Author: अनंत पांगारकर
सोमवार, २९ जुलै अहमदनगरचे खासदार निलेश लंके यांनी एलसीबीतील भ्रष्टाचाराविरोधात एल्गार देत जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयासमोर उपोषण केले. माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मध्यस्थीनंतर विशेष पोलीस महानिरीक्षकांनी दिलेल्या आश्वासनामुळे लंके यांनी आपले उपोषण मागे घेतले असले तरी संगमनेरमधील अवैध धंदे सुरूच आहे. लंके यांच्या उपोषणाकडे पाठ फिरविणाऱ्या जिल्हा पोलीस अधीक्षकांनी अवैध धंद्यांकडे देखील दुर्लक्ष केले की काय? असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. अवैध धंद्याच्या माध्यमातून एलसीबी भ्रष्टाचाराने पोखरली गेली आहे. खासदार लंके यांनी उपोषणादरम्यान जाहीर केलेल्या या भ्रष्ट शाखेच्या रेटकार्डचा जर विचार केला तर तब्बल तीस कोटी रुपयांचा हप्ता दरमहा एलसीबी गोळा करते. या रेडकार्ड मध्ये लंकेंकडून राहिलेली…
सोमवार, २९ जुलै – प्रतिनिधी घराबाहेर खेळणाऱ्या पाच-सहा लहान मुलांवर मोकाट कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर ‘महाराष्ट्र संवाद न्यूज’ने या संबंधीचे वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर नगरपालिका प्रशासनाने मोकाट कुत्र्यांची धरपकड सुरू केली आहे. त्यामुळे नागरिकांनी पालिका प्रशासनाला धन्यवाद दिले आहे. संगमनेर शहरात दहशत निर्माण केलेल्या मोकाट कुत्र्यांनी शुक्रवारी रात्री नाशिक-पुणे महामार्गालगतच्या मोगलपुरा (राजवाडा) भागात घराबाहेर खेळणाऱ्या लहान मुलांवर हल्ला चढविला. या हल्ल्यात पाच ते आठ वर्षे वयोगटातील पाच सहा लहान मुले गंभीर जखमी झाले होते. रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले. यामुळे मोकाट कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आला होता. मोकाट कुत्र्यांचा हल्ल्यात पाच-सहा लहान बालके गंभीर जखमी झाल्याचे वृत्त महाराष्ट्र संवाद न्यूजने आपल्या वेब पोर्टलवर…
सोमवार, २९ जुलै पोलीस इन्स्पेक्टर बोलतोय, “माझा माणूस दुकानात येईल, त्याला जी वस्तू हवी ती द्या,” असे सांगत दुकानदारांना लुटणाऱ्या दोघांपैकी पोलीस असलेल्या तोतयाला अटक करण्यात आली असून तोतया पोलीस इन्स्पेक्टरचा शोध सुरू आहे. नितीन बोराडे असे तोतया पोलिसाचे नाव असून त्याचा साथीदार गणेश पुजारी याचा शोध सुरू आहे. कल्याणच्या कोळसेवाडी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. गणेश पुजारी हा दुकानदारांना फोन करत “मी पोलीस इन्स्पेक्टर बोलत आहे, माझा माणूस दुकानात येईल. त्याला जी वस्तू हवी आहे ती द्या”, असे सांगत असे. त्यानंतर नितीन बोराडे त्या दुकानात जायचा. वस्तू घ्यायचा, पैसे साहेब देतील, असे सांगून तेथून निघून जात असे. गणेश पुजारी…
सोमवार, २९ जुलै अंगणवाडी बांधकामाचे बिल काढण्यासाठी लाच घेताना अक्कलकुवा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आणि सहाय्यक लेखाधिकार्यास न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. लाचखोरीचे प्रकरण समोर आल्यानंतर प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या टक्केवारीच्या मागणीबाबत चर्चा सुरू आहे. अक्कलकुवा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी विजय लोंढे (वय ३९) व सहाय्यक लेखाधिकारी रवींद्र सुखदेव लाडे (वय ४७) अशी पोलीस कोठडी देण्यात आलेल्या लाचखोर आरोपींची नावे आहे. अंगणवाडी बांधकामाचे बिल काढण्यासाठी लाच घेताना नंदुरबार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतले होते. दोन्ही लाचखोर अधिकाऱ्यांविरोधात लाच लुचपत विभागाच्या कारवाईनंतर अक्कलकुवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सोमवार, २९ जुलै शेतामध्ये गवत कापत असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने वयोवृद्ध महिलेवर हल्ला करत तिला शेतात ओढून नेत असताना नातवाच्या हा प्रकार लक्षात आल्याने बिबट्याच्या मागे धाव घेत बिबट्याच्या तावडीतून त्याने आजीचा जीव वाचविण्याची घटना समोर आली. दरम्यान बिबट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी महिलेवर संगमनेरमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. संगमनेर तालुक्यातील देवगाव गावामध्ये ही घटना रविवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली. भिमाबाई लक्ष्मण लामखडे (वय ७५, रा. देवगाव, संगमनेर) असे बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या वयोवृद्ध महिलेचे नाव आहे. सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास भीमाबाई लामखडे आपल्या शेतामध्ये गवताची कापणी करत होत्या. यावेळी जवळच बिबट्या दबा धरून बसला होता. जवळ असलेला…
रविवार, २८ जुलै मुंबई – नुकत्याच निवडून आलेल्या विधान परिषदेच्या ११ जागांवरील नवनिर्वाचित सदस्यांना विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज रविवारी (२८ जुलै) विधान परिषद सदस्यत्वाची शपथ दिली. नवनिर्वाचित सदस्यांमध्ये भारतीय जनता पक्षाचे पाच, शिवसेनेचे दोन, राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) दोन काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रत्येकी एक आमदाराचा समावेश आहे. निवडून आलेल्या योगेश टिळेकर, पंकजा मुंडे, परिणय फुके, अमित गोरखे, सदाभाऊ खोत, भावना गवळी, कृपाल तुमाने, शिवाजीराव गर्जे, राजेश विटेकर, मिलिंद नार्वेकर, प्रज्ञा सातव यांचा शपथ घेणाऱ्या सदस्यात समावेश आहे. विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी १२ जुलै रोजी मतदान पार पडले होते. निवडून आलेल्या या सर्व सदस्यांना…
रविवार, २८ जुलै संगमनेर – केंद्रातील भाजप सरकारने स्वायत्त असलेल्या ईडी, सीबीआयसारख्या संस्था आपल्या गुलाम बनविल्या. दबावाचे राजकारण सुरू केले. देशात महागाई, बेरोजगारी वाढीस लागले असून शेतकरी, कामगार, सर्वसामान्य माणूस अडचणीत आला असताना त्याकडे सरकारने लक्ष दिले नाही. प्रचंड जातीभेद आणि घमेंड असलेल्या केंद्रातील भाजप सरकारला रोखण्याचे काम महाराष्ट्रातील महाविकास आघाडी आणि येथील जनतेने केले आहे. संगमनेर तालुक्यातील चंदनपुरी येथे आमदार थोरात यांच्या प्रयत्नातून ५ कोटी २७ लाख रुपये निधीच्या विविध विकास कामांचा शुभारंभ थोरात यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी खासदार भाऊसाहेब वाकचौरे होते. यावेळी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे,…
रविवार, २८ जुलै मुंबई – शिळफाटा येथील एका मंदिरात आश्रयासाठी गेलेल्या महिलेवर सामूहिक अत्याचार करून तिची हत्या केल्याच्या घटनेचा तपास जलदगतीने करण्यात येणार आहे. दोशींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी कार्यवाही करत हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालविण्यात येणार असून विशेष सरकारी वकील म्हणून या खटल्यात उज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी ठाणे नवी मुंबई पोलीस आयुक्त आणि गृह विभागाचे प्रधान सचिव यांना दिल्या आहे. ही अत्यंत गंभीर घटना असून याप्रकरणी ठाणे आणि नवी मुंबई पोलीसांकडे एफआयआर दाखल करण्यात आला आहे. घटना शिळफाटा, ठाणे येथे घडली असून तेथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला…
रविवार, २८ जुलै स्थानिक नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या आणि घंटागाडीवर घरोघर जात कचरा गोळा करण्याचे काम करणाऱ्या कामगारांच्या प्रश्नी ठेकेदार आणि संगमनेर नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष होत असल्याने स्थानिक नागरिकांसह १५ ऑगस्टच्या स्वातंत्र्य दिन कार्यक्रमात काळे झेंडे दाखविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संगमनेर शहर व उपनगरातील कचरा उचलणाऱ्या ठेकेदार कंपनीने “स्वच्छ संगमनेर सुंदर संगमनेर” या ब्रीद वाक्याची पूरती वाट लावली आहे. या कंपनीशी संलग्न असलेल्या घंटा गाडीवरील कचरा गोळा करणारा कामगारांच्या उघड्यावरच निर्माण केलेल्या वस्तीमुळे या कामगार, त्यांच्या कुटुंबीयांसह स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. वारंवार निवेदने देऊन तक्रारी करून देखील संगमनेर नगरपालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी राहुल वाघ…
रविवार, २८ जुलै नवी दिल्ली : शनिवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास दहा राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांच्या राज्यपालांच्या बदल्या तसेच नियुक्त्यांचे वृत्त जारी करण्यात आले. गेल्या पाच वर्षात महाराष्ट्राला तिसऱ्यांदा नवे राज्यपाल मिळाले आहे. महाराष्ट्राच्या राज्यपालपदी सी. पी. राधाकृष्णन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली. राष्ट्रपती भवनाकडून याविषयी परिपत्रक प्रसिद्धीस देण्यात आले. त्यानुसार संबंधित नेत्यांनी पदभार स्वीकारल्याच्या तारखेपासून या नियुक्त्या लागू होतील. राधाकृष्णन सध्या झारखंडचे राज्यपाल आहेत. त्यांच्या जागी संतोषकुमार गंगवार यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात येईल. तमिळनाडूचे ६७ वर्षीय राधाकृष्णन भाजपचे नेते आहेत. त्यांचा जन्म चार मे १९५७ रोजी तिरुपूरमध्ये झाला. वयाच्या १६…
