Author: अनंत पांगारकर

संगमनेर, दि. १४ फेब्रुवारी – संगमनेर तालुक्यातील साकुर येथील सोनाराच्या दुकानावर टाकलेल्या दरोडा प्रकरणी पोलिसांनी पकडलेल्या आरोपींवर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. यातील सहा आरोपींना तपास अधिकारी तथा पोलीस उपअधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे यांनी गुरुवार आणि शुक्रवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने या आरोपींना २४ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कस्टडी मंजूर केली आहे. या गुन्ह्यातील काही आरोपी अद्यापही फरार आहेत. नोव्हेंबर महिन्यात साकुर बस स्थानकाजवळ गजबजलेल्या परिसरात निखिल सुभाष लोळगे यांचे ‘कान्हा ज्वेलर्स’ नावाने सोन्याचे दागिने विक्रीचे दुकान आहे. पावणे दोन वाजण्याच्या सुमारास दुकानातील कामगार जेवण करण्यासाठी गेले असता दुकानात एक कामगार असल्याचे संधी साधून पल्सर दुचाकीवरून आलेल्या पाच जणांनी…

Read More

छत्रपती संभाजीनगर –  संगमनेरमधील दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेच्या ८१ कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणी तब्बल आठ-नऊ महिन्यापासून अटकेत असलेल्या मुख्य सूत्रधार संस्थेचा अध्यक्ष भाऊसाहेब कुटे याचा मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने जामीन अर्ज नाकारल्याने कुटे याच्या अडचणीत वाढ झाली आहे. कुटे याचा नियमित जामीन अर्ज संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने नाकारल्यानंतर त्याने जामिनासाठी औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती. मात्र औरंगाबाद खंडपीठानेही कुटेला दिलासा देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे दूधगंगा पतसंस्था गैरव्यवहार प्रकरणातील मुख्य आरोपी भाऊसाहेब कुटे याचा तुरुंगातील मुक्काम जैसे थे राहणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या या निर्णयाचे ठेवीदारांनी स्वागत केले आहे. ऑगस्ट २०२३ मध्ये दूधगंगा नागरी सहकारी…

Read More

संगमनेर प्रतिनिधी –  संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथील प्रति जेजुरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खंडोबा देवगड देवस्थानचा तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील ब वर्ग दर्जात समावेश करण्यासाठी आपण शासन स्तरावर प्रयत्न करू तसेच या देवस्थानच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटीबद्ध राहू, असा विश्वास संगमनेर चे आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केला. हिवरगाव पावसा येथील देवगड खंडोबा महाराज यात्रोत्सव विविध धार्मिक उपक्रमांनी साजरा होत आहे. त्यानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कृषी महोत्सवाचे आणि अश्व प्रदर्शनाचे उद्घाटन आमदार खताळ यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. देवगड देवस्थान ट्रस्टच्या वतीने खताळ यांचा सत्कार करण्यात आला. लोकप्रतिनिधी या नात्याने प्रथमच खताळ यांच्या हस्ते खंडोबा महाराज मल्हार मार्तंड यांचा…

Read More

संगमनेर – प्रतिनिधी बदनामी करण्याच्या उद्देशाने साखरपुड्याचे जुने फोटो व्हायरल करून त्या बदल्यात पाच लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केल्याप्रकरणी संगमनेर शहर पोलिसांनी एका महिलेसह तिघांविरोधात गेल्या महिन्यात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणातील महिला आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळून लावला आहे. यामुळे खंडणी प्रकरणातील आरोपींच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे. कृष्णा अजित सारडा (रा. अशोक चौक, संगमनेर) गोविंद नागरे (रा. नेहरू चौक, संगमनेर) आणि ओंकार राऊत (रा. घुलेवाडी, संगमनेर) अशी खंडणी प्रकरणातील आरोपींची नावे आहेत. शहरातील एक तरुणी व एका सामाजिक कार्यकर्त्याची बदनामी होईल व यामुळे त्यांचे वैवाहिक जिवन संपुष्टात येईल असे माहित असताना देखिल तिघा जणांनी त्यांचे जुने…

Read More

संगमनेर दि. १३ फेब्रुवारी – संगमनेर तालुक्याच्या तहसील कार्यालयाचे विभाजन करून आश्वी बुद्रुक येथे नवे अपर तहसील कार्यालय प्रस्तावित करण्यात आले आहे. अनेक गावांसाठी गैरसोयीचा असलेला हा प्रस्ताव रद्द करण्यात यावा अशी मागणी होऊन देखील सरकार जर ऐकणार नसेल तर सरकार विरोधात जन आंदोलन उभे करून न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. प्रस्तावित असलेल्या आश्वी बुद्रुक येथील अपर तहसील कार्यालय निर्मितीच्या विरोधात अनेक ग्रामपंचायत यांनी विशेष ग्रामसभा घेऊन ठराव केल्यानंतर देखील या प्रस्तावात कोणत्याही सुधारणा झालेल्या नाही. माहिती अधिकारात मिळालेल्या कागदपत्रानुसार पूर्वीचाच प्रस्ताव मंत्रालयात पाठविण्यात आला असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे प्रभावित गावातील नागरिक व जेष्ठ विधीज्ञांची बैठक माजी…

Read More

विशेष प्रतिनिधी / प्रवीण पुरो मुंबई – ठाकरे किंवा महाविकास आघाडीचे सरपंच असतील, तिथे एक रूपयांचा सुद्धा निधी देणार नाही. निधी पाहिजे, तर भाजपमध्ये प्रवेश करा. भरपूर निधी मिळेल. अन्यथा विकास होणार नाही, असा दम आणि आगाऊपणाची भाषा राज्याचे वादग्रस्त मंत्री नितेश राणे यांनी वापरली आहे. नितेश राणे यांच्या विधानावरून नव्या वादाला तोंड फुटलं आहे. देशात लोकशाही शिल्लक आहे का? असा सवाल शिवसेना ( ठाकरे गट ) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी नितेश राणे यांच्या विधानावरून उपस्थित केला आहे. भाजपच्या ओरोस मंडलचा कार्यकर्ता मेळावा ओरोस येथे भाजपचे महाराष्ट्र कार्यकारी अध्यक्ष, माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी पालकमंत्री…

Read More

विशेष प्रतिनिधी / मुंबई अँटी करप्शन ब्युरोच्या कारवाईने संकटात सापडलेले शिवसेनेचे कोकणचे कट्टर सैनिक राजन साळवी यांनी अखेर शिवसेनेला रामराम ठोकला. मात्र हे करताना त्यांनी एसीबी कारवाईविषयी ब्र न काढता पक्ष सोडण्याला विनायक राऊत कारणीभूत असल्याचं सांगत आपली कातडी वाचवली आहे. सुमारे चार कोटीच्या बेहिशेबी मालमत्ता बाळगल्याचं निमित्त करत एसीबीने त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांवरही कारवाईची टांगती तलवार उगारली होती. एकीकडे बेहिशेबी मालमत्तेचं प्रकरण डोक्यावर असताना विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे राजन साळवी गेल्या काही दिवसांपासून नाराज होते. याच कारणामुळे ते उद्धव ठाकरेंची साथ सोडून भाजपा किंवा शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचं बोललं जात होतं. अशातच त्यांनी बुधवारी  पक्षातील उपनेतेपदाचा राजीनामा देत ठाकरेंची…

Read More

अहिल्यानगर दि. १३ – अहिल्यानगर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी मुंबई पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) अन्वये २३ फेब्रुवारी २०२५ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश जारी केला आहे. सदरचे आदेश धार्मिक कार्यक्रम, लग्नकार्य, लग्न मिरवणुका किंवा प्रेतयात्रेच्या जमावास लागू राहणार नाहीत. तसेच हा आदेश पोलीस अधिकारी, कामावर असलेल्या इतर शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना, सभा अगर मिरवणूका काढण्यास रितसर परवानगी घेतली असलेल्या व्यक्तींना लागू नाही. आदेशाचा भंग करणाऱ्या विरोधात कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Read More

अहिल्यानगर, दि. १३ –  शिर्डी शहराच्या मध्यवर्ती भागातून गेलेल्या नगर-मनमाड रोडवरील वाढत्या ट्रॅफिकमुळे आणि भाविकांच्या होणाऱ्या गर्दीमुळे श्री साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना आणि शहरातील नागरिकांना नेहमीच वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. त्यामुळे प्रभारी अपर जिल्हादंडाधिकारी अतुल चोरमारे यांनी शिर्डी शहरातील अवजड व तत्सम वाहतूक दि. ११ फेब्रुवारी ते ७ मार्च २०२५ या कालावधीत पर्यायी मार्गाने वळविण्याचे आदेश निर्गमित केले आहेत. लक्ष्मीनगर टी पॉईंट, अहिल्यानगर-मनमाड हायवे (पूर्व बाजू) ते आर.बी.एल. बँक चौक, नगर-मनमाड हायवे (पूर्व बाजू) जाणारी अवजड वाहतूक हॉटेल ऋषिकेश, १८ मीटर रिंगरोड ते आर.बी.एल. बँक चौक १८ मीटर रिंगरोड या पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. नगर-मनमाड हायवे (पश्चिम बाजू)…

Read More

संगमनेर, दिनांक १३ –  पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे मार्ग संगमनेर मार्गेच ठेवण्याची मागणी आमदार अमोल खताळ यांनी केली असून, या संदर्भात दोन दिवसीय दिल्ली दौऱ्यात आमदार अमोल खताळ यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची दिल्ली येथील लोकसभा सचिवालय येथे भेट घेतली. या भेटीत सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे देखील उपस्थित होते. रेल्वेमंत्री यांनी संगमनेर मार्गेच हा रेल्वे मार्ग जाईल, असे सकारात्मक आश्वासन दिले. आमदार खताळ यांनी या भेटीत रेल्वे मंत्र्यांना पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे मार्ग संगमनेर मार्गेच जावा याबाबतचे अधिकृत पत्र सुपूर्द केले. या पत्रात त्यांनी या मार्गाचा शेती, उद्योग, व्यापार, शिक्षण आणि स्थानिक अर्थव्यवस्थेवर होणाऱ्या…

Read More