Author: अनंत पांगारकर
अहिल्यानगर दि. २६ मार्च – अहिल्यानगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) श्रीगोंदा येथील दुय्यम निबंधक कार्यालयात मोठी कारवाई करत सचिन पांडुरंग खताळ या दुय्यम निबंधकाला ५००० रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले आहे. तक्रारदार हे वकील असून जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांनी श्रीगोंदा येथील गट क्रमांक ११७१ मधील ५ हेक्टर ६८ आर क्षेत्रापैकी २८ आर जमीन खरेदी केली होती. या जमिनीच्या खरेदी विक्रीचा दस्त नोंदवण्यासाठी तक्रारदारांनी दुय्यम निबंधक सचिन खताळ यांच्याकडे दिला होता. खताळ यांनी या कामासाठी तक्रारदाराकडे १०,००० रुपयांची लाच मागितली. त्यानंतर, २६ मार्च २०२५ रोजी तक्रारदाराने आणखी एका जमिनीच्या विक्रीचा दस्त नोंदवण्यासाठी खताळ यांच्याकडे दिला. यावेळी खताळ यांनी या…
नाशिक, दि. २६ मार्च – रोजगार हमी योजनेतील देयके मंजूर करण्यासाठी २ लाख १० हजार रुपयांची लाच घेताना सुरगाणा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी महेश पोतदार यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली आहे. त्यांच्या नाशिक येथील घरातून २ लाख १० हजार रुपयांची रोकड आणि मालमत्तेची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. तक्रारदार हे महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेत सुरगाणा तालुक्यातील गावांमध्ये पुरवठादार म्हणून काम करतात. त्यांची २ कोटी ३२ लाख ३० हजार २७ रुपयांची देयके प्रलंबित होती. ही देयके मंजूर करण्यासाठी पोतदार यांनी तक्रारदाराकडे २ लाख १० हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केल्यानंतर, विभागाने सापळा…
संगमनेर, दि. २६ मार्च – प्रतिनिधी जम्मू-काश्मीरमधील तंगधार सेक्टरमध्ये भारत-पाकिस्तान नियंत्रण रेषेवर कर्तव्य बजावत असताना वीरमरण आलेले मेंढवण गावचे सुपुत्र हवालदार रामदास साहेबराव बढे (वय ४४) यांच्यावर आज (दि. २६ मार्च) संगमनेर तालुक्यातील मेंढवण येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. शहीद रामदास बढे यांचे पार्थिव आज सकाळी मेंढवण येथे आणण्यात आले. त्यानंतर लष्करी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला. यावेळी भारतीय लष्कराच्या मराठा फिल्ड रेजिमेंट आणि पोलिसांच्या पथकांनी हवेत बंदुकीच्या फैरी झाडून शहीद बढे यांना मानवंदना दिली. ‘भारत माता की जय’ आणि ‘शहीद रामदास बढे अमर रहे’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमला. शहीद रामदास बढे यांचे…
संगमनेर, दि. २६ मार्च – प्रतिनिधी संगमनेर तालुक्यातील ग्रामीण विकासाला चालना देण्यासाठी आमदार अमोल खताळ यांनी ११ कोटी १८ लाख रुपयांचा निधी मंजूर करून घेतला आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या सहकार्याने जिल्हा नियोजन व विकास समितीच्या माध्यमातून हा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांचा विकास, जिल्हा परिषदेच्या शाळा खोल्यांचे बांधकाम तसेच अन्य नागरी सुविधांची कामे होणार आहेत. जिल्हा नियोजन व विकास समितीच्या माध्यमातून तालुक्यातील विकास कामांच्या संदर्भात दाखल झालेल्या प्रस्तावांना मंजूरी मिळाल्याने या विकास कामांसाठी हा निधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आमदार खताळ म्हणाले, तालुक्यातील १९ रस्त्यांसाठी ३ कोटी ७० लाख रुपये मंजूर झाले…
संगमनेर, दि. २६ मार्च – प्रतिनिधी परमपूज्य गोवत्स श्री राधाकृष्णजी महाराज यांच्या अमृतवाणीतून १ एप्रिल ते ९ एप्रिल या कालावधीत संगमनेरच्या मालपाणी लॉन्सवर भव्य श्रीराम कथेचे आयोजन करण्यात आले आहे. श्रीराम कथा भाविक श्रोत्यांसाठी मोठी पर्वणी ठरणार आहे. या माध्यमातून संगमनेर शहर लवकरच एका भव्य धार्मिक कार्यक्रमाचे साक्षीदार होणार आहे. १ एप्रिल ते ९ एप्रिल या कालावधीत दररोज दुपारी तीन ते सायंकाळी साडेसहा वाजेच्या दरम्यान राधाकृष्णजी महाराज यांच्या सुमधुर वाणीतून संगमनेरकरांना श्रीराम कथा श्रवण करण्याचे सौभाग्य मिळणार आहे. या कथेदरम्यानच राधाकृष्णजी महाराज यांच्या रसाळ व गोड वाणीतून भजनाचा देखील आनंद लुटता येणार आहे. श्रीराम कथा श्रवणाच्या माध्यमातून श्रोत्यांना जीवनातील जगण्याचे…
मी संपूर्ण राज्याचा मंत्री आहे या तत्वाने वागणारे नेते, राजकारणातील तत्वनिष्ठ, ऋषितुल्य जीवन जगणारे, शेवटपर्यंत काँग्रेसचे, गांधीचे विचार जपणारे, गांधी कुटुंबाशी एकनिष्ठ राहणारे, कुठलीही अपेक्षा न बाळगणारे तत्त्वनिष्ठ राजकारणी, पाटबंधारे मंत्री म्हणून महाराष्टात अनेक धरणाचे शिल्पकार परंतु हे मी केलं अस कधीही न सांगणारे तत्वनिष्ठ व्यक्तिमत्व, संगमनेर साखर कारखान्याचे मुख्य प्रवर्तक परंतु मी केलं किंवा माझं नाव द्या अस न सांगणारे राजकारणी, माजी आमदारांची मुलगी असतानासुध्दा आपल्या पत्नीला राजकारणात न आणणारे तत्वनिष्ठ पुढारी, माझ्या पुण्याईवर नाही तर स्वतःच्या कर्तृत्वावर राजकारणात या असा सल्ला आपले मुलं, नातवंडे यांना देणारे तत्वनिष्ठ पालक, मी सर्व जनतेचा लोकप्रतिनिधी आहे म्हणून स्वतःच्या नातेवाईक अथवा जवळच्या…
मुंबई, दि. २५ मार्च – विशेष प्रतिनिधी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अंतिम आठवडा प्रस्तावावर विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला. “राज्यात कायद्याचे राज्य राहिले नसून अराजकाची परिस्थिती निर्माण झाली आहे,” असा आरोप त्यांनी केला. दानवे म्हणाले, “हे सरकार कोत्या मनोवृत्तीने चालवले जात आहे. राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. २०२४ मध्ये राज्यात ७ लाख ८२ हजार ९६० गुन्हे नोंदवले गेले आहेत. अमरावती विभागात दंगलीचे ५६४ गुन्हे घडले आहेत, नागपूरमध्ये ८८ हत्या झाल्या आहेत, छत्रपती संभाजीनगरमध्ये बलात्काराच्या १६६ घटना घडल्या आहेत, आणि पुण्यात ५०६ गुन्हे घडले आहेत. तुरुंगातील कैद्यांची क्षमता २७ हजार ११४ असताना ४३ हजार…
संगमनेर, दि.२५ मार्च – प्रतिनिधी जम्मू-काश्मीरमधील तंगधार येथे कर्तव्य बजावत असताना संगमनेर तालुक्यातील मेंढवण गावातील जवान रामदास साहेबराव बडे (वय ३८) यांना वीरमरण आले. त्यांच्या निधनाने संपूर्ण तालुक्यात शोककळा पसरली आहे. रामदास बडे हे जम्मू-काश्मीरमधील तंगधार जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर कर्तव्य बजावत होते. त्यावेळी त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. रामदास बडे हे ३४ एफ रेजिमेंटमध्ये हवालदार म्हणून कार्यरत होते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन ते सैन्यात भरती झाले होते. त्यांच्या निधनाने मेंढवण गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शहीद रामदास बडे यांच्या पार्थिवावर उद्या (बुधवार, २६ मार्च) दुपारी १ वाजता त्यांच्या मूळ गावी, मेंढवण येथे शासकीय…
अहिल्यानगर, दि. २५ मार्च येत्या काही दिवसात संगमनेर येथील सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना आणि प्रवरानगर येथील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना यांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांसाठी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. संगमनेर कारखान्यासाठी संगमनेरचे उपविभागीय अधिकारी शैलेश हिंगे यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. संगमनेरचे तहसीलदार धीरज मांजरे हे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहतील. तर प्रवरानगर येथील विखे पाटील कारखान्यासाठी शिर्डीचे उपविभागीय अधिकारी माणिक आहेर यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राहात्याचे तहसीलदार अमोल मोरे हे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी…
मुंबई, दि. २५ मार्च – प्रतिनिधी जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. यावर्षी, शिक्षकांना उन्हाळी सुट्टी मिळणार नाही. त्याऐवजी, त्यांना विद्यार्थ्यांसाठी विशेष वर्ग घ्यावे लागतील. या वर्गांमध्ये, विद्यार्थ्यांना भाषा आणि गणित या विषयांवर विशेष लक्ष केंद्रित करून शिकवले जाईल. ३० जूनपर्यंत, प्रत्येक विद्यार्थ्याला या विषयांमध्ये प्रवीण करणे हे शिक्षकांचे ध्येय असेल. हे विशेष वर्ग शालेय शिक्षण विभागाच्या ‘निपुण महाराष्ट्र’ अभियानाचा भाग आहेत. या अभियानाचा उद्देश राज्यातील दुसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक क्षमता वाढवणे आहे. या कार्यक्रमाअंतर्गत, शिक्षकांना विद्यार्थ्यांना ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने शिकवावे लागेल. या उपक्रमात, राज्यातील दुसरी ते पाचवीच्या प्रत्येक वर्गातील किमान ७५% विद्यार्थ्यांना भाषा…
