Author: अनंत पांगारकर

संगमनेर – नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजीत तांबे यांनी संगमनेर शहराचे ‘विद्रूपीकरण’ थांबवण्यासाठी संगमनेर नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना गुरुवारी (९ ऑक्टोबर) एक कळकळीचे पत्र लिहिले आहे. शहरात अनधिकृतपणे लावण्यात आलेल्या फ्लेक्स, कमानी, झेंडे आणि पोस्टरमुळे शहराचे सौंदर्य हरवत चालल्याची खंत त्यांनी या पत्रातून व्यक्त केली आहे. संगमनेर नगर परिषदेच्या प्रभारी मुख्याधिकारी धनश्री पवार या पत्राच्या अनुषंगाने काय दखल घेतात हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल. ‘एक संगमनेरकर’ म्हणून संवाद – तांबे यांनी हे पत्र आमदार म्हणून नव्हे, तर ‘एक संगमनेरकर’ म्हणून लिहिले असून, ते स्वतः देखील याप्रकरणी दोषी असल्याची कबुलीही देतात. राजकीय स्पर्धेत नाईलाजाने आवडत नसतांनाही आम्हाला उतरावे लागते, असे त्यांनी…

Read More

संगमनेर – नाशिक–पुणे राष्ट्रीय महामार्गावरील सुरू असलेल्या कॉंक्रिटिकरण आणि पुलांच्या कामांमुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर आमदार सत्यजीत तांबे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन पाठवले असून नाशिक–पुणे राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्यांची कामे होईपर्यंत टोलवसुली थांबवा असे आमदार सत्यजीत तांबे यांनी सांगितले. आमदार तांबे म्हणाले, पूर्वी संगमनेर ते नाशिक हा प्रवास केवळ एका तासात पूर्ण होत होता. मात्र सध्या त्याच अंतरासाठी दोन तासांपेक्षा अधिक वेळ लागत असून नाशिक ते पुणे हा प्रवास तब्बल सहा तासांपर्यंत वाढला आहे. महामार्गावरील मोठमोठे खड्डे, खराब नियोजन आणि अपुरे वाहतूक व्यवस्थापन यामुळे अपघातांचे प्रमाण देखील वाढले आहे.…

Read More

संगमनेर – प्रवरा चिट्स प्रा. लि. कंपनीच्या भिशी व्यवहारात दिलेला धनादेश अनादरीत झाल्याचे सिद्ध झाल्याने संगमनेर येथील कोर्टाने आरोपी सुर्यभान हरीभाउ नाईकवाडी यांना एक महिन्याच्या साध्या कारावासाची शिक्षा ठोठावत थकीत रक्कम महिनाभराच्या आत फिर्यादीला देण्याचे आदेश न्यायालयाने दिले.  संगमनेरचे ४ थे सह दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर तथा अतिरीक्त मुख्य न्यायदंडाधिकारी जे. व्ही. भेंडे यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी झाली. प्रवरा चिट्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स ॲक्टचे कलम १३८ नुसार दाखल केलेल्या या खटल्यामध्ये सुर्यभान हरीभाउ नाईकवाडी हे आरोपी होते. आठ वर्षे हा खटला सुरू होता.  न्यायालयात ॲड. कुलभूषण महाले यांच्यामार्फत दाखल करण्यात आलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी हा कंपनीच्या भिशी योजनेचा सदस्य…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट किंवा व्हिडिओ प्रसारित करणाऱ्यांवर पोलीस विभागाने कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. याचाच एक भाग म्हणून, कॉलेजला जाणाऱ्या मुलींची छेड काढण्याचा उद्देश असलेला एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर अपलोड केल्याबद्दल दोन तरुणांवर लोणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. या संदर्भात श्रीरामपूर विभागाचे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी, (४ ऑक्टोबर २०२५) श्रीरामपूर येथील शाहिद हुसेन शेख (वय २१) आणि सात हशम सय्यद (वय २०) या दोघांनी परिसरामध्ये एक व्हिडिओ तयार केला. हा व्हिडिओ त्यांनी इंस्टाग्रामवर अपलोड केला होता. व्हिडिओमध्ये हे दोन्ही तरुण श्रीरामपूरहून लोणी…

Read More

छत्रपती संभाजीनगर: मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस उपनिरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ८,००० रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे. तक्रारदाराच्या भावाविरुद्ध दाखल असलेल्या शस्त्र अधिनियम गुन्ह्यात मदत करण्यासाठी आरोपी पोलीस उपनिरीक्षक वसंत राऊत (वर्ग २) यांनी ही लाच स्वीकारली. आरोपी लोकसेवक, वसंत राऊत (वय ४३ वर्षे) हे मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात कार्यरत असून तक्रारदाराच्या भावाविरुद्ध मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात शस्त्र अधिनियम कायद्यान्वये गुन्हा दाखल होऊन त्याला अटक करण्यात आली होती. सदर गुन्ह्यात मदत करणे, पुढील कायदेशीर प्रक्रियेत सहकार्य करणे आणि न्यायालयात जामीन मिळवण्यासाठी मदत करण्याच्या मोबदल्यात आरोपी राऊत यांनी तक्रारदाराकडे सुरुवातीला १०,०००/- रुपयांची लाच मागितली. तडजोडीनंतर ही रक्कम ८,०००/- रुपये निश्चित…

Read More

आज ०९ ऑक्टोबर, जागतिक टपाल दिन. टोकियोत १९६९ मध्ये आयोजित केल्या गेलेल्या युनिव्हर्सल पोस्टल काँग्रेसच्या संमेलनात जागतिक टपाल दिनाची घोषणा करण्यात आली होती. १८७४ मध्ये युनिव्हर्सल पोस्टल युनियन (UPU) निर्मितीच्या वर्धापन दिनानिमित्त स्वित्झर्लंड राजधानी बर्न या शहरात २२ देशांनी एकत्र येऊन करारावर सही केली होती. १ जुलै १८७६ ला भारत ‘युनिवर्सल पोस्टल युनियन’ चा सदस्य होणारा पहिला आशियाई देश ठरला. या वर्षी युनिव्हर्सल पोस्टल युनियनने “पोस्ट फॉर पीपल” या थीमवर जागतिक टपाल दिनाचे आयोजन केले आहे. संपूर्ण भारतभर हा आठवडा राष्ट्रीय टपाल सप्ताह म्हणून साजरा केला जातो. या पूर्ण आठवड्यात पोस्टाच्या विविध योजना,भूमिका सामाजिक व आर्थिक विकासातील योगदान याविषयी जनसामान्यांमध्ये…

Read More

मेष (Aries) – आत्मविश्वास वाढेल. रखडलेली कामे पूर्ण होण्यास मदत मिळेल. वडील आणि कुटुंबियांचे सहकार्य महत्त्वाचे ठरेल. मात्र, रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे, अन्यथा कौटुंबिक तणाव वाढू शकतो.  वृषभ (Taurus) – जुन्या मित्रांशी भेट होईल. आर्थिक खर्च जपून करा. कामाच्या ठिकाणी षड्यंत्रांपासून सावध राहावे लागेल. जोडीदारासोबत वाद होण्याची शक्यता आहे, त्यामुळे बोलताना काळजी घ्या. मिथुन (Gemini) – काहीतरी नवीन सुरू करण्याचा विचार असेल, पण घाई न करता सर्व बाजूंनी विचार करून निर्णय घ्यावा. कामातील ऊर्जा चांगली राहील. कर्क (Cancer) – आजचा दिवस चांगला आहे. करिअरमध्ये प्रगतीच्या संधी मिळतील. व्यवसायात काम वाढेल. प्रवासाचा योग आहे. नातेसंबंध मजबूत होतील. सिंह (Leo) -…

Read More

संगमनेर – सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर राज्यभरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेने वेग घेतला आहे. या पार्श्वभूमीवर संगमनेर तालुक्यातील जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणासाठी राखीव जागांची आरक्षण सोडत सोमवारी (१३ ऑक्टोबर) काढण्यात येणार असल्याची माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे तहसीलदार धीरज मांजरे यांनी दिली आहे.  संगमनेर तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेचे ९ गट तर पंचायत समितीचे १८ गण आहेत. जिल्हा परिषदेच्या ९ गटामध्ये समनापुर, तळेगाव, आश्वी बुद्रुक, जोर्वे, घुलेवाडी, धांदरफळ बुद्रुक, चंदनापुरी, बोटा व साकुर या गटांचा समावेश आहे. तर पंचायत समितीच्या १८ गणांमध्ये निमोण, समनापुर, तळेगाव, वडगाव पान, आश्वी बुद्रुक, आश्वी खुर्द, जोर्वे, अंभोरे, घुलेवाडी, गुंजाळवाडी, राजापूर, धांदरफळ बुद्रुक, संगमनेर खुर्द, चंदनापुरी,…

Read More

संगमनेर: आमदार सत्यजीत तांबे यांचे प्रत्येक गोष्टीवर किती बारीक लक्ष असते, याचे आणखी एक उदाहरण संगमनेरकरांना पाहायला मिळाले आहे. शहरातील राज्य उत्पादन शुल्क कार्यालयासमोर अनेक दिवसांपासून धूळ खात पडलेली, कारवाईत जप्त केलेली वाहने हटविण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित दादांनी ग्रीन सिग्नल दिल्यानंतर बुधवारी ही वाहने काढण्यात आली. मोक्याच्या ठिकाणी असलेल्या या कार्यालयासमोरच महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे. त्यामुळे याच ठिकाणी समाजबांधव मोठ्या संख्येने जमून जयंती, महापरिनिर्वाण दिन यासह अनेक महत्त्वपूर्ण सामाजिक कार्यक्रम आयोजित करतात. मात्र, वर्षानुवर्षे पडून असलेल्या या जप्त वाहनांमुळे कार्यक्रमांच्या आयोजकांना प्रचंड त्रास होत होता. तसेच, हा परिसर नागरिकांच्या वर्दळीचा असल्याने वाहतुकीसाठी व सुरक्षिततेच्या दृष्टीनेही ही वाहने दुसरीकडे…

Read More

संगमनेर – गेल्या तीन-चार वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेला वेग आला आहे. संगमनेर नगरपालिका निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर बुधवारी प्रभाग निहाय आरक्षण सोडत काढण्यात आली.  पिठासन अधिकारी तथा संगमनेरचे प्रांताधिकारी अरुण उंडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही सोडत काढण्यात आली असून यावेळी पालिकेच्या प्रभारी मुख्याधिकारी धनश्री पवार, प्रशासन अधिकारी संजय पेखळे, राजेंद्र गुंजाळ आदी उपस्थित होते. असे आहे प्रभाग निहाय आरक्षण… प्रभाग १ अ – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला प्रभाग १ ब – सर्वसाधारण प्रभाग २ अ – अनुसूचित जाती प्रभाग २ ब – सर्वसाधारण महिला  प्रभाग ३ अ – नागरिकांचा मागास प्रवर्ग  प्रभाग ३ ब…

Read More