Author: अनंत पांगारकर
विशेष प्रतिनिधी / मुंबई राज्यातल्या युती सरकारपासून महाराष्ट्राची सुटका करणं हे आपल्या समोरचं मोठं आव्हान आहे, अशा परिस्थितीत आपल्याला निवडणुकीला सामोरं जायचं आहे, एकजूटीने लढायचं आहे, सरकार बदलायचं आहे, असा संदेश देत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाविकास आघाडीच्या प्रचाराचं रणशिंग फुंकलं. महाराष्ट्राचं चित्र बदलायचं असेल तर इथलं सरकार बदलण्याशिवाय गत्यंतर नाही, अशा शब्दात शरद पवार यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला. शुक्रवारी मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात महाविकास आघाडीचा निर्धार मेळावा पार पडला. या मेळाव्याला पवार मार्गदर्शन करत होते. सुरुवातीला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाषण केले आणि शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे…
विशेष प्रतिनिधी / मुंबई लोकसभा निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीला मिळालेलं यश आणि महाविकास आघाडीचे उद्धव ठाकरे यांनी राज्यभरात प्रचारासाठी केलेलं यशस्वी नेतृत्व पाहता आगामी विधानसभा निवडणुकांसाठीही उद्धव ठाकरे यांच्याच खांद्यावर प्रचाराची जबाबदारी देण्याचा विचार महाविकास आघाडीत सुरू आहे. काँग्रेसच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरे यांच्याकडेच महाविकास आघाडीच्या प्रचाराची धुरा सोपवण्याकडे कल दिसून आला. विधानसभा निवडणुका अगदी जवळ येऊन ठेपल्याने महाविकास आघाडीच्या वतीने राज्यात पुन्हा एकदा जोरदार प्रचार सुरू करण्याबाबत महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक पार पडली. त्या पाठोपाठ काँग्रेसनेही आपली आढावा बैठक घेतली. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी केलेलं काम आणि त्यांचं नेतृत्व यामुळं त्यांच्या हाती पुन्हा एकदा महाविकास आघाडीच्या विधानसभा निवडणुकीच्या…
शुक्रवार, १६ ऑगस्ट चिंचोली गुरव ते पारेगाव बुद्रुक रस्त्यावर मोटार सायकलवरून गुटखा वाहतूक करणाऱ्या दोघांना तीन गोण्या गुटख्यासह पकडले. पोलिसांनी दुचाकीवरून वाहतूक होत असलेला ऐंशी हजार रुपयांचा गुटखा पकडल्याची माहिती समोर येतात संगमनेरमधील गुटखा किंग विजय भागवत हा फरार झाल्याची माहिती पोलिसांनी दिले आहे. संगमनेरमध्ये कायद्याचे उल्लंघन करत गुटखा विक्री मोठ्या प्रमाणात सुरू असते. शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या इंदिरानगरमधील (संगमनेर) विजय भागवत या गुटका किंगवर अन्न औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसह पोलीस मेहरबान असल्याचे आरोप वारंवार होत असतात. मात्र या तस्कराकडून मोठा मलिदा मिळत असल्याने संबंधित यंत्रणेचे कारवाईबाबत नेहमी कानावर हात असतात. सोमवारी स्वातंत्र्यदिनी संगमनेर तालुका पोलिसांना चिंचोली गुरव ते पारेगाव…
शुक्रवार, १६ ऑगस्ट मठाधिपदी सद्गुरु गंगागिरी महाराज संस्थान श्री क्षेत्र गोदावरी धाम बेटाच्या महंतावर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. संगमनेरमध्ये दाखल करण्यात आलेला हा गुन्हा तपासासाठी सिन्नर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. संगमनेर शहर पोलीस ठाण्यात लखमीपुरा येथील अहमद रझा युनूस शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी, फिर्यादी शेख यांच्या टिपू सुलतान एक योद्धा युवा मंच संगमनेर या व्हाट्सअप ग्रुप वर गंगागिरी महाराज मठाधिपती सद्गुरु गंगागिरी महाराज संस्थान श्रीक्षेत्र गोदावरी तांबे यांनी मुस्लिम धर्माचे प्रेषित…
विकसित महाराष्ट्रासाठी योजनांची प्रभावी अंमलबजावणी सुरु भारताच्या स्वातंत्र्यदिनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहण गुरुवार, १५ ऑगस्ट मुंबई – राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि येथील नागरिकांच्या कल्याणासाठी राज्य शासन वचनबद्ध आहे. शेतकरी, शेतमजूर, महिला, विद्यार्थी या सर्व घटकांच्या विकासासाठी विविध योजनांच्या माध्यमातून विकासाला चालना देण्याचे काम सुरु आहे. विकसित महाराष्ट्र घडविण्यासाठी राज्य शासनाने राबविलेल्या धोरणांची प्रभावी अंमलबजावणी सुरु आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. ७८ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त मंत्रालय येथे मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्रकुमार उपाध्याय, मुख्य सचिव सुजाता सौनिक, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, मुख्य राजशिष्टाचार अधिकारी…
गुरुवार, १५ ऑगस्ट गुन्ह्यात जप्त करण्यात आलेली कार न्यायालयातून परत मिळवून देण्यासाठी आणि पुण्यात मदत करण्यासाठी दहा हजार रुपये लाच घेणाऱ्या सहाय्यक सरकारी वकील महिलेला लाच लुचपतच्या पथकाने रंगेहात पकडले आहे. अंजला नलिनी कमलाकर नवगिरे (वय ५४ वर्ष, पुणे) असे लाच घेणाऱ्या सहाय्यक सरकारी अभियोक्ता महिलेचे नाव असून पुणे लाच लुचपत विभागाने ही कारवाई केली आहे. पुणे लाच लुचपत विभागाकडे तक्रार करणाऱ्या तक्रारदार महिलेच्या पतीविरुद्ध जून २०२४ मध्ये हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्यात तक्रारदाराच्या नावावर असलेली मारुती स्विफ्ट कार जप्त करण्यात आली होती. जप्त करण्यात आलेली कार परत मिळावी यासाठी तक्रारदार महिलेने प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी लष्कर कोर्ट,…
बुधवार, १४ ऑगस्ट वेतन फरकाची फाईल मंजूर करण्याच्या बदल्यात पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना आश्रम शाळेचे मुख्याध्यापक आणि शिपाई लाचेच्या सापळ्यात अडकले आहे. सिन्नरच्या रामनगर आश्रम शाळेत लाच लुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी ही कारवाई केली. सुनिल वसंत पाटील (वय – ५४ वर्ष, मुख्याध्यापक, प्राथमिक आश्रमशाळा रामनगर ता. सिन्नर) आणि बाळू हिरामण निकम (वय ५५ वर्ष, शिपाई, प्राथमिक आश्रम शाळा, रामनगर, ता. सिन्नर, जिल्हा – नाशिक) अशी लाचखोर आरोपींची नावे असून दोघांनाही ताब्यात घेत त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाच लुचपत विभागाकडे तक्रार करणाऱ्या तक्रारदाराच्या २०१६ ते २०२३ या दरम्यानच्या वेतन फरकाची फाईल मंजूर करून आणून फरकाची रक्कम काढून…
रवी राणांच्या वक्तव्याचा संगमनेर काँग्रेसने केला निषेध महाराष्ट्रातील स्वाभिमानी महिला लाचार होणार नाही बुधवार, १४ ऑगस्ट संगमनेर – महाराष्ट्राला संत व समाज सुधारकांची मोठी परंपरा आहे. महाराष्ट्रात कायम महिलांचा सन्मान केला जातो. मात्र महायुती सरकारने मते खरेदी करण्याच्या नावावर महिला भगिनींचा स्वाभिमान दुखावला असून महाराष्ट्रातील स्वाभिमानी महिला कधीही लाचार होणार नाहीत. सरकारच्या घोषणासाठी लागणारा पैसा हा जनतेचा आहे, महायुतीचा नाही. आ. रवी राणांसह महायुती सरकारने महिलांची माफी मागावी, अशी मागणी दुर्गाताई तांबे यांनी केली आहे. संगमनेर बस स्थानक येथे संगमनेर तालुका काँग्रेस व युवक काँग्रेसच्यावतीने रवी राणा यांचा निषेध करण्यात आला. यावेळी नगराध्यक्ष सौ दुर्गाताई तांबे, सुरेश थोरात, अर्चना बालोडे,…
बुधवार, १४ ऑगस्ट विधानसभा निवडणूक तोंडावर असताना काँग्रेसचे दोन आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या दोन्ही आमदारांनी बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. त्यामुळे पक्ष बदलाच्या चर्चेने वेग पकडला आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांची जोरदार तयारी सुरू झाली आहे. त्याचबरोबर इच्छुकांचीही चाचपणी सुरू आहे. मिळण्याची शक्यता दिसत नसल्याने काही जण पक्ष बदलण्याच्या तयारीत आहेत. तर काहींनी पक्षांतर करण्याचा निर्णयही घेतला आहे. त्या दृष्टीने भेटीगाठी वाढल्या आहेत. विद्यमान आमदारही कोणत्या पक्षाकडून उमेदवारी मिळेल? कोणत्या पक्षाच्या तिकीटावर विजयी होता येईल? विद्यमान पक्ष उमेदवारी देणार की नाही? याची चाचपणी करत आहेत. अशा स्थितीत…
बुधवार, १४ ऑगस्ट बिबट्या घरात घुसल्याने घराला बाहेरून कुलूप लावून घेतल्याने बिबट्याला पकडण्यासाठी गर्दीचा अडथळा येत होता, त्यामुळे पोलिसांना बघ्यांच्या गर्दीवर लाठीमार करावा लागला होता. या घटनेत पोलिसांनी घराला कुलूप लावून बिबट्याला कोंडून घेणाऱ्याला जबाबदार ठरवत त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. तब्बल दहा वर्षानंतर या पदाधिकाऱ्याची संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. भाजप पदाधिकाऱ्यांशी संबंधित हा खटला असल्याने याकडे संगमनेर-अकोले तालुक्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथील माळीझाप येथे ३ एप्रिल २०१४ रोजी भाऊसाहेब आल्हाट यांच्या राहत्या घरात ही घटना घडली होती. आल्हाट यांच्या घरात घुसलेल्या बिबट्याची माहिती मिळताच अकोले तालुका भाजपचे सरचिटणीस…
