Author: अनंत पांगारकर

शनिवार, दिनांक ८ जून २०२४ काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी ठेवलेल्या प्रस्तावावर गौरव गोगोई, के. सुधाकरन, तारीक अन्वर यांनी समर्थन दिल्यानंतर काँग्रेसच्या संसदीय पक्षाच्या अध्यक्षपदी सोनिया गांधी यांची एकमताने निवड करण्यात आली. सोनिया गांधी फेब्रुवारीमध्ये राज्यसभा म्हणून राजस्थानमधून निवडून आल्या आहेत. संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये शनिवारी झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली. आजच काँग्रेसच्या कार्य समिती बैठकीत राहुल गांधी यांनी विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी घ्यावी असा काँग्रेसच्या नेत्यांचा आग्रह आहे. आज काँग्रेस संसदीय पक्षाच्या बैठकीत विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी राहुल गांधींना पार पाडण्याची विनंती करणारा ठराव मंजूर करण्यात आला. पण, राहुल गांधी यांनी विचार करण्यासाठी वेळ मागितला. 

Read More

शनिवार, दिनांक ८ जून २०२४ दोघा चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील तीन तोळ्याची सोन्याची चैन हिसकावत पलायन केल्याची घटना शुक्रवारी संगमनेरमध्ये घडली. याप्रकरणी अज्ञात दोघा चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलांच्या गळ्यातील दागिने लांबवण्याच्या घटना संगमनेरमध्ये वारंवार समोर येत आहेत. शुक्रवारी रात्रीदेखील साडेसात ते आठ वाजण्याच्या सुमारास शहरातील नाशिक-पुणे महामार्गालगत असलेल्या कुंथूनाथ सोसायटीमध्ये जैन मंदिराजवळ सुनिता संतोष मेहता या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे तीन तोळे वजनाची चैन ओढून गाडी भरधाव वेगात नेत पळून गेले. सुनिता मेहता यांनी या संदर्भात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात दोघा चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहराच्या विविध भागात तसेच बस स्थानकावर सातत्याने महिलांच्या गळ्यातील…

Read More

शनिवार दिनांक ८ जून २०२४ संसदेच्या विरोधी पक्षनेतेपदी राहुल गांधी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. काँग्रेसच्या बैठकीत एकमताने राहुल गांधी यांच्याकडे विरोधी पक्षनेतेपद देण्याचा ठराव संमत करण्यात आला, अशी माहिती काँग्रेसचे प्रभारी सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी दिली. आज शनिवारी (ता. ०८ जून) दिल्लीत काँग्रेस कार्यकारणीची बैठक पार पडली. या बैठकीत ही निवड करण्यात आली. संसदेत विरोधी पक्षनेता म्हणून राहुल गांधीच नीट जबाबदारी पार पाडू शकतात, असेही वेणुगोपाल म्हणाले. राहुल गांधी यांनी सभागृहात काँग्रेसची धुरा सांभाळावी आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते व्हावे, अशी मागणी काँग्रेसमधील खासदारांनी आधीपासूनच केली आहे. त्यामुळे या संदर्भात झालेल्या काँग्रेसच्या बैठकीत यावर एकमताने निर्णय घेण्यात आला.…

Read More

शनिवार, दिनांक ८ जून २०२४ मनोज जरांगेंनी आजपासून पुन्हा आंतरवालीत उपोषण सुरू केले असून महायुती सरकारवर निशाणा साधला आहे. जर आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाही, तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्रात सर्व जातीधर्माचे २८८ उमेदवार उभे केल्याशिवाय आम्ही राहणार नाही, तसेच विधानसभेला आम्ही नाव घेऊन पाडणार”, असा थेट इशाराही मनोज जरांगे यांनी दिला. मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील शनिवार (दि. ८) पासून पुन्हा एकदा आंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसले आहेत. मात्र, त्याआधी आंतरवालीतील काही ग्रामस्थांनी जरांगेंच्या उपोषणाला परवानगी देऊ नये, असे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. त्यानंतर पोलिसांनी जरांगेंच्या आमरण उपोषणाला परवानगी नाकारली होती. मात्र, तरीही जरांगे उपोषणावर…

Read More

शनिवार, दिनांक ८ जून २०२४ संगमनेर शहरातील बेकायदा कत्तलखान्याचे नेटवर्क आता तालुक्याच्या ग्रामीण भागात हातपाय पसरू लागले आहे. शुक्रवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास संगमनेर तालुका पोलिसांनी केलेल्या कारवाईत कत्तलीच्या उद्देशाने बांधून ठेवलेल्या गोवंश जातीच्या ११ वासरांची सुटका करण्यात आली आहे. संगमनेर तालुक्यातील कौठे धांदरफळ येथे ही कारवाई करण्यात आली असून याप्रकरणी महिला पोलीस कॉन्स्टेबल वनिता चोखंडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संतोष गंगाधर घुले आणि इम्तियाज मोमीन या दोघांविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोरक्षक अविनाश शहा यांच्या मदतीने ही कारवाई करण्यात आल्याची माहिती मिळते. कौठे धांदरफळ (संगमनेर) येथे संतोष गंगाधर घुले याच्या घरासमोर गोवंश जातीची वासरं कत्तलीच्या उद्देशाने…

Read More

शनिवार, दिनांक ८ जून २०२४  देशाच्या पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा सत्तारूढ होत पंतप्रधान पदाचे हॅट्रिक साधणार आहेत. रविवारी सायंकाळी सव्वा सात वाजता मोदींसोबत त्यांच्या मित्र पक्षाचे १८ खासदार मंत्री पदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. यात महाराष्ट्रातील कोणाला संधी मिळते याची उत्सुकता वाढली आहे. या १८ नव्या मंत्र्यांमध्ये ७ जण कॅबिनेट तर उर्वरित ११ खासदार स्वतंत्र मंत्री आणि राज्यमंत्री म्हणून शपथ घेऊ शकतात. पंतप्रधान मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातून भाजपकडून दोघांना केंद्रीय मंत्री व दोघांना राज्यमंत्री म्हणून संधी मिळू शकते. यासाठी नितीन गडकरी, पियुष गोयल, उदयनराजे भोसले, हेमंत सावरा आणि रक्षा खडसे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. मित्र पक्षाचे खासदार देखील त्यांच्या…

Read More

शनिवार, दिनांक ८ जून २०२४ काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांना मुंबईतील एच. एन. रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती सुधारत असल्याने लवकरच त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज दिला जाणार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले. लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान आमदार थोरात यांना ताप आणि घशाच्या संसर्गाचा त्रास जाणवत होता, मात्र त्याकडे त्यांनी दुर्लक्ष करत आपल्या प्रचार सभा सुरूच ठेवल्या. त्यामुळे त्यांची प्रकृती अधिक बिघडत गेली. लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी जाहीर झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे ५ जून रोजी त्यांना जास्त त्रास होऊ लागल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. आता त्यांची प्रकृती सुधारत असून लवकरच त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज दिला जाणार…

Read More

शनिवार, दिनांक ८ जून २०२४ नाशिक जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय बिले पडताळणारा लिपिक ‘एसीबी’च्या जाळ्यात अडकला आहे. संशयित लिपिक आतिश भोईर याने ५ हजार रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारताच त्याला लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांनी पकडले. जिल्हा रुग्णालयात काेणतीही वैद्यकिय देयके मंजूर करण्यासाठी टक्केवारीने पैसे उकळले जात असल्याची चर्चा असतानाच आता एकूण बिलाच्या रकमेत सहा टक्के रक्कम घेऊन बीले मंजूर करणाऱ्या कनिष्ठ लिपिकास अटक झाली आहे. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. तक्रारी करून लाचलुचपत विभागाकडून (दि. ७) रोजी सापळा रचला. सायंकाळी सहा वाजता रुग्णालयात संशयित लिपिक आतिश भोईर याने ५ हजार रुपयांची लाचेची रक्कम स्विकारली. त्यास लाच घेताना रंगेहाथ पकडत त्याला ताब्यात…

Read More

शुक्रवार दिनांक ७ जून २०२४ १७ व्या लोकसभेचा कार्यकाळ १६ जून २०२४ रोजी संपणार आहे. लोकसभा निवडणूक पार पडली असून १८ वी लोकसभा अस्तित्वात येत आहे. सर्वात मोठा पक्ष ठरल्याने एनडीएचे (NDA) प्रमुख नरेंद्र मोदींना सरकार स्थापनेसाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून निमंत्रण देण्यात आले आहे. राष्ट्रपतींना एनडीच्या नेत्यांचे समर्थन पत्र मिळाले त्यानंतर आता राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान व केंद्रीय मंत्री परिषदेच्या अन्य सदस्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ ९ जून २०२४ ला संध्याकाळी सव्वा सात वाजता देतील. एनडीए गठबंधनचे नेते म्हणून निवड झाल्यानंतर नरेंद्र मोदींनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांच्या घरी भेट घेतली.…

Read More