Author: अनंत पांगारकर
दुसर्यावर आरोप करणारा आपण किती पाण्यात आहोत, याचा विचार कधीच करत नसतो. नैतिकता गुंडाळलेल्यांकडून तर याची अपेक्षाही नसते. तेव्हा अमित शहा आणि त्यांच्या कंपुतली माणसं कोणावर काय टीका आणि आरोप करतात याकडे पाहावं अशी परिस्थिती नाही. मात्र यामुळे परिस्थिती बिकट बनते, अनेकांच्या भावना दुखावतात, मनं विस्कळीत होतात, असं होणं हेही अयोग्यच. म्हणूनच अशा बावळट आणि अहंकार्यांचा समाचार घेणं अगत्याचं ठरतं. गेल्या रविवारी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा पुण्यात येऊन गेले. लोकसभा निवडणुकीत सपाटून आपटलेल्या भाजपच्या पदाधिकार्यांना जागं करण्यासाठी पक्षाने पुण्यात कानफुंकणीचा कार्यक्रम ठेवला होता. या कार्यक्रमात विरोधकांवर मनसोक्त टीका करून शहांपासून…
रविवार, २८ जुलै – अहमदनगर जीवन एक तडजोड आहे. आपल्या आयुष्यात प्रत्येकाने तडजोड करायला शिकले पाहिजे. आप आपसात तडजोड करून जास्तीत जास्त वादातील प्रकरणी मिटविले पाहिजे. लोक अदालत मध्ये ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, महसूल, वीज वितरण, बँका, पतसंस्था, इन्शुरन्स कंपनीचा सहभाग असतो. त्यामुळे लोक अदालत हा एक महायज्ञ असून त्यामध्ये प्रत्येकाने आपले योगदान दिले पाहिजे, असे प्रतिपादन अहमदनगरचे प्रमुख जिल्हा न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांनी केले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अहमदनगर बार असोसिएशन आणि सेंट्रल बँक असोसिएशनच्यावतीने शनिवारी (२७ जुलै) आयोजित केलेल्या लोक अदालतीचे उद्घाटन न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील, अतिरिक्त पोलीस…
शनिवार, २७ जुलै पर्यावरण संवर्धनाचे महत्त्वाचे काम दंडकारण्य अभियानाच्या माध्यमातून संगमनेरमध्ये सुरू आहे. थोर स्वातंत्र्य सेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या कामाची दखल काही वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय पातळीवर युनोस्कोत घेतली गेली असून तालुक्यात वृक्षांची संख्या वाढली असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले. एसएमबीटी सेवाभावी ट्रस्ट, युवक काँग्रेस आणि कऱ्हे ग्रामस्थांच्यावतीने संगमनेरजवळ नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील कऱ्हे घाटामध्ये शनिवारी थोरात यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, दुर्गाताई तांबे, डॉ. जयश्री थोरात आदींसह विविध संस्थांचे पदाधिकारी, काँग्रेसचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. थोरात म्हणाले, स्वर्गीय भाऊसाहेब थोरात…
शनिवार, २७ जुलै एक लाख रुपयांच्या वैयक्तिक जात मुचलक्यावर तीन महिन्यांसाठी तात्पुरत्या स्वरूपात जामीन मिळालेल्या नगर अर्बन बँकेचा कर्जदार संगमनेरमधील उद्योजक अमित पंडितने अखेर न्यायालयात कबूल केल्याप्रमाणे थकीत कर्जापोटी १० कोटी ६४ लाख रुपये बँकेत जमा केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पंडितला नियमित जामीन मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे मानले जात असून पत्नी, मुलगा आणि भागीदाराच्या जामीन अर्जावर उच्च न्यायालय काय निर्णय घेते याकडे लक्ष लागले आहे. नगर अर्बन बँकेतील बड्या कर्जदारांमध्ये अमित पंडितचा समावेश आहे. संगमनेरच्या सहकारातील सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी अमृतवाहिनी बँकेचा अनेक वर्ष अध्यक्ष असलेल्या अमित पंडितचे नाव नगर अर्बन बँकेच्या फॉरेन्सिक ऑडिट नंतर आरोपींमध्ये समोर…
शनिवार, २७ जुलै | मोहसीन शेख मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांनी शुक्रवारी रात्री गल्लीत खेळणाऱ्या लहान मुलांवर हल्ला केल्याने या हल्ल्यात पाच सहा लहान बालके जखमी झाली असून मोकाट कुत्र्यांची संगमनेरमध्ये शहरात दहशत पसरली आहे. नगरपालिका प्रशासनाने या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. संगमनेर शहरातील नाशिक-पुणे मार्गालगत असलेल्या मोगलपुरा (राजवाडा) येथे शुक्रवारी रात्री आठ ते नऊ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. मोकाट कुत्र्यांच्या या हल्ल्यात रात्री घराबाहेर खेळणारी पाच ते आठ वर्षे वयोगटातील पाच-सहा लहान मुलं जखमी झाले आहेत. अब्दुल कवी तबरेज, ईनाया हिम्मत कुरेशी, मारिया सलीम शेख अशी तीन जखमी मुलांची नावे समोर आली असून अन्य जखमी मुलांचे नावे…
शुक्रवार, २६ जुलै | अनंत पांगारकर दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेतील सुमारे ८१ कोटी रुपयांच्या गैव्यवहारप्रकरणी न्यायालयातील तारखांना सातत्याने गैरहजर असलेल्या न्यायालयीन कोठडीतील प्रमूख आरोपीपैकी एक असलेला आरोपी, पतसंस्थेचा व्यवस्थापक भाऊसाहेब विठ्ठल गुंजाळ याला शुक्रवारी जेल प्रशासनाने न्यायालयासमोर हजर केले. त्याच्यासह अन्य पाच आरोपी देखील न्यायालयात उपस्थित होते. तर या खटल्यातील प्रमुख आरोपी असलेल्या भाऊसाहेब कुटे याच्या विरोधातदेखील आर्थिक गुन्हे शाखेने आरोपपत्र न्यायालयात दाखल केले असून आता कुटे यालादेखील न्यायालयासमोर हजर राहावे लागणार आहे. दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेतील सुमारे ८१ कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराने संगमनेरातील पतसंस्थांचे अर्थकारण धोक्यात आले आहे. संगमनेर शहर पोलीस ठाण्यात दूधगंगा पतसंस्थेचा चेअरमन आणि राजकीयदृष्ट्या प्रतिष्ठित असलेला असामी…
साफसफाई करणाऱ्या खासगी कंपन्यांची मदत घ्यावी, नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश शुक्रवार. २६ जुलै : पुणे शहर आणि परिसरात काल झालेल्या अतिवृष्टीमुळे सिंहगड रोड, संचयनी पुलाजवळील पाटील इस्टेट, एकतानगर, फुलपची वाडी आदी भागातील घरांमध्ये पाणी शिरल्याने चिखल आणि घाणीचे साम्राज्य पसरले. या घरांमधील चिखल, गाळ आणि कचऱ्याची महापालिका तसेच साफसफाई करणाऱ्या खासगी कंपन्याच्या मदतीने युद्धपातळीवर स्वच्छता मोहिम राबवावी, पुरामुळे घरांचे, शेतीचे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याच्या सुचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केल्या आहेत. पुण्यातील सिंहगड रोड, संचयनी पुलाजवळील पाटील इस्टेट, एकता नगर, फुलपची वाडी आदी भागातील घरामध्ये चिखल शिरला आहे. त्यामुळे या भागातील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले असून…
शुक्रवार, २६ जुलै तीन अंगणवाड्यांच्या बांधकामाचे पैसे ठेकेदाराला काढून देण्यासाठी तक्रारदाराकडून २६ हजार रुपयांची लाच घेताना नंदुरबारच्या अक्कलकुवा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजय लोंढे व सहाय्यक लेखा अधिकारी रवींद्र लाडे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकले असून या दोघा लाचखोराविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्यावतीने या संदर्भात देण्यात आलेल्या माहितीत म्हटले आहे की, तक्रारदार यांनी पंचायत समिती अक्कलकुवा व ग्रामपंचायत डाब अंतर्गत एकूण तीन अंगणवाड्यांचे बांधकाम पूर्ण केले आहे. तिन्ही कामांच्या बिलाची रक्कम ग्रामपंचायतीच्या खात्यावर वर्ग करण्यासाठी तक्रारदार यांनी सहाय्यक लेखाधिकारी रविंद्र लाडे यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केला. परंतु तक्रारदार यांची बिलाची रक्कम त्यांनी ग्रामपंचायतीच्या…
शुक्रवार, २६ जुलै दुध व दुग्धजन्य पदार्थांतील भेसळ रोखण्यासाठी एमपीडीएपेक्षाही कठोर असा राज्याचा स्वतंत्र कायदा करावा लागेल. तसेच अन्न पदार्थातील भेसळखोरांवर अजामीनपात्र गुन्हा दाखल व्हावा यासाठी केंद्राला शिफारस करण्यात येईल. दुधातील भेसळखोरांविरोधात अन्न व औषध प्रशासन आणि दुग्ध व्यवसाय विकास विभाग यांनी संयुक्त मोहीम प्रभावीपणे राबवून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. राज्यातील प्राथमिक शाळांमध्ये गुणवत्ता वाढीसाठी व्ही. रमणी पॅटर्न राबविणे तसेच राज्यातील दुध व दुग्धजन्य पदार्थांतील भेसळीविषयी आयोजित संयुक्त बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झालेल्या या बैठकीस शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा अत्राम, माजी आमदार…
प्रवीण पुरो | मुंबई गुरुवारी (ता. २५ जुलै) पहाटेपासूनच मुंबई शहर आणि उपनगराला पावसाने झोडपून काढले असताना हवामान विभागानेही धडकी भरणारी शक्यता वर्तवली आहे. २६ जुलैची आठवण करून देणारा पाऊस आज होत आहे. शुक्रवारी (ता. २६ जुलै) सकाळपर्यंत मुंबईला पावसाचा रेड अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईकरांनी आवश्यकता असेल तरच घराच्याबाहेर पडावे, असे आवाहन मुंबई महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. आज पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे २६ जुलै २००५ ला आलेल्या पुराची आठवण ताजी होऊ लागली आहे. या दिवशी मुंबईकरांनी पावसाचे रौद्ररुप पाहिले होते. त्या दिवशी मुंबईत दुपारपासून मुसळधार पावसाने थैमान घातले होते. तेव्हा संपूर्ण मुंबईसह रायगड, ठाणे, रत्नागिरी जलमय…
