Author: अनंत पांगारकर
संगमनेर – सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर राज्यभरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेने वेग घेतला आहे. या पार्श्वभूमीवर संगमनेर तालुक्यातील जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणासाठी राखीव जागांची आरक्षण सोडत सोमवारी (१३ ऑक्टोबर) काढण्यात येणार असल्याची माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे तहसीलदार धीरज मांजरे यांनी दिली आहे. संगमनेर तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेचे ९ गट तर पंचायत समितीचे १८ गण आहेत. जिल्हा परिषदेच्या ९ गटामध्ये समनापुर, तळेगाव, आश्वी बुद्रुक, जोर्वे, घुलेवाडी, धांदरफळ बुद्रुक, चंदनापुरी, बोटा व साकुर या गटांचा समावेश आहे. तर पंचायत समितीच्या १८ गणांमध्ये निमोण, समनापुर, तळेगाव, वडगाव पान, आश्वी बुद्रुक, आश्वी खुर्द, जोर्वे, अंभोरे, घुलेवाडी, गुंजाळवाडी, राजापूर, धांदरफळ बुद्रुक, संगमनेर खुर्द, चंदनापुरी,…
आमदार सत्यजीत तांबेंची तत्परता! संगमनेरातील राज्य उत्पादन शुल्क कार्यालयासमोरून जप्त वाहने अखेर हटली
संगमनेर: आमदार सत्यजीत तांबे यांचे प्रत्येक गोष्टीवर किती बारीक लक्ष असते, याचे आणखी एक उदाहरण संगमनेरकरांना पाहायला मिळाले आहे. शहरातील राज्य उत्पादन शुल्क कार्यालयासमोर अनेक दिवसांपासून धूळ खात पडलेली, कारवाईत जप्त केलेली वाहने हटविण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित दादांनी ग्रीन सिग्नल दिल्यानंतर बुधवारी ही वाहने काढण्यात आली. मोक्याच्या ठिकाणी असलेल्या या कार्यालयासमोरच महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे. त्यामुळे याच ठिकाणी समाजबांधव मोठ्या संख्येने जमून जयंती, महापरिनिर्वाण दिन यासह अनेक महत्त्वपूर्ण सामाजिक कार्यक्रम आयोजित करतात. मात्र, वर्षानुवर्षे पडून असलेल्या या जप्त वाहनांमुळे कार्यक्रमांच्या आयोजकांना प्रचंड त्रास होत होता. तसेच, हा परिसर नागरिकांच्या वर्दळीचा असल्याने वाहतुकीसाठी व सुरक्षिततेच्या दृष्टीनेही ही वाहने दुसरीकडे…
संगमनेर – गेल्या तीन-चार वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेला वेग आला आहे. संगमनेर नगरपालिका निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर बुधवारी प्रभाग निहाय आरक्षण सोडत काढण्यात आली. पिठासन अधिकारी तथा संगमनेरचे प्रांताधिकारी अरुण उंडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही सोडत काढण्यात आली असून यावेळी पालिकेच्या प्रभारी मुख्याधिकारी धनश्री पवार, प्रशासन अधिकारी संजय पेखळे, राजेंद्र गुंजाळ आदी उपस्थित होते. असे आहे प्रभाग निहाय आरक्षण… प्रभाग १ अ – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला प्रभाग १ ब – सर्वसाधारण प्रभाग २ अ – अनुसूचित जाती प्रभाग २ ब – सर्वसाधारण महिला प्रभाग ३ अ – नागरिकांचा मागास प्रवर्ग प्रभाग ३ ब…
आज ८ ऑक्टोबर २०२५, बुधवार आहे. पंचांगानुसार, आज द्वितीया तिथी आहे आणि चंद्रमा मेष राशीत संचार करत आहे. आजचा दिवस गणेशाला समर्पित असल्याने, तो तुमच्या प्रयत्नांना यश मिळवून देईल. मेष राशी – आजचा दिवस तुमच्यासाठी उत्साहाने भरलेला असेल. तुमचे विचार आणि ऊर्जा योग्य दिशेने वापराल, तर तुमच्या इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. आर्थिक बाबतीत भाग्य तुमच्या बाजूने असेल, पण अहंकार टाळा. कामाच्या ठिकाणी तुमच्या प्रयत्नांना योग्य मान्यता मिळू शकते. भागीदारीत काम करण्यासाठी किंवा नवीन प्रकल्पावर काम करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. वृषभ राशी – तुमची पत्नी किंवा जोडीदार तुम्हाला आनंदित करेल. तुम्ही आज आपले पत्ते व्यवस्थित टाकल्यास अतिरिक्त नफा मिळू…
मुंबई – महाराष्ट्र शासनाने प्रशासकीय स्तरावर महत्त्वाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर केल्या आहेत. यात अनेक जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका आयुक्तांचा समावेश आहे. एम. देवेंद्र सिंह, जे सध्या रत्नागिरीचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते, त्यांची नियुक्ती आता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, मुंबईचे सदस्य सचिव म्हणून करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त, शेखर सिंह यांची नियुक्ती नाशिकच्या कुंभमेळ्याचे आयुक्त या महत्त्वाच्या पदावर झाली आहे. नाशिकचे जिल्हाधिकारी, जलज शर्मा यांना नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, नाशिकचे महानगर आयुक्त म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. जळगावचे जिल्हाधिकारी, आयुष प्रसाद यांची आता नाशिकचे जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे. जिल्हा परिषद ठाणेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, रोहन घुगे यांची…
पोलिसांनी दाखवली तत्परता, महसूल विभागाच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह संगमनेर: अवैध वाळू वाहतुकीला आळा घालण्याची मुख्य जबाबदारी असलेल्या महसूल विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी नदीपात्रालगत ‘घिरट्या’ मारण्यात व्यस्त असताना, संगमनेर शहर पोलिसांनी अत्यंत सतर्कता दाखवत वाळू माफियांना चांगलाच दणका दिला आहे. पोलीस उपनिरीक्षक रावसाहेब लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या कारवाईत ३ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, महसूल विभागाने या गंभीर घटनेवर अद्यापही कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नाही, ज्यामुळे त्यांच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. कोल्हेवाडी रोड परिसरात अवैध वाळू वाहतूक सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलीस उपनिरीक्षक लोखंडे यांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीवर तात्काळ विश्वास ठेवून,…
अहिल्यानगर – पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार, स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत कत्तलीसाठी आणलेली चार गोवंशीय जनावरे ताब्यात घेतली आहेत. या कारवाईत जनावरे आणि वाहतुकीसाठी वापरलेले पिकअप वाहन असा एकूण ६,६०,०००/- (सहा लाख साठ हजार रुपये) किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जिल्ह्यातील अवैध कत्तलखान्यांची माहिती काढून कारवाई करण्याचे निर्देश पोलीस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. यानुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिष भोये, पोलीस उपनिरीक्षक दिपक मेढे, तसेच पोलीस अंमलदार दिपक घाटकर, शामसुंदर गुजर, बिरप्पा करमल, सोमनाथ झांबरे, राहुल डोके, विशाल तनपुरे, महादेव भांड यांच्या पथकाने सोनई पोलीस…
संगमनेर – सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श तत्वांवर यशस्वी वाटचाल करणाऱ्या थोरात सहकारी साखर कारखान्याने यंदाच्या दिवाळीनिमित्त शेतकरी, ऊस उत्पादक, कामगार आणि सभासदांसाठी आनंदाची मोठी घोषणा केली आहे. कारखान्याचे विद्यमान चेअरमन माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी ही महत्त्वपूर्ण घोषणा केली, यामुळे या सर्व घटकांची दिवाळी गोड होणार आहे. माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, सहकारामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत झाली आहे. संगमनेर शहरातील बाजारपेठ भरलेली आहे. अमृत उद्योग समूहातून विविध संस्थांमधून सुमारे १०० कोटी रुपये बाजारात येत असल्याने संगमनेरकरांची दिवाळी ही आनंदाची होणार असल्याचे त्यांनी सांगितले. दिवाळीनिमित्त सन २०२४-२५ या गाळप हंगामात गाळपास आलेल्या उसास कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादकांना २०० रुपये प्रति…
मुंबई – भारताच्या मुख्य न्यायमूर्तीवर सोमवारी (६ ऑक्टोबर) वकील राकेश किशोर यांनी केलेल्या कथित शारीरिक हल्ल्याच्या घटनेने महाराष्ट्रातील संपूर्ण न्यायवृंद हादरला आहे. या अत्यंत धक्कादायक, दुर्दैवी व निषेधार्ह घटनेबद्दल महाराष्ट्र राज्य न्यायाधीश संघटनेने आज मुंबई येथे झालेल्या बैठकीत तीव्र संताप व्यक्त करत तीन महत्त्वाच्या मुद्द्यांचा समावेश असलेला निषेधाचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला आहे. राज्य न्यायाधीश संघटनेने स्पष्ट केले की, ही घटना केवळ एका व्यक्तीवरचा हल्ला नसून भारतीय न्यायव्यवस्थेच्या गौरव, स्वातंत्र्य आणि पवित्रतेवर थेट आघात आहे. संविधानिक लोकशाहीच्या मूलभूत तत्वांवर प्रहार करणारी अशी कृत्ये कोणत्याही सभ्य समाजात असह्य आणि पूर्णपणे अस्वीकार्य आहेत. संघटनेचे अध्यक्ष जिल्हा न्यायाधीश सचिन सूर्यकांत पाटील यांनी…
संगमनेर : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका निष्पक्ष व शांततेत पार पडाव्यात यासाठी संगमनेर शहर पोलीस स्टेशनमधील स्थानिक रहिवासी (होमटाऊन रेसिडेंट) पोलीस कर्मचाऱ्यांची, विशेषतः एका वादग्रस्त कॉन्स्टेबलची तातडीने बदली करण्यात यावी, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्याकडे करण्यात आली आहे. सोमवारी (६ ऑक्टोबर) शिवसेना पक्षाचे माजी शहर प्रमुख अमर कतारी यांनी पोलीस अधीक्षकांना लेखी निवेदन दिले. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसंदर्भात प्रभाग रचना अंतिम झाली असून नगराध्यक्षपदाच्या सोडतीही पार पडल्या आहेत. लवकरच निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार असल्याने, कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने स्थानिक पोलीस कर्मचाऱ्यांची बदली करणे गरजेचे असल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे. निवेदनात…
