Author: Annant Ppangarkar
असा असेल तुमचा आजचा विजयादशमीचा दिवस शनिवार, दि. १२ ऑक्टोंबर मेष- महत्त्वाची कामे करू शकाल. संततीकडे लक्ष द्यायला वेळ मिळेल. त्यांच्या प्रगतीने मन आनंदी होईल, संतती सौख्य लाभेल. नवीन कार्यक्षेत्रात प्रवेश करू शकता. नवीन कामाचा आनंद घ्याल. वृषभ – आपल्यामध्ये आत्मविश्वास परिपूर्ण असणार आहे. तत्त्वाप्रमाणे काम कराल, सरकारी काम करून घ्यावी. काम करताना सातत्य ठेवणे आवश्यक आहे. खोळंबलेली काम सुद्धा पूर्ण करा. मिथुन – बहीण-भावामध्ये तणावाचं वातावरण असू शकते. त्यामध्ये तुम्ही पुढाकार घेऊन त्या तणावाचे वातावरण कमी करू शकता, तुमच्या बोलण्याने वातावरण आनंदी व सुखमय होईल. कर्क – प्रवास टाळणे चांगले. आर्थिक व्यवहार मोठ्या प्रमाणात होणार आहे, त्यामुळे आर्थिक प्राप्तीपण…
शुक्रवार, ११ ऑक्टोंबर तोफेतून गोळा सोडत असताना तो जागेवरच फुटल्याने झालेल्या स्फोटात दोन अग्निवेरांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून एक अग्निवीर गंभीर जखमी झाला आहे. नाशिकमध्ये हा प्रकार घडला. गोहिल विश्वराज सिंग (वय २० वर्ष, मूळ रा. गुजरात ह.मू. आर्टिलरी सेंटर, नाशिकरोड, नाशिक) आणि शक्कींन शीत (वय २१ वर्ष, मूळ रा. पश्चिम बंगाल, ह.मू. आर्टिलरी सेंटर, नाशिकरोड, नाशिक) असे मृत झालेल्या अग्निवीरांची नावे असून अप्पाला स्वामी (वय २० वर्ष) असे जखमी झालेल्या अग्निविराचे नाव आहे. दरम्यान या प्रकरणी देवळाली पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास इंडियन शील्ड गन या मैदानावर…
शुक्रवार, ११ ऑक्टोंबर संगमनेर तालुक्यातील राजापूर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेसह जिल्ह्यातील १६ औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे नामांतर करण्यात आले असून शुक्रवारी राजापूर आयटीआयचे ‘शाहीर विठ्ठल उमप’ असे नामांतर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले आहे. राजापूर येथून दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, राजापूर येथे प्राचार्य यु. डी.पालवे, शाहीर विठ्ठल उमप यांचे चिरंजीव संदेश उमप, जिल्ह्यातील सर्व आयटीआयचे प्राचार्य दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. विखे म्हणाले, राज्यात ४१९ शासकीय व ५८५ खासगी आयटीआय कार्यरत आहेत. यापैकी १०८ आयटीआयना त्या जिल्ह्यातील थोर व्यक्ती, स्वातंत्र्यसैनिक व समाजसुधारकांची नावे देण्यात येत आहेत. आयटीआयचे नामांतर ही ऐतिहासिक घटना आहे. मुख्यमंत्री युवा…
शुक्रवार, ११ ऑक्टोंबर विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागू शकते. त्यामुळे राज्य सरकारने निर्णयांचा धडाका लावला आहे. त्याचबरोबर जीआर, सरकारी जाहिराती आणि स्थानिक आमदार मंत्र्यांकडून उद्घाटनाच्या जाहिरातींचा माध्यमांना सपाटा सुरू आहे. या सर्व गोष्टींवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे कर्जत-जामखेडचे रोहित पवार यांनी ट्विटच्या माध्यमातून जोरदार टीका केली आहे. ट्विटमध्ये पवार म्हणाले, केवळ निवडणुका समोर ठेवून मंत्रिमंडळ बैठकीत घेतले जाणारे निर्णय, GR, आणि जाहिराती बघता आता पगारही होतील की नाही अशी चर्चा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये दबक्या आवाजात सुरू असून या महिन्याच्या पगाराची तर आशासुद्धा सर्वांनी सोडलीय. सहकारी पक्षांची आर्थिक बेशिस्त आणि हवेतल्या घोषणांना कंटाळून कालच्या मंत्रिमंडळ बैठकीतून अर्थमंत्री तर पहिल्या…
शुक्रवार, ११ ऑक्टोंबर सहकार कायद्यानुसार एखाद्या संस्थेची थकबाकी असताना संचालकपदावर राहता येत नाही, या नियमाचा आधार घेत संगमनेर मधील उद्योजक आणि काँग्रेसचे नेते कैलास पानसरे यांचे दोन संस्थांवरील संचालकपद सहकारी संस्था उपनिबंधक संतोष कोरे यांनी रद्द ठरविले आहे. यामुळे संगमनेरच्या सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे. रायते विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था आणि दुर्गामाता ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था या दोन संस्थांवरील संचालक पद कैलास बाळासाहेब पानसरे गमवावे लागले आहे. पानसरे हे रायते विविध कार्यकारी सेवा सोसायटीमध्ये संचालक म्हणून निवडून आले होते. त्यांनी शारदा पतसंस्थेमधून कर्ज घेतले होते. या कर्जाची थकबाकी आहे. सहकार कायद्यानुसार थकबाकी असताना संचालकपदासाठी काम करणे बेकायदेशीर आहे.…
असा असेल तुमचा आजचा दिवस शुक्रवार दि. ११ ऑक्टोंबर मेष – आपले कार्य वाढवण्यासाठी आपणास सुसंधी मिळणार आहे. आपल्या कार्यक्षेत्रात यश मिळणार आहे तसेच प्रसिद्धीही आपणास मिळू शकते. नवीन कामास प्रारंभ करू शकता. वृषभ – आपण आज जे कार्य कराल त्यामध्ये आपणास यश येईल. काम करण्याची कार्यक्षमता वाढणार आहे. उत्तम मनोबल असल्यामुळे आनंदाने काम कराल. आपणास सहकाऱ्यांचे उत्तम सहकार्य लाभेल. मिथुन – कामात यश येण्यासाठी आपण खूप काम कराल. सातत्याने काम करून यश मिळवा. परदेशातून काही संधी आपणास येण्याची अपेक्षा असेल तर, आज ती सुसंधी निश्चित येईल. कर्क – आर्थिक लाभाचे योग आहेत. पण तसे आपण खर्चही कराल. कुटुंबामध्ये अचानक…
गुरुवार, १० ऑक्टोंबर अहिल्यानगर – अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी अहिल्यानगर जिल्ह्यात २३ ऑक्टोंबरपर्यंत जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू केले आहे. मुंबई पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) व ३७ (३) अन्वये हे आदेश लागू करण्यात आले असून सदरचे आदेश धार्मिक कार्यक्रम, लग्नकार्य, लग्न मिरवणुका किंवा प्रेत यात्रेच्या जमावास लागू राहणार नाहीत. तसेच हा आदेश पोलीस अधिकारी, कामावर असलेल्या इतर शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना, सभा अगर मिरवणूका काढण्यास रितसर परवानगी घेतली असलेल्या व्यक्तींना लागू नाही. आदेशाचा भंग करणाऱ्या विरोधात कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
गुरुवार, १० ऑक्टोबर पुणे – सुनेने न्यायालयात केलेल्या फसवणूक आणि कौटुंबिक हिंसाचाराच्या तक्रारीमुळे आणि न्यायालयाने काढलेल्या नोटीसीमुळे राज्याचे माजी आदिवासी विकासमंत्री व भारतीय जनता पक्षाचे नेते मधुकरराव पिचड, पत्नी कमल आणि संबंधितांच्या यांच्या अडचणीत आगामी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाढ झाली आहे. पिचड यांनी त्यांच्या द्वितीय पत्नी कमल या आदिवासी नसतांना त्यांचा खोटा व बनावट आदिवासी जातीचा दाखला बनून त्याआधारे आमच्या सून श्रीमती सरोज जितेंद्र पिचड यांची संपत्ती हडप करून फसवणूक केली असल्याचे म्हटले आहे. या संदर्भात श्रीमती पिचड यांनी अनुसूचित जाती जमाती तपासणी समितीचे सह आयुक्त यांच्याकडे २०१८ पासून तसेच शहापूर पोलीस निरीक्षक यांच्याकडे देखील तक्रारी केल्या मात्र…
गुरुवार, १० ऑक्टोंबर मुंबई – ज्येष्ठ उद्योगपती पद्मविभूषण रतन टाटा यांना आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबतचा शोकप्रस्ताव बैठकीत मांडला. यावेळी टाटा यांचे कार्यकर्तृत्व लक्षात घेऊन त्यांना भारतरत्न देण्याची केंद्राला विनंती करणारा प्रस्तावही संमत करण्यात आला. या शोकप्रस्तावात म्हटले आहे की, उद्यमशीलता हादेखील समाज उभारणीचा प्रभावी मार्ग असतो. नवनवीन उद्योगांच्या उभारणीनेच देश प्रगतीपथावर नेता येतो, मात्र त्यासाठी हृदयात निस्सीम देशप्रेम आणि आपल्या समाजाप्रती तितकाच प्रामाणिक कळवळा हवा. रतन टाटा यांच्या रुपाने आपण अशाच विचारांचा एक समाजसेवी, द्रष्टा आणि देशप्रेमी मार्गदर्शक गमावला. भारताच्या उद्योगक्षेत्रातच नव्हे, तर समाजउभारणीच्या कामातही टाटा यांचे योगदान अपूर्व होते. ते…
गुरुवार, १० ऑक्टोंबर अहिल्यानगर – आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत जिल्ह्यासाठी पणन महासंघाने मूग, उडिद व सोयाबीन खरेदीसाठी १८ केंद्रांना मंजूरी दिली. याशिवाय मूग, उडिद व सोयाबीन हमीभावाने खरेदीच्या तारखा निश्चित करण्यात आल्या असून जिल्ह्यातील १२ खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा पणन अधिकारी बी. आर. पाटील यांनी दिली. हंगाम २०२४-२५ साठी मूग या पिकासाठी हमीभाव ८ हजार ६८२ प्रति क्विंटल, उडिद ७ हजार ४०० प्रति क्विंटल तर सोयाबीनसाठी ४ हजार ८९२ रुपये प्रति क्विंटल हमीभावाने खरेदी करण्यात येणार आहे. मूग व उडिद पीकाची १० ऑक्टोबर २०२४ ते ७ जानेवारी २०२५ तर सोयाबीन पिकाची १५ ऑक्टोबर २०२४ ते…
गुरुवार, १० ऑक्टोबर मुंबई : ज्येष्ठ उद्योगपती आणि टाटा सन्सचे माजी चेअरमन रतन टाटा यांची बुधवारी रात्री वयाच्या ८६ व्या वर्षी प्राणज्योत मालवली. रतन टाटा यांच्या निधनाने संपूर्ण देशासह जगभरातूनही हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. रतन टाटा यांच्या निधनाचे वृत्त कळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयात जाऊन त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. राज्यातील सर्व मनोरंजन आणि उत्सवाचे कार्यक्रम रद्द करण्यात येत आहेत. तसेच, त्यांच्या पार्थिवावर पूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतील, अशी माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली. ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनाने उद्योगपतींपासून मनोरंजन, राजकारण आणि क्रीडा जगतात शोककळा पसरली आहे. गुरुवारी त्यांचे पार्थिव श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी एनसीपीए येथे ठेवण्यात येणार…
असा असेल तुमचा आजचा दिवस गुरुवार, दि. १० ऑक्टोंबर मेष – संयमाने वागणे आवश्यक आहे. नवीन ओळख झालेल्यांची आती मैत्री करू नका. व्यवहार करताना फार दक्षता बाळगणे आवश्यक आहे. नव्या संकल्पनासाठी ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला मोलाचा ठरणार. वृषभ – मनासारखी आर्थिक प्राप्ती असणार आहे. त्यामुळे कार्य उत्साहाने कराल. मित्र परिवारामध्ये सावधगिरी बाळगावी. आर्थिक व्यवहार निश्चितच टाळा. प्रवासात मोठा त्रास संभवतो. मिथुन – आज आपणास अडचणीच्या मार्गातून काम करावे लागेल. अडचणींवर मात करावीच लागेल. कर्ज देणे घेण्याचे व्यवहार नीट करावे. या कामासाठी प्रवास करावा लागेल दक्षता घेणे आवश्यक आहे. कर्क – कामाचे स्वरूप वाढणार आहे. आपले नियोजन व्यवस्थित होणार आहे. कामे मार्गी…
बुधवार ०९ ऑक्टोबर नित्याच्याच बनलेल्या दुचाकी चोऱ्या, महिलांच्या गळ्यातील दागिने पळविणे, रोकड लंपास करणे या घटनांमुळे संगमनेर पोलिसांचे चोरट्यांवरील नियंत्रण पूर्णतः सुटले असल्याचे समोर येत असून ऐन सणासुदीत संगमनेरकर महिला असुरक्षित बनल्या आहे. सातत्याने वाढणाऱ्या या घटनांमध्ये मंगळवारी आणि बुधवारी आणखी भर पडली. त्यामुळे चोरीची ही मालिका कधी खंडित होणार असा प्रश्न संगमनेरकरांनी उपस्थित केला आहे. चोरट्यांसाठी अतिशय सॉफ्ट ठरलेल्या एसटी बस स्थानकातून महिलेचे दागिने लंपास करण्याच्या घटनेला काही तास होत नाही तोच पुन्हा घडलेल्या घटनांनी पुन्हा एकदा नव्या पोलीस उपअधीक्षक, निरीक्षकांसह पूर्ण पोलिस यंत्रणेला आव्हान निर्माण केले आहे. त्यामुळेच की काय पोलिसांकडून चोरीचे स्वतंत्र गुन्हे नोंदविण्याऐवजी एकाच गुन्ह्यात दुसरा…
बुधवार, ०९ ऑक्टोंबर शिर्डी – शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नवीन एकात्मिक टर्मिनल इमारतीचे भूमिपूजन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिल्ली येथून दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून करण्यात आले. शिर्डी विमानतळाची नवीन टर्मिनल इमारतीमुळे शिर्डी व परिसरातील धार्मिक पर्यटन आणि आर्थिक विकासाला चालना मिळणार आहे, असे प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी याप्रसंगी केले. शिर्डी विमानतळ येथील कार्यक्रमाप्रसंगी महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार आशुतोष काळे, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी आशिष येरेकर, शिर्डी विमानतळ संचालक गौरव उपश्याम उपस्थित होते. मोदी म्हणाले, शिर्डी विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीमुळे साईबाबांच्या भक्तांना सुविधा मिळणार आहेत. यामुळे शिर्डी, शनिशिंगणापूर व आजूबाजूच्या परिसरातील भक्तांच्या संख्येत वाढ…
बुधवार, ०९ ऑक्टोंबर नुकतेच अहमदनगर शहराचे नाव बदलून ते अहिल्यानगर करण्यात आले होते. या संबंधीच्या बदलाला केंद्र सरकारने परवानगी दिल्यानंतर आता महसूल विभागाने तालुक्याच्या नावासह जिल्ह्याच्या नावात देखील बदल केला आहे. मंगळवारी या संदर्भातील राजपत्र प्रसिद्ध झाले. त्यामुळे आता काना मात्रा वेलांटी नसलेल्या शहराची आणि जिल्ह्याची ओळख राज्यात अहिल्यानगर या नव्या नावाने होणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून अहमदनगर शहर आणि जिल्ह्याच्या नावात बदल करण्याचे सुतोवाच राज्यकर्त्यांनी केले होते. अहमदनगर ऐवजी अहिल्यानगर अथवा अंबिकानगर अशा स्वरूपाचे नाव देण्यासंदर्भात मागणी करण्यात आली होती. अखेरीस अहमदनगरला अहिल्यानगर असे नाव देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. त्यानंतर केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाने १ ऑक्टोंबरला दिलेल्या अनुमतीनंतर…
बुधवार, ०९ ऑक्टोंबर संगमनेर : संगमनेर नगर परिषदेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास शासनाची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. यातून सांडपाणी स्वच्छता ओला व सुका कचरा वर्गीकरण व त्यावर प्रक्रिया याचे शास्त्रोक्त व्यवस्थापन नगर परिषदेला करता येईल. या प्रस्तावास नुकतीच मान्यता मिळाल्याने संगमनेर शहर स्वच्छतेस अधिक हातभार लागणार आहे. हा प्रकल्प राबवण्यासाठी सरकारने सुमारे दोन कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे. माजी मंत्री, आमदार बाळासाहेब थोरात यांनी याबाबत मंत्रालय पातळीवर पाठपुरावा केला होता. केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानच्या धर्तीवर राज्यामध्ये स्वच्छ महाराष्ट्र अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाद्वारे राज्यातील सर्व शहरे कचरामुक्त करण्याचे उद्दिष्ट असून या अंतर्गत शहरातील सर्व प्रकारच्या घनकचऱ्याचे शास्त्रोक्त व्यवस्थापन,…
असा असेल तुमचा आजचा दिवस बुधवार, दि. ०९ ऑक्टोंबर मेष – घरातील वातावरण खेळीमेळीचे ठेवण्याचा प्रयत्न करा. छोट्या-मोठ्या तक्रारी विचारविनिमयाने सोडवणे आवश्यक आहे. महत्वाच्या निर्णयांमध्ये घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला घ्या. वृषभ – लहान भावंडांना मदत करावी लागेल. त्यामुळे घरामध्ये छोटी मोठी वादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. पण तुम्ही तुमचे कर्तव्य करा तुमच्यासाठी त्यांच्या मनात आदराची भावना उत्पन्न होईल. मिथुन – खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. खर्चावर नियंत्रण ठेवणे खूपच आवश्यक आहे. अनावश्यक खर्च टाळावा, उत्पन्न कमी खर्च वाढेल अशी स्थिती होऊ देऊ नका मनोबल चांगले ठेवा. कर्क – व्यवहार करताना भावनेचा विचार करू नका. आर्थिक नुकसान होईल नंतर वाईट वाटून घेण्यात…
मंगळवार, ०८ ऑक्टोंबर सोलापूरमध्ये मंगळवारी राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री अनुक्रमे देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा वचनपूर्ती सोहळा पार पडला. यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, महिलांना या योजनेचा लाभ मिळत असल्याने समाधान व आनंद वाटतो. ही योजना पुढील पाच वर्षे शासन सुरु ठेवेल. राज्यातील सर्व उपसा योजनांचे सौर ऊर्जीकरण करण्यात येणार असून यासाठी ३ हजार ३६६ कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या माध्यमातून राज्यातील सर्व शेतकऱ्यांना त्यांच्या शेती पंपासाठी दिवसा वीज देण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, राज्य शासन समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी विविध कल्याणकारी योजना राबवत आहे. मुख्यमंत्री…
मंगळवार, ०८ ऑक्टोंबर संगमनेर – रशिया युक्रेन युद्ध, इराण इस्त्राईल संघर्ष या पार्श्वभूमीवर जागतिक परिस्थिती अस्थिर झाली असतानाही भारत जगासाठी आश्वासक असे गुंतवणूक केंद्र आहे. सद्यस्थितीत भारतीय अर्थव्यवस्था ब्रिटनला मागे टाकून जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली आहे. भारताचा जीडीपी वाढीचा वेग बघता २०४७ पर्यंत भारतीय अर्थव्यवस्था जागतिक पातळीवर दुसऱ्या क्रमांकाची होईल, असा आशावाद एमएफडी सुनील कडलग यांनी व्यक्त केला. संगमनेर येथील शिक्षण प्रसारक संस्थेच्या शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या प्रेरणा कार्यक्रमात कडलग ‘चला अर्थ साक्षर होऊयात’ या विषयावर बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.भालचंद्र भावे, एमबीए कॉलेजचे प्राचार्य डॉ. किरण गोंटे, प्रा. राजू शेख उपस्थित होते. प्रास्ताविकात प्रा. नयना पंजे…
मंगळवार, ८ ऑक्टोबर संगमनेरमध्ये बहुतांशी रुग्णालयाशी संलग्न असलेल्या औषध दुकानांमधून (medical Store) औषध घेण्याची सक्ती रुग्ण, रुग्णांच्या नातेवाईकांना केली जाते. या औषध दुकानातून छापील किमतीवर औषधांची विक्री केली जात असल्याने रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना मोठा आर्थिक भार सहन करावा लागतो. या उलट रुग्णालयाशी संलग्न नसलेल्या अनेक औषधांच्या दुकानातून औषधांवर दहा ते पंचवीस ते टक्क्यांपर्यंत सवलत दिली जात असल्याने अशा प्रकारची सवलत सामाजिक बांधिलकी जोपासत रुग्णालयांशी संलग्न औषध दुकानातून देण्याची मागणी शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) संगमनेर शहर संघटक तथा युवा सेना उपजिल्हा समन्वयक रवींद्र कानकाटे यांनी केली आहे. रुग्णालयांशी संघटना असलेल्या औषध विक्रेत्यांनी अशा प्रकारची सवलत रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईकांना दिली…
