Author: अनंत पांगारकर
सोमवार, १९ ऑगस्ट मानधन वाढीसह अन्य मागण्यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून संघर्ष करणाऱ्या राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा बुधवारी (२१ ऑगस्ट) मंत्रालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या अध्यक्ष ॲड. निशाताई शिवूरकर यांनी दिली. राज्यभरातील अंगणवाडी कर्मचारी आपल्या मागण्यांसाठी गेल्या अनेक महिन्यांपासून संघर्ष करीत आहे. १५ जुलैपासून कर्मचाऱ्यांनी असहकार आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी शासकीय मिटींग, अहवाल देणे इत्यादी कामांवर बहिष्कार टाकला आहे. १२ ऑगस्टपासून मुंबईच्या आझाद मैदानावर कृती समितीच्यावतीने धरणे आंदोलन सुरू आहे. एकीकडे राज्य सरकार लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून स्वतःची पाठ थोपटून घेत आहे. तर दुसरीकडे मात्र अंगणवाडी कर्मचारी बहिणींच्या प्रश्नाकडे पूर्णतः दुर्लक्ष करत आहे. महाराष्ट्र…
रविवार, १८ ऑगस्ट काँग्रेसमध्ये निष्ठावंत म्हणून ओळखले जाणारे आणि राज्याच्या राजकारणात महत्त्वाची पक्षीय भूमिका बजावणारे संगमनेरचे लोकप्रतिनिधी आमदार बाळासाहेब थोरात यांच्यावर काँग्रेस पक्षाने पुन्हा एकदा महत्त्वाची जबाबदारी सोपवत काँग्रेसच्या सर्वोच्च समजल्या जाणाऱ्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीच्या (CWC) सदस्यपदी त्यांची फेरनिवड केली आहे. यामुळे थोरात यांच्या माध्यमातून देशाच्या राजकारणात पुन्हा एकदा संगमनेरचे महत्व अधोरेखित झाले आहे. काँग्रेस अध्यक्ष खासदार मल्लिकार्जुन खरगे व खासदार राहुल गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी शुक्रवारी प्रसिद्धी पत्रकाद्वारे थोरात यांच्या निवडीची माहिती दिली. स्वातंत्र्य सेनानी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांचा वारसा लाभलेले आमदार बाळासाहेब थोरात हे १९८५ पासून संगमनेर विधानसभा मतदारसंघातून सलग आठ वेळा…
रविवार, १८ ऑगस्ट महामहीम राज्यपालांच्यावतीने देण्यात येणारा “विशेष उल्लेखनीय सेवा पोलीस पाटील राज्यपाल पुरस्कार” संगमनेर तालुक्यातील सावरगाव तळ येथील कामगार पोलीस पाटील गोरक्ष नेहे यांना जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या उपस्थितीत राज्याचे महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते देत गौरविण्यात आले. अहमदनगरच्या जिल्हा मुख्यालयात पार पडलेल्या स्वातंत्र्य दिनाच्या मुख्य शासकीय कार्यक्रमात या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, महानगर पालिका आयुक्त यशवंत डांगे, अप्पर जिल्हाधिकारी सुहास मापारी, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील, गृह उपअधीक्षक हरीश खेडेकर, जिल्हा कृषी अधीक्षक सुधाकर बोराळे, सामान्य प्रशासन विभागाचे तहसीलदार शरद घोरपडे आदी…
राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीच्या दिशेने राजकीय पक्षांची धावपळ सुरू झाली आहे. सत्तेवर कोण येईल, हे आज तरी सांगता येत नसलं तरी भाजपप्रणित सत्तेला चीत करण्याची ताकद महाविकास आघाडीकडे निर्माण झाल्याचं चित्र नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाने दाखवून दिलं आहे. सत्तेवरल्या एकनाथ शिंदे यांच्या महायुती सरकारसाठी लोकसभेचे निकाल खूपच तापदायक आणि संकटाची चाहूल देणारे आहेत. या संकटातून बाहेर पडण्यासाठी सरकारने खिरापतींची वाटमारी सुरू केली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण असो, सुशिक्षितांना स्टायपेंड देण्याचा विषय असो वा साठी गाठलेल्या बुजूर्गांसाठी देश तीर्थ पर्यटनाचा निर्णय असो. राज्याकडे खूप पैसा आहे, म्हणून या खिरापतीच्या योजना सुरू करण्यात आलेल्या नाहीत. असं फुकटात देणारं देशातलं पहिलं राज्य…
अखेर निवडणूक आयोगाने काश्मीर खोऱ्यात अन् दिल्ली सीमावर्तीय हरियाणामधे विधानसभेची निवडणूक जाहीर केली. जम्मू काश्मीरबाबत देशातील सर्वोच्च न्यायालयाने डिसेंबर २०२३ मधे निकाल दिला देत आदेश दिला होता की, सप्टेंबर २०२४ पर्यंत निवडणुकीची प्रक्रिया काश्मीर खोऱ्यात पूर्ण करावी. हा आदेश पाळणे त्यांना बंधनकारक आहे. हरियाणा व महाराष्ट्र यांची मुदत ऑक्टोंबरमधे संपते. मात्र राज्यातील निवडणुका जाहीर करणे अपेक्षित असताना सणसुद, अतिवृष्टी ही फालतू कारणे देवून निवडणूक आयोगाने हे सिद्ध केल की, “होय, मी केंद्र सरकारचा पोपट आहे”. लोकसभेच्या निवडणुका घेतल्या तेव्हा कडक ४७ डिग्री तापमान ह्या निवडणूक आयोगला दिसले नाही, अन् गप्पा मारतोय पोपट अतिवृष्टीच्या. पितृपक्षाचे कारण देऊन पोपट पुढे म्हणतो की…
शनिवार, १७ ऑगस्ट शेअर मार्केटमध्ये पैशांची गुंतवणूक करून जास्त व्याजदराने पैसे मिळवून देतो. त्यातून मोठा लाभ होईल, असे आमिष दाखवून लावलेल्या सापळ्यात अडकलेल्या संगमनेर येथील व्यापारी संकेत शिवाजी कोकणे यांना एका जोडप्याने लाखो रुपयांना फसवले असून या जोडप्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शशांक चंद्रशेखर वडके आणि प्रियांका शशांक वडके (राहणार २७६, भिवंडी, जिल्हा ठाणे) या दोघा पती-पत्नी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याबाबतची हकीकत अशी की, संकेत कोकणे (कॉटन किंग, मेनरोड, संगमनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मित्राच्या माध्यमातून भेटलेल्या शशांक वडके याने शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी त्याची पत्नी प्रियंका हिची एजन्सी असून सहा…
शनिवार, १७ ऑगस्ट | संगमनेर श्रीरामपूरमधील तृतीयपंथी आयशा पिंकी शेख (वय ३० वर्ष, रा. डावखर रोड, वार्ड नंबर ६) हिने संगमनेरमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत माहिती अशी, आयेशा शेख काही दिवसांपासून संगमनेरमधील जोर्वे रस्त्यावरील एकतानगरमध्ये रिया, कविता, प्रियांका, शंतनु यांच्यासोबत राहत होती. श्रीरामपूरहून आल्यापासून ती तणावामध्ये होती. बुधवारी (दि. १४ ऑगस्ट) रात्री संगमनेर येथील वाबळे हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांकडे औषध उपचार घेऊन आल्यानंतर रिया व कविता व्यांच्यासोबत एकतानगरमधील घरी थांबली होती. दरम्यान रिया व कविता यांना काहीतरी आणण्यासाठी गावात पाठवले होते. गावातून आल्यानंतर त्यांनी दरवाजा बंद असल्याचे बघितले त्यानंतर…
शनिवार, १७ ऑगस्ट | संगमनेर स्वातंत्र्यदिनी श्रीरामपुर शहर पोलिस ठाण्यात पोलिसांच्या समोर गोरक्षक आशिष कोळपकर, अर्जुन मापारी, निखिल निर्मळ यांना मारहाण झाली. गो तस्कर व खाटकांना पोलिसांचा कोणताही धाक राहिलेला नाही. त्यामुळे जिल्ह्यात गो तस्कर व खाटकांकडून गोरक्षकांवर होणाऱ्या हल्याचा संगमनेर बजरंग दलाने जाहीर निषेध केला. तसेच बुधवारी (१४ ऑगस्ट) रात्री गोरक्षक मयुर विधाटे व त्याचे कुटूंबियावर गोरक्षण कार्याचा राग मनात धरुन १५० ते २०० च्या मुस्लिम समुदायाने संगनमताने व त्यास जीवे मारण्याच्या उद्देशाने धारदार शस्त्रासह हल्ला केला त्यात मयुर विधाटे व त्याचे कुटूंबिय गंभिर जखमी झाले आहेत व ते दवाखान्यात औषधोपचार घेत आहेत तसेच वरील झटापटीत मयुर विधाटे याच्या…
शनिवार, १७ ऑगस्ट मुंबई: लोकसभा निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या काँग्रेसने राज्यात विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. लोकसभा निवडणुकीत पक्षाचे तेरा खासदार निवडून आले. तर एक बंडखोर उमेदवारही निवडून आला होता. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची उमेदवारी मिळावी, यासाठी इच्छुकांनी प्रचंड गर्दी केली आहे. पक्षाने राज्यातल्या २८८ मतदार संघातून इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागवले होते. त्याला उदंड प्रतिसाद मिळाला आहे. शिवाय या अर्ज विक्रीतून पक्ष निधीतही भरभरून पैसे जमा झाले आहेत. महाविकास आघाडीत कोणाला किती जागा मिळणार हे अजूनही गुलदस्त्यात आहे. असं असलं तरी काँग्रेसने मात्र राज्यातल्या २८८ मतदार संघातून इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागवले होते. त्यातून पक्ष चाचपणीही करत आहे.…
शुक्रवार, १६ ऑगस्ट अहमदनगर – जिल्ह्यात १७ ते २० ऑगस्ट या कालावधीत वीजांच्या कडकडाटांसह वादळी वारा व हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली असून जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत प्रसिध्दी पत्रकाद्वारे करण्यात आले आहे. नागरिकांनी खालीलप्रमाणे दक्षता घ्यावी… मेघगर्जनेच्या वेळी, वीजा चमकत असताना किंवा वादळी वारे वाहत असतांना झाडाखाली किंवा झाडांजवळ उभे राहू नये. विजेपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये. गडगडाटीच्या वादळादरम्यान व विजा चमकतांना कोणत्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नये. वीजेच्या सुवाहक भागाशी संपर्क टाळावा. ट्रॅक्टर्स, शेतीची अवजारे, मोटारसायकल, सायकल यांचेपासून दूर…
