Author: अनंत पांगारकर

आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विठ्ठल- रुक्मिणीची महापूजा विठ्ठलाच्या दर्शनासाठी दर्शन मंडप व टोकन दर्शन पद्धत राबवण्यासाठी १०३ कोटीचा निधी मंजूर पंढरपूर येथे एक हजार बेडचे हॉस्पिटल निर्माण करण्याची घोषणा विठ्ठल रुक्मिणी मंदिर संवर्धनासाठी ७३ कोटी ८० लाखाच्या निधीतून उत्कृष्ट कामे सुरू बुधवार, १७ जुलै आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरचे वातावरण भक्तीमय झालेले असून सर्वजण पांडुरंगाच्या भक्तीमध्ये भान हरपून गेलेले आहेत. “हे बा… विठ्ठला माझ्या बळीराजाला सुखी ठेव, कष्टकऱ्यांच्या व सामान्यांच्या जीवनात समृद्धी येऊ दे, प्रत्येकाचे दुःख दूर कर” असे साकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विठ्ठलाच्या चरणी घातले. आषाढी एकादशी निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीची महापूजा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…

Read More

बुधवार, १७ जुलै  रस्त्यावर सार्वजनिक ठिकाणी व्यवसाय थाटून रहदारीस अडथळा निर्माण करणाऱ्या व्यावसायिकांवर संगमनेरमध्ये पोलिसांनी मोठ्या प्रमाणात गुन्हे दाखल केले आहेत. नव्याने आलेल्या भारतीय न्याय संहिता कायद्याच्या कलम २९३ अंतर्गत या कारवाया करण्यात आल्या आहे. या संदर्भात शहर पोलीस ठाण्यात पोलीस कॉन्स्टेबल अतुल दिनकर उंडे, पोलीस हेडकॉन्स्टेबल कानिफनाथ दत्तात्रय जाधव आदींनी दिलेल्या फिर्यादीवरून संगमनेरमधील मेनरोडवर, अशोक चौक, नवीन नगर रस्त्यावर सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर हातगाडी, दुकाने लावून रहदारीस अडथळा निर्माण करणाऱ्या, येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना उपद्रव होईल अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्या पंधरा ते वीस व्यावसायिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. गेल्या आठवड्यात या कारवाया करण्यात आल्याचे समोर आले असले तरी रस्त्यावरील व्यावसायिकांच्या वाहतुकीला…

Read More

विशेष प्रतिनिधी / मुंबई उप मुख्यमंत्री अजित पवार, माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल, माजी मंत्री खा. सुनील तटकरे यांच्या बरोबरच आता राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनाही ३३ कोटी रुपयांच्या वृक्ष लागवडीच्या भ्रष्टाचार प्रकरणी क्लीनचिट देण्यात आली आहे. मुनगंटीवार यांना देण्यात आलेल्या क्लीनचिटमुळे शिंदे सरकारवर क्लीनचिट सरकार अशी शेरेबाजी केली जावू लागली आहे. राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना राज्यात राबवलेल्या महत्त्वाकांक्षी ३३ कोटी वृक्ष लागवड मोहिम प्रकरणात क्लीन चिट मिळाली आहे. कोणत्याही प्रकारची अनियमितता किंवा गैरव्यवहार न झाल्याचे समितीने स्पष्ट केलं आहे. सुधीर मुनगंटीवार यांना क्लीन चिट मिळाली असली तशीच याआधीही महायुतीतील अनेक नेत्यांना क्लीन चिट देण्यात आली आहे. राज्यात तत्कालीन…

Read More

मंगळवार १६ जुलै | अनंत पांगारकर दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेतील सुमारे ८१ कोटी रुपयांचा अपहार प्रकरणातील मुख्य आरोपी राजकीय आसामी असलेला चेअरमन भाऊसाहेब कुटे याच्यासह व्यवस्थापक भाऊसाहेब गुंजाळ सध्या अटकेत आहेत. यातील भाऊसाहेब विठ्ठल गुंजाळ याला न्यायालयासमोर हजर करण्यासाठी जेल प्रशासनाला प्रोडक्शन वॉरंट काढण्यात आले आहे. पतसंस्थेतील या घोटाळ्याप्रकरणी चेअरमन असलेला कुटे अनेक महिने फरार होता. त्याच्या कुटुंबीयांना सर्वोच्च न्यायालयात दिलासा मिळाल्यानंतर तो स्वतःहून पोलिसात हजर झाला. तर या गुन्ह्यातील दुसरा प्रमुख आरोग्य पतसंस्थेचा व्यवस्थापक भाऊसाहेब गुंजाळ हा देखील गुन्हा दाखल झाल्यानंतर काही दिवसातच स्वतःहून पोलिसात हजर झाला होता. त्या वेळेपासून सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे. त्याच्यासह सहा जणांविरोधात न्यायालयात…

Read More

मंगळवार, १६ जुलै  ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून पर्यावरण संवर्धनासाठी सुरू झालेल्या दंडकारण्य अभियानाचा शुभारंभ यावर्षी संगमनेर तालुक्यातील पेमगिरी गावाच्या चंदनगड डोंगरावर बुधवारी (१७ जुलै) सकाळी नऊ वाजता होणार असल्याची माहिती प्रकल्प प्रमुख दुर्गाताई तांबे यांनी दिली. अभियानाचे यंदाचे १९ वे वर्ष आहे. काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात व माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या उपस्थितीत हा शुभारंभ होत आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी निसर्गाचे संवर्धन करणे प्रत्येकाची मुलभूत जबाबदारी बनली असून वृक्षारोपन व पर्यावरणाचे संवर्धन करणे भावी पिढयांसाठी काळाची गरज बनली आहे. आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली मागील १८ वर्षात तालुक्यातील विविध संस्था, विद्यालये, कार्यकर्ते…

Read More

मंगळवार, १६ जुलै म्युच्युअल फंड्स गुंतवणूक, जीवन विमा, मेडीक्लेम विमा क्षेत्रातील प्रथितयश ब्रँड म्हणून नावारूपास आलेल्या कडलग इन्व्हेस्टमेंट या फर्मच्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी माईंड एक्सलंस प्रोग्रामचे प्रशिक्षण माईंड एक्सलंस कोच व ट्रेनर सुधीर फरगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाले आहे. माईंड एक्सलंस टेक्नॉलॉजीजद्वारे आयोजित हा १४ आठवड्यांचा कार्यक्रम अत्याधुनिक पद्धतीने संमोहन व NLP तंत्रांचा वापर करून व्यक्तिगत व व्यावसायिक क्षमतांचा विकास घडवून आणण्यासाठी बनवला आहे. कडलग इन्व्हेस्टमेंट फर्मचे संचालक सुनील कडलग व आदित्य कडलग यांच्या प्रेरणेतून या प्रोग्रामचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे पहिले सत्र नुकतेच पार पडले असून, फरगडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण सुरू झाले आहे. यामुळे कर्मचार्‍यांचे मानसिक ताण तणाव कमी…

Read More

मंगळवार, १६ जुलै  सध्या सुरू असलेल्या पावसामुळे संगमनेरमधून जाणाऱ्या कोल्हार-घोटी मार्गाच्या झालेल्या दुरवस्थेवर सोमवारी ‘महाराष्ट्र संवाद न्यूज’ने एका बातमीच्या माध्यमातून प्रकाश टाकताच काही वेळातच या मार्गाच्या डागडुजीच्या कामाला सुरुवात करण्यात आली. त्यामुळे या मार्गावरून जाणाऱ्या-येणाऱ्या प्रवाशांसह स्थानिकांना काही अंशी दिलासा मिळाला आहे. या मार्गाची काही छायाचित्रे या परिसरातील स्थानिक जागरूक नागरिकांनी महाराष्ट्र संवाद न्यूजला पाठविली होती. संगमनेर शहरातून जाणाऱ्या कोल्हार-घोटी मार्गाचे काम काही दिवसांपूर्वीच पूर्णत्वास गेल्याने हा मार्ग अतिशय चांगला झाला, हा समज संगमनेरात सध्या सुरू असलेल्या पावसाने खोटा ठरविला असून यामुळे ठेकेदाराच्या कामाची पोलखोल झाली आहे. यामुळे सरकारचा या कामावरील पैसा पाण्यात गेला आहे. या संदर्भात महाराष्ट्र संवाद न्यूजने…

Read More

सोमवार १५ जुलै  खरीप हंगामामध्ये सर्वसाधारण आदिवासी गटासाठी भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, मुग, उडिद, सोयाबीन, भुईमूग व सुर्यफुल या ११ पिकांसाठी पीकस्पर्धेचे आयोजन करण्यात आले असुन या पीक स्पर्धेमध्ये अधिकाधिक शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी केले आहे. राज्यामध्ये पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येऊन उत्पादकतेमध्ये वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशिल शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पाकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांचे मनोबल वाढुन आणखी उमेदीने नवनवीन अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. त्यामुळे कृषी उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन राज्याच्या एकुण उत्पादनात भर पडेल, या…

Read More

विशेष प्रतिनिधी / मुंबई नुकत्याच पार पडलेल्या विधान परिषद निवडणुकीत सेनेच्या उद्धव ठाकरे गटाने मिलिंद नार्वेकर यांच्या नावाने बारावा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवल्यानेच शेकापचे जयंत पाटील यांचा पराभव झाल्याचं स्पष्ट झालंय. ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी शरद पवार यांनी प्रयत्न केले होते. मात्र मिलिंद नार्वेकर यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा उद्धव ठाकरेंचा हट्ट त्यांनी अखेरपर्यंत सोडला नाही. हीच जयंत पाटील यांच्यासाठी ती धोक्याची घंटा ठरली. अशात शरद पवार यांनी जयंत पाटील यांना पूर्ण पाठिंबा दिला असला तरी, उद्धव ठाकरे यांचा जयंत पाटील यांच्या उमेदवारीला विरोध होता, अशी चर्चा आता समोर आलीय. लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार अनंत गीते यांच्या विरोधात जयंत…

Read More

सोमवार १५ जुलै  शहर आणि उपनगरात घंटागाड्यांच्या माध्यमातून फिरून स्वच्छता आणि नागरिकांच्या आरोग्याची काळजी वाहणाऱ्या कामगारांच्या मोकळ्या मैदानावरील वस्तीमुळे, त्यांच्याकडून होणाऱ्या त्रासामुळे स्थानिक नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रासाला सामोरे जावे लागत. शहर स्वच्छतेचा ठेका घेतलेल्या ठेकेदाराने या सफाई कामगारांच्या राहण्याची व्यवस्था इतरत्र करावी, यासाठी परिसरातील नागरिक एकवटले असून या नागरिकांचे त्रासातून मुक्तता करण्यासाठी स्थानिक प्रशासन दखल घेत नसल्याने थेट आरोग्य मंत्रालयाचे दरवाजे ठोठावण्याचा इशारा शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) माजी शहरप्रमुख प्रसाद पवार यांनी दिला आहे. शहर स्वच्छतेचा ठेका नाशिकच्या एका कंपनीला देण्यात आला या कंपनीशी संलग्न सफाई कामगारांची शहरातील परदेशपुरा भागातील जुन्या पाण्याच्या टाकीजवळ अनाधिकृत वस्ती निर्माण करण्यात आली असून या…

Read More