Author: अनंत पांगारकर
हिंदवी स्वराज्याचे प्रणेते छत्रपती शिवरायांचे आपणच जणू कर्तेधर्ते आहोत, अशा तोर्यात भाजपचे नेते छत्रपतींचे आज पोपटासारखे गुणगाण करत आहेत. शिवरायांवर आपलाच तेवढा अधिकार असल्याची भाजपची मस्ती अजून उतरलेली दिसत नाही. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या ट्विटवर टीका करताना भाजपच्या नेत्यांनी कंबरेचंही सोडलं. आपल्या टीकेला जनाधार नाही, हे लक्षात असूनही त्या पक्षाचे नेते स्वत:ला आवरू शकत नाहीत, याचं आश्चर्य वाटतं. छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्त राहुल गांधी यांनी श्रध्दांजली अर्पण केल्याचं ट्विटचं निमित्त करत भाजपच्या काही नेत्यांनी जिभेवर येईल ती टीका केली. भाजपशी आणि त्या पक्षाची पालकसंस्था असलेल्या संघाशी अर्थाअर्थी संबंध नसलेले नेतेच बडबड करत होते. कोणी राहुल…
संगमनेर, दि. २२ फेब्रुवारी – दुचाकीस्वाराला भरधाव वेगाने जाणाऱ्या आयटेन कारने जोराची धडक दिल्याने शेजारून जाणाऱ्या उसाच्या ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून झालेल्या विचित्र अपघातामध्ये दुचाकी स्वाराचा मृत्यू झाला. नासिक पुणे बाह्यवळण मार्गावर कृष्णा लॉन्स जवळ शनिवारी दुपारी पावणे एक वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. सुदाम देवराम वर्पे (वय ४८ रा. चिकणी ता. संगमनेर जि. अहिल्यानगर) असे अपघातात मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या संदर्भात माहिती अशी, सुदाम वर्पे हे त्यांच्या ताब्यातील दुचाकीवरून (MH 17 M 9879) पुण्याच्या दिशेने जात असताना कृष्णा लॉन्स जवळ त्यांच्या दुचाकी ला मागून येणाऱ्या आयटेन कार चालकाने जोराची धडक दिली. कारची जोरात धडक बसल्याने वर्पे दुचाकी वरून…
शनिवार दि. २१ फेब्रुवारी सिंधुदुर्ग (सावंतवाडी) – सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तारकर्ली येथे पर्यटनासाठी आलेले पुण्याचे पाच पर्यटक तारकर्ली समुद्रात बुडाले असून यापैकी दोघांचा मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर असून दोघेजण बचावले असल्याची माहिती समोर येत आहे. पुण्याच्या हडपसर मधून पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांचा समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याने पुण्यात दुःखद वातावरण निर्माण झाले आहे. शनिवारी सकाळी साडेअकरा वाजता तारकर्ली पर्यटन केंद्रानजीकच्या समुद्रात ही दुर्घटना घडली. रोहित बाळासाहेब कोळी (२१) व शुभम सुनील सोनवणे (२२) दोन्ही रा. हडपसर, हवेली पुणे अशी या दुर्घटनेतील दोघा मृतांची नावे आहेत. तर दुर्घटनेतील तिसरा ओंकार भोसले या युवकावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कुश संतोष गदरे…
संगमनेर, दि. २२ फेब्रुवारी – संगमनेर शहरालगत असलेल्या आणि शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुंजाळवाडी शिवारामध्ये गुरुवारी पुण्याच्या रेव्हेन्यू इंटेलिजन्सच्या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने मोठी कारवाई केली होती. या कारवाईत संगमनेरमध्ये भारतीय चलनातील बनावट नोटा तयार करण्याचा प्रयत्न होत असल्याचे समोर आले होते. कारवाईदरम्यान पोलिसांनी अटक केलेल्या आरोपी रजनीकांत राजेंद्र राहणे याला शुक्रवारी न्यायालयासमोर उभे करण्यात आले असता त्याला २५ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले असल्याची माहिती संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी दिली आहे. त्यामुळे पोलीस तपासात आता या प्रकरणी नेमके काय समोर येते याकडे लक्ष लागले आहे. बनावट नोटा प्रकरणातील आरोपी रजनीकांत राहणे हा…
संगमनेर, दि. २२ फेब्रुवारी – संगमनेर रोटरी क्लबच्या वतीने उद्या रविवारी (२३ फेब्रुवारी) स्वर्गीय ओंकारनाथ मालपाणी मार्गावर आनंदी रस्ते या अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. सकाळी ७ ते १० या वेळेत विद्यार्थी आणि नागरिकांसाठी आनंददायक ठरणाऱ्या या उपक्रमात संगमनेरमधील विविध शाळांचे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होणार असून विविध मनोरंजनात्मक आणि क्रीडा संबंधी कार्यक्रमाचे यात आयोजन करण्यात आले आहे. उपक्रमामध्ये झुंबा डान्स, रॉक बँड, मल्लखांब, गाणी सादरीकरण, खेळणी वाटप आणि मनोरंजक गोष्टी सादरीकरण यांसारखे उपक्रम घेण्यात येणार आहेत. नागरिकांनी आपल्या कुटुंबासह या उपक्रमात सहभागी व्हावे आणि आनंददायी वातावरणाचा अनुभव घ्यावा, असे आवाहन रोटरी क्लबचे अध्यक्ष साईनाथ साबळे…
शनिवार, दि. २२ फेब्रुवारी – बनावट नोटा तयार करण्यासाठी लागणारा कागद तस्करीच्या रूपाने बाहेरच्या देशातून कुरियर कंपनीच्या माध्यमातून भारतात आला असल्याची माहिती समोर आल्यानंतर केंद्रीय डायरेक्टरेट ऑफ रेव्हेन्यु इंटीलिजन्सच्या पथकांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने देशभरात एकाच वेळी ११ ठिकाणी छापे टाकले. यात बहुतांश ठिकाणी बनावट नोटा छापण्याचे प्रकार सुरू असल्याचे समोर आल्याने नऊ जणांना अटक करण्यात आले आहे. गुरुवारी (२० फेब्रुवारी) महाराष्ट्रामधील संगमनेर, कोल्हापूरमध्ये तर हरियाणा, तेलंगणा, तामिळनाडू, बिहार या राज्यांमध्ये छापेमारी करण्यात आली. देशभरात टाकलेल्या ११ छापांमध्ये सात ठिकाणी बनावट चलनी नोटा छपाई सुरू असल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी संगमनेरमध्ये गुंजाळवाडी ग्रामपंचायतच्या एका कर्मचाऱ्याला तर कोल्हापूरमध्ये दोघांना पथकाने अटक केली. त्यांच्याकडून…
अहिल्यानगर, दि. २१ फेब्रुवारी – अपहाराच्या गुन्ह्यात अटक झालेले तसेच कामकाजात हलगर्जीपणा केल्याच्या कारणावरून सक्तीच्या रजेवर पाठविलेल्या अहिल्यानगर महापालिकेचे आरोग्य विभागप्रमुख तथा वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांना अखेर सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल बोरगे अहिल्यानगर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात कार्यरत होते. महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी डॉ. बोरगे यांच्या निलंबनाचे आदेश आज (२१ फेब्रुवारी) काढले आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानामध्ये राज्यातील सर्व महानगरपालिकांमध्ये अत्यंत पातळीवर अहिल्यानगर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे कामकाज झाल्याचा ठपका आरोग्य सेवा संचालकांनी ठेवला होता. या संबंधितांनी महापालिकेला देखील कळविले होते. त्यानंतर आयुक्त डांगे यांनी डॉ. बोरगे यांना नोटीस बजावत कामकाजात सुधारणा करण्याचे…
संगमनेर, दि. २१ फेब्रुवारी – संगमनेरमधील साहित्यिक व संगमनेर महाविद्यालयातील निवृत्त प्राध्यापक मा. रा. लामखडे यांना यंदाचा विद्रोही जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्यावतीने देण्यात येणाऱ्या या पुरस्काराचे वितरण शनिवारी (२२ फेब्रुवारी) छत्रपती संभाजीनगर येथे होत असलेल्या विद्रोही साहित्य संमेलनात केले जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. ग्रामीण साहित्य चळवळीतील बहुमोल योगदानाबद्दल लामखडे यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. लामखडे हे सुरुवातीपासूनच ग्रामीण साहित्याच्या चळवळीत सहभागी राहिले आहेत. विद्यापीठ पातळीवर ग्रामीण साहित्याचा अभ्यास सुरू व्हावा म्हणून त्यांनी आग्रह धरला. त्यांच्या पुढाकारानेच पहिले ग्रामीण साहित्य संमेलन संगमनेर तालुक्यातील बोटा या गावी १९७९ मध्ये भरविले गेले होते. दलित…
संगमनेर – अनाधिकृतपणे सुरू असलेल्या संगमनेर शहरातील कत्तलखान्यांना पालिकेने नोटीसा बजावल्या होत्या. मात्र याकडे दुर्लक्ष करत हे कत्तलखाने सुरूच असल्याने अखेर गुरुवारी सकाळी नगरपालिका व पोलीस प्रशासनाने संयुक्त कारवाई करत पाच अवैध कत्तलखाने जमिनदोस्त केले. पालिकेने पाच कत्तलखाने जमीनदोस्त केल्याचे वृत्त समाधानकारक असले तरी मुख्य कत्तलखान्यांचे काय असा प्रश्न अद्यापही कायम आहे. कारण शहरात अधिक कत्तलखाने असून काही ठराविक कत्तलखान्यांवरच कारवाई झाल्याचे दिसते. कारवाईदरम्यान अनुचित प्रकार घडू यासाठी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शहरात गेल्या अनेक दिवसांपासून अवैधरित्या कत्तलखाने सुरू असून याची माहीती पोलीस व पालिका प्रशानला होती. यातील बहुतांशी कत्तलखान्यांवर पोलिसांनी वारंवार छापे देखील मारून कारवाया केल्या…
संगमनेर, दि. २१ फेब्रुवारी – बनावट नोटा तयार करण्यासाठी लागणारा कागद तस्करीच्या रूपाने बाहेरच्या देशातून कुरियर कंपनीच्या माध्यमातून भारतात आला असून तो संगमनेरमध्ये देखील आल्याची गोपनीय माहिती प्राप्त होताच पुण्याच्या डायरेक्टरेट ऑफ रेव्हेन्यु इंटीलिजन्सच्या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने टाकलेल्या छाप्यात बनावट नोटा बाजारात येण्यापूर्वीच थांबविण्यात यश आले आहे. संगमनेरमधील रजनीकांत राजेंद्र राहणे (रा. राहणे मळा गुंजाळवाडी) हा त्याच्या राहत्या घरी भारतीय चलनातील खोट्या नोटा बनवत असल्याची खात्रीशीर माहिती समोर आल्यानंतर पथकाने संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुंजाळवाडी शिवारामध्ये गुरुवारी सकाळी ही कारवाई केली. कारवाईदरम्यान रजनीकांत राहणे याला पकडण्यात आले. राहणे याने हाय सेक्युरिटी थ्रेड असलेली रंगीत पट्टी असलेले पेपरचा वापर…
