Author: अनंत पांगारकर

सोमवार, दि. २७ मे संगमनेरमध्ये कंटेनर चालकाने कोल्हार-घोटी राज्य मार्गावर संगमनेरनजीक बुलेटस्वारांना दिलेल्या धडकेत बुलेटवरील दोघांचाही मृत्यू झाला आहे. अपघातानंतर चालक कंटेनर घेऊन फरार झाला. याप्रकरणी संगमनेर शहर पोलिसांनी अज्ञात कंटेनर चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. प्रशांत रवींद्र भुजबळ (वय ३३ वर्ष) व गोरख सयाजी पर्वत (वय ४० वर्ष, दोघे रा. निंबाळे, ता. संगमनेर) अशी अपघातातील मृतांची नावे आहेत. रविवारी रात्री सव्वादहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातातील मृतक त्यांच्या ताब्यातील बुलेट मोटरसायकलवरून (एम. एच. १४ एच. टी. ५००६) कोल्हार-घोटी राज्य मार्गाने संगमनेर-लोणी रोडने घरी जात असताना लोणी रस्त्यावर फ्लॉवर मार्केटजवळ अज्ञात कंटेनर चालकाने बुलेटस्वारांना पाठीमागून जोराची धडक दिली. अपघातातील…

Read More

सोमवार, दि. २७ मे व्हाट्सअप ग्रुपवर लोकमत न्यूजमधील व्हिडिओ टाकत त्याखाली टाकलेल्या एका मेसेजमुळे धार्मिक भावना दुखावल्या गेल्याने मेसेज टाकणाऱ्या विरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. नगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील तांदूळवाडी येथे हा प्रकार घडला. याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात अमोल चंद्रभान पेरणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आयुब लालखान पठाण (रा. तांदुळवाडी, ता. राहुरी, जि. अहमदनगर) याच्या विरोधात भारतीय दंड संहिता १८६० च्या कलम २९५ (अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पठाण याने गावातील एका व्हाट्सअप ग्रुप वर लोकमत न्यूजमधील सुमारे दोन मिनिटांचा व्हिडिओ टाकत त्याखाली “अखेर डाव साधलाच. केंद्रापाठोपाठ आता महाराष्ट्रातील खाजगीकरण केलय. रद्द केलेला जीआर पुन्हा काढण्यात आला आहे.…

Read More

रविवार, दि. २५ मे अपघातातील जखमीला उपचारासाठी रुग्णालयात घेऊन येणारी रुग्णवाहिका आणि एसटी बसचा संगमनेर तालुक्यातील कोकणगाव शिवारात भीषण अपघात झाला. यात एकाचा मृत्यू तर तिघे गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. रविवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. कोंची शिवारात अपघात झाल्याची माहिती मिळाल्याने येथील कुटे रुग्णालयाची रुग्णवाहिका (विंगर एम.एच. – १७ ए-जी ८००२) घटनास्थळी जखमींना आणण्याकरिता गेली होती. अपघातातील जखमी झालेल्या व्यक्तीला उपचारासाठी रुग्णालयात घेऊन येत असताना या रुग्णवाहिकेचा आणि एसटी बसचा (एम. एच. १४ बी.टी. ३८०३) कोकणगाव शिवारात अपघात झाला. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून तिघेजण जखमी झाले आहे. जखमीत रुग्णवाहिकेच्या चालकाचाही समावेश आहे.…

Read More

संडे स्पेशल फिनलँड हा उत्तर युरोपातला एक देश आहे. या देशाची लोकसंख्या फक्त पंचावन्न लाख आहे. इथली शिक्षणव्यवस्था निव्वळ जगावेगळी नसून ती जगातील सर्वात चांगली मानली जाते. फिनलँड शंभर टक्के साक्षर देश आहे. इथले विद्यार्थी जगात सर्वात जास्त हुशार विद्यार्थी म्हणून गणले जातात. पीआयएसए (प्रोग्रॅम फॉर इंटरनॅशनल स्टुडंट असेसमेंट) म्हणजे “पिसा” नावाची संस्था जगातल्या पंधरा वर्षांच्या शिकणाऱ्या मुलांचं गणित, विज्ञान आणि इतर विषयांच्या अनुषंगानं परीक्षण करते, त्या संस्थेच्या परीक्षेत फिनलँडचे विद्यार्थी कायम सर्वोच्च स्थानी असतात. या देशात शिक्षण पूर्णपणे मोफत असून ते सर्वांसाठी ते उपलब्ध आणि अनिवार्यसुद्धा आहे. या देशातील प्रत्येक विद्यार्थी आपलं संपूर्ण शिक्षण फुकट घेतो. त्यासाठी त्याला एकही…

Read More

रविवार, दि. २६ मे | अनंत पांगारकर खचल्यानंतर तब्बल दीड वर्ष नव्या निर्मितीच्या प्रतीक्षेत असलेल्या आणि निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वाजत गाजत केलेल्या भूमिपूजनानंतरही दीर्घकाळ रेंगाळलेला म्हाळुंगी नदीवरील पूल पाडण्यास अखेर मुहूर्त सापडला आहे. शनिवारपासून खचलेला पूल पूर्णतः नामशेष करण्यास सुरुवात झाली. यामुळे दीर्घकाळ गैरसोयीला सामोरे जाणाऱ्या संगमनेरकरांना नव्या पुलाच्या निर्मितीसाठी आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.  दरम्यान खचलेला हा पूल गेल्या दीड वर्षांपासून वाहतुकीसाठी पूर्णतः बंद होता. पुलाचा विषय राजकीय श्रेयवादात अडकल्याने संगमनेरकर यातून भेटीला धरले गेले होते. यासाठी म्हाळुंगी पूल बनाव कृती समितीच्या माध्यमातून एकवटलेल्या संगमनेरकरांना अखेर न्याय मिळाला आहे. समितीच्या माध्यमातून सातत्याने करण्यात आलेल्या मागणीमुळे केवळ हाच पूल…

Read More

संडे स्पेशल! पुण्यात झालेल्या ‘हिट अँड रन’ केसमध्ये एका बिल्डर व्यावसायिकाच्या अल्पवयीन मुलाने नशेत दीड ते दोन कोटी रुपयांच्या अतिशय महागड्या परदेशी बनावटीच्या कारने दोघांना चिरडले. त्यांचा अत्यंत दुर्दैवी पद्धतीने अंत झाला. घटनेतील दोषीला पोलिसांनी ताब्यात घेतले. आरोप असलेल्या बालगुन्हेगाराला (विधी संघर्षित बालक) ताब्यात घेऊन पोलिसांनी जुव्हेनाईल जस्टीस बोर्डासमोर हजर केले. त्याला बोर्डाच्या सदस्यांनी तात्काळ जामीन पुढील अटीवर दिला, अट ३०० शब्दांचा निबंध लिहिण्याची, मानसोपचार तज्ज्ञाचा सल्ला घेण्याची, १५ दिवस वाहतुकीचे धडे गिरवण्याची शिक्षा देऊन जामिनावर मोकळे केले. आरोपीला पोलिसांनी तसेच स्थानिक आमदारांनी मदत केली, असे आरोप करण्यात आले. ज्याने दोघांना चिरडलं, दोन कुटुंब उद्ध्वस्त केली, अशा प्रवृत्तीला ताब्यात घेतल्यावर…

Read More

ईडीच्या अधिकार्‍यांनी देशभर मांडलेल्या उच्छादाला सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्याने चांगलंच उताणं पाडलंय. सत्ताधार्‍यांची मर्जी राखण्यासाठी लोकशाहीची उघड थट्टा उडवणार्‍या या विभागातल्या अधिकार्‍यांना आणि सत्तेसाठी निरपराधांवर खोटे गुन्हे लादणार्‍या सत्ताधार्‍यांच्या मस्तीला जमिनीवर आणणार्‍या सर्वोच्च न्यायालयाचे मानावेत तितके आभार कमी आहेत. असे निवाडे देताना संबंधितांच्या कृतीची चिकित्सा करण्याचं फर्मान न्यायालय काढतं. मात्र यावेळी ते निघाले नाहीत. ते निघाले असते तर गब्बर झालेल्या ईडी अधिकार्‍यांच्या लुटीचे सारे फेरे बाहेर आले असते. या विभागात आल्यापासून कोण किती श्रीमंत झाला ते जगापुढे आलं असतं.   सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय प्रत्येक व्यक्तीच्या व्यक्ती स्वातंत्र्याला धरून आला असल्याने व्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालणार्‍यांनी किती कमाई केली, याचा लेखाजोखा बाहेर आणला…

Read More

शनिवार, दि. २५ मे  दरोडा टाकण्याच्या उद्देशाने दबा धरून बसलेल्या सहा जणांच्या टोळीतील चौघांना पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला रात्री यश आले असून उर्वरित दोघेजण मात्र अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी ठरले. पथकाने पकडलेले चौघे आणि पळून गेलेले दोघे सराईत गुन्हेगार आहे. ओसवाल इंपिरियअल चव्हाण (वय २८ वर्षे, रा. वाळुंज पारगांव, ता. जि. अहमदनगर), डेग विठ्ठल भोसले (वय २९ वर्षे, रा. आनंद चिखली, ता. आष्टी, जि. बीड, हल्ली रा. वाळुंज पारगांव, ता. जि. अहमदनगर), तुषार उर्फ नुटल्या इंपिरिअल भोसले (वय ३३ वर्षे, रा. वाळुंज पारगांव, ता. जि. अहमदनगर), व नागेश रेजा काळे (वय २५ वर्षे, रा. वाळुंज पारगांव, ता.…

Read More

शनिवार, दि. २५ मे  पंतप्रधान घरकुल आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर करून देण्यासाठी दहा हजार रुपयांची घेणाऱ्या ग्रामसेवक महिलेला अतिरिक्त सत्र न्यायालयाने ५ वर्षांची शिक्षा आणि २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. लाचेचे हे प्रकरण २०१७ मध्ये बारामतीच्या पंचायत समिती कार्यालयात घडले होते. पंतप्रधान घरकुल आवास योजनेतून घरकुल मंजूर करून देण्यासाठी सोनवडी-सुपेच्या (बारामती जि. पुणे) लोकसेवक ग्रामसेविका श्रीमती दिपाली जगन्नाथ कुतवळ (वय ३७ वर्ष) यांनी तक्रारदाराकडे दहा हजार रुपये लाचेची मागणी केली होती. दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना पुणे लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांनी पकडले होते. लाच लुचपतच्या तत्कालीन पोलीस निरीक्षक अर्चना दौंडकर यांनी तपास करत बारामती न्यायालयात आरोप पत्र दाखल केले होते. बारामतीच्या…

Read More

शनिवार, दि. २५ मे नगर शहरात घडलेल्या चैन स्नॅचिंग प्रकरणाचा तपास करणाऱ्या गुन्हे शाखेच्या पथकाला चोरीचे सोने विक्री करण्यासाठी बडी मज्जित मुकुंद नगर परिसरात एक संशयित आल्याची माहिती मिळाली. पथकाने संशयिताला पकडण्यासाठी या परिसरात लावलेल्या सापळ्यामध्ये दोघेजण पावणे दोन लाखाच्या मुद्देमालासह अलगद अडकले. त्यांच्या चौकशीत त्यांनी नगरच्या सावेडी, तारकपूर परिसरात केलेल्या गुन्ह्यांची कबुली दिली. सलीम ऊर्फ सलीमोद्दीन अजोलोद्दीन शेख (वय ५४) व जिशान सलीम ऊर्फ सलीमोद्दीन शेख वय २१, दोघे रा. नवीन विडी वसाहत, कुंभारी, जि. सोलापुर मुळ रा. कासीम बऱ्ही दर्गा, पढेगांव, जि. छत्रपती संभाजीनगर) असे पोलिसांनी पकडलेल्या दोन्ही संशयित आरोपींची नावे आहेत. यातील सलीम ऊर्फ सलीमोद्दीन अजोलोद्दीन शेख…

Read More