Author: अनंत पांगारकर

शुक्रवार, दि. २४ मे  बुधवार-गुरुवारी दोन दिवसात अकोले तालुक्यातील सुगावमध्ये प्रवरा नदीपात्रात बुडालेल्यांची संख्या सहावर गेली असताना संगमनेरमध्ये प्रवरा नदीपात्रात दोघा तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सायंकाळी समोर आली आहे. प्रवरा नदीचे या वेळचे आवर्तन अनेकांच्या जीवावर बेतले आहे. प्रचंड मोठ्या प्रमाणात उन्हाची तीव्रता जाणवत असताना नदीपात्रात आंघोळीसाठी जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे. मात्र नदीपात्रात वाळू तस्करांनी केलेल्या मोठमोठ्या खोल खड्ड्यामुळे पाण्याचा पोहणाऱ्यांना अंदाज येत नदीपात्रात वाळू तस्करांनी खोदलेले हे खड्डे नागरिकांसाठी मात्र जीव घेणे ठरत आहे. वाळू तस्करी थांबविण्यात अधिकाऱ्यांपासून मंत्र्यांपर्यंत कोणालाही यश आले नसल्याने तालुक्यातील सर्वच नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात वाळू तस्करी सुरूच आहे. सुगावमधील शोध कार्य…

Read More

शुक्रवार, दि. २४ मे  दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेच्या सुमारे ८१ कोटी रुपयांच्या आर्थिक घोटाळ्यातील प्रमुख आरोपी भाऊसाहेब कुटे याला आज संगमनेरच्या जिल्हा न्यायालयाने २९ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. आर्थिक गुन्हे शाखेच्या चौकशीत आता या घोटाळ्याच्या अनुषंगाने काय माहिती समोर येते याकडे लक्ष लागले आहे. दूधगंगा पतसंस्थेतील घोटाळ्याप्रकरणी २१ जणांविरुद्ध लेखापरीक्षकाने दिलेल्या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात विविध कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आर्थिक स्वरूपाचा गुन्हा असल्याने अहमदनगर आर्थिक गुन्हे शाखा या गुन्ह्याचा तपास करत आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून प्रमुख आरोपी असलेला कुटे पोलिसांना सापडत नव्हता. यामुळे आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. आरोपींच्या अटकेसाठी व…

Read More

शुक्रवार, दि. २४ मे  लोकसभा निवडणुकीदरम्यान जाहीर करण्यात आलेल्या आणि नंतर पुढे ढकलण्यात आलेल्या दोन शिक्षक व दोन पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकांची नवी तारीख जाहीर करण्यात आली असून आता या निवडणुका २६ जूनला होणार आहे तर १ जुलैला मतमोजणी होईल. विधान परिषदेच्या मुंबई व कोकण पदवीधर तसेच मुंबई आणि नाशिक शिक्षक मतदार संघातील विद्यमान आमदारांचा कार्यकाल पूर्ण झाल्याने या जागांसाठी निवडणूक होत आहे. यापूर्वी या जागांच्या निवडणुकीची घोषणा करण्यात आली होती मात्र शिक्षकांनी लोकसभा निवडणुकीचे कारण देत तारीख बदलण्याची मागणी केली होती. त्यामुळे ही निवडणूक रद्द करण्यात आली होती. आता पुन्हा नव्याने निवडणुकीच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. असा आहे…

Read More

गुरुवार, दि. २३ मे अकोले तालुक्यातील सुगावमध्ये पाण्यात बुडालेल्या तरुणांच्या शोधासाठी धुळ्याहून बोलवण्यात आलेल्या राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या (SDRF) पथकाची बोट उलटून झालेल्या दुर्घटनेत तीन जवानांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. शहीद झालेल्या या तिन्ही जवानांना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शासकीय इतमामात मानवंदना दिली. तसेच शहीद जवानांच्या नातेवाईकांना दहा लाख रुपयांची मदत देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. पीएसआय प्रकाश नाना शिंदे, कॉन्स्टेबल राहुल गोपीचंद पावरा आणि चालक वैभव सुनील वाघ अशी अशी बचाव कार्यावेळी पाण्यात बुडून शहीद झालेल्या व पंकज पंढरीनाथ पवार, अशोक हिम्मतराव पवार असे बचावलेल्या एसडीआरएफच्या जवानांची नावे आहे. संगमनेरचे प्रांताधिकारी शैलेश हिंगे, पोलीस उपअधीक्षक सोमनाथ…

Read More

गुरुवार, दि. २३ मे पुण्याच्या ड्रंक अँड ड्राईव्ह मधील अल्पवयीन आरोपीला न्यायालयाने जामीनावर सोडल्यानंतर त्याचा नवा कारनामा समोर आला आहे. बड्या बापाच्या या दिवट्याने आता रॅप सॉंग तयार करत लोकांना अश्लील शिवीगाळ केली असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. मद्यप्राशन करून भरधाव वेगाने किमती कार चालवत दोन जणांचा बळी घेणाऱ्या या दिवट्याविरोधात सर्वत्र संतापाचे वातावरण असतानाच त्याच्या या कृत्यामुळे आता त्याला नेमके कोणाचे आशीर्वाद आहे. असा प्रश्न निर्माण झाला आहे. एक दिन मे मुझे मिल गयी बेल… फिर से दिखाऊंगा सडक पे खेल, पुण्यातील बिल्डरपुत्राचा माज, अपघातानंतर चीड आणणारं कृत्य, बेल मिळाल्यानंतर शिवीगाळ करणारं रॅप साँग ऐका…. (महाराष्ट्र संवाद न्यूज या…

Read More

गुरुवार, दि. २३ मे  संगमनेरमधील पतसंस्था विश्वातील सर्वात मोठा आर्थिक ठरलेल्या दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेतील तब्बल ८१ कोटी रुपयांचा घोटाळा प्रकरणाचा प्रमुख सूत्रधार असलेला प्रतिष्ठित राजकीय नेता, माजी जिल्हा परिषद सदस्य व दूधगंगा संस्थेचा अध्यक्ष भाऊसाहेब दामोदर कुटे पोलिसांच्या ताब्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून, न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारल्यापासून गेल्या नऊ महिन्यांपासून कुटे फरार होता. कुटे गुरुवारी दुपारी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात हजर झाल्याची माहिती समोर येत असून त्याला पोलीस ठाण्याच्या वरच्या मजल्यावर बसविण्यात आले होते. कुटे याला ताब्यात घेतल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेला कळविण्यात आले असून आर्थिक गुन्हे शाखेचे अधिकारी संगमनेरमधून त्याला ताब्यात घेत अटक करतील अशी माहिती समजते.…

Read More

गुरुवार, दि. २३ मे इगतपुरीच्या भावली धरणात पाच जणांचा, उजनी धरणाच्या बॅक वॉटर मध्ये वादळी वाऱ्यामुळे प्रवासी बोट बुडाल्याने पाच जणांचे मृतदेह हाती आल्याची घटना ताजी असतानाच आता अहमदनगरच्या अकोले तालुक्यातील सुगावमध्ये प्रवरा नदीपात्रात बुडालेल्या दोघा तरुणांच्या शोधासाठी गेलेली एसडीआरएफ (SDRF) पथकाची बोट बुडून पथकातील तिघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बुडालेल्यापैकी एका तरुणासह तिघा जवानांचे मृतदेह हाती लागले आहे. तर अद्यापही दोघे सापडले नसून दोघांना रुग्णालयात दाखल केल्याची माहिती संगमनेरचे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी ‘महाराष्ट्र संवाद न्यूज’ला दिली आहे. अशी आहे घटना … सागर पोपट जेडगुले (वय २५ वर्ष, रा. धुळवड ता. सिन्नर) व अर्जुन रामदास…

Read More

गुरुवार, दि. २३ मे  दिवसेंदिवस व्याप्ती वाढत चाललेल्या नगर अर्बन बँकेच्या २९१ कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील कर्जदार आरोपी अमित वल्लभराय पंडितला औरंगाबाद उच्च न्यायालयाचे सुट्टीतील न्यायाधीश संजय देशमुख यांनी बुधवारी अंतरीम जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे दोन महिन्यापासून अटकेत असलेल्या पंडितचा कोठडीतून सुटण्याचा मार्ग मोकळा झाला. या अटींवर जामीन मंजूर… १ लाख रुपयांच्या वैयक्तिक जात मुचलक्यावर तीन महिन्यांसाठी जामीन. आरोपी पंडित याला जामिनावर मुक्त होताच १५ दिवसाच्या आत २ कोटी तर त्यानंतरच्या ३ महिन्याच्या कालावधीत ८ कोटी ६४ लाख ३३ हजार ०४७ रुपये भरावे लागणार आहेत. पासपोर्ट जमा करावा लागेल. ट्रायल कोर्टाच्या परवानगीशिवाय देश सोडता येणार नाही. जामिनावर सुटताच ईमेल आयडी…

Read More

बुधवार, दि. २२ मे वाळू तस्करांकडून श्रीरामपूरमध्ये पोलिसाच्या अंगावर ट्रॅक्टर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना ताजी असतानाच आता सहाय्यक पोलीस अधीक्षकांच्या पथकाला धक्काबुक्की करून दमदाटीने वाळूची चोरटी वाहतूक करणारा ट्रॅक्टर पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणातील धक्कादायक बाब म्हणजे एका पोलीस पाटलानेच हे ट्रॅक्टर पळवून लावण्यात वाळू माफियांना मदत केली असल्याचे समोर आले आहे. श्रीरामपूर येथील सहाय्यक पोलीस अधिक्षक जीवन बेनीवाल यांना महांकाळ वडगाव शिवारात गोदावरी नदीपात्रात एक ट्रॅक्टर अवैधरित्या वाळूची चोरटी वाहतूक करत असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस अधिक्षक बेनीवाल यांनी सोमवारी पोलीस कॉन्स्टेबल रोहिदास आंधळे, पोलीस नाईक अनिल शेंगाळे, पोलीस कॉन्स्टेबल संभाजी…

Read More

मंगळवार, दि. २१ मे  रिक्षातून फिरण्यासाठी धरणावर गेलेल्या एकाच कुटुंबातील ५ पाच जणांचा धरणात बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मृतांमध्ये दोन तरुण आणि तीन तरुणींचा समावेश असून हे सर्वजण नाशिकच्या नाशिक रोड येथील गोसावीवाडीतील रहिवाशी आहेत. इगतपुरीच्या भावली धरणात मंगळवारी सायंकाळी या सर्वांचा बुडून मृत्यू झाला. समजलेल्या माहितीनुसार अनस खान दिलदार खान (वय १५), नाझिया इमरान खान (वय १५), मीजबाह दिलदार खान (वय १६), हनीफ अहमद शेख (वय २४), ईकरा दिलदार खान (वय १४) अशा तीन मुली व दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. इगतपुरी पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने पाचही जणांचे मृतदेह बाहेर काढले. उन्हाळ्याचे दिवस असल्याने कडक उन्हापासून…

Read More