Author: अनंत पांगारकर

आजच्या दिवसाचे राशिभविष्य मेष – एखादी महत्त्वाची अनुकूल घटना घडल्यामुळे मानसिक प्रसन्नता लाभेल. आनंद द्विगुणित होईल. उत्साहाने आपल्या पुढील कामे पूर्ण करू शकाल. जोडीदाराची चांगली साथ मिळेल. धनलाभाचे योग. वृषभ – एखादी भाग्यकारक घटना घडल्यामुळे भाग्य उदय होईल. कुटुंबात शुभवार्ता मिळतील. एखाद्या धार्मिक कार्यक्रमाचे नियोजन करू शकाल. नोकरीमध्ये समाधानकारक परिस्थिती अनुभवता येईल. मिथुन – व्यवसायातील महत्त्वाची अडलेली कामे मार्गी लावू शकाल. जुने मित्रमंडळी भेटतील. काही महत्त्वाचे नियोजन करू शकाल. जवळचे तसेच दूरचे प्रवासाचे नियोजन होऊ शकते. कर्क – अनेकांशी सुसंवाद घडवून आपली महत्त्वाची कामे पूर्ण करून घ्याल. आपले अंदाज व निर्णय बरोबर ठरल्यामुळे त्याचा आपल्याला आपल्या कार्यात उपयोग होईल. सिंह…

Read More

सोमवार, २८ ऑक्टोबर  गेल्या अनेक दिवसांपासून विद्यमान आमदार बाळासाहेब थोरात यांच्या विरुद्ध मैदानात शड्डू ठोकत टायगर अभी… म्हणत विधानसभा लढविण्याचे संकेत देणारे माजी खासदार डॉक्टर सुजय विखे अपेक्षेप्रमाणे लढणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तर भाजपकडून उमेदवारी लढविण्यासाठी इच्छुक असलेले खासदार राधाकृष्ण विखे यांचे समर्थक अमोल खताळ शिवसेनेकडून मैदानात उतरणार असल्याचे रात्री स्पष्ट झाले. शिवसेनेकडून रात्री उशिराने सहयोगी पक्षाच्या उमेदवारांसह पंधरा उमेदवारांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. यात अपेक्षेप्रमाणे नेवासे आणि संगमनेर या दोन्ही जागा शिवसेनेच्या वाट्याला गेल्या आहेत. तर जिल्ह्यातील प्रत्येकी पाच पाच जागांवर अनुक्रमे भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेस लढणार आहे. उशिराने जाहीर करण्यात आलेल्या यादीत संगमनेर मधून अमोल खताळ यांना उमेदवारी…

Read More

सोमवार, २८ ऑक्टोबर संगमनेर विधानसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अजीज व्होरा यांनी सोमवारी शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल निवडणूक निर्णय अधिकारी शैलेंद्र हिंगे यांच्याकडे दाखल केला.उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शेवटचे अवघे काही तास उरले असून मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस आहे. संगमनेर विधानसभा मतदारसंघासाठी सर्वप्रथम वंचित बहुजन आघाडीने आपला उमेदवार जाहीर केला. उमेदवारी जाहीर करण्यात वंचित ने आघाडी घेत या मतदारसंघातून विद्यमान आमदार बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात सामान्य कुटुंबातील अजीज व्होरा यांना उमेदवारी दिली आहे.संगमनेरमध्ये वंचित बहुजन आघाडी आणि वंचित चे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांना मानणारा मोठा वर्ग आहे. समाजातील सर्व घटकात परिचित असलेल्या अजीज…

Read More

सोमवार, २८ ऑक्टोंबर  अहिल्यानगर जिल्ह्यातील बारा पैकी दहा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आतापर्यंत जाहीर झाले असून महाविकास आघाडीचे सर्वच्या सर्व उमेदवार जाहीर झाले आहे. महायुतीचा नेवासे आणि संगमनेर या दोन जागांवरील तिढा अद्याप कायम आहे. भारतीय जनता पक्षाच्या वाट्याला पाच आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला पाच जागा मिळाल्या असून या जागांवरील उमेदवार जाहीर करण्यात आले आहे. यात अनुक्रमे तीन आणि चार विद्यमान आमदारांचा समावेश आहे. श्रीरामपूरच्या जागेसाठी महायुतीकडून रामदास आठवले यांचे समर्थक कार्यकर्ते इच्छुक होते. आठवले गटाने या जागेवर दावा सांगितला होता. मात्र जागा वाटपात ही जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेली असून राष्ट्रवादी काँग्रेसने येथून काँग्रेसने उमेदवारी नाकारलेल्या…

Read More

सोमवार, २८ ऑक्टोबर विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याकरिता मंगळाच्या अखेरचा दिवस आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी काही तासांचा अवधी उरला असल्याने अद्यापही संगमनेर विधानसभा मतदारसंघात बाळासाहेब थोरात यांच्या विरोधातील महायुतीचा उमेदवार निश्चित झालेला नाही. शेवटच्या क्षणी थोरात यांच्या विरोधातील उमेदवार विरोधकांकडून जाहीर केला जात असल्याने मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी विरोधी उमेदवाराची मोठी दमछाक होत असते. या उलट वंचित बहुजन आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उमेदवार जाहीर केले आहे.गेल्या चार दशकांपासून बाळासाहेब थोरात या मतदारसंघाचे नेतृत्व करत आहे. त्यांच्या विरोधात विरोधकांनी अनेकदा आग पाखड करत मैदानात शड्डू ठोकले मात्र निवडणूक जिंकण्यात त्यांना अपयश आले आहे. निवडणूक लागली की विरोधकांकडून एक चेहरा निश्चित न होता…

Read More

सोमवार, २८ ऑक्टोबर २०२४ मेष – नवीन काम सुरू करण्यासाठी आजचा दिवस चांगला नाही, खर्च वाढेल. जवळच्या व्यक्तीशी वाद होऊ शकतो. कुटुंबाकडून सहकार्य मिळेल. वृषभ- आज तुम्हाला तुमच्या जवळच्या व्यक्तीकडून मोठा फायदा होऊ शकतो. नोकरदार लोकांना फायदा होईल. विवाह निश्चित होईल, प्रवासाची शक्यता आहे, परंतु वाहन काळजीपूर्वक चालवा. मिथुन- आज तुमचे कुटुंबियांशी मतभेद होतील, रागावर नियंत्रण ठेवा. प्रवासात अडथळे येतील. तुमचे आरोग्य बिघडू शकते आणि खर्चही वाढू शकतात. गाडी नीट चालवा. कर्क-आज तुमचे विरोधक तुमचे नुकसान करू शकतात, महत्त्वाचे निर्णय घेऊ नका. बॉसशी वाद होईल, मुलांच्या भविष्याची चिंता राहील. संयमाने निर्णय घ्या. सिंह- आज तुम्हाला भागीदारीतून फायदा होईल, आर्थिक संकट…

Read More

रविवार, २७ ऑक्टोंबर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून विधानसभा निवडणुकीसाठी रविवारी रात्री उमेदवारांची सहावी यादी जाहीर करण्यात आली आहे. राज्याचे माजी मंत्री सलग चार दशके आमदार राहिलेल्या बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने संगमनेर मधून योगेश सूर्यवंशी यांना उमेदवारी जाहीर केली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील तीन उमेदवारांच्या नावाची घोषणा या यादीत करण्यात आली आहे. संगमनेरमधून सूर्यवंशी, राहुरीतून ज्ञानेश्वर गाडे (माऊली) आणि अहमदनगर शहरमध्ये सचिन डफळ यांचा जाहीर झालेल्या उमेदवारांमध्ये समावेश आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वत: ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. मनसेने जाहीर केलेल्या या यादीत राज्यभरातून ३२ उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. आतापर्यंत मनसेने ११० विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांची…

Read More

रविवार, २७ ऑक्टोबर विधानसभा निवडणुकीमुळे राज्यात सर्वत्र राजकीय वातावरण तापले असताना संगमनेरमध्ये मात्र पारंपारिक विरोधक थोरात-विखे यांच्यातील राजकीय संघर्ष उफाळून आला आहे. या संघर्षाला कारणीभूत ठरलेल्या आणि डॉ. जयश्री थोरात यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करून फरार झालेल्या वसंत देशमुखला अहिल्यानगर एलसीबीच्या पुण्यात पकडले आहे.नगर दक्षिणचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या युवा संकल्प मेळाव्यात वसंत देशमुख याने अध्यक्ष स्थानावरून बोलताना माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या कन्या डॉ. जयश्री यांच्या विषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. महिलेविषयी केलेल्या अवमानकारक वक्तव्यामुळे राज्यात संतापाची लाट निर्माण झाली.शनिवारी (दि.२६) वसंतराव देशमुखांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून ते फरार होते. देशमुख यास अटक करण्यात यावी…

Read More

रविवार, २७ ऑक्टोबर शिवसेनेचे माजी मंत्री बबनराव घोलप रविवारी आठ महिन्यानंतर पुन्हा स्वगृही परतले आहे. घोलप यांनी मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधत पुन्हा एकदा शिवसेनेची मशाल हाती घेतली आहे.घोलप यांनी आठ महिन्यांपूर्वी ठाकरेंच्या शिवसेना सदस्य पदाचा राजीनामा देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता.दरम्यान विधानसभा निवडणुकीसाठी देवळाली प्रवरा मतदार संघ ठाकरे गटाच्या वाट्याला आल्याने या मतदारसंघातून ठाकरे गटाने घोलप यांचे पुत्र योगेश घोलप यांना उमेदवारी दिली आहे. बबनराव घोलप यांनी शिवसेनेचा राजीनामा दिल्यानंतर देखील योगेश घोलप शिवसेनेसोबत होते. योगेश घोलप यांना उमेदवारी दिल्यानंतर बबनराव घोलप यांनी पुन्हा सह संपर्कप्रमुख दत्ता गायकवाड यांच्या मध्यस्थीने प्रवेशाची शिष्टाई…

Read More

रविवार, २७ ऑक्टोबर अहिल्यानगर – विधानसभा निवडणुकीत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी विशेष प्रयत्न करावे. संपूर्ण निवडणूक प्रक्रीया पारदर्शक राहील याकडेही लक्ष द्यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिले. विधानसभा निवडणुकीबाबत दूरदृश्यप्रणालीद्वारे शनिवारी आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस अपर जिल्हाधिकारी प्रविण महाजन, उप जिल्हा निवडणूक अधिकारी राहूल पाटील, उपजिल्हाधिकारी अतुल चोरमारे, निवडणूक निर्णय अधिकारी, समन्वयक अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी सालीमठ म्हणाले, संपूर्ण निवडणुक कालावधीत शांतता व सुव्यवस्था रहावी यादृष्टीने पोलीस अधिकाऱ्यांशी समन्वय ठेवावा. निवडणूक विषयक नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, यात कुणालाही सूट देवू नये. कमी मतदान झालेल्या मतदान केंद्रावर मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी स्वीप अंतर्गत विविध उपक्रम राबवावे. आनंददायी…

Read More