Author: अनंत पांगारकर

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  मुंबई – जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीडीसी) निधीवाटपात होणारा भेदभाव आणि मनमानी थांबवण्यासाठी राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या नवीन धोरणामुळे पालकमंत्र्यांचे निधी वाटपाचे सर्वाधिकार मर्यादित झाले आहेत. आता निधी वाटपात अधिक पारदर्शकता आणि समानता आणण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. नवीन धोरणाची गरज का – आतापर्यंत डीपीडीसी निधीचे वाटप पालकमंत्र्यांच्या अखत्यारीत होते. अनेकदा सत्ताधारी पक्षांच्या आमदारांना अधिक निधी मिळतो, तर विरोधी पक्षांच्या आमदारांकडे दुर्लक्ष होते, अशा तक्रारी समोर येत होत्या. यामुळे निधीचा वापर समान आणि योग्य पद्धतीने होत नव्हता. या वाढत्या तक्रारींमुळे सरकारने निधी वाटपाचे नवीन धोरण तयार केले आहे. नवीन धोरणातील प्रमुख बदल पालकमंत्र्यांच्या अधिकाराला…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. महत्त्वाच्या कामांमध्ये यश मिळेल. मित्र आणि कुटुंबीयांचे सहकार्य मिळेल. आर्थिक स्थिती सामान्य राहील. आरोग्याची काळजी घ्या. वृषभ: आज कामामध्ये जास्त लक्ष देण्याची गरज आहे. घाईत कोणताही निर्णय घेऊ नका. कुटुंबासोबत वेळ घालवा, ज्यामुळे मानसिक शांतता मिळेल. खर्च जपून करा. मिथुन: तुमच्यासाठी आजचा दिवस लाभदायक आहे. व्यवसाय किंवा नोकरीत प्रगती होऊ शकते. नवीन संधी मिळतील. आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. कर्क: आज तुम्हाला भावनिकदृष्ट्या थोडे अस्थिर वाटू शकते. कोणताही निर्णय घेण्याआधी विचार करा. नातेसंबंधांमध्ये गैरसमज टाळण्याचा प्रयत्न करा. आज शांत राहणे फायदेशीर ठरेल. सिंह: तुमच्यासाठी आजचा दिवस खूप उत्साहाचा आहे. तुमची…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर, प्रतिनिधी: संगमनेर तालुक्यात राजकीय आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरू असून, माजी आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या आजच्या शांती मोर्चा नंतर आमदार अमोल खताळ यांनी माजी आमदारांवर हल्ला चढवला आहे. जनतेने पराभव करून तुमचा खुळखुळा केला आहे, आता तुमच्याविषयी कोणतीही सहानुभूती राहिलेली नाही, अशी टीका खताळ यांनी केली. तालुक्यातील विकासकामांची घडी बसत असल्यानेच तुम्हाला मोर्चे काढावे लागत आहेत, मात्र जनतेला तुमचे बेगडी हिंदुत्व ओळखता आले आहे, असेही ते म्हणाले. गुरुवारी निघालेल्या शांती मोर्चानंतर आमदार खताळ यांच्या कार्यालयाकडून प्रसिद्धी पत्रक देण्यात आले यात खताळ यांनी माजी आमदारांवर कटकारस्थानाचा आरोप करत, त्यांच्या स्विय सहायकानेच कीर्तनात गोंधळ घातला आणि आता…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन मुंबई, दि. २१ ऑगस्ट २०२५: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना आलेल्या धमकीच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी विरोधक भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. बाळासाहेब थोरात यांच्या केसालाही धक्का लावण्याची धमक नथुराम गोडसेच्या औलादीत नाही, असे ठामपणे सांगत, गरजणारे ढग बरसत नाहीत, असा टोला त्यांनी लगावला. तोंडी राम आणि बगलेत सुरी ही भाजपची कार्यपद्धती – या प्रकरणावर बोलताना सपकाळ म्हणाले की, “तोंडी राम आणि बगलेत सुरी” ही भाजपची जुनी कार्यपद्धती आहे. महात्मा गांधींची हत्या करण्यापूर्वी नथुराम गोडसे त्यांच्या पाया पडला आणि नंतर त्याने तीन गोळ्या झाडल्या, हा इतिहास आहे. आजही भाजप गोडसेच्या…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  संगमनेर, प्रतिनिधी: राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना नथुराम गोडसे होऊन जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या तथाकथित संग्राम भंडारेचा निषेध करण्यासाठी माजी मंत्री बाळासाहेब थोरात-आमदार सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुका आपली अस्मिता जपत एकवटला. हजारो नागरिकांनी एकत्र येऊन भव्य शांती मोर्चा काढला. या वेळी, संगमनेरच्या शांततापूर्ण विकासाला खीळ घालू पाहणाऱ्या गावगुंडांचा बंदोबस्त करण्याची हाक काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी दिली. तथाकथित संग्राम भंडारेचा निषेध करण्यासाठी  स्वाभिमानी संगमनेर तालुका, सकल हिंदू समाज, विविध पुरोगामी संघटना, महाविकास आघाडी, आध्यात्मिक व वारकरी संप्रदाय आणि इतर राजकीय पक्षांच्या वतीने हा भव्य सद्भावना शांती मोर्चा काढण्यात आला. व्यक्तिगत बाळासाहेब थोरात…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  संगमनेर, प्रतिनिधी: अल्पवयीन महाविद्यालयीन तरुणीवर लैंगिक अत्याचाराचा आरोप सिद्ध झाल्याने संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने आरोपीला दहा वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.  बाळासाहेब जगन्नाथ रोकडे (वय ३२ वर्ष रा. श्रीरामनगर संगमनेर) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. एस. घुमरे यांच्या न्यायालयासमोर या खटल्याची सुनावणी सुरू होती. दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने मंगळवारी निर्णय जाहीर करत आरोपीला खटल्यात दोषी ठरविले. १७ मार्च २०१९ रोजी पीडित अल्पवयीन महाविद्यालयीन तरुणी मैत्रिणीचे बँकेत काम असल्याचे कारण सांगून तिच्यासोबत संगमनेर मधील युनियन बँकेत गेली होती. मात्र ही घरी न परतल्याने मैत्रिणीकडे चौकशी केली असता…

Read More

महाराष्ट्र सह्याद्री न्यूज ऑनलाईन अकोले: उत्तर नगर जिल्ह्याची जीवनदायनी म्हणून ओळखले जाणारे भंडारदरा धरण अखेर पूर्णपणे भरले आहे. आज पहाटे ३ वाजता धरणातील पाणीसाठा पूर्ण क्षमतेने भरल्याने प्रशासनाने धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. धरणातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू – सकाळी ६ वाजल्यापासून धरणाच्या स्पीलवेमधून ११,४०६ क्युसेक आणि वीज निर्मितीसाठी ८५० क्युसेक, असा एकूण १२,२३१ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला होता. त्यानंतर पाण्याच्या आवकेनुसार, सकाळी ८ वाजता विसर्ग वाढवून २०,७६३ क्युसेक इतका करण्यात आला आहे. भंडारदरा धरणाची पूर्ण साठवण क्षमता १०,७६३ द.ल.घ.फू. आहे. धरण भरल्यानंतर, येणारे अतिरिक्त…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  अकोले: अकोले शहरात सुरू असलेल्या ऑनलाईन बिंगो, मटका आणि डॉलर जुगाराच्या अड्ड्यावर अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी १६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, त्यांच्याकडून ४ लाख ९८ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अकोले शहरातील बसस्थानकासमोरील नवले कॉम्प्लेक्समध्ये ऑनलाईन जुगार सुरू असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे, पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली. या छाप्यात बिंगो, मटका आणि डॉलर या जुगारांचे साहित्य आणि साधने जप्त करण्यात आली. या प्रकरणी नितीन निवृत्ती गायकवाड, अमोल मारुती मोहिते, वैभव राजेंद्र गायकवाड,…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी सकारात्मक आहे. कामाच्या ठिकाणी प्रगती होईल आणि वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. आर्थिक बाजू मजबूत राहील. कुटुंबासोबत वेळ घालवल्याने आनंद मिळेल. वृषभ: काही कामांमध्ये अडथळे येण्याची शक्यता आहे, पण संयम ठेवल्यास यश मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. मिथुन: आजचा दिवस तुमच्यासाठी फलदायी ठरेल. नवीन संधी मिळतील, ज्यामुळे तुमच्या करिअरला गती मिळेल. सामाजिक कार्यात सहभाग घ्याल आणि तुमचा मान-सन्मान वाढेल. कर्क: तुम्ही घेतलेल्या निर्णयामुळे फायदा होईल. आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्या. कुटुंबातील सदस्यांशी मतभेद टाळा. सिंह: आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ आहे. तुमच्या कामाचे कौतुक होईल आणि नवीन जबाबदाऱ्या मिळतील. वैवाहिक…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर, प्रतिनिधी: राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना कथित कीर्तनकार संग्राम भंडारे यांनी दिलेल्या धमकीच्या निषेधार्थ संगमनेरमध्ये गुरुवारी (२१ ऑगस्ट) एक भव्य निषेध मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. संगमनेरमधील सकल हिंदू समाज, विविध पुरोगामी संघटना, वारकरी संप्रदाय आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी होणार आहेत. या मोर्चाची माहिती देताना काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अजय फटांगरे यांनी सांगितले की, माजी मंत्री बाळासाहेब थोरात हे यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचे वारसदार आहेत. त्यांनी आपल्या कामातून संगमनेर तालुक्याचा विकास केला आहे. ‘एक तालुका, एक परिवार’ ही त्यांची संकल्पना राज्यात आदर्श मानली जाते. अशा संयमी आणि सर्वधर्म समभाव जपणाऱ्या नेत्याला…

Read More