Author: अनंत पांगारकर

संगमनेर – संगमनेरचे तत्कालीन नायब तहसीलदार दत्ता जाधव आणि तलाठी पोमल तोरणे यांच्यावर हल्ला करून ट्रॅक्टर अंगावर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपातून येथील जिल्हा व सत्र न्यायाधीशांनी तिघा आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. या खटलाकडे संगमनेरकरांचे लक्ष लागले होते. मुमताज हसन शेख, आयुब हसन शेख व लतीफ हसन शेख असे न्यायालयाने मुक्तता केलेल्या आरोपींची नावे आहे. ०८ ऑगस्ट २०१५ रोजी सकाळी सुमारे साडेनऊ ते दहा वाजण्याच्या दरम्यान ही घडली होती. याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजि. नं. १८५/२०१५ नुसार आरोपींविरुद्ध भा.दं.वि. कलम ३०७, ३९४, ३५३, ३३२, ५०४, ५०६ सह ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन पोलीस…

Read More

संगमनेर-  संगमनेर शहर पोलिसांनी मध्यरात्री एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश करत सुमारे आठ लाख रुपये किमतीचा ३२.८४५ किलोग्रॅम वजनाचा सुका गांजा जप्त केला आहे. या प्रकरणी चार आरोपींना पोलिसांनी तत्काळ अटक केली आहे. सातत्याने दोन दिवसात गांजा संदर्भात कारवाई झाल्याने शहरातील अवैध व्यवसायाचे मोठे नेटवर्क समोर येत आहे. या नेटवर्कच्या मुळापर्यंत जाण्याचे आव्हान संगमनेर पोलिसांसमोर उभे राहिले आहे. संगमनेर शहरात अवैध अंमली पदार्थांच्या तस्करीविरोधात स्थानिक पोलिसांनी केलेली ही महत्त्वाची आणि धडक कारवाई मानली जात आहे.  गुरुवारी नाशिकच्या नार्कोटिक विभागाच्या अधिकाऱ्यांनी शहरालगत असणाऱ्या सुकेवाडीमध्ये अशाच प्रकारे मध्यरात्रीपासून छापेमारी करत मोठी कारवाई केली होती. या कारवाईमध्ये सव्वा कोटी रुपयांचा ४५६ किलो गांजा जप्त…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी-  संगमनेर आगारात शिवनेरी आणि विनावाहक बसगाड्यांना थांबा देण्याबाबत राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सकारात्मक प्रतिसाद देत, संबंधित विभागाला त्वरित निर्देश दिले आहेत. आमदार अमोल खताळ यांच्या विशेष प्रयत्नांमुळे अनेक वर्षांपासून प्रवाशांची होणारी मोठी गैरसोय आणि पायपीट आता थांबणार आहे. आमदार अमोल खताळ यांच्या जनसंपर्क कार्यालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, संगमनेर शहरातून नोकरी, शिक्षण आणि वैद्यकीय कामांसाठी पुणे व नाशिक यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये नियमित ये-जा करणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. मात्र, शिवनेरी आणि विनावाहक बसगाड्या संगमनेर शहरात प्रवेश न करता थेट बाह्यवळण मार्गाने पुढे जात होत्या. त्यामुळे संगमनेरला येणाऱ्या प्रवाशांना शहराच्या बाहेर उतरावे लागत होते आणि तिथून त्यांना मोठा…

Read More

संगमनेर –  संगमनेर शहरालगत असलेल्या सुकेवाडी परिसरात नाशिक नार्कोटिक्स विभागाने स्थानिक पोलिसांना सोबत घेत एक मोठी आणि धडाकेबाज कारवाई करत तब्बल सव्वा कोटी रुपये किमतीचा ४५६ किलो गांजा जप्त केला आहे. या कारवाईमुळे संगमनेरमधील अंमली पदार्थांच्या रॅकेटचा पर्दाफाश झाला असला तरी, स्थानिक पोलिसांच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. कारवाईनंतर मुख्य आरोपी तुषार उत्तम पडवळ उर्फ दमल्या (रा. सुकेवाडी, ता. संगमनेर) हा फरार झाला आहे. नाशिक येथील नार्कोटिक्स डिपार्टमेंटचे पोलीस उपअधिक्षक गुलाबराव पाटील यांना सुकेवाडी गावात अमली पदार्थांची विक्री होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारावर उपअधिक्षक पाटील यांनी तातडीने एक पथक तयार करून सुकेवाडी येथे धाड टाकली.…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी –  संगमनेर नगर परिषदेच्या 15 प्रभागांमधील 30 जागांसाठी जाहीर झालेल्या निवडणुकीतील प्रभाग 1 ब, 2 ब, 15 ब या उर्वरित तीन जागांसाठीचे निवडणूक चित्र बुधवारी संध्याकाळी अखेर स्पष्ट झाले आहे. न्यायालयीन प्रक्रियेमुळे लांबलेल्या या जागांसाठी आता शनिवारी, 20 डिसेंबरला मतदान होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवसापर्यंत तीन उमेदवारांनी माघार घेतल्याने लढतींचे स्वरूप निश्चित झाले आहे. यात प्रभाग 1 ब मधून लोंढे संकेत सुभाष, तर प्रभाग 15 ब मधून शेख रेहाना सिराजोद्दीन आणि सईदा गफ्फार शेख यांनी अर्ज मागे घेतले आहेत. प्रभाग 2 ब मधून मात्र कोणीही माघार घेतली नाही. माघारीनंतर उर्वरित तीन जागांवर खालीलप्रमाणे लढती होणार…

Read More

संगमनेर – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात व माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेरमध्ये क्रीडा संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी जयहिंद लोक चळवळ व क्रिकेट असोसिएशन ऑफ संगमनेर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येणाऱ्या सहकारमहर्षी टी-२० राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेचे २६ वे पर्व लवकरच सुरू होत आहे. माजी आमदार डॉ. तांबे आणि आमदार सत्यजीत तांबे यांच्या पुढाकाराने ही स्पर्धा १ जानेवारी २०२६ ते १७ जानेवारी २०२६ या कालावधीत सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुलात आयोजित करण्यात आली आहे. आमदार सत्यजीत तांबे यांनी या राज्यस्तरीय स्पर्धेची अधिक माहिती दिली. राज्यातील अत्यंत प्रतिष्ठेची आणि नावाजलेली क्रिकेट स्पर्धा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – नागपूर संगमनेर विधानसभा मतदारसंघातील आरोग्य सुविधांचा विकास आणि प्रलंबित प्रकल्पांना तातडीने चालना देण्यासाठी राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. आमदार अमोल खताळ यांच्या मागणीनुसार, १०० खाटांचे महिला व बाल रुग्णालय, घुलेवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे बांधकाम आणि कामगार रुग्णालय उभारणीच्या कामांना गती देण्याचे स्पष्ट निर्देश आरोग्यमंत्र्यांनी नागपूर येथे झालेल्या बैठकीत अधिकाऱ्यांना दिले. नागपूर विधान भवनातील जुने कामकाज समिती कक्षामध्ये आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि आमदार अमोल खताळ यांच्या प्रमुख उपस्थितीत संगमनेरच्या आरोग्य सुविधांसंदर्भात बैठक पार पडली. यावेळी बैठकीसाठी राज्याचे आरोग्यसंचालक डॉ.नितीन अंबाडेकर सहसंचालक डॉ. विजय कंदेवाड डॉ. सुनीता गोल्हाईत, जिल्हा डॉ. संजय घोगरे…

Read More

संगमनेर/नागपूर –  संगमनेर बुद्रुक येथील सर्वे नं. १०६(४४२) मधील इंदिरानगर परिसरातील रहिवाशांच्या ४० ते ५० वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मालकी हक्काचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. महसूल अभिलेखात मणियार कुटुंबाची मालकी असतानाही प्रत्यक्ष ताब्यात असलेल्या या जमिनीच्या नोंदी रहिवाशांच्या नावे करण्यासाठी आमदार सत्यजित तांबे यांच्या सातत्याच्या पाठपुराव्याला यश आले आहे. दरम्यान यासंदर्भात दिरंगाई करणाऱ्या सब रजिस्ट्रारची बदली करून चौकशी केली जाणार असल्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात केली. या किचकट कायदेशीर प्रक्रियेत निर्माण झालेले अडथळे दूर करण्यासाठी आमदार तांबे यांनी थेट मणियार कुटुंबीयांशी संपर्क साधून त्यांची नावे कमी करून रहिवाशांना ‘कन्फरमेशन डीड’ करून देण्याची विनंती केली होती. मणियार कुटुंबीयांनी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन जमिनीच्या फेरफार नोंदीचा निकाल बाजूने लावण्यासाठी तब्बल १० लाख रुपयांची लाच मागणाऱ्या सिन्नर येथील नायब तहसीलदार संजय धनगर याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ पकडले आहे.  तक्रारदाराकडून तडजोडीअंती अडीच लाख रुपये स्वीकारताना एसीबीच्या पथकाने ही कारवाई केली आहे. नाशिक जिल्ह्यातील या घटनेमुळे महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे. तक्रारदार यांची सिन्नर तालुक्यातील दोडी शिवारात जमीन आहे. या जमिनीच्या फेरफार नोंदीचा निकाल त्यांच्या बाजूने लावण्यासाठी नायब तहसीलदार संजय धनगर याने त्यांच्याकडे सुरुवातीला १० लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराने लाच देण्याची इच्छा नसल्याने याबाबत एसीबीकडे तक्रार केली. तक्रारीची शहानिशा केल्यानंतर एसीबीच्या पथकाने सापळा रचला. वाटाघाटीनंतर लाचेची…

Read More

अहिल्यानगर – घारगांव (ता. संगमनेर) येथील मुळा नदीच्या पुलावरून फेकून दिलेल्या तीन महिने वय असलेल्या शिवांश उर्फ देवांश प्रकाश जाधव या बालकाचे खुनी अखेर जेरबंद झाले आहे. अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या सखोल तपासामध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे. शिवांशचे आई-वडील आणि अन्य एका व्यक्तीनेच त्याचा खून करून प्रेताची विल्हेवाट लावल्याचे निष्पन्न झाले आहे. ४ डिसेंबर रोजी सकाळी ०९.१६ वाजता आंबीखालसा येथील रहिवासी अशोक धोंडीराम माळी यांना मुळा नदीच्या पुलाखाली काटेरी झुडुपामध्ये अंदाजे ०३ ते ०४ महिन्यांच्या बालकाचा मृतदेह दिसला. या घटनेनंतर घारगांव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू रजि. नंबर ७४/२०२५, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १९४ प्रमाणे अकस्मात…

Read More