकच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने ५ वर्षे सश्रम कारावासाची आणि दंडाची शिक्षा सुनावली आहे. किशोर दिनकर सोनवणे (वय २९, रा. महाकाली चौक) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. ही घटना २ मे २०१९ रोजी नाशिकमधील सिडको परिसरातील साईबाबानगर, महाकाली चौक येथे घडली होती. पीडित अल्पवयीन मुलगी घरासमोर इतर मुलांसोबत खेळत होती. यावेळी आरोपी किशोर सोनवणे याने घराच्या गच्चीवरून एक उशी खाली फेकली. मुलीला ती उशी घेऊन गच्चीवर येण्यास सांगून, तिच्या अजाणतेपणाचा गैरफायदा घेत आरोपीने तिचा विनयभंग केला. मुलीने घडलेला सर्व प्रकार आपल्या आईला सांगितल्यानंतर, अंबड पोलीस ठाण्यात पोक्सो (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा…
संगमनेर, प्रतिनिधी- कृषी क्षेत्रात येणाऱ्या नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती थेट शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचावी, या उद्देशाने शिवछत्रपती प्रतिष्ठान व अमृतवाहिनी शिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘कळस कृषी व डेअरी प्रदर्शनाने’ लोकप्रियतेचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. थोरात कृषी महाविद्यालयाच्या प्रांगणात भरलेल्या या ज्ञानकुंभाला गेल्या तीन दिवसांमध्ये तब्बल ३ लाख ९ हजार ४७२ नागरिकांनी भेट दिली असून, संपूर्ण परिसर जनसागराने ओसंडून वाहत आहे. माजी कृषिमंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली ४० एकरच्या विस्तीर्ण परिसरात हे भव्य प्रदर्शन भरवण्यात आले आहे. या प्रदर्शनाला माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, माजी मंत्री दिनेश ठाकूर, केंद्रीय पशुसंवर्धन आयुक्त प्रवीण मलिक, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, एकविरा फाउंडेशनच्या…
अहिल्यानगर- कोपरगाव शहर परिसरात घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरमधून वाहनांमध्ये अवैधपणे गॅस रिफिलिंग करणाऱ्या रॅकेटचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. पथकाने कोपरगाव परिसरात गस्त घालत असताना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही मोठी कारवाई यशस्वी केली. जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी जिल्ह्यातील अवैध गॅस रिफिलिंग केंद्रांवर कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिश भोये यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले होते. या पथकामध्ये पोलीस अंमलदार दीपक मेढे, राहुल द्वारके, राहुल डोके, सतिश भवर, सुनिल मालणकर आणि चालक भगवान धुळे यांचा समावेश होता. मिळालेल्या माहितीनुसार, कोपरगाव ते संजीवनी कॉलेज रोडवरील एका कॉम्प्लेक्सच्या मागे मनोज चंद्रकांत…
राज्यात सुरू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनी महाराष्ट्राची लाज आणि शरम अक्षरश: रस्त्यावर आणली आहे. पत्रकारितेच्या 35 वर्षांच्या काळात निवडणुकांची इतकी अधोगती आम्ही पाहिली नाही. गडबड केली तर हातची उमेदवारी जाईल, आचारसंहिता भंग केला तर पोलीस कारवाई होईल, अशा संविधानिक दडपणात होणार्या राज्यातील निवडणुका म्हणजे देशातील निवडणुकांचा आदर्श मानला जाई. पण गेल्या दहा वर्षांपासून निवडणुकांचं झालेलं अवमुल्यन पहाता निवडणुका म्हणजे केवळ बाजार झालाय, असंच म्हणता येईल. निवडणुकांतील वाढता काळाबाजार हे लोकशाहीचं अध:पतनच ठरलंय. याआधी महाराष्ट्रासारख्या राज्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन एव्हाना काहीसा बरा होता. पण विकासाच्या मुद्यापेक्षा लाळघोटेपणाला महत्व आल्यापासून महाराष्ट्र हे निवडणुकांसाठी नालायक राज्य ठरलं आहे. याची सर्वस्व जबाबदारी ही सत्ताधार्यांकडेच…
संगमनेर, प्रतिनिधी- ग्रामीण भागात आणि वनक्षेत्राच्या लगत राहणाऱ्या नागरिकांसाठी बिबट्याचा वावर हा आता केवळ भीतीचा विषय उरला नसून तो जीवघेणा ठरत आहे. शेतकरी, महिला आणि लहान मुले बिबट्याच्या हल्ल्यात आपले प्राण गमावत असताना, शासन केवळ कागदी घोडे नाचवण्यात व्यस्त आहे का? असा संतप्त सवाल आता विचारला जात आहे. संगमनेर तालुक्यातील अभियंता किरण सोमनाथ मैंदड यांनी या गंभीर प्रश्नावर आक्रमक पवित्रा घेत थेट मुख्यमंत्र्यांपासून वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत ई-मेलद्वारे निवेदन धाडले आहे. तंत्रज्ञान असतानाही दिरंगाई का?- आजच्या आधुनिक काळात जिथे आपण प्रगत तंत्रज्ञानाचा वापर सर्वच क्षेत्रांत करत आहोत, तिथे वन्यप्राण्यांच्या हल्ल्याची पूर्वसूचना देण्यासाठी ‘कॅमेरा ट्रॅप्स’ आणि ‘मोशन सेन्सर’ यांसारख्या साध्या यंत्रणेचा वापर…
मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहाचा आणि ऊर्जेने भरलेला असेल. भावंडांच्या मदतीने महत्त्वाची कामे पूर्ण होतील. नवीन उपक्रम सुरू करण्यासाठी आजचा दिवस शुभ आहे, मात्र घाईघाईत निर्णय घेणे टाळा. वृषभ: आर्थिक दृष्टीकोनातून आजचा दिवस फायदेशीर आहे. तुमची वाणी प्रभावी राहील, ज्यामुळे कठीण कामेही सुलभ होतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील आणि संध्याकाळी एखाद्या समारंभाला उपस्थित राहण्याची संधी मिळेल. मिथुन: चंद्र तुमच्याच राशीत असल्याने आज तुमची कल्पनाशक्ती विस्तारलेली असेल. नवीन विचार आणि योजना अंमलात आणाल. आत्मविश्वास वाढल्यामुळे तुम्ही इतरांना प्रभावीत कराल. स्वतःच्या आरोग्याकडे आणि आहाराकडे लक्ष द्या. कर्क: आज थोडा धावपळीचा आणि खर्चाचा दिवस असू शकतो. विनाकारण चिंता वाटण्याची शक्यता आहे, त्यामुळे…
संगमनेर, प्रतिनिधी- लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली ‘विकसित आणि वैभवशाली’ शहर म्हणून ओळख असलेल्या संगमनेरला गेल्या वर्षभरापासून गुन्हेगारीचे ग्रहण लागले आहे. शहरातील वाढती अमली पदार्थांची तस्करी, दहशत आणि चोऱ्यांच्या घटनांमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, ही गुन्हेगारी तातडीने थांबवावी, या मागणीसाठी शहरातील महिला पदाधिकारी कमालीच्या आक्रमक झाल्या आहेत. या संदर्भात आज नगराध्यक्षा डॉ. मैथिलीताई तांबे आणि माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस प्रशासनाला तीव्र भावनांचे निवेदन देण्यात आले. शहर पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांना देण्यात आलेल्या निवेदनात महिलांनी शहरातील विदारक परिस्थिती मांडली आहे. पोलीस निरीक्षक बारवकर यांनी महिलांच्या भावना जाणून घेत, या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने ठोस पावले उचलण्याचे…
संगमनेर, अनंत पांगारकर- गेल्या काही दिवसांपासून संगमनेरच्या राजकीय वर्तुळात अत्यंत चर्चेचा आणि दोन्ही आमदारांच्या ‘पत्रक युद्धा’चा विषय ठरलेली मालमत्ता करावरील शास्ती माफी अखेर प्रत्यक्षात उतरली आहे. संगमनेर नगरपालिकेच्या हद्दीतील थकबाकीदार मिळकतधारकांसाठी राज्य शासनाच्या निर्णयानुसार ‘अभय योजना’ लागू करण्यात आली असून, यामुळे शहरातील हजारो मालमत्ताधारकांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. या योजनेअंतर्गत मालमत्ता करावरील थकीत व्याजात (शास्ती) तब्बल ५० टक्के सवलत जाहीर करण्यात आली असून, प्रशासकीय पातळीवर झालेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. नवनिर्वाचित नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांनी पदभार हाती घेताच त्यांच्या कार्यकाळातील अंमलबजावणी होणारा हा पहिलाच मोठा निर्णय ठरला आहे. गेली अनेक वर्ष संगमनेरकरांना अपेक्षित असलेला निर्णय तांबे यांच्या…
