Author: Annant Ppangarkar

सोमवार ९ डिसेंबर – अहिल्यानगर गेल्या काही दिवसांपासून संगमनेरमध्ये धूम स्टाईलने दुचाकीवरून येत महिलांच्या गळ्यातील दागिने ओरबाडून पळविण्याचे प्रकार सर्रासपणे सुरू आहे. दागिने पळविणाऱ्या अशाच एका टोळीला पकडण्यात अहिल्यानगर गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले असून पथकाने टोळीतील चार जणांना अटक केली. तर दोघे अद्याप फरार आहेत. या टोळीकडून संगमनेरमधील आठ आणि लोणी मधील एका गुन्ह्याची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. हे आहेत आरोपी – पोलिसांनी अटक केलेल्या आरोपी मध्ये मयूर संजय ब्राह्मणे (वय २२, रा. चर्चजवळ, वेताळबाबा चौक, लोणी, ता. राहता जि. अहिल्यानगर), निखिल सुरेश भुजबळ (वय २०, रा. गिरीम, ता. दौंड, जि. पुणे, हल्ली रा. भाने वस्ती, हसनापूर…

Read More

सोमवार, ०९ डिसेंबर – संगमनेर सात वर्षांपासून फरार असलेल्या एका गंभीर गुन्ह्यातील आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांचा पाठलाग सुरू असताना रात्रीच्या वेळी अंधाराचा अंदाज न आल्याने पोलीस पथकातील एक पोलीस कर्मचारी व आरोपी विहिरीत पडल्याची घटना शुक्रवारी रात्री संगमनेर तालुक्यातील सांगवी गावामध्ये घडली. काय होती घटना – याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, जुन्या वादाच्या कारणावरून तालुक्यामध्ये २०१६ साली हाणामारी झाल्याची एक घटना घडली होती. या घटनेतील आरोपीने आपल्या मामा आणि मामीला जमिनीच्या वादातून बेदम मारहाण केली होती. त्यामुळे सदर आरोपीविरुद्ध पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला होता. फरार गुन्हेगाराचा पोलिसांना मिळाला माग – गुन्हा दाखल झाल्यानंतर अटकेच्या भीतीने या आरोपीने पलायन केले होते.…

Read More

रविवार, ०८ डिसेंबर – मुंबई विधानसभा अध्यक्षपदासाठी महायुतीकडून भाजप नेते, आमदार राहुल नार्वेकर यांनी रविवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. नार्वेकर यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड होणार आहे. या निवडीची औपचारिकता बाकी आहे. यांच्या उपस्थितीत भरला अर्ज – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार, चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत राहुल नार्वेकर यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा आज अर्ज दाखल केला आहे. निवड निश्चित – विधानसभा अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करण्याची आज (८ डिसेंबर ) दुपारी १२ वाजेपर्यंतची मुदत होती. त्यानुसार राहुल नार्वेकर यांनी अर्ज दाखल केला. परंतु, यावेळेत राहुल नार्वेकर यांच्या व्यतिरिक्त अन्य कोणीही अध्यक्षपदाचा…

Read More

रविवार, ०८ डिसेंबर – नाशिक बस स्थानकात उभ्या असलेल्या ईबस चालकाने बस सुरू करताच क्षणार्धात बसने उसळी घेत समोरील लोखंडी बार तोडत बस थेट स्थानकाच्या भिंतीवर आदळल्याने झालेल्या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला तर अन्य एक जण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गुन्हा दाखल – शनिवारी रात्री अपघाताची ही दुर्दैवी घटना मुंबई नाका परिसरातील महामार्ग बस स्थानकात घडली असून यासंदर्भात बसचालका विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्याला ताब्यात घेतले आहे. अशी आहेत नावे – अपघातात आंध्रप्रदेशची महिला बसखाली सापडून जागीच ठार झाली. अंजली थट्टीकोंडा – नागार्जुन (२३, रा. पटछवा, जि. प्रकाशम, आंध्रप्रदेश) असे मृत्यूमुखी…

Read More

रविवार, ०८ डिसेंबर – नवी दिल्ली मोदी सरकार जीएसटीमध्ये नवीन कर टप्पा तयार करण्याच्या तयारीत असून यामध्ये जनतेसाठी जीवनावश्यक ठरलेल्या वस्तूंवरील जीएसटी करामध्ये वाढ करण्याची योजना आखली जात आहे. तर उद्योगपतींना सूट दिली जात आहे या पार्श्वभूमीवर सरकारच्या नवीन कर धोरणावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी प्रश्न उपस्थित केले आहे. राहुल गांधी म्हणाले की, असे ऐकण्यात येत आहे की, जीएसटीच्या वाढत्या संकलनादरम्यान, सरकार एक नवीन कर टप्पा आणणार आहे. आपल्याला आवश्यक असलेल्या गोष्टींवर जीएसटी वाढवण्याची योजना आहे. तसेच, जरा विचार करा सध्या लग्नाचा हंगाम सुरू आहे, लोक पैसे जमा करत आहेत आणि दरम्यान सरकार १५०० रुपयांच्या वरच्या कपड्यांवरील जीएसटी १२…

Read More

रविवार, ०८ डिसेंबर – मुंबई विधानसभा अध्यक्षपदाची निवड उद्या होत आहे, या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांनी रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत अध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीला विधानसभा उपाध्यक्षपद आणि विरोधी पक्षनेते पद मिळावं, असा प्रस्ताव फडणवीसांसमोर ठेवल्याची माहिती समोर येत आहे. या नेत्यांनी घेतली भेट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणाऱ्यांमध्ये महाविकास आघाडीतील भास्कर जाधव, नाना पटोले, विजय वडेट्टीवर यांचा समावेश होता. बहुमत बघता विधानसभा अध्यक्षपदासाठी राहुल नार्वेकर यांची निवड निश्चित असल्याने या नेत्यांनी महाविकास आघाडीच्या वतीने उपाध्यक्षपदाची मागणी केली आहे. विधानसभा अध्यक्ष पदासाठी नार्वेकर निश्चित – विधानसभा निवडणुकीत प्रचंड बहुमत मिळवत महायुतीने सरकार स्थापन केलं. सध्या…

Read More

रविवार, ०८ डिसेंबर – अहिल्यानगर अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात धक्कादायक घटना समोर आली असून गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता असलेल्या व काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष असलेले मिठुभाई शेख यांचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत शनिवारी आढळून आला आहे. या प्रकारामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. शेख गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता होते. या संदर्भात त्यांच्या नातेवाईकांनी गेल्या महिन्यात २५ नोव्हेंबरला पाथर्डी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविलेली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने पोलिसांचा तपास देखील सुरू होता. शनिवारी त्यांचा मृतदेह खेर्डा फाटा येथील एका शेतात छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आल्याचे समोर येत आहे. घटनास्थळी पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, उपनिरीक्षक निवृत्ती आगरकर, पोलीस कर्मचारी अभयसिंग लबडे, राम सोनवणे आदींनी माहिती मिळताच…

Read More

राज्याचे व्यक्ती सापेक्ष एकवीसावे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी पद आणि गोपनियतेची शपथ घेतली आणि लागलीच नव्याने राज्य उभारणीची घोषणा केली. आजवर नव्हतं असं प्रचंड संख्याबळ त्यांच्या मागे असल्याने आता त्यांना राज्य चालवणं घडवणं अजिबात अवघड नाही. विरोधी पक्ष नसल्यागतच असल्याने तीही अडचण आपसूक निकाली निघाली आहे. विरोधकांपेक्षा सत्ताधारी म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या गटातील आमदारांकडूनच काही संकटं आलीच तर त्यांना तोंड देण्याची वेळ फडणवीस यांच्यावर येईल, हे मात्र नाकारता येत नाही. पार पडलेल्या निवडणुकीतील यशावर आजही कोणाचा विश्‍वास नाही. सामान्य माणूस आणि जाणत्या नागरिकालाही भाजप युतीला एकहाती सत्ता मिळाली याचं आश्‍चर्य आहे. जो भेटतो तो आजही…

Read More

शनिवार ०७ डिसेंबर – विशेष प्रतिनिधी / मुंबई राज्यात पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत झालेल्या गैरप्रकारांचा निषेध म्हणून निवडून आलेल्या विरोधी पक्षाच्या आमदारांनी शपथविधी कार्यक्रमावर बहिष्कार घालत स्वतःही शपथ घेण्यास नकार दिला. या कृतीने देशभर निवडणूक आयोगाची निर्भत्सना होऊ लागली आहे. आज विरोधकांपैकी कोणीही शपथ घेतली नसल्याची माहिती महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विधानभवनात पत्रकारांशी बोलताना दिली. यावेळी शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे, माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, शरदचंद्र पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाने नेते जितेंद्र आव्हाड, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड, सुनील प्रभू आणि महाविकास आघाडीचे नवनिर्वाचित आमदार उपस्थित होते. शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे म्हणाले, निषेध म्हणून आज शपथ घेतली जाणार…

Read More

शनिवार ०७ डिसेंबर – शिर्डी माजी आदिवासी विकासमंत्री मधुकरराव पिचड यांच्या पार्थिवावर अकोले तालुक्यात राजूर येथील मधुकरराव पिचड माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिचड यांच्या पार्थिवाचे राजूर येथील निवासस्थानी अंत्यदर्शन घेत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी त्यांनी पिचड यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधून त्यांचे सांत्वन केले. यांची होती उपस्थिती – याप्रसंगी आमदार राधाकृष्ण विखे पाटील, आमदार दिलीप वळसे पाटील, आमदार किरण लहामटे, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, हेमंत सावरा, राजाभाऊ वाजे, आमदार नरहरी झिरवाळ, सत्यजित तांबे, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, हेमलता…

Read More

शनिवार, ०७ डिसेंबर – संगमनेर संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पठार मधील गिर्हेवाडी, सुतारवाडी, पायरवाडी येथील ग्रामस्थांना पिण्याचे चांगले पाणी मिळावे यासाठी व त्यातील अडचणी लक्षात घेत तत्कालीन लोकप्रतिनिधी बाळासाहेब थोरात यांनी प्रशासनाला सूचना दिल्याने या वाड्या-वस्त्यांवर पिण्याचे पाणी मिळू लागले आहे. मात्र ज्यांना अद्यापही गाव आणि वाडी ही माहित नाही असे नवनिर्वाचित आमदार बातम्या देऊन जनतेत संभ्रम निर्माण करत आहे, अशी टीका हिवरगाव पठारच्या सरपंच सुप्रिया मिसाळ यांनी केली आहे. सरपंच सुप्रिया मिसाळ आणि उपसरपंच दत्तात्रेय वनवे म्हणाले, पठार भागातील अनेक वाड्या-वस्त्यांच्या विकासासाठी तत्कालीन लोकप्रतिनिधी बाळासाहेब थोरात यांनी सातत्याने निधी उपलब्ध करून दिला आहे. वाड्या-वस्त्यांवर पिण्याचे पाणी, रस्ते, वीज आदी सुविधांसोबत…

Read More

शनिवार, ०७ डिसेंबर – संगमनेर गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेसच्या वर्चस्वाखाली असलेल्या संगमनेर तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या नांदुरी दुमाला ग्रामपंचायतीवर महायुतीच्या झेंडा फडकला आहे. माजी सरपंच ॲड. मीनानाथ शेळके समर्थक असलेले निखिल निळे सरपंचपदाच्या निवडणुकीत निवडून आले. काँग्रेस उमेदवाराचा पराभव – शिवसेनेचे शिंदे सरपंच पदाचे उमेदवार निखिल निळे यांनी काँग्रेस उमेदवार किसन कवडे यांचा अवघ्या एका मताने पराभव केला. सरपंच निवडीवेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ज्योती ससे यांनी काम बघितले. संगमनेर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील नांदुरी दुमाला ही ग्रामपंचायत राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जाते. या ग्रामपंचायतीवर तत्कालीन काँग्रेसचे मीनानाथ शेळके यांचे वर्चस्व होते शेळके यांच्या पत्नी अर्चना शेळके ग्रामपंचायतच्या सरपंच होत्या.…

Read More

शुक्रवार ०६ डिसेंबर – अकोले माजी मंत्री, आदिवासींचे नेते, भाजपा नेते मधुकरराव पिचड यांचे वयाचे ८३ व्या वर्षी नाशिक येथे शुक्रवारी सायंकाळी साडेसहा वाजता निधन झाले आहे. गेल्या दीड महिन्यांपासून बेनस्ट्रोकमुळे त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. शनिवारी (७ डिसेंबर) दुपारी चार वाजता राजुर (अकोले) येथे त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. पिचड यांच्या निधनाने अकोले तालुक्यात शोककळा पसरली आहे. आदिवासी कुटुंबात जन्म – मधुकरराव पिचड यांचा जन्म १ जून १९४१ रोजी महादेव कोळी या आदिवासी कुटुंबात झाला. त्यांचे वडील काशिनाथ पिचड हे एक शिक्षक होते. पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमधून त्यांनी बीएएलएलबी करुन वकिलीच शिक्षण पूर्ण केलं. विद्यार्थी…

Read More

विशेष- ॲड. गोरक्ष कापकर लोकसभाच्या निवडणूकीच्या निकालानंतर विरोधी पक्षांतील नेते भाजपवर तुटून पडले, जातीय धुर्वीकरणांचा झालेल्या फायद्याचा गैरफायदा घेऊन देवेंद्र फडणवीस हे पराभवाला दोषी आहे हे दाखविण्यासाठी तथाकथित पत्रकार, सर्व राजकीय विरोधक नेत्यांनी प्रयत्न केला. भाजपा पक्षाचा डोलारा ज्या सेनापतीवर आधारित होता, त्याला बदनाम करण्यासाठी खास षड्यंत्र रचले जाऊ लागले. व्हाट्सअप युनिव्हर्सिटीत लाखो ग्रुप खोलून त्यावर खलनायकाचे भूमिकेत उभे करून एकटे पाडण्याची प्रयत्न केला, त्यांच्या जातीवर, त्यांच्या संख्येवर बोलण्याचा प्रयत्न आला. एक स्थितप्रज्ञ व्यक्ती सारं काही सहन करून फक्त कामावर लक्ष केंद्रित करत होती. महाराष्ट्रभर ८० वर्षीय चाणक्याच्या गप्पा मारल्या जाऊ लागल्या. त्याचे चाहते वाटेल त्या पद्धतीने समाज माध्यमावर फडणवीस…

Read More

गुरुवार ०५ डिसेंबर – मुंबई राज्याचे ३१ वे मुख्यमंत्री म्हणून राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत ऐतिहासिक आझाद मैदानावर झालेल्या शपथविधी समारंभात मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमवेत उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ गंगुबाई संभाजी शिंदे, अजित आशाताई अनंतराव पवार यांना राज्यपालांनी पद आणि गोपनियतेची शपथ दिली. यांनी केले संचलन – राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी शपथविधी सोहळ्याचे संचलन केले. उद्योग, क्रीडा, मनोरंजन क्षेत्रातील विविध मान्यवर, विशेष निमंत्रित अतिथी यावेळी उपस्थित होते. शपथविधी सोहळ्याची सुरुवात राष्ट्रगीत व राज्य गीताने करण्यात आली. मंचावर यांची उपस्थिती – आजच्या शपथविधी कार्यक्रमास मंचावर केंद्रीय संरक्षण…

Read More

गुरुवार, ०५ डिसेंबर – संगमनेर शहरातून गायब झालेल्या दुचाकी चोराबद्दल पोलिसांना माहिती मिळाली आणि त्यांनी दुचाकी चोराचा शोध घेण्यासाठी बीड गाठले. संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेऊन संगमनेरमध्ये आणले आणि पोलीस चौकशीमध्ये त्याने एक एक करत चोरलेल्या तीन बुलेटसह पाच दुचाकी पोलिसांच्या स्वाधीन केल्या. दागिने दुचाकी चोऱ्या – दिवसेंदिवस संगमनेरमध्ये वाढत असलेल्या दागिने आणि दुचाकीचोरांना पकडण्याचे मोठे आव्हान शहर पोलिसांसमोर आहे. दागिने आणि दुचाकी चोरांचा शक्यतो पोलिसांना तपास लागत नसतानाच संगमनेरमधून समाधानकारक बातमी समोर आली आहे. चोरीस गेलेल्या पाच दुचाकींचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले आहे. या दुचाकी चोरणाऱ्या एका आरोपीला बीड जिल्ह्यातून ताब्यात घेण्यात संगमनेर पोलिसांना यश आले असून त्याचा साथीदार…

Read More

गुरुवार, ०५ डिसेंबर – संगमनेर आईचे दागिने गहाण ठेवणाऱ्या भावाबद्दल अपशब्द वापरत भावाने आपल्या मुलासह त्याची हत्या केल्याची घटना अकोले तालुक्यातील ब्राह्मणवाडा येथे घडली होती. या खून प्रकरणी संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने बाप-लेकाला जन्मठेपेची शिक्षा केली असून अन्य दोन महिला आरोपी असलेल्या सासु-सुनेची निर्दोष मुक्तता केली आहे. यांना केली शिक्षा तर यांची निर्दोष मुक्तता – मार्तंड मनोहर आरोटे (वय ६०), मयूर मार्तंड आरोटे (वय २२, दोघेही रा. खंडोबाची वाडी, ब्राह्मणवाडा, ता. अकोले) अशी शिक्षा झालेल्या बाप-लेकांची तर शकुंतला आरोटे आणि सोनाली आरोटे अशी निर्दोष मुक्तता केलेल्या सासु-सुनेची नावे आहेत. येथे घडली होती घटना – ११ मार्च २०२२ ला…

Read More

बुधवार, ०४ डिसेंबर – मुंबई मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत गेमचेंजर ठरली. विरोधकांनीही योजनेचा निकालावर परिणाम झाल्याचे मान्य केले होते. राज्यात महायुतीची सत्ता आणणाऱ्या लाडक्या बहिणींच्या गेम चेंजर ठरलेल्या या योजनेकडे आता वक्रदृष्टी झाली आहे. सत्ता मिळवून देण्यात मोलाची मदत करणाऱ्या या योजनेतील काही लाभार्थ्यांना मात्र आता लाभापासून वंचित राहावे लागू शकते. सत्तास्थापनेच्या हालचाली सुरू होताच, प्रशासनाने लाडकी बहीण लाभार्थ्यांच्या अर्जाची पडताळणी करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन कोटी महिला लाभार्थी – राज्यातील दोन कोटी महिलांना या योजनेचा लाभ मिळाला होता. निवडणुकीआधी ज्या-ज्या महिलांनी अर्ज केला, त्या सर्वांना प्रति महिना १,५०० रुपयांचा लाभ दिला गेला. तसेच निवडणुकीनंतर सत्ता…

Read More

बुधवार ४ डिसेंबर – मुंबई  केंद्रीय निरीक्षक निर्मला सीतारामन आणि विजय रूपानी यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर अखेर राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. भाजपाच्या बैठकीत हा ठराव करण्यात आला असून भाजपाच्या अनेक नेत्यांनी त्यांच्या नावाला अनुमोदन दिल. सत्ता स्थापनेचा तिढा सुटला – राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार सत्तेवर विराजमान होणार आहे. केंद्रीय निरीक्षकांसोबत झालेल्या बैठकीत चंद्रकांत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला तर उर्वरित भाजपाच्या आमदारांनी फडणवीसांच्या नावाला अनुमोदन दिलं. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेला सत्तास्थापनेचा तिढा अखेर सुटला आहे. महायुती सरकारचा शपथविधी उद्या – महायुती सरकारचा शपथविधी येत्या ५ डिसेंबर रोजी आझाद मैदानात…

Read More

लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या पाठीशी संगमनेर तालुका एकवटला बुधवार, ०४ डिसेंबर – संगमनेर सततच्या अविश्रांत कामातून संगमनेर तालुक्याला विकसित आणि वैभवशाली बनवणारे लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी तालुक्यातील प्रत्येक कुटुंबाच्या जीवनात आनंद निर्माण केला. संगमनेर तालुक्याच्या विकासाची घडी बसवली. कार्यकर्त्यांची मोठी फळी असताना अनपेक्षित निकालामुळे संपूर्ण राज्यात हळहळ निर्माण झाली. यानंतर तालुक्यातील कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतर हजारो कार्यकर्त्यांनी आमदार बाळासाहेब थोरात यांची भेट घेऊन आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली तर अनेकांना अश्रू अनावर झाले. प्रगतशील व सुसंस्कृत तालुका – १०० किलोमीटर विस्तार असलेल्या तालुक्यातील १७१ गावे आणि २५८ वाड्या-वस्त्यांवर सातत्याने विकास कामे राबवताना संगमनेर तालुका त्यांनी परिवार मानला. तालुक्यातील प्रत्येक कुटुंबाच्या…

Read More