Author: अनंत पांगारकर
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क केंद्रीय निवडणूक आयोगाचा रात्री मोठा निर्णय समोर आला आहे. निवडणूक आयोगाने ठाकरे आणि शिंदे यांच्या गटाच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. ठाकरे गटाचे नाव यापुढे ‘शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे’ असे असेल. त्यांच्या गटाला ‘मशाल’ हे निवडणूक चिन्ह देण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ असे नाव मिळाले असून चिन्हासाठी त्यांच्याकडून पुन्हा पर्याय मागविण्यात आला आहे.शिवसेना फुटीनंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह गोठविले होते तसेच शिवसेना हे नाव वापरण्यास दोन्ही गटाला परवानगी नाकारली होती त्यामुळे आयोगाने दोन्ही गटाकडून नाव आणि चिन्हाबाबत पर्याय मागविले होते सोमवारी आयोगाने या पर्यायांवर निर्णय घेतला उद्धव ठाकरे यांनी मशाल या…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क आपल्यावरील टीकेला टीकेने उत्तर देण्याची गरज नसून कोणीही कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नये. सरकारला गालबोट लागणार नाही याची काळजी घेताना शंभर दिवसातील आपले निर्णय जनतेसमोर न्या, अशी तंबी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या गटाच्या मंत्री, आमदार व पदाधिकाऱ्यांना दिली आहे.केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह गोठविल्याने ते आता कोणत्याच गटाला मिळणार नाही. यावरून सध्या ठाकरे-शिंदे गटात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दोन्ही गटाला आता नवे नाव आणि चिन्ह शोधावे लागणार आहे, या पार्श्वभूमीवर आपल्या गटाच्या शिवसेनेचे नवे नाव आणि चिन्ह काय असावे यावर विचार विनिमय करण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी बोलावलेल्या बैठकीत ही नाराजी व्यक्त केली. यावेळी…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क निवडणूक चिन्ह गोठविण्यापर्यंत ठीक आहे मात्र पक्षच वापरायला बंदी घालण्याचा केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय अभूतपूर्व म्हटला पाहिजे. देशाच्या इतिहासात असा निर्णय कधीच झाला नाही. शिवसेना संपविण्यासाठी भाजपने कशी पाऊले टाकली हे सर्वांना दिसत आहे. त्यामुळे या निर्णयामुळे लोकांच्या मनात शंका निर्माण झाली आहे.शिवसेनेवरून ठाकरे शिंदे गटातील वाद दावे प्रति दावे राज्यासह संपूर्ण देश बघत आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह गोठविले असून फक्त शिवसेना हे नाव देखील वापरण्यास दोन्ही गटांना मज्जाव केला आहे. त्यामुळे दोन्ही गटांकडून पक्षाचे नवे नाव आणि नवे चिन्ह आयोगाला देण्यात आले आहे. याबाबत आयोगाचा निर्णय प्रतीक्षेत आहे.पाथर्डीमध्ये आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क महावितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे संगमनेर तालुक्यात चार मुलांचा मृत्यू झाल्याच्या घटनेला काही तास होत नाही तोच, सांगलीतील बिळूरमध्ये एका तलावात तीन मुलींसह आईचा मृतदेह आढळून आल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी मृतदेह तलावा बाहेर काढून शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविले आहेत.सुनिता माळी (वय ३० वर्ष), अमृता (वय १३ वर्ष), अश्विनी (वय १० वर्ष) आणि ऐश्वर्या (वय ७ वर्ष) अशी तलावात बुडून मृत्यू झालेल्या मायलेकींची नावे आहेत. या संदर्भातील नेमकी घटना काय आहे हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी घटनास्थळी आढळलेल्या कपडे आणि कपडे धुण्याच्या साबणावरून प्राथमिक अंदाजानुसार सुनिता आपल्या मुलींसह या तलावावर कपडे धुण्यासाठी आल्या…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात आलेल्या सेवा पंधरवड्यात संगमनेर महसूल उपविभागाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. पंधरा दिवसाच्या या कार्यकाळात तब्बल १९५२३ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला आहे.सर्वसामान्यांच्या तक्रारींचा निपटारा व्हावा, यासाठी १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरपर्यंत राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा आयोजित करण्यात आला होता. विकासाचे विविध उपक्रम राबवण्यासोबत प्रशासन जनतेचे प्रश्न, तक्रारी निकाली काढण्यासाठी प्रयत्नशील असते. पण, अनेक प्रकरणात काही कारणामुळे किंवा काही शुल्लक चुकांमुळे प्रकरणे दीर्घकाळ प्रलंबित असतात; नियमित प्रक्रियेत मागे पडतात. यामुळे संबंधिताना व्यवहारात अडचणी येऊ शकतात, अशी प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी सेवा पंधरवड्याचा संगमनेर महसूल उपविभागाने पुरेपूर उपयोग करून घेतला.या पंधरवड्यात…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क केंद्रीय निवडणूक आयोगाने तात्पुरत्या स्वरूपात धनुष्यबाण हे चिन्ह गोठविले असून शिवसेना या एका नावालाही दोन्ही गटांसाठी परवानगी नाकारली आहे. यामुळे ठाकरे-शिंदे गटाचे निवडणूक चिन्ह आणि पक्षाचे नाव काय असेल, हे आता निवडणूक आयोगाच्या हाती राहणार आहे. या प्रकारामुळे राज्यातील राजकीय वर्तुळात घडणाऱ्या घडामोडींवर भाष्य करण्यास मनसैनिकांना राज ठाकरेंनी बंदी घातली आहे.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी या संदर्भात ट्विट करत आपली भूमिका योग्य वेळेस मांडणार असल्याचे सांगितले आहे. शिवसेनेतून एक मोठा गट घेऊन बाहेर पडलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केवळ चिन्हच गोठविले नाही तर शिवसेना देखील संपविल्याची टीका त्यांच्यावर होत आहे. या संदर्भात राजकीय गोटातून…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क चार बालकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरणाऱ्या वीज वितरण कंपनीच्या तिघा कर्मचाऱ्यांविरोधात अखेर घारगाव पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्याचे महसूल मंत्री आणि नगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यासंबंधी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले होते.तालुक्यातील घारगाव पोलीस ठाण्यात यासंदर्भात अरुण हौशीराम बर्डे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वीज वितरण कंपनीच्या तिघा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वायरमन भालेराव (पूर्ण नाव माहित नाही), जालिंदर लेंडे (पूर्ण नाव माहित नाही) आणि साहेबराव शिवाजी लेंडे (दोघे रा. खंदरमाळ, ता. संगमनेर अशी आरोपींची नावे आहे. आरोपी पैकी विजय सयाजी भालेराव याला अटक करण्यात आली आहे.शनिवारी वांदरकडा खंदरमाळवाडी येथे असलेल्या…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क खंदरमाळवाडी येथे विजेचा शॉक लागून ४ लहान मुलांच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या दोषी व्यक्तींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे निर्देश राज्याचे महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले. तसेच मृत मुलांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ११ लाख रुपयांची मदत आणि या भागातील आदिवासी कुटुबीयांच्या घरकुलांचे प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनास दिल्या.संगमनेर तालुक्यातील खंदरमाळवाडी येथे वीजेचा शॉक लागून अनिकेत अरुण बर्डे, ओंकार अरूण बर्डे, दर्शन अजित बर्डे व विराज अजित बर्डे या चार भावंडांचा ८ ऑक्टोबर रोजी मृत्यू झाला. या कुटूंबाची राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आज खंदरमाळवाडी येथे सात्वंनपर भेट घेतली. त्यावेळी त्यांनी हे निर्देश…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील खंदरमाळवाडी येथे झालेल्या दुर्दैवी घटनेत मृत्यू झालेल्या चार भावंडांच्या वारसांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत करण्याची मागणी खासदार सदाशिव लोखंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात रविवारी सायंकाळी सात वाजता ते मुख्यमंत्र्यांची प्रत्यक्षात भेट घेणार असल्याची माहिती देण्यात आली.पाण्यात पडलेल्या उच्च दाबाच्या वीज तारेचा प्रवाह छोट्याशा तळ्यातील पाण्यात उतरल्याने संगमनेर तालुक्यातील खंदरमाळवाडी येथील अनिकेत अरुण बर्डे (वय १२ वर्ष), ओंकार अरुण बर्डे (वय १० वर्ष), दर्शन अजित बर्डे (वय ८ वर्ष) व विराज अजित बर्डे (वय ६ वर्ष) या चार भावंडांचा शनिवारी मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला होता.वीज वितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे…
महाराष्ट्राची राज्यसत्ता काबीज करण्याचं ईडीतंत्र आत्मसात झाल्यानंतर राज्यात होणार्या महानगर पालिकांसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थाही आपल्या ताब्यात आल्या पाहिजेत यासाठी सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटाने आता पुन्हा रडीचा डाव सुरू केला आहे. सत्तेचा ताबा मिळवण्यासाठी केंद्रिय गृह खात्याच्या मदतीने राज्यात ईडी, सीबीआयचा उच्छाद सुरू असताना आता गल्लीतल्या सत्तेसाठी पोलिसांना कामाला लावण्याचं पाताळयंत्री कृत्य सुरू आहे. येत्या महिन्या-दोन महिन्यात राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. या सार्या महानगरपालिका आपल्याच ताब्यात आल्या पाहिजेत, या आसुयेपोटी सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेचा फुटीर गट कामाला लागलं आहे. ज्यांची ताकद आहे, राजकीय शक्ती आहे, अशा कार्यकर्त्यांना वेचून त्यांच्या विरोधात पोलीस कारवाईचा सपाटा हेच सांगतं.यंत्रणांचा वापर…
