Author: अनंत पांगारकर

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय पातळीवर अग्रगण्य असणाऱ्या व सुमारे ५० देशांमध्ये तीन लाखाहून अधिक कर्मचारी असलेल्या कॅपजेमिनी या कंपनीत अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेजमधील १११ विद्यार्थ्यांची चांगल्या पगारावर थेट निवड झाली. अशी माहिती प्राचार्य डॉ. एम. ए. व्यंकटेश यांनी दिली. डॉ. व्यंकटेश म्हणाले, काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात व आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेज हे राज्यातील अग्रमानांकित महाविद्यालय ठरले आहे. नॅकचा ‘ए प्लस’ दर्जा मिळवणाऱ्या या महाविद्यालयामध्ये अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील कंपन्या थेट मुलाखती आयोजित करत असतात. कॅपजेमिनी या आंतरराष्ट्रीय पातळीवरील कंपनीने शैक्षणिक वर्ष २०२२-२३ च्या सुरुवातीला अमृतवाहिनीतील अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या मुलाखती…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध करणाऱ्या व समर्पित वृत्तीने समाज घडविणाऱ्या शिक्षकांना दिला जाणारा जिल्हा शिक्षक पुरस्कार हा त्यांना प्रेरणा देणारा व जबाबदारी वाढविणारा आहे, असे प्रतिपादन पुण्याच्या चाणक्य मंडळ परिवाराच्या संचालिका रोहिणीताई गुट्टे-नागणे यांनी केले. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त संगमनेर पंचायत समितीच्यावतीने आयोजित करण्यात आलेला विद्यार्थी व शिक्षक गुणगौरव सोहळा संगमनेर महाविद्यालयाच्या साईबाबा हॉलमध्ये पार पडला. यावेळी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी संगमनेर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अनिल नागणे होते. यावेळी गटशिक्षणाधिकारी सुवर्णा फटांगरे व्यासपिठावर उपस्थित होत्या. यावेळी जिल्हा पुरस्कार प्राप्त शिक्षक सुशीला धुमाळ, वृषाली कडलग व अशोक शेटे यांना याप्रसंगी सन्मानित करण्यात आले. व्ही-स्कुलमध्ये योगदान देऊन पंचायत समितीचे…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क माजी मंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांची सोमवारी प्रकृती खालावल्याने त्यांना उपचारासाठी मुंबईत लिलावती रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. माजी आमदार वैभव पिचड यांनी स्वत:ला सावरत कार्यकर्त्यांना गर्दी न करण्याचे आवाहन केले आहे. ८१ वर्षीय पिचड सकाळी सातच्या सुमारात फेरफटका मारत असतांना अचानक त्यांचा रक्तदाब अनियमीत झाल्याने त्यांची प्रकृती खालावली. माजी आमदार वैभव पिचड यांनी तातडीने त्यांची डॉ. मारुती भांडकोळी आणि डॉ. बाबासाहेब गोडगे यांच्याकडून तपासणी करुन घेतली. मात्र त्यांनी पिचड यांना तातडीने लिलावतीत हलविण्याचा सल्ला दिला. पिचड यांची प्रकृती खालावल्याची माहिती मिळताच कार्यकर्त्यांनी त्यांच्या राजुर येथील निवासस्थानी धाव घेतली होती. डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर पिचड…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात संगमनेर नगर परिषदेने पश्चिम विभागात देशात तिसरा क्रमांक मिळविला आहे. तसेच कचरा मुक्त शहराअंतर्गत थ्री स्टारचे मानांकन देखील पालिकेत प्राप्त झाल्याची माहिती प्रशासक तथा प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे आणि मुख्याधिकारी राहुल वाघ दिली. 2022 मध्ये झालेल्या या स्पर्धेचे मानांकन नुकतेच जाहीर करण्यात आले असून संगमनेर नगर परिषदेने पुन्हा एकदा नेत्रदीपक कामगिरी केली आहे. तत्कालीन नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांनी या अभियानात मोठी मेहनत घेत संगमनेर कचरा मुक्त करण्यात आणि या माध्यमातून सर्वांच्या सहकार्याने पालिकेला कोट्यावधी रुपये बक्षीस मिळून देण्याचे काम केले होते. आता प्रशासकीय कालावधीत देखील हाच पायंडा कायम राहिला आहे. केंद्र…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हत्येचा कट रचला जात असल्याची खोटी माहिती देणाऱ्या अविनाश वाघमारे याला लोणावळा पोलीसांनी अटक केली आहे. वाघमारे याने खोडसाळपणा करत हे कृत्य केल्याचे समोर आले आहे. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर या कथित हत्येच्या धमकी प्रकरणाचा उलगडा झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्ला करण्याचा कट रचला जातोय, अशी माहिती थेट पोलिसांच्या १०० नंबरवर देण्यात आली होती. सतर्क झालेल्या पोलिसांनी घाटकोपरमधील रहीवासी असलेल्या अविनाश वाघमारे याला ताब्यात घेतले. वाघमारे मुंबईहून सांगलीला जात असतांना लोणावळ्यात शनिवारी रात्री हा प्रकार घडला होता. १०० नंबरवरील या कॉलमुळे पोलीस यंत्रणा सतर्क झाली होती. पोलिसांनी या कथित प्रकरणाच्या तळाशी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क कोणत्याही कामाजी लाज न बाळगता विविध व्यवसायात महिलांनी पारंगत झाले पाहिजेत. सक्षम होवून आपल्या पायावर उभे राहण्यासाठी विज्ञानवादी विचारसरणी स्विकारण्यासाठी मराठा सेवा संघ प्रयत्नशील आहे. सेवा संघात महिलांना मानाचे स्थान असून घरोघरी जिजाऊ पारायण होण्यासाठी जिजाऊ ब्रिगेडने पुढे यावे व चांगला समाज घडवावा असे प्रतिपादन मराठा सेवा संघाचे प्रदेश कार्याध्यक्ष प्रा. अर्जुनराव तनपुरे यांनी केले. संगमनेर मराठा सेवा संघाचा ‘जनसंवाद’ शासकीय विश्रामगृहात झाला. यावेळी ते बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, मराठा सेवा संघाचे विभागीय अध्यक्ष दीपक भदाणे, चंद्रकांत नवले, संपत देशमुख, जिजाऊ ब्रिगेड प्रदेश सदस्य डॉ. दिपाली पानसरे, जिल्हाध्यक्ष श्रध्दा वाणी, जिल्हा उपाध्यक्ष…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क सत्य, अहिंसा आणि त्यागाची शिकवण देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या अहिंसेच्या मार्गाने केवळ भारतच नव्हे तर जग चालत असल्याने गांधीजी आंतरराष्ट्रीय शांतीदूत ठरल्याचे प्रतिपादन नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केले. माजी मंत्री, आमदार बाळासाहेब थोरात यांच्या ‘यशोधन’ संपर्क कार्यालयामध्ये कॉग्रेस कमिटीच्यावतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी डॉ. तांबे बोलत होते. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात साखर कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ, कॅन्सरतज्ज्ञ डॉ. जयश्री थोरात, प्रमिला अभंग, बाळासाहेब पवार, सुनील कडलग, रमेश नेहे आदी उपस्थित होते. यावेळी गांधी व शास्त्री यांच्या प्रतिमांना अभिवादन करण्यात आले.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क डॉ. जयश्री थोरात यांच्या नेतृत्वाखाली महिलांच्या उन्नतीसाठी काम करणाऱ्या एकविरा फाउंडेशनच्या माध्यमातून नवरात्रोत्सवात विविध क्षेत्रात काम करुन नावलौकीक मिळविणाऱ्या समाजातील विविध घटकातील महिलांच्या ‘यशोगाथा’ सांगणाऱ्या मुलाखती सुरु आहे. एकीकडे नवरात्रोत्सवात नवदुर्गांचा सन्मान होत असताना दुसरीकडे समाजातील यशस्वी महिलांच्या कर्तृत्व भरारीचा हा आलेख इतर महिलांसाठी अनुकरणीय लौकिकास्पद ठरत आहे. डॉ. जयश्री थोरात यांनी तळागाळातील महिला व मुलींच्या उन्नतीसाठी व त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी एकविरा फाउंडेशनची स्थापना केली असून या फाउंडेशनच्यावतीने तालुक्यात अनेक संकल्पना राबवल्या जात आहे. याचाच एक भाग म्हणून हा उपक्रम राबविण्यात आला आहे. समाजातील महिलांना व मुलींना विविध क्षेत्रात पुढे जाण्यासाठी कला, क्रीडा, साहित्य,…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क २ ऑक्टोंबरच्या महात्मा गांधी जयंती दिनी पहाटेच पोलिसांनी संगमनेर शहरातील प्रतिष्ठीतांच्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून ११ जुगाऱ्यांना तब्बल साडेपाच लाख रुपयांच्या मुद्देमालासह पकडले आहे. जुगार अड्ड्यावर छाप्यासाठी थेट घारगांव पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुनील पाटील संगमनेरात आले होते. त्यामुळे पोलिस वर्तुळात या छाप्याची चर्चा रंगली आहे. संगमनेर शहरासह जिल्ह्यात अवैध धंदे मोठ्या जोमात सुरु असून यावर नियंत्रण आणण्यात पोलीस प्रशासन अयशस्वी ठरले आहे. शहर पोलिसांनी याच आठवड्यात शहरातील कॉफी सेंटर, कॅफे सेंटरवर छापे मारुन तब्बल ३४ जोडप्यांना अश्लील चाळे करतांना पकडले होते. या घटनेमुळे शहरात अशा प्रकारचे अनैतिक व्यवसायही राजरोसपणे सुरु असल्याचे समोर आले होते. निरीक्षक सुनिल…

Read More

रविवार विशेष । प्रविण पुरो महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क उकेंविरोधी 31 मार्च 2022 रोजी ईडीने अटकेची कारवाई केली. इतर ज्येष्ठ नेत्यांविरोधात ईडीने कारवाईचा फास टाकल्याने उकेंच्या कारवाईकडे तेव्हा कोणाचं लक्ष जाऊ शकलं नाही. आता या अटकेच्या कारवाईला सहा महिने होत आहेत तरीही उके यांना जामीन मिळालेला नाही. उकेंवर कारवाई का झाली याची उत्तरं देताना उकेंच्या आई आणि वडिलांचीही उघडपणे देवेंद्र फडणवीसांचं नाव घेतलं. पहाटे पाच वाजता उकेंच्या घरी पोहोचलेल्या ईडी अधिकार्‍यांनी उकेंच्या पत्नीला धक्काबुक्की केली. ती करताना तुम्ही फडणवीसांविरोधी बोलत असल्याचे हे परिणाम असल्याचं ईडीच्या अधिकार्‍यांनी ऐकवल्याचा आरोप उकेंचे वडील शेखर उके यांनी केला आहे. शेखर उके यांनी प्रसार माध्यमांपुढे…

Read More