Author: अनंत पांगारकर
सोमवार, २४ जून अहमदनगर रेल्वे स्टेशन परिसरातून अज्ञात महिलेने ११ महिन्याच्या अपहरण झालेल्या चिमुकल्याची संगमनेर पोलिसांच्या मदतीने रविवारी रात्री सुटका करण्यात पोलिसांना यश आले. याप्रकरणी एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याला पुढील चौकशीसाठी रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. अपहरण झालेल्या बालकाला संगमनेर शहरालगतच्या गुंजाळवाडी येथून ताब्यात घेत त्याच्या पालकांकडे सोपविण्यात आले. अहमदनगर रेल्वे स्टेशन परिसरातील एका महिलेने स्वानंद आकाश खडसे या ११ महिन्याच्या चिमुकल्याचे अपहरण केले होते. या संदर्भात नगर रेल्वे पोलिसांकडे गुन्हा नोंद करण्यात आला. सदरचे अपहरण झालेले बालक संगमनेरमध्ये असल्याची माहिती रेल्वे पोलिसांना मिळाली होती. नगर रेल्वे पोलीसचे उपनिरीक्षक एस. जी. लोणकर यांनी आपल्या सहकाऱ्यांसह संगमनेर शहर…
सोमवार, २४ जून १८ व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनाला सुरवात झाली असून खासदारांना शपथ दिली जात आहे. बघा लोकसभा अधिवेशनाचे लाईव्ह (live) कामकाज.. https://www.youtube.com/live/aQZwbc7cHww?si=Nha-iRFq19_FL2Zm https://www.youtube.com/live/YAcRXrrEFZQ?si=v1yDk9KKfrDNj0Kw
सोमवार, २४ जून दोन दिवसांपूर्वी भारतीय जनता पक्षाचा राजीनामा दिलेल्या माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे. यामुळे १० वर्षानंतर त्या पुन्हा स्वगृही परततील. त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे भाजपला नांदेड जिल्ह्यात मोठा धक्का बसू शकतो. नांदेड जिल्ह्यात सूर्यकांता पाटील यांची डॅशिंग नेत्या म्हणून ओळख आहे. १० वर्षांपासून भाजपमध्ये कार्यरत असलेल्या पाटील यांच्यावर पक्षाने कोणती जबाबदारी दिलेली नव्हती. दोन दिवसांपूर्वी त्यांनी भाजपा पक्ष सदस्यत्वाचा आणि हदगाव विधानसभा संयोजक पदाचा राजीनामा दिला होता. भारतीय जनता पक्षावर नाराज असलेल्या पाटील शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. आज त्या मुंबईत पक्ष प्रवेश करण्याची…
सोमवार, २४ जून आरक्षण या विषयाकडे राज्य सरकारने अतिशय संवेदनशीलपणे बघण्याची गरज आहे. कोणत्याही समाजाच्या आरक्षणाचा विषय असू दे, सरकारने त्यावर लवकर निर्णय घ्यायला हवा. केंद्रात ३०० खासदार असताना देखील महाराष्ट्राच्या आरक्षणाची चर्चा का होत नाही असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे. पत्रकारांशी बोलताना सुप्रिया सुळे सुरुवातीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. त्या म्हणाल्या की, देवेंद्र फडणवीस आमच्या घरापाशी येऊन म्हणाले होते, पहिल्या पंधरा दिवसात धनगर समाजाला आरक्षण देऊ. पण खरं तर आरक्षण या विषयाकडे महाराष्ट्र सरकारने अतिशय संवेदनशीलपणे बघितलं पाहिजे. हे सरकार उपोषणाला दहा-पंधरा दिवसांपर्यंत का खेचते? मराठा असो, धनगर, लिंगायत, मुस्लिम कोणत्याही…
सोमवार, २४ जून अठराव्या लोकसभेचे पहिले अधिवेशन आजपासून सकाळी ११ वाजता सुरू होत आहे. आज पहिले दोन दिवस नव्या खासदारांचा शपथविधी होणार आहे. हंगामी अध्यक्षांच्या नियुक्तीशिवाय NEET-UGC पेपर लीक आणि इतर स्पर्धा परीक्षा पुढे ढकलल्याप्रकरणीही विरोधकांनी सरकारला कोंडीत पकडण्याची रणनीती आखली आहे, त्यामुळे पहिल्याच दिवशी गदारोळ होण्याची शक्यता आहे. अठराव्या लोकसभेचे पहिले अधिवेशन सोमवारपासून सुरू होणार आहे. ३ जुलैपर्यंत चालणाऱ्या अधिवेशनाच्या पहिल्या दोन दिवशी नव्या खासदारांचा शपथविधी होणार आहे. नवीन लोकसभा अध्यक्षांची निवड बुधवारी होणार आहे, तर गुरुवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीला संबोधित करतील. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी सातवेळा खासदार भर्तृहरी महताब यांची प्रोटेम स्पीकर म्हणून नियुक्ती…
रविवार, २३ जून नीट परीक्षेत ग्रेस मार्क मिळालेल्या विद्यार्थ्यांची आज सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने फेर परीक्षा झाली. यावर नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी गोलमाल है भाई, सब गोलमाल है! अशी प्रतिक्रिया एक्स (X) वर व्यक्त केली आहे. तांबे म्हणाले, आज नीट परीक्षेत ग्रेस मार्क मिळालेल्या १५६३ विद्यार्थ्यांची सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने फेर परीक्षा घेण्यात आली, ह्या परीक्षेला १५६३ पैकी ८१३ विद्यार्थीच हजर राहिले म्हणजेच ७५० विद्यार्थ्यांनी ही फेरपरीक्षा टाळली, ह्यातूनच नीटमध्ये गोलमाल झाल्याचे सिध्द होते. तांबे यांनी नीट परिक्षेबद्दल भाष्य करत या विषयाला तोंड फोडलं आहे. जवळपास निम्म्या परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी परीक्षा देण्याचे टाळले असल्याने तांबे यांनी गोलमाल है भाई,…
रविवार, २३ जून आमदार रोहित पवार यांच्या आणखी एका कारखान्यावर कारवाई करण्यासाठी सरकारच्या हालचाली सुरू असल्याची माहिती पवार यांनी स्वतः एक्सवर (X) दिली आहे. तपास यंत्रणांच्या मदतीने विरोधी पक्षातील नेते फोडायचे ही भाजपची जुनी रणनीती आता भाजपच्या सहकारी पक्षांची सुद्धा सवय बनलेली आहे. त्यातूनच दबाव टाकण्यासाठी बिद्री कारखान्याचे अध्यक्ष के. पी. पाटील यांच्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने खोटी कारवाई केली. या कारवाईचा पवार यांनी जाहीर निषेध केला. पवार म्हणाले, माझ्यावरही अशाच प्रकारे प्रदूषण नियंत्रण बोर्ड, इडी (ED) च्या माध्यमातून दबाव टाकण्याचा प्रयत्न झाला. एवढे होऊनही मी सरकारच्या विरोधात बोलायचे थांबवत नाही म्हणून माझ्या आणखी एका कारखान्यावर कारवाई करण्यासाठी सरकारच्या हालचाली…
रविवार, २३ जून चोरीच्या गुन्ह्यात अटक असलेल्या आरोपीला ठसे घेण्यासाठी पोलिसांनी कोठडीतून (लॉकअप) बाहेर काढलेला आरोपी पोलिसांना चकवा देत पसार झाला. गजबजलेल्या परिसरात असलेल्या हडपसर (पुणे) पोलीस ठाण्यात ही घटना घडली. पोलिसांसह गुन्हे शाखेची यंत्रणा कामाला लागले आणि अवघ्या दीड तासातच आरोपीला दिवे घाटातून पकडण्यात पोलिसांना यश मिळाले. गोविंद उर्फ पिंट्या घोडके पसार झालेल्या आणि गुन्हे शाखेच्या युनिट पाचच्या पथकाने नंतर पकडलेल्या आरोपीचे नाव आहे. घोडके याला हडपसर पोलिसांनी एका चोरीच्या गुन्ह्यात अटक केली होती. शनिवारी (२२ जून) दुपारी साडेबारा एकच्या दरम्यान त्याला पोलीस कोठडीतून हाताचे ठसे घेण्यासाठी बाहेर काढण्यात आले होते. त्यावेळी पोलिसांचे लक्ष नसल्याची संधी साधून चकवा देत…
आरोपी भाऊसाहेब कुटे न्यायालयीन कोठडीतून ग्रामीण रुग्णालय आणि आता नगरच्या जिल्हा रुग्णालयात… तेथून व्हीआयपी ट्रीटमेंटसाठी (?) पुण्याला हलविण्याच्या हालचाली वैद्यकीय अहवालाबाबत तुरुंग अधीक्षक, वैद्यकीय अधीक्षकांचेही मौन, सगळे प्रकरणच बनतय संशयास्पद आंदोलनादरम्यान पुढाकार घेणाऱ्या ठेवीदारांच्या नेत्यांचेही मौन रविवार, २३ जून | अनंत पांगारकर दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेच्या आर्थिक घोटाळा प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या मुख्य आरोपी भाऊसाहेब कुटे याला अचानकपणे संगमनेरच्या दुय्यम कारागृहातून ग्रामीण रुग्णालयात व तेथून अहमदनगरच्या सिव्हिल रुग्णालयात हलविण्यात आले आहे. दरम्यान आरोपीला नेमकं काय झालंय याबाबत सर्वच यंत्रणांनी मौन बाळगले आहे. त्यामुळे आरोपीला ट्रीटमेंटच्या नावाखाली कोठडीतून बाहेर काढून व्हीआयपी सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू असल्याच्या चर्चा सुरू आहे.…
रविवार, २३ जून संगमनेर उपविभागात नागरिकांच्या महागड्या मोबाईल चोरीचे प्रमाण मोठे असून अशा चोरी गेलेल्या मोबाईल पैकी १९ मोबाईलचा शोध घेण्यास पोलिसांना यश मिळाले आहे. त्यातील १२ मोबाईल मूळ मालकांना पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या हस्ते परत करण्यात आले. मोबाईल चोरांच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे यांनी संगमनेरचे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांना चोरी गेलेल्या मोबाईलचा शोध घेण्याचे आदेश देण्यात आले होते. पोलीस उपाधीक्षक वाघचौरे यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधव, पोलीस हेड कॉन्स्टेबल दत्तात्रय मेंगाळ, पोलीस नाईक राहुल डोके, पोलीस कॉन्स्टेबल राहुल सारबंदे यांच्यासह अपर पोलीस अधीक्षक कार्यालयाचे पोलीस नाईक सचिन धनाड, राम वेताळ…
