Author: अनंत पांगारकर
संगमनेर, दि. ४ एप्रिल – जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि संगमनेर मर्चंट सहकारी बँकेवर सेवक संचालकपदाची नियुक्ती ३० दिवसांत कायदेशीर प्रक्रियेनुसार पूर्ण करण्याचे आदेश उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. जिल्हा बँक कर्मचारी संघटनेचे कार्यकारी अध्यक्ष आणि याचिकाकर्ते धनंजय भंडारे यांनी या संदर्भात माहिती दिली. उच्च न्यायालयाने नाशिक विभागाच्या सहकार खात्याच्या सहनिबंधकांना हे आदेश दिले आहेत. संघटनेने जिल्हा सहकारी बँकेवर विद्या अजय तन्वर आणि श्रीमंत घुले यांची, तर संगमनेर मर्चंट सहकारी बँकेवर वाघोबा शेलार आणि तुकाराम सांगळे यांची सेवक संचालक म्हणून नियुक्ती केली होती. मात्र, संबंधित बँकांनी ही नियुक्ती स्वीकारण्यास टाळाटाळ केली होती. या विरोधात संघटनेने प्रथम नाशिक विभागीय सहनिबंधकांकडे…
संगमनेर, दि. ४ एप्रिल – राज्याच्या आजी-माजी महसूलमंत्र्यांच्या अधिपत्याखाली असलेल्या साखर कारखान्यांची पंचवार्षिक निवडणूक पुढील महिन्यात होत आहे. कारखान्यावरील आपले वर्चस्व कायम राखण्यासाठी आजी माजी मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. संगमनेरच्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्यासाठी दुसऱ्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नसल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी शैलेश हिंगे यांनी दिले आहे. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आतापर्यंतच्या दोन दिवसात केवळ माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा एकमेव उमेदवारी अर्ज साकुर, जोर्वे आणि सोसायटी मतदारसंघातून दाखल झाला आहे. राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी आमदार अमोल खताळ यांच्या नेतृत्वाखाली…
नांदेड, दि. ४ एप्रिल – नांदेड जिल्ह्यातील आलेगाव शिवारात शुक्रवारी (दि. ४) पहाटे भीषण अपघात झाला. हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील गुंज गावातील महिलांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत कोसळला. या दुर्घटनेत आठ महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृतांमध्ये चित्राबाई माधव पारदे, सिमरन संतोष कांबळे, सपना राजू राऊत (२५), ज्योती इरबाजी सरोदे (३५), सरस्वती लखन बुरड (२५), ताराबाई सटवा जाधव (४०), धुरपता सटवा जाधव (१८) यांचा समावेश आहे. पार्वतीबाई बुरड (३५), पुरभाबाई कांबळे (४०) आणि सटवाजी जाधव (५५) यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. गुंज येथील १० महिला व एक पुरुष आलेगाव शिवारात दगडू शिंदे यांच्या शेतात हळद काढण्यासाठी ट्रॅक्टरने निघाले होते. आलेगाव शिवारात…
नवी दिल्ली, दि. ४ एप्रिल – वक्फ मालमत्तांचे व्यवस्थापन सुधारण्याच्या उद्देशाने मांडलेले वक्फ (सुधारणा) विधेयक २०२५ राज्यसभेत मंजूर झाले आहे. बारा तासांपेक्षा जास्त काळ चाललेल्या प्रदीर्घ चर्चेनंतर, या विधेयकाच्या बाजूने १२८ मते पडली, तर ९५ सदस्यांनी याला विरोध केला. यापूर्वी, लोकसभेत हे विधेयक २८८ मतांनी मंजूर झाले होते. दोन्ही सभागृहांमध्ये मंजूर झाल्यामुळे, आता राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर या विधेयकाचे कायद्यात रूपांतर होईल. हे विधेयक अब्जावधी रुपयांच्या वक्फ मालमत्तांच्या व्यवस्थापनात अधिक पारदर्शकता आणेल, असा सरकारचा दावा आहे. वक्फ मालमत्तांचा गैरवापर रोखण्यासाठी आणि मुस्लिम समुदायाच्या हिताचे रक्षण करण्यासाठी हे विधेयक आवश्यक असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. तथापि, विरोधी पक्षांनी या विधेयकावर चिंता व्यक्त केली आहे. या…
सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती जाहीर करणार आपली मालमत्ता, निम्न न्यायमूर्तीसाठीही लागू होणार नियम
विशेष प्रतिनिधी / मुंबई देशाच्या न्यायव्यवस्थेत अधिक पारदर्शकता आणण्यासाठी, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांच्या मालमत्तेची घोषणा सार्वजनिक करण्याचा निर्णय घेतला आहे. काही दिवसांपूर्वी एका न्यायाधीशाच्या घरी आग लागल्यानंतर मोठी रोख रक्कम सापडली होती. त्यानंतर या न्यायाधीशाची बदली करण्यात आली होती. आता सर्वोच्च न्यायालयानं या प्रकारचा निर्णय घेतल्यानं इतरही न्यायालयांच्या न्यायाधीशांच्या संदर्भात असाच निर्णय होण्याची अपेक्षा आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या पूर्ण न्याय वृंदाच्या बैठकीत, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी त्यांच्या मालमत्तेची घोषणा करण्याचा निर्णय घेतला. मालमत्तेची ही माहिती न्यायालयाच्या वेबसाइटवर अपलोड कारण्याचंही ठरवण्यात आलं. १ एप्रिल रोजी झालेल्या पूर्ण न्यायालयाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या वेबसाइटवर…
संगमनेर, दि. ३ एप्रिल – प्रतिनिधी बुधवारी संगमनेर तालुक्यात अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर आमदार अमोल खताळ यांनी तातडीने नुकसानग्रस्त भागाचा दौरा केला. त्यांनी सावरगाव तळ, धांदरफळ, मिर्झापूर, नांदुरी दुमाला, कौठे धांदरफळ, नांदूर खंदरमाळ आणि जांबुत या गावांना भेट देऊन नुकसानीचा आढावा घेतला. कौठे धांदरफळ येथे वीज पडून दोन गाई दगावल्या होत्या, या ठिकाणी आमदार खताळ यांनी भेट देऊन पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामा करण्याचे आदेश दिले. तसेच, शासनाकडून आवश्यक मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले. नांदुरी दुमाला येथे जिल्हा परिषद शाळेची संरक्षक भिंत कोसळली होती. या ठिकाणाचीही त्यांनी पाहणी केली. या दौऱ्यात आमदार खताळ यांनी कांदा, द्राक्ष, डाळिंब,…
राहाता, दि. ३ एप्रिल – वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने खाजगी संस्थांनाही सदस्यत्व देण्यास सुरुवात केल्यामुळे, ही संस्था आता राजकीय अड्डा बनत असल्याचे राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे. या संस्थेने सहकारी संस्थांना बळकट करण्याचे धोरण अवलंबायला हवे होते, परंतु तसे झाले नाही. राज्यातील सहकारी चळवळीसमोर अनेक प्रश्न आहेत, परंतु ते सोडवण्यासाठी कोणीही पुढे आलेले नाही, असेही त्यांनी सांगितले. शरद पवारांचे नाव न घेता, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी टीका केली की, ‘जाणते राजे’ देखील दिल्लीत केवळ शिष्टमंडळ घेऊन जातात. सहकारी संस्थांचे प्रश्न न सुटल्यामुळे अनेक संस्था बंद पडल्या आहेत. कारखान्यांचे खाजगीकरण झाले आणि ते कवडीमोल भावाने विकले गेले. सहकारी संस्थांना…
संगमनेर, दि. ३ एप्रिल – प्रतिनिधी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी कारखान्याचे मुख्य मार्गदर्शक असलेले राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. थोरात यांनी गुरुवारी अनुक्रमे जोर्वे, साकुर आणि उत्पादक सहकारी संस्था, बिगर उत्पादक संस्था व पणन संस्था या तीन गटातून उमेदवारी अर्ज दाखल केले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा संगमनेरचे प्रांताधिकारी शैलेश हिंगे यांनी दिली आहे. पहिल्याच दिवशी माजी मंत्री थोरात यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने कारखाना निवडणुकीने पहिल्याच दिवशी वेग पकडला आहे. विरोधकांनी कारखाना निवडणुकीसाठी उमेदवार देण्याची तयारी सुरू केली असून यावेळी निवडणूक रंगण्याची…
नवी दिल्ली, दि. ३ एप्रिल – नुकताच मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा प्रस्ताव लोकसभेत मंजूर झाला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी हा प्रस्ताव लोकसभेत मांडला. विरोधकांनी या विषयावर त्यांची मते मांडली, आणि अमित शाह यांनी त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. लोकसभेत झालेल्या चर्चेनंतर, आवाजी मतदानाने हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. या चर्चेदरम्यान, विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि खासदार प्रियांका गांधी वाड्रा यांच्यासह अनेक विरोधी खासदार अनुपस्थित होते. काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी चर्चेची सुरुवात केली आणि मणिपूरमध्ये कायदा आणि सुव्यवस्था प्रस्थापित करण्याची मागणी केली. त्यांनी पंतप्रधान मोदींनी एकदा मणिपूरला भेट द्यावी, अशीही मागणी केली. अमित शाह यांनी विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर…
संगमनेर, दि. ३ एप्रिल – प्रतिनिधी काल (बुधवारी २ एप्रिल) संगमनेर तालुक्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. कौठे धांदरफळ येथील निवृत्ती रखमा घुले यांच्या दोन गाई वीज पडून मृत पावल्या. या घटनेमुळे घुले कुटुंबाचे मोठे नुकसान झाले आहे. संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्ष कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्री थोरात यांनी आज तातडीने घुले कुटुंबीयांची भेट घेऊन याबद्दल दुःख व्यक्त केले. यावेळी ज्येष्ठ नेते पांडुरंग घुले, प्राजक्ता घुले आणि शासकीय अधिकारी उपस्थित होते. डॉ. जयश्री थोरात यांनी दु:ख व्यक्त करत, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची मागणी केली. डॉ. थोरात म्हणाल्या, “शेतकरी खूप कष्टाने पिके घेतात. संगमनेर तालुक्यात मोठ्या प्रमाणात पशुधन आहे. दुधाचा…
