Author: अनंत पांगारकर
सोमवार, ०८ जुलै हवामान खात्याने मुंबईला ऑरेंज अलर्ट दिला असून राज्य आपत्ती नियंत्रण विभाग, मुंबई महापालिका, रेल्वे प्रशासन एकत्रितपणे काम करून मुंबईकरांना दिलासा देण्याचं काम करीत आहेत. मुंबईत काल रात्रीपासून २६७ ते ३०० मिलीमीटर एवढ्या मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला आहे. नागरिकांना मदतीसाठी सर्वोच्च प्राधान्य दिले जात असून सर्व यंत्रणा २४ तास अलर्ट मोडवर असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. मंत्रालयातील राज्य आपत्ती नियंत्रण कक्षाला भेट देऊन मुख्यमंत्री शिंदे यांनी मुंबई महापालिकेच्या नियंत्रण कक्षाला भेट देऊन मुंबईच्या परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांच्या समवेत मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, ग्रामविकास विभागाचे मंत्री गिरीष महाजन, मुख्य…
सोमवार, ०८ जुलै आई आणि पत्नीच्या कर्ज थकबाकीपोटी पतसंस्थेला दिलेला धनादेश न वटता परत आल्याने दाखल असलेल्या खटल्यात श्याम दिगंबर मयूर (रा. मयूर ज्वेलर्स, संगमनेर) या आरोपीला संगमनेरच्या अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी गुरुवारी एक वर्ष साध्या कारावासाची आणि १० लाख ६० हजार रुपये नुकसान भरपाई देण्याची शिक्षा ठोठावली. अधिक माहिती अशी, आरोपी श्याम दिगंबर मयूर यांची आई वत्सलाबाई दिगंबर मयूर आणि पत्नी संगीता शाम मयूर यांनी संगमनेर शहरातील गृहलक्ष्मी महिला सहकारी पतसंस्थेकडून प्रत्येकी एक वर्षाच्या कालावधीसाठी २ लाख ७५ हजार रुपये कर्ज घेतले होते. या कर्जासाठी आरोपी शाम मयूर हा जामीनदार होता. कर्जदार कर्जाची रक्कम भरण्यात अपयशी ठरल्याने ते संस्थेत थकबाकीदार…
सोमवार, ०८ जुलै आदरणीय एकनाथ (दादा) शिंदे मुख्यमंत्री – महाराष्ट्र राज्य दादा! पत्र लिहिण्यास कारण की, तू सुरू केलेली लाडकी बहीण माझी या योजनेअंतर्गत आम्हाला तू दर महिन्याला १५००/- रुपये देणार आहेस. पण दादा हे पैसे आम्हाला नको. या बदल्यात तू … गॅसचे दर कमी कर, विजेचा दर कमी कर, चांगले रस्ते तयार कर, ट्रॅफिक समस्या सोडण्याचा प्रयत्न कर. जेणेकरून असा विचार केलास तर तुझ्या भाओजीनां पैशाची चणचण लागणार नाही. त्यांच्या कमी पगारात, कमाईतपण तुझी बहीण सुखी राहील. दादा, आणखी एक विनंती करते, तुझ्या लाडक्या भाचा-भाचीची शाळेची फी पण काय कमी करता येते का बघ जेणे करून तुझे भाचे सगळ्याना…
सोमवार, ०८ जुलै शीतपेयाच्या खरेदीपोटी व्यापाऱ्याला दिलेले चार चेक न वटल्याने तसेच मागणी करूनही आरोपीने पैसे न दिल्यामुळे त्याच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या संगमनेर न्यायालयातील चार वेगवेगळ्या खटल्यात न्यायालयाने आरोपीला मोठी शिक्षा ठोठावली आहे. रोहित बाळासाहेब हासे (रा. गुंजाळवाडी, संगमनेर) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. न्यायाधीश गिरीश देशमुख यांच्या न्यायालयाने नुकताच हा निर्णय दिला. आरोपी रोहित हासे याने या खटल्यातील फिर्यादी ऋषिकेश एजन्सीचे मालक अनंत दिगंबर कल्याणकर यांच्याकडून पेप्सी, पेप्सी कोला इत्यादी पेये विक्रीसाठी खरेदी केले होते. या खरेदी पोटी त्याने कल्याणकर यांना प्रत्येकी ५० हजार, ६० हजार, ५२,६०५, ६० हजार रुपयांचे असे चार चेक दिले होते. मात्र कल्याणकर…
सोमवार, ०८ जुलै आपल्या शुद्ध आयुर्वेद उपचारपद्धतीसाठी महाराष्ट्रात नावाजलेल्या आणि उत्तर महाराष्ट्रातील सर्वांत अद्ययावत असलेल्या एसएमबीटी आयुर्वेद हॉस्पिटतर्फे बालकांसाठी मोफत सुवर्णप्राशन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर सोमवारी (८ जुलै) होणार असून सकाळी ९ ते दुपारी ३.३० वाजेपर्यंत बालकांना सुवर्णप्राशन संस्कार केले जाणार आहेत. जास्तीत जास्त नागरिकांनी त्यांच्या बालकांना मोफत सुवर्णप्राशन करण्यासाठी भेट द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. सिन्नर-घोटी रस्त्यावर धामणगाव येथे एसएमबीटी सेवाभावी संस्थेचे एसएमबीटी आयुर्वेद रुग्णालय आहे. उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या क्षमतेचे आणि तज्ज्ञ चिकित्सक असलेल्या एसएमबीटी आयुर्वेद रुग्णालयाकडून मोफत सुवर्णप्राशन व विशेष आयुर्वेद चिकित्सा शिबिर आयोजित केले आहे. सुवर्ण प्राशन हे लहान मुलांच्या शारीरिक विकासासाठी…
रविवार ७ जुलै | अनंत पांगारकर पोलीस उपअधीक्षक, प्रांत अधिकारी कार्यालय, संगमनेर शहर पोलीस ठाणे आणि दारूबंदी विभागाच्या कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील शक्तिमान टॉवर्समध्ये अवैध धंदे बोकाळले असून याकडे पोलीस यंत्रणेचे दुर्लक्ष झाल्याने हॉटस्पॉट बनलेल्या या परिसरात गंभीर घटना घडण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. सुसंस्कृत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संगमनेरला अवैध धंद्यांवर नियंत्रण ठेवण्यात अयशस्वी ठरलेल्या अधिकाऱ्यांच्या अवकृपेने अवैध धंद्यांचा कलंक लागला आहे. शहरातील अवैध धंदे राजरोसपणे सुरू असून पोलिस आणि संबंधित यंत्रणांच्या एजंट मार्फत होणाऱ्या अर्थपूर्ण नात्यामुळे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आहे. विविध विकास कामे, मोठी बाजारपेठ आणि सहकारी…
रविवार, ०७ जुलै १६ वर्षांपूर्वी सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या एका खटल्यातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना या नव्या पक्षाची स्थापना केली. २००७ साली स्थापन केलेल्या मनसे पक्षाच्या सुरुवातीच्या काळातच राज यांनी मराठीच्या मुद्द्यावरुन सांगली जिल्ह्यातील शिराळा येथे आंदोलन केले होते. २००८ साली रेल्वे भरतीमध्ये मराठी मुलांना प्राधान्य देण्याच्या मुद्द्यावरुन मनसेनं रान उठवलं होतं. मध्य रेल्वेने विविध पदांसाठी भरती सुरु केली होती. त्यात मराठी मुलांना संधी द्यावी यासाठी मनसेने महाराष्ट्रभर आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनाला शिराळा तालुक्यात काही ठिकाणी हिंसक वळण…
रविवार, ०७ जुलै दुधाला ४० रुपये प्रति लिटर भाव मिळावा या मागणीसाठी दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्यावतीने राज्यभर आंदोलने सुरू आहेत. अकोले तालुक्यातील कोतुळ येथे सुरू असलेल्या आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांचा मोठा सहभाग वाढला असून युवक शेतकरी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी होत आहेत. अकोले तालुक्याचे आमदार डॉ. किरण लहामटे यांनी कोतुळ येथे जाऊन आंदोलकांची भेट घेतली. दूध उत्पादकांचे व शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेतले व प्रश्न सोडवण्यासाठी यथायोग्य सहकार्य करू असे आश्वासन दिले. राज्य सरकारने दुधाला ३० रुपये भाव सहकारी व खाजगी संघांनी द्यावा व सरकार ५ रुपयाचे अनुदान देईल, याप्रमाणे ३५ रुपये भाव देण्याचा शासन आदेश काढलेला आहे. मात्र राज्यातील…
भारतीय लोकशाहीचं मंदिर असलेल्या संसद भवनात गेल्या आठवड्यात पार पडलेल्या दोन महत्वाच्या भाषणांवरचं देशाचं लक्ष आजही सरत नाहीए. त्यात एक होतं ते लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचं तर दुसरं होतं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं. या दोन भाषणांची तुलना करायची तर एक झकास आणि दुसरं भकास, असंच म्हणता येईल. संसदीय कार्यपध्दतीत सरकारवर होणार्या आरोपांना मुद्देसूद उत्तरं देणं ही उत्तर देणार्याची जबाबदारी असते. ती त्याने पार न पाडली तर संसदीय प्रणालीला ते मारक मानलं जातं. नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान झाल्यापासून संसदीय कार्यपध्दतीचा पुरता हिरमोड झाला आहेच. लोकसभेतील विरोधी पक्ष खासदारांची संख्या अगदीच मर्यादित झाल्याचा फायदा घेत मोदींच्या सरकारने नको…
शनिवार, ०६ जुलै जिल्ह्याच्या विकासाचे सातत्य टिकवून ठेवताना दर्जेदार व गुणवत्तापूर्वक विकास कामे करण्याचे व विकास कामांमध्ये अधिक गतिमानता आणण्यासाठी यंत्रणा प्रमुखांनी प्रलंबित प्रकरणांचा क्षेत्रीय स्तरावर आढावा घेण्याचे निर्देश पालकमंत्री तथा राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शनिवारी यंत्रणांना दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत दूरदृश्यप्रणालीद्वारे पालकमंत्री विखे यांनी हे निर्देश दिले. यावेळी सभागृहात आमदार प्रा. राम शिंदे, आमदार बबनराव पाचपुते, आमदार रोहित पवार, आमदार प्राजक्त तनपुरे, आमदार मोनिकाताई राजळे, आमदार सत्यजित तांबे, आमदार लहू कानडे, आमदार संग्राम जगताप हे दूरदृश्यप्रणालीद्वारे तर प्रत्यक्ष जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आमदार डॉ. किरण लहामटे, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश…
