Author: Annant Ppangarkar
भगूरमध्ये साकारणार सावरकरांच्या जीवनावर आधारित थीमपार्क पंढरपुरातील दर्शन मंडप, दर्शन रांगेसाठी १२९ कोटींची तरतूद मंगळवार, २४ सप्टेंबर मुंबई : राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासाच्या सुमारे ३०५ कोटी ६३ लाख रुपयांच्या आराखड्यांना आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्यस्तरीय शिखर समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. यात श्री क्षेत्र पंढरपूर येथील दर्शन मंडप व दर्शन रांग या सुविधेसाठी १२९ कोटी ४९ लाख रुपयांच्या कामांचाही समावेश आहे. अर्थसंकल्पात तसेच वेळावेळी आश्वासित केल्याप्रमाणे राज्यातील तीर्थस्थळांच्या विकासासाठी भरीव निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यानुसार तीर्थस्थळ व पर्यटनस्थळांच्या विकासासाठी तातडीने नियोजन करण्यात यावे. तसेच सर्वच ठिकाणची कामे दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण व्हावीत याची काळजी घ्यावी, असे…
मंगळवार, २४ सप्टेंबर अहमदनगर – जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी मुंबई पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) व ३७ (३) अन्वये २४ सप्टेंबर ते ७ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत शस्त्र व जमावबंदी आदेश जारी केला आहे. सदरचे आदेश धार्मिक कार्यक्रम, लग्नकार्य, लग्न मिरवणुका किंवा प्रेतयात्रेच्या जमावास लागू राहणार नाहीत. तसेच हा आदेश पोलीस अधिकारी, कामावर असलेल्या इतर शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना, सभा अगर मिरवणूका काढण्यास रितसर परवानगी घेतली असलेल्या व्यक्तींना लागू नाही. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग करणाऱ्या विरोधात कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
मंगळवार, २४ सप्टेंबर मुंबई – महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी कार्यरत असलेल्या रश्मी शुक्ला ह्या अत्यंत वादग्रस्त अधिकारी आहेत. शुक्ला यांची सेवा जून २०२४ रोजी समाप्त झाली असतानाही भाजपा-युती सरकारने जानेवारी २०२६ पर्यंत त्यांना नियमबाह्य बढती दिली आहे. रश्मी शुक्ला यांची कार्यपद्धती अत्यंत वादग्रस्त राहिली असून नियमबाह्य कामे करणे तसेच विरोधी पक्षांतील नेत्यांना धमकावण्याची कामे त्यांनी केली आहेत. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२४ मध्ये होतील. या निवडणुका निष्पक्ष वातावरणात पार पडाव्यात यासाठी, वादग्रस्त पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांची तात्काळ हकालपट्टी करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले…
मंगळवार, २४ सप्टेंबर मुंबई : न्यायालयाच्या कामाचे स्वरूप आणि आवाका हा प्रचंड वाढल्याने न्यायालयाची जागा आणि सुविधा यांची आवश्यकता वाढली आहे. नवी आव्हाने, नवीन उद्दिष्टे आणि न्यायपालिकेचा भविष्यात्मक दृष्टिकोन, त्यातील बदल याचा विचार करता नवीन इमारत ही काळाची गरज आहे. नवीन संगणकीय बदल, डिजिटायझेशन, पेपरलेस कोर्ट, न्यायदानाची बदललेली संकल्पना म्हणजे “न्याय आपल्या दारी” या सगळ्या बाबींचा विचार करता नवीन इमारत मोठी आणि अद्ययावत बांधणे, हे सगळ्यांसाठी सोयीचे होणार आहे. त्यामुळेच आजचा दिवस हा मुंबई उच्च न्यायालयाच्या कारकीर्दीचा अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक दिवस ठरणार असल्याचे मत भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती डॉ. धनंजय चंद्रचूड यांनी व्यक्त केले. वांद्रे पूर्व येथे प्रस्तावित नवीन उच्च…
मंगळवार, २४ सप्टेंबर मुंबई :- अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील मौजे चिकणी येथील जमीन हस्तांतरण व्यवहार बेकायदेशीर असून याप्रकरणी गुन्हे नोंद करण्यात यावेत तसेच या जमीन नोंदणीची निर्गमित झालेली सूचना नियमबाह्य असल्याने रद्द करण्याची कार्यवाही केली जावी, अशा सूचना महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सोमवारी प्रशासनाला दिल्या. मंत्रालयात मौजे चिकणी येथील जमीन व्यवहार नोंदणीच्या अनुषंगाने महसूल पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार, वन विभागाचे प्रधान सचिव एच. गोविंदराज उपस्थित होते. तसेच अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.…
मंगळवार, २४ सप्टेंबर गेल्या अनेक वर्षांपासून वादग्रस्त ठरलेला सहायक पोलीस उपनिरीक्षक सिद्धार्थ पाटील याला एका एमडी तस्कराकडून वसुली करणे चांगलेच अंगलट आले. पोलीस आयुक्तांनी त्याला सेवेतून निलंबित केले असून प्राथमिक चौकशीच्या अहवालानंतर त्याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. या कारवाईमुळे अनेक वसुलीबाज कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. सिद्धार्थ पाटील हा पोलीस खात्यात गेल्या अनेक वर्षांपासून वसुली कर्मचारी म्हणून वादात होता. तो नागपूरच्या अमली पदार्थ विरोधी पथकामध्ये कार्यरत होता. गांजा आणि ड्रग्स घेणाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी हा त्यांच्याकडून पैसे वसुली करून आरोपींना सोडून देत होता. त्यांच्या कुटुंबियांनाही गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन पैसे वसूल करीत होता. गेल्या…
शिक्षक दिनानिमित्त विद्यार्थ्यांना इंग्रजी व भूमिती विषय शिकविले गुरुवार, दि. ०५ सप्टेंबर संगमनेर – समाजाच्या विकासात शिक्षकांचा अत्यंत मोलाचा वाटा असून शिक्षक दिनानिमित्त सर्व शिक्षकांना अभिवादन करताना महाराष्ट्राचे युवा आमदार सत्यजित तांबे यांनी शाळेत जाऊन पुस्तक, खडू, डस्टरसह विद्यार्थ्यांना भूमिती व इंग्रजी हे विषय शिकवले. सह्याद्री विद्यालय संगमनेर येथे आमदार सत्यजित तांबे यांनी इयत्ता आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी व भूमिती विषय शिकवले आमदार सत्यजित तांबे यांनी इंग्रजी विषय शिकवताना इंग्रजीचे महत्त्व मोठे असून इंग्रजीला घाबरू नका असे सांगताना करियरसाठी हा विषय प्रत्येकाला आवश्यक आहे. मोठी स्वप्ने पहा त्याबरोबर चांगला अभ्यासही करा. दडपण न घेता हसत खेळत शिका म्हणजे शिक्षण…
गुरुवार, दि. ०५ सप्टेंबर संगमनेरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या संमेलनात संगमनेर प्रखंडाची विश्व हिंदू परिषद बजरंग दलाची नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. विश्व हिंदू परिषदेच्या शहराध्यक्षपदी श्रीकांत मोरे, शहर उपाध्यक्षपदी शेखर वामन, कार्याध्यक्षपदी ओम बिल्लाडे, प्रखंड मंत्रीपदी कृष्णा डंबिर, सहमंत्रीपदी वैभव मेहेत्रे, कोषाध्यक्षपदी प्रसाद थोरात, शहर संयोजकपदी ओंकार भालेराव, संयोजकपदी रवी मंडलिक व किरण पाचारणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय बजरंग दल बलोपासना प्रमुख म्हणून आदित्य गुप्ता, सहप्रमुख प्रणव सस्कर, बजरंग दल महाविद्यालयीन प्रमुख सुमित वर्मा, सहप्रमुख समर्थ कटारे, गौरव वराडे, साई ठाकूर, ओंकार डावखरे, श्लोक मुळे, गोरक्षा प्रमुखपदी आदित्य रुपवते व ओम सातपुते, मातृशक्ती संयोजिका म्हणून संगीता बैरागी, दुर्गावाहिनी…
गुरुवार, दि. ०४ सप्टेंबर पनवेल : ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेत कागदपत्रांची पडताळणी सखोल न केल्याने गैरव्यवहार झाल्याची तक्रार सोमवारी भारतीय जनता पक्षाच्या पनवेल महापालिकेच्या माजी नगरसेवकांनी पनवेल तहसीलदारांकडे केल्यावर प्रशासनाला जाग आली आहे. खारघर येथील महिला या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी त्या वारंवार ऑनलाइन अर्ज नारी शक्ती पोर्टलद्वारे भरत होत्या. मात्र या महिलेच्या आधार कार्डवर सातारा जिल्ह्यातील महिलेने नोंदणी केल्याची धक्कादायक माहिती समजताच खारघर येथील महिलेने पनवेलची तहसीलदार कचेरी गाठली. संबंधित लाभार्थी महिलेची माहिती घेतल्यावर या लाभार्थी महिलेच्या नावावर २७ वेगवेगळे अर्ज मंजूर झाल्याचे उजेडात आले. याबाबत तक्रार अर्ज मिळाला असून पुढील कार्यवाहीसाठी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविल्याचे पनवेलच्या तहसीलदारांनी सांगीतले. खारघर…
एसटी कर्मचारी कृती संघटनेकडून मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचे स्वागत गुरुवार, ०५ सप्टेंबर मुंबई : राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांना एप्रिल २०२० पासून मुळ वेतनामध्ये ६५०० रुपयांची वाढ करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी घेतला. या निर्णयाचे एसटी कर्मचारी कृती संघटनेने स्वागत करीत मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. ऐन गणपती उत्सवाच्या काळात एसटी संपामुळे सामान्यांना झालेल्या त्रासाबद्दल मुख्यमंत्र्यांनी संघटनांकडे तीव्र नाराजी व्यक्त केली. एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली कर्मचारी संघटनांची बैठक झाली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत, आमदार सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव डॉ. आय. एस. चहल, अपर मुख्य सचिव विकास खारगे,…
असा असेल आजचा तुमचा दिवस! मेष – षष्ट स्थानी असलेले चंद्रशेखर की आज तब्येतीच्या दृष्टीने जराशी हानिकारक असेल. प्रवासाचे योग येतील, मात्र आज प्रवास टाळा. वृषभ – आज पंचमेष चतुर्थ स्थानी पंचमेषा बरोबर आहे. पंचमस्थान सुद्धा बलवान असल्याने अचानक आर्थिक फायदा संभवतो. वास्तू योग दर्शवतो. मिथुन – आज आपला दिवस अतिशय कटकटीचा असेल. आर्थिक समस्या उद्भवतील. संध्याकाळ नंतर मात्र आनंददायी दिवस. कर्क – आज आपल्याला कसलेही भान राहणार नाही. कारण आजचा दिवस आपला आहे. भरपूर मेहनत करायला लावणारा दिवस. सिंह – आज आपल्या बुद्धीची कसोटी लागेल. आपण आज कोणालाही जुमानणार नाही. कन्या – आनंद-दुःख ऊन-सावलीसारखे आज आपल्याशी खेळतील. समाधान ही…
महोत्सव बचत गटातील महिलांना स्वयंरोजगारासाठी व्यासपीठ निर्माण करणारा दोन दिवसात ३५ हजार महिलांचा सहभाग बुधवार, दि. ०४ सप्टेंबर इंदिरा महोत्सवातून अनेक महिलांना रोजगार व स्वयंरोजगारासाठी मोठे व्यासपीठ निर्माण झाले आहे. बचत गटाच्या महिलांना रोजगार, स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देत त्या कुटुंबाची अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी हा प्रयत्न आहे. बचत गटाच्या माध्यमातून उत्पादित मालाच्या मार्केटिंगसाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर केल्यास जगाच्या पाठीवर पोहोचता येईल. यासाठी इंदिरा महोत्सव मानबिंदू ठरेल, असा आशावाद काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला. संगमनेरमध्ये आयोजित इंदिरा महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशीच्या कार्यक्रमात थोरात बोलत होते. धुळ्याच्या खासदार डॉ. शोभा बच्छाव, शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत वाघ,…
बुधवार, दि. ०४ सप्टेंबर मुंबई – महिला आणि अल्पवयीन मुलींवर बलात्कार करून त्यांचा खून करणाऱ्या नराधमांना सर्वोच्च न्यायालयात आरोप सिद्ध होऊन फाशीची शिक्षा सुनावली तरी त्यांना राष्ट्रपती यांच्याकडे दयेचा अर्ज करण्याचा अधिकार आहे. अशा अर्जावर राष्ट्रपती कार्यालयाकडून दीर्घ काळ निर्णय घेतला जात नाही, पर्यायाने अशा गुन्हेगारांची फाशी लांबते. त्यामुळे अशा घटनेतील पीडितेला आणि तिच्या कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी राष्ट्रपतींनी असे दयेचे अर्ज नाकारावे आणि अर्जावर लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी विनंती विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांनी महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना केली. राष्ट्रपतींनी यावर सकारात्मक प्रतिसाद दिला, अशी माहिती डॉ. गोऱ्हे यांनी दिली. विधान परिषदेच्या शतक महोत्सवी कार्यक्रमाच्या समारोपानंतर…
बुधवार, दि. ०४ सप्टेंबर सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग मुंबईच्या रिक्त पदी असलेल्या मुख्य अभियंता पदी गेल्या काही दिवसापासून पदस्थापनेच्या प्रतीक्षेत असलेल्या राजेंद्र रहाणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राहणे यांनी नव्या पदाचा पदभार त्वरित स्वीकारण्याचे आदेश देण्यात आले आहे. राज्य सरकारने बुधवारी त्यांच्या बदलीचे आदेश काढले आहे. राहणे गेल्या काही दिवसापासून नव्या नियुक्तीच्या प्रतीक्षेत होते. अखेरीस त्यांची सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागाच्या मुख्य अभियंतापदी मुंबईत नियुक्ती करण्यात आली आहे.
बुधवार, दि. ०४ सप्टेंबर महाराष्ट्रात महिला अत्याचाराचे प्रमाण वाढले असून दररोज नवीन घटना समोर येत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले नगरपंचायतीच्या नगरसेवकानेच बारा वर्षीय अल्पवयीन मुलीशी लज्जास्पद वर्तन केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी भारतीय जनता पक्षाचा नगरसेवक असलेल्या हितेश कुंभार याला संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने गुरुवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. दररोजच्या अत्याचाराच्या आणि गुन्हेगारीच्या घटनांमुळे महाराष्ट्रात नेमकं चाललय तरी काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. नगर जिल्ह्यातील अकोले येथे नगरसेवकानेच अल्पवयीन मुलीची छेड काढत तिच्याशी लज्जास्पद वर्तन केले. आरोपी जबाबदार नागरिक आणि नगरसेवक असल्याने त्याच्या विरोधात जनमानसात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. एकीकडे महायुतीचे सरकार राज्यात ‘मुख्यमंत्री…
बुधवार, दि. ०४ सप्टेंबर पोलीस प्रशासनाच्या भूमिकेमुळे सातत्याने वादात सापडणाऱ्या शांतता समितीच्या बैठकीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शांतता समितीचे नेमके सदस्य कोण असा प्रश्न उपस्थित करत या बैठकीला जाणीवपूर्वक डावल्याचा आरोप आरपीआय आठवले गटाचे शहराध्यक्ष कैलास कासार यांनी केला आहे. मंगळवारी (ता. ३ सप्टेंबर) यशवंतराव चव्हाण प्रशासकीय भवनाच्या सभागृहात पोलीस प्रशासनाच्या वतीने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीच्या बैठकीच्या आयोजन करण्यात आले होते. यावर्षी संगमनेर शहराची, येथील सण उत्सवाची कोणतीही पार्श्वभूमी माहीत नसलेल्या अधिकाऱ्यांच्या (बढतीवर बदली झालेल्या पोलीस उपअधीक्षकांचा अपवाद वगळता) हातात गणेशोत्सवाची सूत्रे गेल्याने काही ठराविक लोकांनाच त्या बैठकीचे निमंत्रण दिले गेले. अचानक तणावात्मक परिस्थिती निर्माण झाल्यास पोलीस खात्याचे अधिकारी समाजातील…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विभागीय, जिल्हा प्रशासनाला सूचना बुधवार, दि. ०४ सप्टेंबर मुंबई : विशेषतः मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. यासह मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या विदर्भासह इतर भागातील जिल्हे किंवा तालुक्यांमध्ये नुकसानीचे पंचनामे आणि मदतीची कार्यवाही त्वरित करण्यात यावी, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. पिकांचे झालेले नुकसान, घरांची पडझड, पशुधनाची हानी अशा सर्व बाबींची माहिती घेण्यात यावी, यासंदर्भात त्वरित पंचनामे करण्यात यावेत. अतिवृष्टीमुळे तात्पुरते स्थलांतर केलेल्या लोकांना सर्व आवश्यक सुविधा देण्यात याव्यात. त्यांना आवश्यक ती सर्व मदत त्वरित उपलब्ध करून द्यावी. विभागीय आयुक्त, जिल्हा प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग, स्थानिक नगरपालिका, महानगरपालिका, ग्रामपंचायती, पोलीस प्रशासन…
असा असेल आजचा आपला दिवस… मेष – बाहेरगावी जाण्याचे योग. आर्थिक लाभ होण्याचा दिवस. पोटाचे आजार संभवतील. वृषभ – रागावर नियंत्रण ठेवा. आज तुमची कामे संथ गतीने होतील. वाहन चोरीची शक्यता, वाहन सांभाळा. मिथुन – जितका लाभाचा तितकाच खर्चाचा दिवस. चिडचिड, संतापावर नियंत्रण ठेवा. कर्क – आजचा दिवस अतिशय फायदेशीर असा आहे. जिथे जाल तिथे तुमचा सन्मान केला जाईल. मात्र भाऊबंदकीपासून चार हात दूर राहा. सिंह – अतिशय प्रेमळ आणि आपुलकी जपणारी व्यक्ती आज तुमच्या आयुष्यात येत आहे, तिला मान द्या. पैसा जास्त खर्च करू नका. कन्या – रडका आणि रडविणारा असा आजचा दिवस आहे. आज मित्रांपासून सावध राहा. कोणतेही…
मंगळवार, दि. ०३ सप्टेंबर विशेष प्रतिनिधी / मुंबई ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर राज्य परीवहन महामंडळ म्हणजेच एसटी कर्मचारी संघटनांनी संप पुकारला आहे. एसटी कामगार संयुक्त कृती समितीच्यावतीने आजपासून बेमुदत धरणे आंदोलनाला बसले आहेत. आज एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा पहिलाच दिवस असून याचा एसटीच्या महसूलावर मोठा परिणाम झाला आहे. संपामुळे अंदाजे १४ ते १५ कोटी रुपयांचा महसूल बुडाल्याची माहिती समोर आली आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांना वेतन मिळावे, प्रलंबित महागाई भत्ता आणि फरक, वाढीव घरभाडे भत्ता आणि फरक, वेतनवाढीच्या दराचा फरक तसेच ४८४९ कोटी रुपयांमधील शिल्लक रकमेचे वाटप आणि नुकत्याच मुळ वेतनात जाहीर केलेल्या पाच हजार, चार हजार आणि अडीच हजार रुपयांऐवजी…
महिलांना मानसिक व आर्थिक सक्षम करणारा महोत्सव मंगळवार, दि. ०३ सप्टेंबर संगमनेर : भारतीय जनता पक्षाच्या राजवटीमध्ये विकृत मानसिकता वाढली आहे. पुरोगामी महाराष्ट्रामध्ये आज महिला, चिमुकल्या सुरक्षित नाही. महिलांवरील अत्याचार वाढले असून बदलापूर घटनेनंतर पोलीस पीडीतेचा एफआयआरदेखील दाखल करून घेत नव्हते. दिल्लीत कुस्तीपटूंवर झालेल्या अन्यायाची कोणी दखल घेत नाहीत अशा परिस्थितीत भ्रष्टाचार देखील वाढला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कोसळलेला होता भ्रष्टाचाराच प्रतीक असल्याचा खासदार प्रणिती शिंदे यांनी म्हटल आहे. संगमनेरच्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर एकविरा फाउंडेशन आणि अमृत उद्योग समूहाच्या पुढाकारातून पंधरा हजार महिलांच्या उपस्थितीत आयोजित ‘इंदिरा महोत्सव’ शुभारंभ प्रसंगी कार्यक्रमात खासदार प्रणिती शिंदे बोलत होत्या.…
