Author: अनंत पांगारकर
अहिल्यानगर – अहिल्यानगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेला आज बनावट ओळखपत्रांच्या एका मोठ्या प्रकरणाने गालबोट लागले. प्रभाग क्रमांक ३ मधील आनंद विद्यालय मतदान केंद्र परिसरात बनावट निवडणूक ओळखपत्रे आणि आधार कार्डांचा मोठा साठा बाळगणाऱ्या दोन संशयितांना पोलिसांनी रंगेहात पकडले. या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून प्रशासनाने या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आनंद विद्यालय केंद्रावर मतदान सुरू असताना दोन व्यक्तींच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. काही उमेदवारांनी आणि त्यांच्या प्रतिनिधींनी सतर्कता दाखवत या व्यक्तींची झडती घेतली असता, त्यांच्याकडे वेगवेगळ्या नावांची शेकडो बनावट निवडणूक ओळखपत्रे आणि आधार कार्ड आढळून आली. एकाच व्यक्तीकडे इतक्या मोठ्या प्रमाणात ओळखपत्रे सापडल्याने उपस्थित…
संगमनेर, प्रतिनिधी – संगमनेर तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत भरदिवसा चोरीची एक धक्कादायक घटना घडली आहे. निमगावजाळी ते संगमनेर रस्त्यावरील वडगावपान फाटा येथे दोन अज्ञात चोरट्यांनी एका ६१ वर्षीय महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने ओरबडून नेले. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. जिजाबाई बाळासाहेब सातपुते (वय ६१, रा. पावबाकी रोड, संगमनेर) या १४ जानेवारी २०२६ रोजी दुपारी ३:३० वाजेच्या सुमारास आपल्या मोपेड गाडीवरून प्रवास करत होत्या. त्या वडगावपान फाट्याजवळ आल्या असता, एका मोटारसायकलवरून दोन अज्ञात इसम तिथे आले. मोटारसायकलवर पाठीमागे बसलेल्या चोरट्याने जिजाबाई यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने अत्यंत वेगाने ओरबडले आणि दोघेही आरोपी तिथून पसार झाले. या चोरीमध्ये एकूण…
संगमनेर: आपसातील सर्व हेवेदावे, मतभेद आणि मनभेद आता कायमचे बाजूला ठेवा. आता वेळ आली आहे ती फक्त भगव्यासाठी आणि शिवसेनेसाठी मैदानात उतरण्याची! आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी होणारे फेरबदल पक्षासाठी फायदेशीर ठरणार असून, त्या जोरावर सत्तेवर भगवा झेंडा निश्चितपणे रोवला जाईल, असा जोरदार विश्वास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उत्तर नगर जिल्हाप्रमुख सचिन कोते यांनी व्यक्त केला. संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी येथे आयोजित शिवसैनिकांच्या मेळाव्यात ते बोलत होते. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने संगमनेर तालुक्यात आपला आक्रमक पवित्रा स्पष्ट केला आहे. माजी उपजिल्हाप्रमुख रावसाहेब गुंजाळ यांच्या निवासस्थानी पार पडलेल्या या महत्त्वपूर्ण बैठकीत शिवसैनिकांचा मोठा उत्साह पाहायला मिळाला.…
मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहाचा आणि ऊर्जेने भरलेला असेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कतृत्वाचे कौतुक होईल आणि नवीन जबाबदारी तुमच्या खांद्यावर येऊ शकते. जोडीदारासोबतचे जुने मतभेद मिटून संबंधांमध्ये सुधारणा होईल, मात्र आरोग्याच्या बाबतीत थोडे सावध राहा, विशेषतः डोळ्यांच्या तक्रारी जाणवण्याची शक्यता आहे. वृषभ – आर्थिक दृष्टिकोनातून आजचा दिवस फायदेशीर ठरेल आणि जुनी रखडलेली येणी वसूल होतील. कुटुंबात आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण राहील, ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. तरीही, रागावर आणि बोलण्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे, कारण तुमच्या शब्दांमुळे विनाकारण वाद निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मिथुन – आज तुम्हाला करिअरमध्ये नवीन आणि चांगल्या संधी प्राप्त होतील. तुमची बऱ्याच…
नाशिक-पुणे महामार्गावर चंदनापुरी घाटात चाकूचा धाक दाखवून लूटमार; दोन अज्ञात इसमांविरुद्ध गुन्हा दाखल
संगमनेर, प्रतिनिधी – नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील चंदनापुरी घाटात प्रवाशांना गाठून लुटण्याची घटना घडली असून, एका शेतकऱ्याला चाकूचा धाक दाखवून ३० हजार रुपयांचा मुद्देमाल लांबवल्याचे समोर आले आहे. महामार्गावर मध्यरात्रीच्या सुमारास ही लूटमार झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात दोन अज्ञात इसमांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०९ (४), (६) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपळगाव देपा (ता. संगमनेर) येथील शेतकरी नितीन बाळासाहेब फटांगरे (वय ४६) हे १४ जानेवारी २०२६ रोजी रात्री १:३० वाजेच्या सुमारास नाशिक ते पुणे महामार्गावरून जात असताना ही घटना घडली. चंदनापुरी घाटातील खिंडीच्या वळणाजवळ पाठीमागून विना क्रमांकाच्या काळ्या रंगाच्या होंडा युनिकॉन मोटारसायकलवरून दोन…
संगमनेर, प्रतिनिधी – संगमनेर तालुक्यातील खळी येथे शेतीच्या वादातून एका कुटुंबाने दुसऱ्याच्या उभ्या मका पिकात ट्रॅक्टर घालून पिकाचे मोठे नुकसान केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी आश्वी पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी किशोर दादू वाघमारे (रा. खळी) यांचे त्यांच्याच कुटुंबातील काही सदस्यांशी शेतीच्या वाटणीवरून गेल्या काही काळापासून न्यायालयात वाद सुरू आहेत. ९ जानेवारी २०२६ रोजी किशोर वाघमारे हे त्यांच्या आजारी आईला भेटण्यासाठी लोणी येथील रुग्णालयात गेले होते. हीच संधी साधून आरोपींनी मुंबईहून थेट खळी येथे येत शेत गट क्र. १५ व १६ मध्ये ट्रॅक्टर चालवून उभ्या मका पिकाची नांगरणी केली. पिकाचे नुकसान होत असल्याचे पाहून…
संगमनेर | अनंत पांगारकर प्रशासकीय राजवटीच्या प्रदीर्घ काळानंतर संगमनेर नगरपरिषदेचे राजकारण पुन्हा एकदा लोकशाहीच्या मुख्य प्रवाहात परतले आहे. तब्बल चार-साडेचार वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर पालिकेच्या ऐतिहासिक रामकृष्ण सभागृहाचे दरवाजे नवनिर्वाचित सदस्यांसाठी उघडण्यात आले. निमित्त होते उपनगराध्यक्ष आणि स्वीकृत सदस्यांच्या निवडीचे. या निवडीच्या निमित्ताने अनुभवी नगरसेवकांसह अनेक नवीन चेहऱ्यांनी प्रथमच सभागृहात पाऊल ठेवले, तर नवनिर्वाचित नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांची देखील या सभागृहात पहिलीच ‘एन्ट्री’ झाली. नगराध्यक्षांच्या आसनावर विराजमान होत तांबे यांनी नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष आणि स्वीकृत नगरसेवकांची निवड करत पहिलीच विशेष सभा यशस्वीपणे पार पाडली. तत्कालीन नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांच्यासह सर्व सदस्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर पालिकेवर प्रशासकाची नियुक्ती झाली होती. या साडेचार वर्षांच्या…
संगमनेर, प्रतिनिधी- येथील प्रतिष्ठित व्यापारी शैलेश पारख यांची कन्या कुमारी हर्षा पारख हिने संसारातील भौतिक सुखांचा त्याग करून संयम, तप आणि साधनेचा मार्ग स्वीकारण्याचा दृढ निर्णय घेतला आहे. येत्या २५ जानेवारी २०२६ रोजी संगमनेर येथे तिचा भव्य व ऐतिहासिक जैन भागवती दीक्षा महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे. या पावन प्रसंगी जैन श्रमण संघाचे अर्हम विज्जा प्रणेते उपाध्याय प्रवर प्रवीण ऋषी महाराज हे चतुर्विध संघाच्या साक्षीने हर्षा पारख यांना भागवती दीक्षा प्रदान करणार आहेत. या सोहळ्यासाठी जैन धर्मातील प्रख्यात संत वाणीचे जादूगर रमणिक मुनीजी महाराज, मधुर कंठी तीर्थेश ऋषीजी महाराज, सरलमना अचल ऋषीजी महाराज आणि कैवल्यधाम प्रेरक कैवल्य रत्नाश्री महाराज…
संगमनेर | प्रतिनिधी संगमनेर शहराच्या विकासाचा नवा रोडमॅप असलेल्या ‘संगमनेर २.०’ या जाहीरनाम्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आता प्रशासकीय स्तरावर वेगाने हालचाली सुरू झाल्या आहेत. या संकल्पनेला प्रत्यक्ष कृतीची जोड देण्यासाठी मंगळवारी संगमनेर नगरपरिषद कार्यालयात आमदार सत्यजित तांबे आणि नूतन नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांच्या उपस्थितीत सर्व विभाग प्रमुखांची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीच्या माध्यमातून आमदार तांबे यांनी थेट ‘ॲक्शन मोड’मध्ये येत आगामी १०० दिवसांतील कामांचे नियोजन करण्यासोबतच प्रशासनाला कामाचा दर्जा आणि पारदर्शकता राखण्याचे कडक निर्देश दिले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या बैठकीत आमदार सत्यजित तांबे यांनी ‘संगमनेर २.०’ मधील आश्वासनांची पूर्तता करण्यावर विशेष भर दिला. प्रत्येक विभागाने आपल्या जबाबदारीच्या क्षेत्रात…
संगमनेर, प्रतिनिधी – सभागृहात प्रशासनाला प्रश्न विचारणे किंवा राजकीय चर्चा होणे स्वाभाविक असले, तरी सर्वांचे अंतिम ध्येय हे संगमनेरचा विकास हेच असले पाहिजे, राजकारण हे केवळ निवडणुकीपुरते मर्यादित असावे आणि सभागृहाच्या आत शिरताना ते उंबरठ्यावरच सोडून केवळ शहराच्या विकासासाठी एकत्र यावे, असे आवाहन नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार आणि संगमनेर सेवा समितीचे प्रमुख आमदार सत्यजित तांबे यांनी केले. संगमनेर नगरपरिषदेच्या निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळाल्यानंतर, नवनिर्वाचित नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांची पहिली विशेष सभा पालिकेच्या ऐतिहासिक रामकृष्ण सभागृहात उत्साहात पार पडली. यावेळी आमदार सत्यजित तांबे यांनी नवनियुक्त नगरसेवकांना मार्गदर्शन करताना अत्यंत मोलाचा सल्ला दिला. आमदार तांबे यांनी नगरसेवकांना सुरुवातीलाच संगमनेर नगरपालिकेच्या प्रदीर्घ आणि गौरवशाली…
