Author: अनंत पांगारकर
अनंत पांगारकर | महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेरच्या राजकीय रणांगणात आज पुन्हा एकदा ‘थोरात-तांबे’ नावाचा डंका वाजला असून, नगरपरिषद निवडणुकीच्या निकालाने प्रस्थापित नेतृत्वाची पकड किती मजबूत आहे, हे सिद्ध केले आहे. संगमनेरच्या राजकीय इतिहासात आजचा दिवस सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल, कारण हा विजय केवळ एका नगरपरिषदेची सत्ता मिळवण्याचा नसून, तो संगमनेरच्या अस्मितेवर आणि विकासाच्या मॉडेलवर जनतेने दिलेली मोहोर आहे. माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि युवा नेते आमदार सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखालील ‘संगमनेर सेवा समिती’ने विरोधकांच्या रणनीतीचे अक्षरशः धिंडवडे काढत ३० पैकी २७ जागांवर निर्विवाद वर्चस्व मिळवले आहे. विधानसभा निवडणुकीत झालेला पराभव हा केवळ एक राजकीय अपघात होता, हे संगमनेरच्या मतदारांनी…
संगमनेर | महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर नगरपरिषद निवडणुकीमध्ये आज रविवारी सकाळी दहा वाजता सुरू झालेल्या मतमोजणी मध्ये नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखालील संगमनेर सेवा समितीने आपल्या पहिल्याच विजयानंतर जोरदार खाते उघडले आहे. आत्तापर्यंत समोर आलेल्या निवडणूक निकालामध्ये सेवा समितीचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होताना दिसत असून महायुतीच्या उमेदवारांना या निवडणुकीत चुरस निर्माण करता आली नसल्याचे समोर येत आहे. आतापर्यंत समोर आलेल्या निवडणूक निकालातून संगमनेर सेवा समितीचे उमेदवार सीमा खटाटे, भारत बोऱ्हाडे, सौरभ कासार, शोभा पवार, प्राची काशीद, किशोर पवार, विश्वास मुर्तडक, डॉ. अनुराधा सातपुते, वनिता गाढे, गजेंद्र अभंग, नितीन अभंग, मालती डाके, दिपाली पंचरिया, गणेश गुंजाळ यांनी…
‘नावात काय आहे? गुलाबाला दुसर्या कुठल्याही नावाने हाक मारली तरी त्याचा सुगंध तसाच राहतो’, जगाला तत्व देणार्या विल्यम शेक्सपीयरच्या ‘रोमिओ अॅण्ड ज्युलिएट’ या प्रसिध्द नाटकातील ही अजरामर रचना. नावापेक्षा व्यक्तीचा किंवा वस्तूंचा खरा गूणधर्म, मूल्य आणि स्वरूप महत्वाचं असतं. नाव बदललं तरी त्याचा गूण बदलत नसतो. विल्यम शेक्सपीयरच्या या तत्वज्ञानाची फारकत सध्या भारताच्या मध्यवर्ती सरकारने घेतली आहे. मागल्या सरकारने देशातील विविध ठिकाणं, संस्था, योजनांना दिलेली नावं काढण्याचा खोडसाळपणा या सरकारने सुरू केला आहे. इतिहास पुसून काढताना इतिहासाची पानं आम्ही सांगू तशीच असतील, असं कोणी सांगण्याचा प्रयत्न केला तर? त्याला जगात वेडं ठरवलं जाईल. पण भारतात ते खुलेआम सुरू आहे. हे…
मेष : आजचा दिवस उत्साहाचा राहील. रखडलेली कामे मार्गी लागतील. कुटुंबासोबत आनंदात वेळ घालवाल, पण खर्चावर थोडे नियंत्रण ठेवा. वृषभ : आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. मानसिक शांततेसाठी योगा किंवा ध्यानाचा आधार घ्या. आर्थिक बाबतीत दिवस सामान्य आहे. मिथुन : मित्रमैत्रिणींच्या भेटीगाठी होतील. नवीन लोकांशी संपर्क वाढेल. व्यापारात धनलाभाचे योग आहेत. बोलण्यावर संयम ठेवा. कर्क : नोकरी किंवा व्यवसायात प्रगतीची संधी मिळेल. वरिष्ठांकडून कौतुक होईल. जोडीदारासोबतचे संबंध मधुर राहतील. सिंह : नशिबाची साथ लाभेल. धार्मिक कार्यात रुची वाढेल. प्रवासाचे योग आहेत, जो तुमच्यासाठी सुखद ठरेल. कन्या : आज सावध राहण्याची गरज आहे. वाहन जपून चालवा. कोणत्याही वादात पडू नका. आरोग्याची…
संगमनेर | महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर नगर परिषदेच्या निवडणूक प्रक्रियेचा महत्त्वाचा टप्पा असलेल्या मतमोजणीची तयारी पूर्ण झाली असून, रविवारी (दिनांक २१ डिसेंबर) ही प्रक्रिया पार पडणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अरुण उंडे यांनी दिली आहे. मतमोजणी सुव्यवस्थित पार पाडण्यासाठी प्रशासनाने १० टेबलांची व्यवस्था केली असून संपूर्ण मोजणी एकूण ८ फेऱ्यांमध्ये पूर्ण केली जाणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी अरुण उंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मतमोजणीला सकाळी दहा वाजता सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुलातील बॅडमिंटन हॉलमध्ये सुरुवात होणार असून मतमोजणीच्या फेऱ्यांचे नियोजन प्रभागांनुसार करण्यात आले आहे. पहिल्या फेरीत प्रभाग १ व २ ची मोजणी होईल, तर दुसऱ्या फेरीत प्रभाग ३, ४…
संगमनेर | महाराष्ट्र संवाद न्यूज अहिल्यानगर जिल्ह्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या लोहारे-मिरपूर येथील श्रीक्षेत्र आवजीनाथ बाबा देवस्थान परिसरात भाविकांच्या सुरक्षिततेसाठी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नांदूर शिंगोटे–कोल्हार राष्ट्रीय महामार्गावर उड्डाणपूल उभारण्यात यावा, अशी आग्रही मागणी आमदार सत्यजित तांबे यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याशी पत्राद्वारे आणि दूरध्वनीवरून संपर्क साधून पाठपुरावा सुरू केला आहे. संगमनेर तालुक्यातील लोहारे येथील आवजीनाथ बाबा मंदिराच्या विकासासाठी माजी मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न होत आहेत. गेल्या वर्षी ५० लाख रुपयांच्या निधीतून भक्त निवासाची उभारणी व परिसराचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. यामुळे भाविकांच्या संख्येत मोठी…
संगमनेरकरांनो सावधान! उद्या ‘हे’ रस्ते राहणार बंद; मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा मोठा निर्णय!
संगमनेर | महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीची मतमोजणी उद्या रविवारी, (२१ डिसेंबर) सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुल परिसरात पार पडणार आहे. मतमोजणी प्रक्रियेदरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी प्रशासनाने क्रीडा संकुल परिसरातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल केले असून अनेक रस्ते सर्वसामान्यांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मतमोजणीच्या दिवशी सुरक्षिततेच्या कारणास्तव खालील मार्गांवरून सर्व वाहनांना व नागरिकांना प्रवेश नाकारण्यात आला आहे- ईदगाह मैदान ते नेहरू गार्डन: हा संपूर्ण रस्ता मतमोजणीच्या दिवशी बंद राहील. शहर पोलीस स्टेशन ते संजय गांधी नगर: या दरम्यानचा रस्ता बॅरिकेडिंग करून पूर्णतः बंद असेल. वकील कॉलनी व अभंग मळा: या भागातून…
संगमनेर | अनंत पांगारकर संगमनेर नगरपरिषदेच्या रखडलेल्या तीन जागांसाठी आज (शनिवारी) रणधुमाळी उडाली आहे. या तीन जागांसाठी आज सकाळीच शांततेत मतदान सुरू झाले असून सकाळी साडेनऊ पर्यंत ६.६१ टक्के मतदान झाले होते. तर नगराध्यक्षपदासह २७ जागांसाठी २ डिसेंबरला मतदान झाले आहे. उद्या रविवारी होणाऱ्या मतमोजणीनंतर संगमनेर शहराच्या स्थानिक राजकारणाची आगामी दिशा स्पष्ट होणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर तालुक्यात होत असलेली ही पहिलीच मोठी निवडणूक असल्याने या निकालातून शहराचा ‘किंग’ कोण ठरणार? याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सुमारे ११,४२६ मतदार आज ९ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मशीनमध्ये बंद करणार असून, उद्या रविवारी (२१ डिसेंबर) होणाऱ्या मतमोजणीकडे सर्वांचे डोळे लागले आहेत. या निवडणुकीत…
मेष – आज तुमचा आत्मविश्वास दांडगा असेल. कार्यक्षेत्रात नवीन जबाबदाऱ्या अंगावर पडू शकतात, पण त्या तुम्ही यशस्वीपणे पार पाडाल. घाईघाईत घेतलेले निर्णय नुकसान करू शकतात, त्यामुळे संयम ठेवा. कुटुंबातील सदस्यांशी संवाद वाढवा. वृषभ – आर्थिक दृष्टीकोनातून आजचा दिवस चांगला आहे. धनलाभाचे योग आहेत. व्यावसायिक कामात प्रगती होईल. घरातील वातावरण आनंदी राहील, मात्र बाहेरचे अन्न खाणे टाळावे कारण पोटाचे विकार त्रास देऊ शकतात. मिथुन – आज तुम्हाला बुद्धी आणि कौशल्याचा वापर करावा लागेल. नवीन लोकांशी संपर्क होईल जो भविष्यात फायदेशीर ठरेल. जोडीदारासोबत असलेल्या जुन्या कुरबुरी संपतील. प्रवासाचे बेत आखले जातील. कर्क – आजचा दिवस थोडा संयमाचा आहे. कामाचा ताण वाढल्यामुळे थकवा…
संगमनेर | महाराष्ट्र संवाद न्यूज: संगमनेर तालुक्याच्या जनतेने ४० वर्षे प्रेम दिले, आम्ही कष्टाने निळवंडे धरण, थेट पाईपलाईन आणि रेल्वे मार्ग मंजूर करून घेतला. मात्र, आता हाच विकासाचा वारसा उध्वस्त करण्याचे षडयंत्र सुरू असून ज्यांनी रेल्वे पळवली, त्यांना ओळखा आणि तालुका वाचवण्यासाठी वेळीच एकत्र या, असे प्रखर आवाहन माजी महसूल मंत्री व आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले आहे. संगमनेर सेवा समितीच्यावतीने गणेशनगर येथे आयोजित नगरपालिका निवडणुकीच्या सांगता सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, वंचित बहुजन आघाडीच्या प्रवक्त्या उत्कर्षाताई रूपवते, माजी नगराध्यक्ष विश्वास मुर्तडक, माजी नगराध्यक्ष व उमेदवार असलेले…
