Author: अनंत पांगारकर

संगमनेर, प्रतिनिधी –  संगमनेर शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या अमली पदार्थ व अंमली द्रव्य कायद्यांतर्गत (NDPS Act) गुन्ह्यातील फरार दोघा आरोपींना पकडण्यात पोलिसांना मोठे यश आले आहे. श्रीरामपूरच्या अपर पोलीस अधीक्षक कार्यालय आणि संगमनेरच्या उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या संयुक्त पथकाने ही धडक कारवाई केली. या घटनेची सविस्तर माहिती अशी की, संगमनेर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे यांना दि. २१ जानेवारी २०२६ रोजी पहाटेच्या सुमारास एक गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीनुसार, अमली पदार्थ विक्रीच्या गुन्ह्यातील फरार आरोपी साद शेख हा सध्या संगमनेर येथील भारतनगर भागात असल्याची खात्री झाली.  मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने तातडीने भारतनगर परिसरात सापळा रचला आणि…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी – तालुक्यातील कोल्हेवाडी परिसरात एका बंद घराचे खिडकीचे गज तोडून अज्ञात चोरट्यांनी ७५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी दत्तात्रय रघुनाथ कोल्हे (वय ७२, रा. ठाणे पच्छिम, मूळ रा. कोल्हेवाडी, संगमनेर) यांचे कोल्हेवाडी येथे घर आहे. दि. १३ जानेवारी ते दि. १८ जानेवारी दरम्यान ही चोरीची घटना घडली. कोल्हे कुटुंबीय घरी नसताना अज्ञात चोरट्याने घराभोवतीच्या तार कंपाउंडची तार तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर चोरट्याने घराच्या बाजूच्या पोर्चमधील खिडकीचे गज कशाच्या तरी साहाय्याने तोडून व वाकवून खिडकीवाटे…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी –  जिल्ह्यातील अवैध वाळू उपसा आणि गौण खनिजाचे विनापरवाना उत्खनन करणाऱ्या टोळ्यांविरुद्ध आता जिल्हा प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. वारंवार अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्या सराईत गुन्हेगारांची गय न करता त्यांच्यावर ‘मोक्का’ (MCOCA) किंवा ‘एमपीडीए’ सारख्या कठोर कायद्यांतर्गत कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी पोलीस व महसूल प्रशासनाला दिले आहेत.  संगमनेर तालुका दौऱ्यादरम्यान आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला तहसीलदार धीरज मांजरे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी आज संगमनेर तालुक्याचा दौरा करून विविध विकासकामांचा आणि प्रशासकीय कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी –  साकूरमधील नाविन्यपूर्ण प्रकल्प आणि ग्रामपंचायतीचे नेटके नियोजन पाहून जिल्हाधिकारी अक्षरशः भारावून गेले होते. यावेळी त्यांनी साकूर ग्रामपंचायतीच्या कामांचे तोंडभरून कौतुक केले आणि साकूरला पुन्हा एकदा भेट देण्यासाठी नक्की येईल, असा शब्दही कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव खेमनर यांना दिला. गावांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्यभर राबविल्या जाणाऱ्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियाना अंतर्गत संगमनेर तालुक्यातील साकूर ग्रामपंचायतीने केलेल्या लोकाभिमुख कामांची अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी गुरुवारी (दि. २२ जानेवारी) प्रत्यक्ष पाहणी केली.  जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी साकूर शिवारातील खंडोबा डोंगराच्या पायथ्याशी ग्रामपंचायतीने विकसित केलेल्या नक्षत्र घनवन उद्यान व तुलसी वृंदावनाची बारकाईने पाहणी केली. विशेषतः महर्षि पराषर व…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी –  संगमनेर शहरातील शाळा आणि महाविद्यालयांच्या १०० यार्ड परिसरात बेकायदेशीरपणे सुरू असलेली तंबाखूजन्य पदार्थ, गुटखा आणि सिगारेटची विक्री तात्काळ बंद करण्यात यावी, या मागणीसाठी राहुल गांधी समर्थक संघाच्या वतीने (Team-RGSS) संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांना निवेदन देण्यात आले. प्रशासनाने तातडीने कारवाई न केल्यास तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. निवेदनात म्हटले आहे की, तंबाखू नियंत्रण कायदा (COTPA) २००३ नुसार शैक्षणिक संस्थेच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर सक्त मनाई असतानाही संगमनेरमध्ये अनेक ठिकाणी शाळांच्या अगदी जवळ पानटपऱ्या आणि दुकानांमधून सर्रास गुटखा व सिगारेट विक्री सुरू आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य व भविष्य धोक्यात येत असून, हा…

Read More

अहिल्यानगर – जिल्ह्यातील अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीविरुद्ध पोलिसांनी मोठी मोहीम उघडली असून, स्थानिक गुन्हे शाखेने मिरजगाव आणि खर्डा पोलीस स्टेशनच्या हद्दीत धडक कारवाई केली आहे. या दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये पोलिसांनी दोन जेसीबी, चार ट्रॅक्टर आणि वाळू असा एकूण ८२ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून अनेक आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना जिल्ह्यातील अवैध वाळू व्यवसायावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग, पोलीस अंमलदार हृदय घोडके, बिरप्पा करमल, श्यामसुंदर जाधव, भाऊसाहेब काळे व अमोल कोतकर यांच्या पथकाने ही…

Read More

मुंबई (वडाळा) – शेतजमीन आणि घराच्या वादातून दोन नातेवाईकांनी एका महिलेला शिवीगाळ करत अंगावर धावून गेल्याची घटना वडाळा येथे घडली आहे. याप्रकरणी वडाळा पोलिसांनी संगमनेर आणि बारागाव नांदूर येथील दोन व्यक्तींविरुद्ध अदखलपात्र गुन्हा (NCR) नोंदवला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला सुमन रामदास वाघमारे आणि आरोपी हे एकमेकांचे नातेवाईक आहेत. त्यांच्यामध्ये मूळ गावी असलेली शेतजमीन आणि मुंबईतील घरावरून गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरू आहे. हा वाद सध्या न्यायालयात प्रलंबित आहे. गुरुवारी (२२ जानेवारी २०२६) सकाळी १० वाजेच्या सुमारास, तक्रारदार महिला त्यांच्या घराशेजारी राहणाऱ्या अजय नावाच्या व्यक्तीच्या घरी गेल्या होत्या. त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या किशोर दादू वाघमारे (वय ४६) आणि कैलास बाबूराव…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी – बोटा येथील स्व. शेखर शेळके यांनी क्रिकेट खेळाप्रती दाखवलेली निष्ठा आणि त्यांचे योगदान आजही पठार भागात स्मरणात आहे. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद सदस्य जनार्दन आहेर यांनी ‘स्व. शेखर शेळके चषक २०२६’ आयोजित करून त्यांच्या कार्याचा खऱ्या अर्थाने गौरव केला असल्याचे गौरवोद्गार आमदार अमोल खताळ यांनी काढले. घारगाव येथे स्व. म्हातारबा लक्ष्मण आहेर प्रतिष्ठान संचलित धर्मवीर छत्रपती क्रिकेट क्लबच्या वतीने या भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचा शुभारंभ आमदार अमोल खताळ आणि स्व. शेखर शेळके यांच्या मातोश्री नंदा शेळके यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी शिवसेना तालुका प्रमुख…

Read More

दैनिक राशीभविष्य:  मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहाचा राहील. कामाच्या ठिकाणी तुमच्या कतृत्वाची प्रशंसा होईल आणि प्रलंबित कामे मार्गी लागतील. आर्थिक आघाडीवर काही सकारात्मक घडामोडी घडतील, ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. जोडीदारासोबतचे संबंध मधुर राहतील, मात्र आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. वृषभ – आज तुम्हाला खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. अनावश्यक गोष्टींवर पैसा खर्च होण्याची शक्यता आहे. नोकरीमध्ये कामाचा ताण वाढू शकतो, त्यामुळे संयमाने काम घेणे हिताचे ठरेल. कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधताना शब्द जपून वापरा. शक्य असल्यास आज कोणताही मोठा आर्थिक निर्णय घेऊ नका. मिथुन – आजचा दिवस तुमच्यासाठी प्रगतीकारक आहे. मित्रांच्या सहकार्याने एखादे अवघड काम सहज पूर्ण होईल. व्यापारात…

Read More

संगमनेर | अनंत पांगारकर –  संगमनेर तालुक्यातील सुमारे १० हजार कामगारांसाठी संजीवनी ठरणारा ‘ESIC’ (राज्य विमा प्रतिष्ठान) सेवा दवाखाना मंजूर झाला असून, या निर्णयावरून आता तालुक्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. नाशिक क्षेत्रीय कार्यालयाने ४ जून २०२५ रोजी काढलेल्या या आदेशाचे श्रेय घेण्यासाठी महायुतीचे आमदार अमोल खताळ आणि नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांच्यात जबरदस्त चढाओढ पाहायला मिळत आहे. दोन्ही नेत्यांनी हा दवाखाना आपल्याच पाठपुराव्यामुळे मंजूर झाल्याचा दावा केल्याने नक्की कामाचा धनी कोण? असा प्रश्न आता सर्वसामान्यांना पडला असून ज्या दिवशी दवाखाना कृतीत येईल तो संगमनेरकरांसाठी सुदिन असेल. आमदार अमोल खताळ यांनी या यशाचे श्रेय महायुती सरकार आणि पालकमंत्री राधाकृष्ण…

Read More