Author: अनंत पांगारकर
देशभरात भारतीय जनता पक्षाची झालेली पिछेहाट ही आपल्या कर्माची फळं आहेत, असं अजूनही त्या पक्षाचे नेते मानायला तयार नाहीत. स्वत: नरेंद्र मोदींची त्यांच्या वाराणसीत झालेली पिछेहाट आणि मोदींच्या सर्वात आवडत्या मंत्री असलेल्या स्मृती इराणी यांचा रायबरेलीत झालेला सपाटून पराभव सारं काही सांगून जातं. याच कर्मामुळे चारसौ पारचा नारा कुठल्या कुठे गुंडाळून ठेवावा लागला आणि चक्क पाऊणशे भाजप खासदारांना लोकांनी घरचा रस्ता दाखवला. सर्वच्या सर्व जागा जिंकण्याच्या आणाभाका मारणार्या योगी आदित्यनाथ यांच्या उत्तर प्रदेशनेही सत्तेला जागा दाखवली. जिथे रामाची प्रतिष्ठापना झाली तिथे तर पराभव चाखाण्याची वेळ भाजपवर आली. हाती असलेल्या सत्तेचा आतिरेक करतो, हे त्यांना मान्य नाही. सत्तेला अहंकाराने इतकं पछाडलं…
शनिवार, २२ जून लोकसभा निवडणूक संपले असले तरी या निवडणुकीचे कवित्व अद्यापही संपलेले नाही. शिर्डी लोकसभा मतदारसंघात भाजपचे पंटर असलेल्या आणि वरिष्ठांची दिशाभूल करून पक्षविरोधी काम करणाऱ्यांना अजूनही शिवसेनेत (उद्धव बाळासाहेब ठाकरे) स्थान का? असा सवाल शिवसेना वाहतूक सेनेचे शहर प्रमुख, माजी उपशहर प्रमुख इम्तियाज शेख यांनी उपस्थित केला आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघात शिवसेनेने भाऊसाहेब वाकचौरे यांना पुन्हा पक्ष प्रवेश देत उमेदवारी बहाल केली होती. तर विरोधी शिवसेना शिंदे गटाकडून सदाशिव लोखंडे यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली. अटीतटीच्या लढतीत सहापैकी चार मतदारसंघात सदाशिव लोखंडे यांना तर दोन मतदारसंघात भाऊसाहेब वाकचौरे यांना मताधिक्य मिळाले. यात वाकचौरे यांचा विजय झाला असला तरी…
शनिवार, २२ जून भंडारदरा धरण परिसरात फिरण्यासाठी गेलेल्या तरुणांपैकी एकाचा धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. तर त्याचे अन्य सहकारी मित्र बचावले असल्याची माहिती मिळते. सद्दाम शेख (वय २६ वर्ष, रा. पुनमनगर, शिर्डी) असे पाण्यात बुडून मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याचा मृतदेह सापडला असल्याची माहिती संगमनेरचे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी ‘महाराष्ट्र संवाद न्यूज’ला दिली आहे. शनिवारी शिर्डी परिसरातील सहा तरुण भंडारदरा धरण परिसरात फिरण्यासाठी गेले होते. दुपारी सव्वा दन वाजण्याच्या सुमारास ते धरणाच्या पाण्यात उतरले असता त्यातील एक जण पाण्यात बुडाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक आणि मदत कार्य घटनास्थळी पोहोचले. शेख याचा मृतदेह पाण्यातून वर काढण्यात आला…
शनिवार, २२ जून न्यायालयीन सुनावणीला सातत्याने गैरहजर राहिल्याच्या कारणामुळे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना मुंबई सत्र न्यायालयाने तीन हजार रुपयांचा दंड ठोठावला. महाविकास आघाडी सरकारच्या काळात कोरोना साथ रोग सुरू असताना भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी वीज दरवाढी विरुद्ध आंदोलन केले होते. आंदोलना दरम्यान भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी बेस्टच्या महाव्यवस्थापकांना मारहाण केली होती. याप्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, भाजपचे नेते मंगल प्रभात लोढा तसेच वीस जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाची सुनावणी सध्या मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष न्यायालयापुढे सुरू असून या खटल्याची सुनावणी अंतिम टप्प्यात आली असताना देखील राहुल नार्वेकर हे सातत्याने न्यायालयात गैरहजर राहत असल्याने न्यायाधीशांनी त्यांच्या विरोधात संताप व्यक्त केला. राहुल…
जमिनीच्या मोजणीसाठी ४ लाखाची लाच मागणाऱ्या लाचखोर भूमापकाविरोधात गुन्हा, ५० हजार घेतांना एकाला पकडले
शनिवार, २२ जून जमीन मोजण्यासाठी व क्षेत्राची हद्द ठरवून देण्यासाठी ४ लाख रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी लाचखोर भूमापकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर ४ लाखापैकी ५० हजार रुपये घेतांना एकाला पकडले आहे. दौलत मधुकर गायकवाड (वय ३५ वर्षे, भूकरमापक भूमी अभिलेख कार्यालय, हवेली, येरवडा, पुणे.) व योगेश्वर राजेंद्र मारणे (वय २५ वर्षे, रा. एरंडवणे, पुणे) या दोन लाचखोर आरोपीविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम सन १९८८ चे कलम ७ अ १२ अन्वये येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदाराच्या देहूगाव, पुणे येथील जमीन मोजण्यासाठी व क्षेत्राची हद्द ठरवून देण्यासाठी लाचखोर आरोपी हवेली भूमी अभिलेख कार्यालयाचा भुकरमापक दौलत गायकवाड याने…
शनिवार, २२ जून शेतकऱ्यांच्या गाळप केलेल्या उसाचे पैसे थकविल्याच्या कारणावरून २१ कोटी ०३ लाख ५० हजार रुपयांच्या वसुलीसाठी नगर जिल्ह्यातील श्रीगोंद्याच्या कर्मयोगी कुंडलिकराव जगताप (कुकडी) सहकारी साखर कारखान्याची जंगम, स्थावर मालमत्ता जप्त करण्याचे आदेश देण्यात आले आहे. यासाठी अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांना प्राधिकृत करण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे. राज्याच्या साखर आयुक्तांनी ३१ मे रोजी कुकडी (कर्मयोगी कुंडलिकराव जगताप) कारखान्यासाठी हा आदेश दिला आहे. शेतकऱ्यांचे थकविलेले पैसे परत मिळावेत यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने गेल्या तीन आठवड्यात कोणतीही पाऊले उचललेली नसल्याचे यासंबंधीचे वृत्त लोकसत्ताने दिले आहे. नियमानुसार उसाचे गाळप झाल्यानंतर १४ दिवसात शेतकऱ्यांना त्यांचे पेमेंट अदा करणे कारखान्यांवर बंधनकारक आहे.…
महायुती सरकारने भ्रष्टाचाराच्या सर्व सीमा ओलांडल्या, १०० टक्के कमीशनखोरी. महायुती सरकारच्या भ्रष्टाचारावर पावसाळी अधिवेशनात आवाज उठवणार शुक्रवार, दि २१ जून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ज्या अटल सेतुचे उद्घाटन करण्यात आले त्या रस्त्याला अवघ्या तीन महिन्यातच भेगा पडल्या आहेत. नवी मुंबईकडील एका भागात अर्धा किलोमीटरपर्यंत रस्ता एक फुट खाली खचला आहे. महायुती सरकारने भ्रष्टाचाराच्या सर्व सीमा ओलांडल्या आहेत. कर्नाटकातील आधीचे भाजपा सरकार ४० टक्के कमिशनवाले होते पण महायुती सरकार तर १०० टक्के कमीशनखोर आहे, असा गंभीर आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींबरोबर अटल सेतुची पाहणी करून रस्त्याला भेगा…
शुक्रवार, २१ जून दिल्ली दारू धोरणाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मोठा झटका बसला आहे. केजरीवाल यांच्या जामीन याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाने सुनावणी होईपर्यंत कनिष्ठ न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती दिली असल्याचे सांगितले. म्हणजेच हायकोर्टात सुनावणी होईपर्यंत केजरीवाल तिहार तुरुंगातून सुटणार नाहीत. अरविंद केजरीवाल यांच्या जामीनाविरोधात ईडीच्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाने तातडीने सुनावणी घेण्याची परवानगी दिली. या खटल्याची सुनावणी होईपर्यंत खालच्या न्यायालयाचा आदेश प्रभावी ठरणार नाही, असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. उच्च न्यायालयात याचिका दाखल करताना ईडीने युक्तिवाद केला की, आम्हाला कनिष्ठ न्यायालयात आमचे म्हणणे मांडण्याची संधी मिळाली नाही. यावर उत्तर देताना केजरीवाल यांच्या वकिलाने असे म्हणणे योग्य नसल्याचे…
शुक्रवार, २१ जून अहमदनगर जिल्ह्यातील अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांनी रेशन घेण्यासाठी आपल्या रास्त भाव दुकानातून ३० जून पर्यंत ई-केवायसी करून घेण्याचे आवाहन अहमदनगरच्या जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांमार्फत करण्यात आले आहे. नगर जिल्ह्यात सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत रास्त भाव दुकानामार्फत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना धान्याचे वितरण करण्यात येते. राज्य शासनाच्या निर्देशानुसार नगर जिल्ह्यातील २९ लाख ३४ हजार ४८५ लाभार्थ्यांचे ई-केवायसी आधार प्रमाणीकरण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांच्या शिधापत्रिकेसोबत संलग्न करण्यात आलेले आधार क्रमांक बरोबर असल्याचे तसेच शिधापत्रिकेमध्ये नमुद असलेल्या व्यक्ती त्याच आहेत, याची खात्री करण्यासाठी ई-केवायसी प्रणाली उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याव्दारे…
शुक्रवार, २१ जून बीड लोकसभा मतदारसंघातून झालेल्या पराभवानंतर भाजपाच्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर घेण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या गोटात हालचाली सुरू असल्याचे वृत्त आहे. असे झाले तर अनेकदा डावलल्या गेलेल्या मुंडे आणि त्यांच्या समर्थकांसाठी हा आनंदाचा धक्का असेल. दिल्लीत भाजप नेत्यांच्या झालेल्या बैठकीत मुंडे यांना राज्यसभेवर पाठविण्यासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. उदयनराजे भोसले आणि पियुष गोयल हे दोन सदस्य लोकसभा निवडणुकीत निवडून आल्याने राज्यसभेतील त्यांच्या जागा व्यक्त झाल्या आहेत. यातील एका जागेवर मुंडे यांना घेण्यासंदर्भात चर्चा सुरू आहे. मुंडे यांच्या लोकसभेतील पराभवानंतर त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी आत्महत्या करण्याचे प्रकार समोर आले आहेत. तसेच राज्यात सध्या मराठा विरुद्ध ओबीसी…
